पंजाब हे भारतातील एक प्रमुख कृषी राज्य असून या राज्यातील माती सुपीक गाळ असलेली आहे. याशिवाय या राज्यात विस्तीर्ण कालवा सिंचनप्रणाली प्रगत पातळीवर असून या प्रणालीमुळे नद्यांमधून मुबलक जलस्रोतांपर्यंत पोहोचते. याशिवाय पंजाबचे शेतकरी आधुनिक शेती तंत्राचा अवलंब करतात. याचाच परिणाम म्हणून येथील शेतकरी एकत्रितपणे उच्च दर्जाचे पीक उत्पादित करतात. यामुळेच पंजाब राज्याला “भारताची ब्रेडबास्केट” असे म्हटल्या जाते. पंजाब राज्यातील शेती प्रगत का आहे हे जाणून घेण्यासाठी पंजाबच्या यशस्वी शेतीत महत्वाचे योगदान देणारे महत्त्वाचे घटक कोणते आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया कोणते घटक पंजाबच्या शेतीला अनुकूल आहेत याची सविस्तर माहिती.
पंजाब राज्यातील समृद्ध माती
पंजाब राज्याचा बहुसंख्य प्रदेश हा एका सुपीक सपाट मैदानावर असल्यामुळे येथील माती अतिशय सुपीक असून ती विविध पिकांसाठी नैसर्गिकरित्या जास्त उत्पादन मिळवून देण्यास अनुकूल ठरते. पंजाब राज्यातील शेती प्रगत का आहे तर सर्वात महत्वाचा घटक म्हणजे येथील सुपीक माती हा आहे.
आता तुम्ही विचाराल की पंजाबमधील जमीन सुपीक असण्याचे कारण काय आहे? तर तुम्हाला सांगू इच्छितो की येथील जमिनीत गाळाचा साठा मुबलक प्रमाणात आहे. पावसाचे मुबलक प्रमाण आणि तयार आधारित प्रभावी कालवा सिंचन पद्धती याच दोन महत्वाच्या गोष्टी पंजाब राज्यातील शेती प्रगत का आहे या प्रश्नाचं उत्तर देण्यास पुरेस ज्ञान देऊन जातात. या दोन कारणांमुळे पंजाबची जमीन शेतीसाठी खूप उपयुक्त ठरते. पंजाबला ‘भारताचे धान्याचे कोठार’ म्हणून ओळखले जाते. पंजाबची जमीन सुपीक असण्याची अजून काही कारणे आहेत ती पुढीलप्रमाणे.
पंजाबमधील जमीन सुपीक होण्याची कारणे
पंजाब राज्यातून गंगा नदिसारख्या मोठमोठ्या नद्या वाहतात. मुख्यत्वे गंगा नदी आणि तिच्या उपनद्या वाहून येताना त्यांच्यात साचलेला पुरेसा गाळ घेऊन येतात. पूर आल्यावर या नद्यांतील गाळात जमा होणारी खनिजे, क्षार, पोषक तत्वांनी यामुळे जमिनीत ॲल्युव्हियममध्ये आर्द्रता टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते. आणि गाळ अधिकाधिक सुपीक होते. तसेच या राज्यात मुबलक पाऊस पडतो. पंजाबमधील शेती प्रगत का आहे याचे मुख्य कारण येथील मुबलक पाऊस आणि नद्यांनी वाहून आणलेला सुपीकता वाढविणारा गाळ हे सुद्धा आहे. पंजाबमधील शेतीमुळे या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली असे म्हणण्यास हरकत नसावी.
राज्यातील विस्तृत सिंचन नेटवर्क
शेतकरी मित्रांनो पंजाब राज्यातील शेती प्रगत का आहे असा प्रश्न बऱ्याच वेळा आपल्या मनात येतो. तर या राज्याच्या प्रगत शेतीसाठी कारणीभूत असलेला दुसरा महत्वाचा घटक म्हणजे पंजाब राज्यातील विस्तृत सिंचन व्यवस्थापन. तुम्हाला कदाचित माहीत नसेल की या राज्यातून वाहणाऱ्या अनेक नद्यांमुळे एक आधुनिकतेचा वापर करून विकसित करण्यात आलेली विस्तीर्ण कालवा सिंचन प्रणाली शेतीसाठी सातत्यपूर्ण पाणीपुरवठा करते.

पंजाब राज्यातील सिंचन व्यवस्थापन करण्यासाठी पंजाब वॉटर रिसोर्सेस मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (PWMRDC) आणि पंजाब जल नियमन आणि विकास प्राधिकरण (PWRA) या संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थांच्या माध्यमातून पंजाबमधील पाण्याचा विकास, संवर्धन आणि व्यवस्थापन केले जाते. पंजाब राज्यातील शेती प्रगत का आहे जे जाणून घेण्यासाठी आपल्याला पंजाबमधील सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. पंजाबमधील जलस्रोतांचे न्याय्य, न्याय्य आणि शाश्वत वापर आणि व्यवस्थापन करण्यासाठी पंजाब जल संसाधन (व्यवस्थापन आणि नियमन) कायदा, 2020 करण्यात आला आहे. पंजाब हे सिंचनाची सर्वाधिक टक्केवारी असलेले राज्य आहे.

राज्यात हरित क्रांतीचा प्रचंड प्रभाव
एकेकाळी पंजाब राज्य हरितक्रांतीत आघाडीवर होते. आज सुद्धा आहे. यामुळे येथील शेतकरी बांधव उच्च उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती आणि सुधारित शेती पद्धतींचा अवलंब करण्यात पटाईत आहेत. पंजाब राज्यातील शेती प्रगत का आहे याचे उत्तर आपण शोधत आहोत तर या राज्यातील शेती प्रगत असण्याचे एक कारण म्हणजे नावीन्यपूर्ण शेती करण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल असणे हे सुद्धा आहे.
पंजाबमधील हरित क्रांतीबद्दल थोडेसे
पंजाबमध्ये 1960 च्या दशकात सुरू झालेल्या हरित क्रांतीमुळे कृषी क्षेत्रात मोठा विकास झाला. या क्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि देशाला अन्नसुरक्षा मिळाली. पंजाब राज्यातील शेती प्रगत का आहे तर या हरित क्रांतीचा सुद्धा यात मोलाचा वाटा आहे. नवीन संकरित बी-बियाणांचा वापर, कीटकनाशकांचा वापर, उच्च-उत्पादन देणारे धान्य, उत्तम व्यवस्थापन ही हरित क्रांतीची काही वैशिष्ट्ये आहेत. हरित क्रांतीचे महत्त्व सांगण्याची काही वेगळी गरज नाही. या हरित क्रांतीमुळे देशातील अन्नधान्याचे उत्पादन वाढले तसेच नागरिकांना अन्नसुरक्षा मिळाली. भारतासारख्या विकसनशील देशांमधील उपासमारी रोखता आली. याच हरित क्रांतीमुळे भारताची स्थिती अन्नधान्याच्या कमतरतेपासून बदलून जगातील अग्रगण्य कृषी राष्ट्रांमध्ये झाली हे आपल्याला माहीतच आहे. याच हरित क्रांतीची पंजाबच्या शेतकऱ्यांना शेतीतील प्रगतीत मोलाची मदत झाली.
दुष्काळग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील या शेतकऱ्याने असे काय केले की मिळाला चक्क पद्मश्री पुरस्कार?
यांत्रिक शेतीला प्राधान्य देण्यात अग्रेसर
पंजाब राज्यातील बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणावर आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करतात. यामुळे येथील शेतकऱ्यांना शारीरिक कष्ट खूप कमी प्रमाणात करावे लागतात, शिवाय मोठ्या प्रमाणात त्यांच्या शेतजमिनीवर कार्यक्षम लागवड करता येणे शक्य होऊन शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन सुद्धा मिळते. पंजाब राज्यातील शेती प्रगत का आहे याच उत्तर पंजाब राज्यातील शेतीसाठी अनुकूल वातावरण हे तर आहेच मात्र त्यापेक्षा येथील शेतकऱ्यांची शेतीविषयक सकारात्मक मानसिकता हे सुद्धा एक महत्वाचे कारण आहे.

पंजाबमधील शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रांचा वापर करतात. यामुळे त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढली आहे. पंजाबमध्ये गहू आणि धान्ये यांची शेती आधुनिक यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करून केली जाते. शेती यांत्रिकीकरणाचे फायदे खूप आहेत. याची पंजाबच्या शेतकऱ्यांना जाणीव आहे. शेती यांत्रिकीकरणामुळे उत्पादकता वाढते आणि मनुष्यबळ कमी होऊन वेळ सुद्धा वाचतो. इतकेच काय तर यांत्रिकीकरणामुळे कामाची गुणवत्ता सुधारते. पंजाब राज्यातील शेती प्रगत का आहे याचे एक महत्वाचे कारण म्हणजे येथील शेतकऱ्यांत शेती यांत्रिकीकरणाबद्दल असलेली सकारात्मक मानसिकता आणि इत्यंभूत ज्ञान तसेच या यंत्राचा प्रभावी वापर करण्यासाठी आर्थिक सक्षमता.
मुळ नसलेल्या फळझाडांची लागवड करणाऱ्या या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार प्रदान
राज्य सरकारचे शेतकऱ्यांच्या हितार्थ आवश्यक प्रयत्न
शेतकरी मित्रांनो पंजाब राज्य सरकारने यंत्रांच्या उपलब्धतेसाठी उचललेली कल्याणकारी पाऊले येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करतात. पंजाब सरकारने शेतकऱ्यांना यंत्र खरेदीसाठी अनुदान दिले आहे. पंजाब सरकारने कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना यंत्र उपलब्ध करून देतात. पंजाबमधील तांदूळ-गहू शेतीच्या महत्त्वामुळे, पीक अवशेष जाळण्यापासून न जळणाऱ्या क्रॉप रेसिड्यू मॅनेजमेंट (CRM) मध्ये संक्रमण सुलभ करण्यात येत आहे.
सरकारी मदत आणि कृषी धोरण
तुम्हाला कदाचित माहीत नसेल मात्र पंजाब राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) मिळते. सरकारची अशी शेतीसाठी अनुकूल धोरणे शेतकऱ्यांना फक्त किमतीत स्थिरताच प्रदान करत नाहीत तर त्यांना लागवडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करतात.

पंजाबमध्ये घेण्यात येणारी प्रमुख पिके
शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वात जास्त गहू उत्पादित करणाऱ्या पंजाब राज्यातील शेती प्रगत का आहे याची सविस्तर माहिती आपण बघत आहोत. तर या राज्यात कोणती प्रमुख पिके घेतल्या जातात हे सुद्धा जाणून घ्या.
नागालँड राज्याची झूम शेती पद्धती काय आहे? जाणून घ्या रोचक माहिती
भारताच्या गहू उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे पंजाब राज्य आहे. या राज्यात उत्पादित होणारे गव्हाचे प्रमाण भारताच्या इतर राज्यांपेक्षा खूपच जास्त आहे. गहू उत्पादनात पंजाब हे भारतातील प्रथम क्रमांकावर बसलेले राज्य आहे. शिवाय गहू हे पंजाब राज्यातील प्राथमिक पीक म्हणून ओळखल्या जाते. गव्हानंतर पंजाब राज्यातील दुसरे एक प्रमुख पीक तांदूळ आहे. केंद्र सरकारच्या अन्नधान्य साठ्यात पंजाबच्या तांदळाचा वाटा तब्बल 40 टक्के आहे.
आपल्या राज्याप्रमाणेच पंजाब राज्यात सुद्धा कापसाचे उत्पादन घेतल्या जाते. पंजाबच्या काही भागात कापूस लागवड केल्या जाते. मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत येथील कापसाचे उत्पादन अत्यल्प आहे. पंजाब राज्यातील शेतकरी फक्त गहू आणि तांदूळ याच दोन प्रमुख पिकांकडे त्यांचे लक्ष केंदित करतात. आणि या दोन्ही पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी येथील भौगोलिक परिस्थिती तसेच शेतकऱ्यांनी विकसित केलेली त्यांची उत्पादनाची नावीन्यपूर्ण पद्धत याचा विचार केला तर पंजाब राज्यातील शेती प्रगत का आहे या प्रश्नाचं उत्तर मिळणे फारसे कठीण नाही.