राज्यातील शेतकरी असा करू शकतात शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर

आज तंत्रज्ञानाचे जागतिक स्तरावर प्रत्येक क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती केलेली आहे. याला कृषी क्षेत्र सुद्धा अपवाद नाही. आता आपल्या राज्यात सुद्धा शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर होताना दिसून येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर केल्याने बरेच फायदे शेतकऱ्यांना होतात. शेतीतील ai technology च्या प्रभावी वापरामुळे चीन, जपान, अमेरिका यांसारख्या देशांनी पिकांच्या उत्पादनात वाढ तर केलीच आहे, शिवाय पिकांत विविधता सुद्धा आणली आहे.

आपला देश सुद्धा आता कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर करायला काही मागे नाही. हळूहळू का होईना मात्र शेतीतील ai technology सोबत परिचित होऊन बरेच सधन शेतकरी तसेच विविध कृषी संस्था शेती व्यवसायाला अधिकाधिक फायदेशीर आणि कमी कष्टाची करत आहेत. चला तर या माहितीपूर्ण लेखातून जाणून घेऊया शेतकरी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर कशाप्रकारे करू शकतात आणि या शेतीतील ai technology चा वापर करण्याचे काय फायदे शेतकऱ्यांना मिळतात या सर्व महत्वपूर्ण बाबींची सविस्तर माहिती.

शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता कशी वापरावी?

शेतकरी मित्रांनो तुमच्या मनात या नवीन तंत्रज्ञानाबद्दल अनेक प्रश्न असतील. आणि वैयक्तिकरीत्या या सर्व टेक्नॉलॉजीचा वापर सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्यात आहे का असा सुद्धा ज्वलंत प्रश्न तुमच्यासमोर येत असेल. या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत देण्याचा आणि विशेषकरून ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर केल्यामुळे काय फायदा होईल याबाबत या लेखात सविस्तरपणे अशा संभ्रमित शेतकऱ्यांचे पुरेपूर समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर सर्वात आधी जाणून घेऊया शेतीतील ai technology आहे तरी काय आणि या आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती.

राज्यातील शेतकरी असा करू शकतात शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर

हवामानाचा अंदाज ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर

आजकालच्या काळात निसर्ग बेभरवशाचा झाला आहे यात शंका नाही. अचानक पडणारा मुसळधार पाऊस, गारपीट, धुके इत्यादी कारणांमुळे पिकावरील रोगाचे प्रमाण तर वाढते. एकदा का पिकावर रोगाचे सावट पसरले की त्याचा पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घसरण होते. आता असे वारंवार घडत असते. या सर्व नैसर्गिक आव्हानाचा सामना करण्यासाठी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर करून अचानक येऊ घातलेल्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीपिकाचे होणारे नुकसान कमी कसे करता येईल, याची दक्षता घेणे फार गरजेचे असते. यासाठी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर खूप महत्वाचा ठरतो.

राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी हवामानाची माहिती देणाऱ्या हवामान केंद्रांची उभारणी करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आज काळाची गरज आहे. हवेची दिशा, गती, हवेत असलेले कीटक, रोग इत्यादी आवश्यक गोष्टींची माहिती हवामान केंद्रामुळे सहज उपलब्ध होते. ही माहिती संगणकावर संकलित करून या माहितीच्या आधारे येत्या काही दिवसांतील हवामानाचा अंदाज ओळखता येऊ शकतो. एवढेच नव्हे तर अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करून शेती पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी काय करावे, याचा सल्ला सुद्धा संगणकात संकलित केलेल्या माहितीच्या आधारे मिळू शकतो.

राज्यातील शेतकरी असा करू शकतात शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर

ड्रोनच्या साहाय्याने खत अन् औषध फवारणी

हवामानाचा अंदाज घेणे हे एवढेच कार्य म्हणजे शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर आहे असे नव्हे. तर शेतीत विशिष्ट पिकाची लागवड केल्यास हवामान बदलाच्या काळात त्या पिकासाठी उपयुक्त असणारी कोणती औषधे वापरायची, त्या औषधांची योग्य मात्रा किती द्यायला हवी, वाऱ्याचा वेग आणि दिशा कोणती आहे याची माहिती शेतकऱ्यांना आधीच प्राप्त झाली असल्याने त्यांना त्यांच्या शेतीत औषधाचा वापर ड्रोनच्या माध्यमातून करता येऊ शकतो. यामुळे मनुष्यबळ वाचते. आणि वेळ सुद्धा कमी लागतो.

जाणून घ्या शेतीविषयक ड्रोनचे विविध प्रकार आणि त्यांचा वापर

सेन्सरच्या साहाय्याने शेतीपिकाच्या या गोष्टींचं मिळवता येईल ज्ञान

शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर करून पिकामध्ये साखरेचे प्रमाण किती आहे, पिकाच्या परिपक्वतेचा कालावधी किती आहे याची माहिती अत्याधुनिक सेन्सरच्या साहाय्याने संकलित केल्या जाऊ शकते. शेतजमिनीत नत्र, पालाश, स्फुरद यांचे प्रमाण किती आहे तसेच शेतात लागवड केलेल्या पिकासाठी कोणत्या मूलद्रव्याची आवश्यकता आहे अन् ते मूलद्रव्य किती प्रमाणात देण्याची गरज आहे या सर्व उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण बाबींची माहिती शेतकऱ्याला उपलब्ध होते.

राज्यातील शेतकरी असा करू शकतात शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर, रिमोट सेन्सर र

आता रिमोट सेन्सर पद्धतीने होणार पिकांची पाहणी, पिकविम्याचे पैसे वेळेवर मिळणार

पिकाला पाण्याची किती गरज आहे, शेतजमिनीत भूजल पातळी तसेच पाण्याचा ओलावा किती फुटांपर्यंत आहे, आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार लिकल्स पाणी किती प्रमाणात द्यावे लागणार आहे, या सर्वच प्रश्नांची उत्तरे देणारी माहिती ही शेतातील सेन्सरच्या माध्यमातून संगणकावर संकलित करता येऊ शकते. आणि याच माहितीचा प्रभावी वापर करून पीकाचे योग्यप्रकारे नियोजन करता येणे सहजशक्य आहे. याशिवाय खताचे नियोजन आणि पाण्याचे नियोजन सुद्धा योग्यप्रकारे करता येणार आहे. असे केल्यास शेतीत दिल्या जाणाऱ्या आवश्यकतेपेक्षा जास्त पाण्याचा वापर टाळता येऊ शकतो. त्याचबरोबर रासायनिक खतावर होणारा खर्च सुद्धा कमी होतो.

एआय मुळे शेती क्षेत्रात होणार अमुलाग्र सकारात्मक बदल

शेतात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर जर शेतकऱ्यांना प्रशिक्षण घेऊन यशस्वीपणे करता आला, तर शेतीचे उत्पन्न तब्बल 40 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. चीन, जपान , अमेरिका, इस्रायल या देशांतील शेतकऱ्यांनी ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये सुद्धा सुमारे 20 ते 30 टक्के कपात केल्या जाऊ शकते. याशिवाय खतांवर होणाऱ्या खर्चात तब्बल 30 ते 35 टक्क्यांपर्यंत शेतकऱ्यांची बचत होऊन शेतकऱ्यावरील अतिरिक्त आर्थिक ओझ कमी होणार आहे.

शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर प्रभावीपणे करून शेतकऱ्यांना पिकावरील कीड आणि अळीचे नियंत्रण प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून करण्याची संधी मिळाल्याने मावा, तुडतुडे यापासून होणारे पिकांचे नुकसान सुद्धा टाळता येणार आहे. यात आवश्यक तेवढ्याच प्रमाणात म्हणजेच मर्यादित स्वरूपात कीटकनाशकांचा वापर होत असल्यामुळे जमिनीतील परोपजीवी कीटकांचा नायनाट होण्याचा धोका टळून जमिनीचा दर्जा सुद्धा सुधारणार आहे. इत्यादी अनेक प्रकारचे फायदे शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर करून म्हणजेच या अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सधन ते सामान्य शेतकऱ्यांना होणार आहेत.

राज्यातील शेतकरी असा करू शकतात शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर, रिमोट सेन्सर र

शेतकऱ्यांच्या समूहाने एआय तंत्रज्ञानाची उभारणी शक्य

वरील सर्व बाबींचा विचार केल्यानंतर तुम्हाला शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर खूपच लाभदायक आहे हे पटल असेलच. मात्र तुमच्या मनात एक शंका असेल की शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर करण्यासाठी ती अत्याधुनिक यंत्रे आणावी लागणार. आणि ती यंत्रे निश्चितच खूप महाग असणार यात शंका नाही. अशा परिस्थितीत सामान्य शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा काय फायदा? तर मित्रांनो यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न महत्वाचे ठरणार आहेत.

विविध योजना आणि प्रोत्साहनपर अनुदान आता शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना मिळायला सुरूवात झाली आहे. याचे उदाहरण म्हणजे केंद्र सरकार सध्या ड्रोन विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या गटाला 10 लाख रुपये अनुदान देत आहे. तर शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर सर्वच शेतकऱ्यांना वैयक्तिक दृष्ट्या जरी शक्य नसला तरी प्रत्येक भागातील शेतकऱ्यांनी त्यांचा एक समूह तयार करून या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समाविष्ट यंत्रसामग्री नक्कीच त्यांच्या शेतात आणता येऊ शकते. आणि सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या गटाला आर्थिक मदत करण्यास नेहमीच सकारात्मक पाहायला मिळते.

शेतीतील ai technology चा प्रत्यक्ष डोळ्यांनी वापर पाहण्याची सुवर्णसंधी

शेतकरी बांधवांनो येत्या 16 ते 20 जानेवारी दरम्यान देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांकडून बहुप्रतिक्षित असलेल्या बारामती कृषी प्रदर्शन 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी शेतीत कृत्रिम (बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा प्रभावी वापर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता यावा यासाठी विविध प्रकारची शेतीतील ai technology ची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. या बारामती कृषी प्रदर्शन मध्ये राज्यातीलच काय तर देश विदेशातील सुमारे अडीच ते तीन लाख शेतकरी सहभागी होणार आहेत.

तुम्हाला सुद्धा या प्रदर्शनात शेतीबद्दल अनेक अशा महत्वपूर्ण गोष्टींची आणि तंत्रज्ञानाची माहिती होईल की जी शक्य आहे यावर तुमचा विश्र्वासच बसणार नाही. जर तुम्ही नवनवीन तंत्रज्ञान वापरून होणाऱ्या शेतीत स्वारस्य ठेवत असाल तर हे कृषी प्रदर्शन तुमच्यासाठी एक पर्वणीच ठरेल. शक्य असल्यास या बारामती कृषी प्रदर्शन 2025 मध्ये नक्की सहभागी व्हा.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!