शेतीविषयक ड्रोनचे प्रकार

आजच्या या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात शेतीत सुद्धा अनेक क्रांतिकारी बदल घडत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान उदयास येत आहे. शेतीविषयक ड्रोनचे प्रकार आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. अलिकडच्या काही वर्षांत कृषी उद्योगाने उत्पादकता आणि कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी करून तांत्रिक क्रांतीचा जो ध्यास घेतला आहे, त्यामुळेच शेती व्यवसायामध्ये ड्रोनचा वापर अतिशय लाभदायक ठरत आहे.

ड्रोन मध्ये असलेली अत्याधुनिक भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) सारख्या प्रभावी तंत्रज्ञानामुळे या मानवरहित हवाई वाहनांनी म्हणजेच ड्रोनचा वापर शेतकऱ्यांना विविध बाबतीत अत्यंत लाभदायक ठरत आहे. तर शेतकरी मित्रांनो या शेतीविषयक ड्रोनचे प्रकार एकूण किती आहेत म्हणजेच किती प्रकारच्या ड्रोनचा वापर आपण आजच्या युगात शेतीसाठी करू शकतो आणि आधुनिक शेतीकडे वाटचाल करू शकतो याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.

तर शेतकरी मित्रांनो एकूण 4 शेतीविषयक ड्रोनचे प्रकार आहेत जे जगभरात प्रगत शेती करण्यासाठी वापरले जातात. शेतीविषयक ड्रोनचे प्रकार जाणून घेण्यापूर्वी आपण शेतीविषयक ड्रोनचे फायदे काय आहेत याबद्दल थोडी माहिती बघुया.

भारतात बहुतांश लोकांचा प्राथमिक व्यवसाय शेती किंवा शेतीवर अवलंबून इतर व्यवसाय हे आहेत. आज जग झपाट्याने प्रगती करत आहे. शेतीच्या क्षेत्रात सुद्धा अनेक नवनवीन प्रगत यंत्रांचा समावेश होत आहे. परिणामी शेतीची मशागत तसेच शेतीतून भरघोस उत्पादन घेणे शक्य होत आहे. सद्यस्थितीत शेतीविषयक ड्रोनचे प्रकार एकूण चार असून यांच्या वापरामुळे अनेक फायदे शेतकऱ्यांना होऊ शकतात.

शेतीविषयक ड्रोनचे प्रमुख फायदे सांगायचे झाल्यास हवामानात वेळोवेळी होणाऱ्या बदलांचा आढावा घेऊन नुकसान कमी करता येते. तसेच पिकांचे घरी बसून नियंत्रण करता येणे शक्य होते. याशिवाय जिओ फेन्सिंग, पिकांच्या वाढीच्या निरीक्षणाची अचूकता, शेतजमिनीचे परीक्षण, रसायनांच्या वाढत्या वापराची वेळीच माहिती आणि नियंत्रण, पिकांवर पडणाऱ्या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी शेतीविषयक ड्रोनचा वापर अत्यंत कार्यक्षम ठरत आहे. चला तर बघुया शेतीविषयक ड्रोनचे प्रकार.

1) फिक्स्ड-विंग ड्रोन

फिक्स्ड-विंग ड्रोन हे मोठ्या प्रमाणात कृषी ऑपरेशन्ससाठी एक प्रमुख पर्याय म्हणून सध्याच्या काळात समोर आले आहेत कारण ते विस्तीर्ण शेतीची क्षेत्रे अत्यंत कार्यक्षमतेने नियंत्रित करण्याची क्षमता या ड्रोन मध्ये पाहायला मिळते. या शेतीविषयक ड्रोनचे शेतीत खूप महत्व आहे. रोटरी-विंग ड्रोन पेक्षा वेगळे दिसणारे फिक्स्ड-विंग ड्रोन हे पारंपारिक विमानांसारखे दिसतात. तसेच त्यांची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी योग्यरीत्या डिझाइन केलेले असतात. हे शेतीविषयक ड्रोन प्रगत GIS सेन्सरसह सुसज्ज करण्यात आलेले असतात. उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा काढण्याचे कार्य हे फिक्स्ड-विंग ड्रोन करतात. परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्या शेताबद्दल तपशीलवार स्थानिक डेटा गोळा करता येणे सहजशक्य होते.

