कष्टाने पिकविलेल्या कोबी पिकावर ट्रॅक्टर घालून पिक केले नष्ट

दिवस रात्र कष्टाने पिकविलेल्या पिकावर नांगर चालविण्याची पाळी जेव्हा एखाद्या शेतकऱ्यावर येते, तेव्हा त्या शेतकऱ्याच्या मनाला किती असह्य वेदना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. अशीच एक घटना गडहिंग्लज तालुक्यातील खणदाळ येथे घडली आहे. येथील शेतकऱ्याने कोबी पिकावर ट्रॅक्टर चालवून एक एकर शेतातील संपूर्ण कोबीचे पीक नष्ट केले. त्यावेळी या शेतकऱ्याचा राग आणि संताप काय असेल तसेच मेहनत आणि पैसा वाया गेल्याच दुःख काय असेल हे एक शेतकरी म्हणून आपण नक्कीच समजू शकता. गडहिंग्लज तालुक्यातील खणदाळ येथील कुमार पाटील या युवा शेतकऱ्यावर स्वतःच्याच शेतातील कोबी पिकावर ट्रॅक्टर चालवून पिक नष्ट करण्यासारखा टोकाचा निर्णय घेण्याची पाळी का आली हे जाणून घेऊया.

कोबी पिकावर ट्रॅक्टर घालून केले नष्ट

या कारणामुळे फिरवला कोबी पिकावर ट्रॅक्टर

गडहिंग्लज तालुक्यातील खणदाळ या गावात राहणारे शेतकरी कुमार पाटील त्यांच्या एकर शेतीत सुमारे चाळीस हजार रुपये खर्च करून कोबी पिकाची लागवड केली होती. लागवडीनंतर जवळपास 80 दिवसांनंतर हे पीक काढणीला आले. त्यांनी काढणी करून यातील दहा पोती कोबी कोल्हापूर येथील ठोक बाजारात विक्रीसाठी पाठवला. परंतु त्या ठिकाणी कोबीची आवक जास्त झाल्याने मालाची विक्री होऊ शकली नाही. परिणामी कोबी भरलेला ट्रॅक्टर त्यांना परत आणावा लागला. यात त्यांचा वाहन भा खर्च वाया गेला.

त्यानंतर कुमार पाटील यांनी कर्नाटकातील संकेश्वर येथील ठोक बाजारात ही कोबी पाठवली. मात्र संकेश्र्वर येथे सुद्धा हीच परिस्थिती दिसून आली. यावेळी पुन्हा हा माल परत आणून फुकटचा खर्च होणार होता. मात्र कोबीच्या भावात घसरण झाल्याने किलोला तीन रुपये एवढा कवडीमोल दर मिळत होता. या पडलेल्या दरामुळे फक्त सहाशे रुपयांचीच त्यांच्या कोबीचे मिळाले. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो की चाळीस हजार रुपये खर्च करून केलेल्या शेतीतून केवळ सहाशे रुपये मिळविण्याची वेळ जेव्हा कोणत्याही शेतकऱ्यावर येते त्यावेळी मनस्थिती ठिकाणावर राहत नहीं कुमार पाटील यांच्यावर अशी बिकट परिस्थिती ओढवल्यामुळे त्यांचा फार संताप झाला. आणि त्यातूनच त्यांनी त्यांच्या शेतातील कोबी पिकावर ट्रॅक्टर चालवून पिक पूर्णपणे उध्दवस्त केले.

कष्टाने पिकविलेल्या कोबी पिकावर ट्रॅक्टर घालून पिक केले नष्ट

भाजीपाल्याच्या दरातील चढउतारामुळे कोबी पीक ठेवून काही अर्थ नाही असा निर्णय त्या संतापाच्या भरात त्यांनी घेतला. आणि घरी आल्या आल्याच हताश होऊन कुमार पाटील यांनी कोबी पिकावर ट्रॅक्टर घातले. शेतातील कोबी रोटर मशीन फिरवत सर्वच्या सर्व पीक उद्ध्वस्त केले. भाजीपाल्याला चांगला दर मिळेल या आशेने शेतात पेरलेल्या कोबी पिकावर ट्रॅक्टर फिरवून त्याचे खत करण्याची बिकट वेळ कुमार पाटील या शेतकऱ्यावर आली.

बळीराजा संतापला, उध्दवस्त केलं स्वतःच्या शेतातील उभ कोथिंबीर पिक

भाजीपाल्याच्या दरात चढ उतार अन् शेतकऱ्याच्या जीवावर टांगती तलवार

सध्या भाजीपाला दरात प्रचंड चढ उतार दिसून येत आहे. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी कोबीला बाजारात पंचवीस रुपये इतका दर मिळत होता. परंतु त्यावेळी कुमार पाटील यांच्या शेतातील पीक काढणीला आलेले नव्हते. जेव्हा पिकाची काढणी केली त्या वेळी कोबीचा भाव अचानकच घसरला. कोबीचा प्रती किलोमागे सध्याला तीन रुपये दर मिळत आहे. संकेश्वर, कोल्हापूर बाजारपेठांमध्ये माल पाठविण्यासाठी त्यांना भुर्दंड पडला तो वेगळाच. कोबीला भावच मिळत नसल्याने या शेतकऱ्याकडे दुसरा पर्यायच शिल्लक नसल्याचे पाहून त्यांनी जड अंतकरणाने त्यांच्या शेतातील कोबी पिकावर ट्रॅक्टर फिरवला अन् संपूर्ण पीक नष्ट केले. अशी परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवते हे ऐकून एक शेतकरी म्हणूनच काय तर एक माणूस म्हणून सुद्धा प्रचंड दुःख होते.

शेजारील भांडखोर शेतकरी शेतीला रस्ता देत नाही, असा करा त्याचा कायदेशीररीत्या बंदोबस्त

कष्टाने पिकविलेल्या कोबी पिकावर ट्रॅक्टर घालून पिक केले नष्ट

सरकारने यात लक्ष घालायला हवे

बळीराजाने अत्यंत काबाडकष्ट करून दोन पैसे हातात येतील या आशेने पिकविलेल्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचा हा प्रश्न सोडविणे खुच गरजेचे आहे. शेतकरी जगला तरच जग जगेल. शेतकऱ्यांना त्यांच्या खांद्यावर बळकट हात असला की ते देशाची आर्थिक प्रगती करण्यात सर्वात पुढे असतील यात शंका नाही. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकरी वर्ग हा पिकांचे नुकसानच जास्त भोगत आहे. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नैराश्यात जिवन व्यतीत करत आहे.

कधीकधी निसर्गाने साथ देऊन पिकाचे चांगले उत्पादन मिळते त्यावेळी पिकाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी अशा बिकट परिस्थितीत काय करावे? निदान या प्रश्नांचे उत्तर तरी सरकारने द्यावे. असेच सुरू राहिले तर जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणारा बळीराजा मात्र खचून जावून आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलून स्वतःच मातीत जाईल हे मात्र नक्की.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!