गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम अन् गावाकडची ओढ पाहून वाटेल कौतुक

महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी महाराष्ट्राच्या संगीतात दिलेले योगदान अतुल्य आहे. त्यांच्याच पावलांवर चालून आज त्यांचे दोन्ही मुले आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे हे सुद्धा यशस्वी गायक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. आज करोडपती असलेल्या या गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम आपल्याला विचार करायला भाग पाडेल. माणूस श्रीमंत झाला की तो शक्यतो गाव सोडतो. आणि शेतीकडे तर ढुंकूनही पाहत नाही. मात्र शिंदे कुटुंब याला अपवाद आहे.

आजही त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या छोट्याशा गावात ते आजही वेळात वेळ काढून ये-जा करत असतात. इतकेच काय तर आनंद शिंदे यांना सुद्धा शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मूळ गावात शेती खरेदी केली होती. आज आपण या छोट्याशा लेखामधून या गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं किती अगाध आहे आणि आजही मातीशी नाळ जोडलेलं हे एक आदर्श घेण्यासारख कुटुंब आहे, याबद्दल रोचक माहिती जाणून घेणार आहोत.

गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम

डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी केली एक भावूक पोस्ट

आनंद शिंदे आणि त्यांचे दोन्ही मुले आणि परिवार आजही एकत्र करून राहतो. इतके मोठे होऊनही या कुटुंबातील कुठ्ल्याही सदस्याला कणभर सुद्धा गर्व नाही. गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम आणि गावाची ओढ दिसून आली ते त्यांचा धाकटा सुपुत्र उत्कर्ष शिंदे यांनी केलेल्या एका इंस्टाग्राम पोस्ट वरून. डॉ.उत्कर्ष शिंदे यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये त्यांना त्यांच्या मंगळवेढा गावाबद्दल असलेली ओढ आणि आजही या गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम या महत्वाच्या आणि संस्कार युक्त भावनांना वाट करून दिली.

इंस्टाग्राम पोस्ट मधून दिसली गावाकडची ओढ

गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम जाणून घ्यायचे झाल्यास डॉ. उत्कर्ष शिंदे यांच्या पोस्टमधील त्यांचे विचार जाणून घेणे आवश्यक आहे. या भावूक करणाऱ्या पोस्ट मध्ये डॉ. उत्कर्ष शिंदे लिहितात की, आम्ही भावंडांनी शेती विकली नाय तर राखली आणि आता वाढवली. पिढ्या पुढे सरकतात, वारसा पुढे जातो, वडिलोपार्जित कोणाला धन, कोणाला पैसा, कोणाला घर, जागा तर कोणाला मळा मिळतो. उत्कर्ष आणि आदर्श यांना पूर्वजांकडून मेहनत करुन नाव कमवायचे संस्कार मिळाले. पिढ्यांना पिढ्याची, रसिकांच्या प्रेमाची शक्ती आणि त्याच शक्तीच्या जोरावर आज त्यांच्या शिंदे नावाचं शिंदेशाही घराणं झालं.

गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम

शिंदे कुटुंबाचा संघर्ष अगाध मात्र जिद्दीने कमावलं नाव

आजच्या या लेखातून आपण गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम आणि त्यांची गावाकडची ओढ याबद्दल रोचक आणि अनुकरणीय अशी माहिती देत आहोत. आज राज्यातच काय तर संपूर्ण देशात आपल्या कर्तबगारीचा डंका वाजविणारे आनंद शिंदे यांचे दोन्ही पुत्र यशस्वी गायक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. उत्कर्ष शिंदे हे एक एमबीबीएस डॉक्टर आहेत. मात्र यशाच्या उत्तुंग शिखरावर असताना सुद्धा त्यांचे विचार किती उच्च दर्जाचे आहेत याची प्रचिती येते. तसेच शिंदे कुटुंबाबद्दल त्यांच्या चाहत्यांचे असलेले प्रेम हे फक्त अप्रतिम गायकीबद्दलच नाही तर त्यांच्या या उच्च गुणांमुळे सुद्धा आहे हे सिद्ध होते.

गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम, गावाकडची शेती

चला जवळून बघुया अजित पवार यांची शेती, फार्महाऊस, गोठा अन् उसाची शेती

आई वडिलांनी कष्टाने घेतलेली जमीन आम्ही दोन्ही भावंडांनी वाढवली

डॉ. उत्कर्ष शिंदे त्यांच्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये पुढे म्हणतात की, त्यांच्या आई वडिलांना म्हणजेच आनंद शिंदे आणि विजया शिंदे यांना त्यांच्या गावात शेती नसल्याची नेहमी खंत असायची. मात्र जेव्हा आनंद शिंदे एक उमदा गायक म्हणून नावारूपाला आले तेव्हा त्यांनी गावात शेती घेतली. आणि आज प्रसिद्ध गायक डॉ. उत्कर्ष शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी दोघांनी मिळून वडिलांनी घेतलेल्या शेतीला जोड म्हणून अधिक शेती घेऊन त्यांच्या गावातील पूर्वजांच्या आठवणी आणि शेतीची आवड जपली.

आजही गावची शेती पिकवत आहे शिंदे कुटुंब अन् शेतीत बांधले टुमदार घर

आज रोजी शिंदे कुटुंबियांच्या मंगळवेढा या मूळ गावात त्यांची बरीच शेती आहे. इतकंच काय तर दोघं भावांनी मिळून टुमदार अस फार्महाऊस सुद्धा बांधलं आहे. त्यांच्या रील मध्ये शेतात हरभरा सुद्धा डोलताना दिसत आहे. वेळ मिळेल तेव्हा शिंदे कुटुंब गावाकडे जायला आतुर असते. यावरून तुम्हाला गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम आणि गावाकडची ओढ याची प्रकर्षाने जाणीव होईल.

शिंदे कुटुंबीयांचे संघर्षाचे दिवस अन् कष्टाने निर्माण केलेले आजचे वैभव

डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी या सुंदर पोस्ट मध्ये त्यांच्या संघर्षाच्या दिवसांची सुद्धा आठवण काढली आहे. ते पुढे म्हणतात, शिंदे परिवाराच्या अनेक पिढ्या दुष्काळातून पळ काढत जगण्याचा मार्ग शोधत मुंबईकडे आल्या. जमेल ते काम करत त्यांनी गायकीची कला जोपासली. रखरखत्या रस्त्यावर फिरण्यापासूनचा खडतर प्रवास आज रेड कारपेटपर्यंत पोहोचला. रसिकांनी नावारुपाला आणून आज शिंदे कुटुंबाला शिखरावर पोहोचवलं मात्र आई- वडिलांना गावात शेतजमीन नसल्याची खंत अन् दुःख वाटायचं. अखेर त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं. आई वडिलांनी नावाची हक्काची शेतजमीन घेतली.

सामान्य ग्रामीण शेतकरी असा करू शकतात शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्रज्ञानाचा वापर

उत्कर्ष शिंदे आणि आदर्श शिंदे शहरात शिकले, वाढले आणि नावारुपाला आले पण गावच्या मातीचा विसर त्यांना कधीच पडला नाही. ती शेतजमीन आम्ही मुलांनी टिकवली, जपली आणि आता हर्षद, आदर्श, उत्कर्षने ती आणखीन वाढवली. आजही या गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम आणि गावाकडची ओढ आजही जशीच्या तशी आहे हे मात्र या पोस्टमधून प्रकर्षाने जाणवते.

आजोबांकडून मिळालेला गायकीचा वारसा नातवांनी शिखरावर नेऊन पोहोचवला

महाराष्ट्राचे लाडके गायक दिवंगत प्रल्हादजी शिंदे यांच्यापासून सुरुवात झालेला गायकीचा वारसा आज लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि यांचे छोटे बंधू डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी नुसताच जपला नाही तर प्रगतीच्या उंच शिखरावर नेऊन पोहोचवला. प्रल्हादजी शिंदे आणि आदर्श उत्कर्ष यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे त्यांचे वडील महाराष्ट्राच्या तमाम जनतेला त्यांच्या उठावदार कडक आवाजातून मंत्रमुग्ध करणारे आनंददादा शिंदे. या गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम आणि गावाची ओढ याबद्दल आपण जाणून घेतलच आहे. आता त्यांच्या अप्रतिम गायकीविषयी संक्षिप्त माहिती बघुया.

भीम बुद्ध गीते असो की लोकगीते, कव्वाली असो की मराठी चित्रपटांसाठी गायलेली गाणे असो, त्यांचे प्रत्येक गाणे हे आजच्या तमाम मराठी रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांचाच वारसा आज आदर्श उत्कर्ष यांनी मोठ्या कर्तुत्वाने प्रतिभावान गायक बनून जगभर प्रसिद्ध केला. आज आदर्श शिंदे हे मराठी चित्रपटांचे टॉपचे सिंगर आहेत. त्यांनी गायलेली अनेक गाणी आज तरुण पिढीच्या कायम तोंडावर असतात.

कुठलाही सण असो व उत्सव, शिंदेशाहीचे गाणे लागणार नाही अस कधीच होत नाही. भीम जयंती असो की बुद्ध जयंती असो, गणेशोत्सव असो की कुठला जुलूस असो, शिंदेशाहीची मनाला मंत्रमुग्ध करणारी गाणी लग्न समारंभापासून ते विविध धार्मिक कार्यक्रमांचा उल्हास द्विगुणित करण्याचे कार्य करतात. आज इतकं नेत्रदिपक यश प्राप्त करून सुध्दा या गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम अन् गावाकडची ओढ पाहून वाटेल त्यांचं मनापासून कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.

डॉ. आंबेडकरांची पुण्याई अन् शिंदे कुटुंबाची मेहनत यांना दिले यशाचे श्रेय

गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम याबद्दल डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी पोस्ट मध्ये असंही म्हटलं आहे की, शेती ही वाढलीच पाहिजे. ज्या मंगळवेढे गावाने त्यांना पिढ्यानपिढ्या माया दिली त्याच आमच्या गावात आज डॉ.आंबेडकरांच्या पुण्याईने उत्कर्ष, आदर्श, हर्षदचं नवीन फार्मलँड सुद्धा झालं. नुकतेच सुरू झालेलं 2025 हे नववर्ष नवीन चैतन्य घेऊन आलं आहे हे नक्की. रसिकांच्या आशिर्वादाने हे नवीन वर्ष सुद्धा नक्कीच गाजवू असा विश्वास डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी व्यक्त केला. तर मित्रांनो गायक शिंदे कुटुंबाचं शेतीवर असलेलं प्रेम बघून तुम्हाला गावाकडची आठवण आली की नाही हे कमेंट करून नक्की कळवा.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!