शेतीविषयक ड्रोनचे प्रकार

2) रोटरी-विंग ड्रोन

रोटरी-विंग ड्रोन हे सामान्यत: क्वाडकॉप्टर्स किंवा हेक्साकॉप्टर्स म्हणून ओळखले जातात. त्यांच्या उभ्या टेक-ऑफ आणि लँडिंग क्षमतेद्वारे ते शेतीसाठी अत्यंत कार्यक्षम ठरतात. रोटरी-विंग ड्रोन हे वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या गरजांसाठी वापरल्या जातात. रोटरी-विंग ड्रोन हे मुख्यत्वेकरून लहान शेतात किंवा अनियमित भूप्रदेश असलेल्या शेती क्षेत्रांसाठी अतिशय योग्य ठरतात. रोटरी-विंग ड्रोनच्या साहाय्याने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे जवळचे अधिक तपशीलवार दृश्य घेता येते. आणि त्यानुसार देखरेख करता येते.

जाणून घ्या तव्याचा नांगर का वापरला जातो आणि काय आहेत फायदे

3) हायब्रीड ड्रोन

शेतकरी मित्रांनो तिसऱ्या प्रकारचा जो शेतीविषयक ड्रोनचे प्रकार आहे तो म्हणजे हायब्रीड ड्रोन. इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे नावाप्रमाणेच या प्रकारचा ड्रोन हा फिक्स्ड-विंग आणि रोटरी-विंग या दोन्ही प्रकारांचा हायब्रीड प्रकार आहे. या दोन्ही ड्रोनच्या मॉडेल्सचे फायदे या ड्रोन व्दारे शेतकऱ्यांना मिळतात. हे ड्रोन उभ्या टेक-ऑफ आणि लँडिंगसाठी सक्षम असतात त्यामुळे या ड्रोनची कार्यक्षमता आणि सहनशक्ती देखील खूपच जास्त असते. हायब्रीड ड्रोन विशेषत: वैविध्यपूर्ण टोपोग्राफी असलेल्या मोठ्या आकाराच्या विस्तृत शेतांसाठी खूपच परिणामकारक तसेच लाभदायक ठरत आहेत.

4) व्हीटीओएल (व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग) ड्रोन

शेतकरी बांधवांनो आतापर्यंत आपण तीन शेतीविषयक ड्रोनचे प्रकार जाणून घेतले आहेत. आता शेतीविषयक ड्रोनचा चौथा प्रकार म्हणजे व्हीटीओएल ड्रोन. हे रोटरी-विंग ड्रोन प्रमाणेच उभ्या उभ्या टेक ऑफ आणि लँडिंगसाठी डिझाइन केलेले आहेत. मात्र शेतीच्या मोठ्या क्षेत्रात कार्यक्षम ठरणारे हे ड्रोन मोठमोठ्या शेतकऱ्यांकडून बहुधा मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. या शेतीविषयक ड्रोनमध्ये असलेली दुहेरी कार्यक्षमता म्हणजेच VTOL ड्रोन विशेषत: अशा परिस्थितीत प्रभावी बनवते जिथे चपळता आणि हवामानाशी अन् प्रतिकूल परिस्थितीतही कुशलतेने कार्यक्षम राहण्याची सहनशक्ती दोन्ही गोष्टी आवश्यक असतात.

सध्याचा काळात ड्रोनचा वापर हळूहळू शेतीच्या क्षेत्रात वाढत असून त्यांची किंमत जास्त असल्यामुळे सामान्य शेतकऱ्यांपर्यंत हे ड्रोन अजून पोहोचले नाहीत. मात्र सरकार सुद्धा शेतीविषयक ड्रोनचा वापर वाढावा यासाठी अनेक योजना घेऊन येत आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी विशिष्ट अनुदान प्रदान करण्यात येते. शेतकरी बांधवांनी नेहमीच शेतीला आधुनिकतेकडे नेण्याची गरज आहे जेणेकरून शेती फायद्याची ठरेल आणि बळीराजा आपली आर्थिक उन्नती साध्य करून सुखी होऊ शकेल.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment