पंजाबच्या शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करणे गरजेचे का आहे? वाचा सविस्तर अवलोकन

शेतकरी मित्रांनी मागील लेखात आपण पंजाबची शेती समृद्ध असण्याची महत्वाची कारणे काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती बघितली. आजच्या लेखातून आपण पंजाबच्या शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करणे गरजेचे का आहे? या प्रश्नांची मीमांसा करणार आहोत. मात्र पंजाब राज्यातील शेतकरी गहू आणि तांदळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत असताना त्यांना पीक पद्धतीत बदल करण्याची गरजच काय? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो.

तर मित्रांनो याचे मुख्य कारण असे आहे की गहू आणि तांदूळ या पिकांचे उत्पादन करण्यासाठी प्रचंड प्रमाणावर पाण्याची गरज असते. आणि मागील काही काळापासून पंजाब राज्यात सुद्धा भूजल पातळी कमी कमी होताना दिसून येत आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करणे गरजेचे का आहे? तर पंजाबच्या शेतकऱ्यांनी जर पीक पद्धती बदलली नाही तर त्यांना पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागेलं यात शंका नाही. त्यावर तोडगा म्हणून या राज्यातील शेतकऱ्यांनी पाणी-केंद्रित पीक पद्धतीकडे वळण्याची गरज आहे.

पंजाबच्या शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करणे गरजेचे का आहे? वाचा सविस्तर अवलोकन

पंजाब राज्यातील शेती समृद्ध का आहे? जाणून घ्या विचारात पाडणारी कारणे

पंजाबमधील पीक पद्धतीतील बदल

शेतकरी मित्रांनो पंजाबमध्ये पारंपारिक गहू-मकाची पीक पद्धती होती. आता पाणी-केंद्रित गहू-तांदूळ पीक पद्धतीकडे वळण्यात आले आहे. भूजल कमी झाल्यामुळे, सेंट्रीफ्यूगल पंप अधिकाधिक सबमर्सिबल पंपांनी बदलले जात आहेत. कृषी हवामानाच्या परिस्थितीनुसार कमी पाणी-केंद्रित पिके घेण्यात येत आहेत. मात्र आता बरेच शेतकरी खरीप हंगामात मका, तांदूळ, ज्वारी, बाजरी, कापूस यांची लागवड करतात. तसेच रब्बी हंगामात गहू, हरभरा, बार्ली, रेपसीड यांची लागवड करत आहेत. मात्र हे प्रमाण वाढण्याची गरज आहे. चला तर पंजाबच्या शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करणे गरजेचे का आहे? याची काही कारणे आजच्या या लेखात सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पीक पद्धतीत बदल करणे शेतकऱ्यांच्या हिताचे

पंजाब राज्यातील शेतकऱ्यांनी भाताऐवजी मका पिकाची लागवड केल्यास होणारा पाण्याचा वापर 60-70% कमी होऊ शकतो. तुम्हाला तर माहीतच आहे की पंजाबची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी आधारित आहे जिथे 85 टक्के भौगोलिक क्षेत्र शेतीखाली येते.
या राज्यातील पीक तीव्रता सुमारे 184 टक्के असून आधी येथील बहुतांश शेतकरी बांधव पारंपारिक शेती करून मका,गहू किंवा ऊस,मका, गहू या पीक पद्धतीचे पालन करत असे. मात्र गेल्या दोन दशकांमध्ये येथील.शेतकरी गहू-तांदूळ पीक पद्धतीकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत.

याचाच परिणाम म्हणून सिंचनाच्या पाण्याची मागणी वाढली आहे आणि भूजल स्त्रोतांचे अति शोषण झाले आहे. आणि भूजल पातळी कमी होताना दिसून येत आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करणे गरजेचे का आहे तर सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भूजल पातळीत वाढ करण्यासाठी.

पंजाबच्या शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करणे गरजेचे का आहे? वाचा सविस्तर अवलोकन

फक्त गहू तांदूळ पिकविण्याची मानसिकता का?

पंजाब राज्यात किमान आधारभूत किमतीत गहू आणि तांदूळ यांची विक्री येथील शेतकऱ्यांना करता येते. परिणामी या पिकांची लागवड केल्यास त्यांना चांगल्या भावाची हमी किमान आधारभूत किमतीमुळे मिळते. प्रामुख्याने पीक लागवड खर्चाच्या तुलनेत मिळणार जास्त परतावा पाहून पंजाबचे शेतकरी धान आणि गव्हाच्या शेतीला प्राधान्य देत आलेले आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करणे गरजेचे का आहे? तर ही निर्माण होत असलेली भयावह परिस्थिती बदलण्यासाठी. पंजाबच्या शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करणे गरजेचे का आहे याचे आणखी एक कारण म्हणजे वारंवार एकच पिक घेतल्याने कमी होणारी मातीची गुणवत्ता.

शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या

तुम्हाला कदाचित माहीत नसेल की एक किलो तांदूळ आणि गहू तयार करण्यासाठी अनुक्रमे 3 हजार लिटर आणि 1350 लिटर पाण्याची गरज पडते. येथील शेतकऱ्यांनी जर गहू आणि तांदूळ या पीक पद्धतीचा दीर्घकाळ अवलंब केला तर राज्यातील जमीन आणि पाण्याचा ऱ्हास वाढतच जाईल. आजच परिस्थिती सुद्धा गंभीर आहे. येथील शेतकऱ्यांना सिंचनासाठी भूगर्भातील पाणी काढण्यासाठी 200 फूट खोलीवर कूपनलिका बसवाव्या लागत आहेत.

मात्र यात सुद्धा एक अडचण आहे. ती म्हणजे खालच्या जलचरातील पाण्यामध्ये जड धातूंचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते पाणी शेतीच्या वापरासाठी नुकसानकारक ठरते. या महत्वाच्या कारणाचे महत्व जर तुम्हाला समजले असेल तर पंजाबच्या शेतकऱ्यांना पिक पद्धतीत बदल करणे गरजचे का आहे याचे उत्तर आपोआपच सापडेल.

सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही होईल सेंद्रिय शेती करण्याची इच्छा

कमी होणारी भूजल पातळी एक गहन संकट

पंजाब राज्यातील शेतीच्या शाश्वततेला पाण्याच्या संकटामुळे निर्माण झालेल्या धोक्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे असे म्हणता येईल. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने मिळून धोरणात्मक योजना राबवून जलस्रोतांच्या शाश्वततेवर लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज आहे. कृषी हवामानाच्या परिस्थितीनुसार कमी पाणी लागणारी पिके घेऊन पाणी केंद्रित गहू आणि तांदूळ या पीक पद्धतीत बदल करणे हे या राज्यातील पीक विविधीकरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

पंजाबमधील शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याविषयी असलेली आव्हाने कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेकडे लक्ष देऊन त्यानुसार कमी पाण्यात घेतल्या घेतल्या जाणाऱ्या पिकांची निवड करून शेती करणे या संकटावर तात्पुरती मात करण्यासाठी उचलल्या जाणारे पाहिले पाऊल आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करणे गरजेचे का आहे तर भविष्यात होणारी पाण्याची तीव्र चणचण आणि परिणामी शेतीची होणारी कमी उत्पादकता टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून पीक बदल आवश्यक ठरतो.

पिक बदलामुळे होणारे फायदे

पंजाब राज्याला भारताचे अन्नधान्याचे कोठार म्हटले जाते. मात्र येथील शेतकऱ्यांनी आता घटती भूजल पातळी पाहून पिकाच्या लागवडीत बदल करणे या राज्याच्या शेतकऱ्यांसाठी हितावह आहे. कमी पाणी लागणारी अनेक पिके त्यांना घेता येऊ शकतात. पंजाबची माती अतिशय सुपीक आहे. त्यामुळे कुठलेही पिक घेता येणे येथील शेतकऱ्यांना सहज शक्य आहे. पिकांमध्ये गहू आंतरपीकांसह मका आणि खरीप कडधान्ये सुद्धा घेतल्या जाऊ शकतात.

पिक विविधतेचे अनेक फायदे आहेत. पिकांत बदल केल्यामुळे भूजल संवर्धन तर होतेच, शिवाय मातीचे पुनरुज्जीवन होऊन उत्पादकता वाढते. तसेच पर्यावरण सुद्धा अबाधित राहून त्याचा ह्रास होत नाही. विविध पिके घेतल्यामुळे त्यावर आधारित रोजगार निर्मिती सुद्धा शक्य होते. पंजाबच्या शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करणे गरजेचे का आहे? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आता बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आले असेल की पीक बदल येथील शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे.

पिक पद्धतीत बदल करण्यास पंजाबचे शेतकरी नाखूष असण्याची कारणे

पंजाबच्या शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करणे गरजेचे का आहे याची मीमांसा आपण केली. मात्र येथील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विविधतेचे फायदे असून सुद्धा येथील बहुतांश शेतकरी कमी पाणी लागणारी पिके घेण्यास तयार नाहीत. यामुळे पीक विविधीकरण धोरण राबविण्यात अडथळे येत आहेत. मात्र या शेतकऱ्यांना पिक विविधिकरणाचे काय वावडे आहे याची कारणे जाणून घेणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.

किमान आधारभूत किंमत आणि खात्रीशीर किंमत तसेच खरेदीसाठी सध्याच्या प्रभावी धोरणांना सरकारचा पाठिंबा मिळत नाही. कमी पाणी लागणाऱ्या पिकांच्या प्रयोगासंदर्भात धान आणि गहू व्यतिरिक्त इतर पिकांची सार्वजनिक खरेदी अस्तित्वात नाही. पर्यायी पिकांसाठी सध्याच्या MSP बाबत शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा अभाव दिसून येतोय तसेच पायाभूत सुविधांची अकार्यक्षमता आणि कृषी पायाभूत सुविधांमध्ये अपुरी सार्वजनिक-खाजगी गुंतवणूक हे सुद्धा येथील पीक विविधिकरणात येणारे अडथळे आहेत.

यवतमाळच्या या शेतकऱ्याने असं काय केलं की मिळाला चक्क पद्मश्री पुरस्कार?

फळे आणि भाजीपाला यांसारख्या पर्यायी पिकांसाठी राज्य सरकारने कोणतीही मोठी साठवण सुविधा (कोल्ड स्टोरेज) शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली नाही. तसेच पर्यायी पिकांसाठी यंत्रसामग्रीसाठी वाढीव भांडवली गुंतवणुकीची मोठया प्रमाणावर आवश्यकता आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करणे गरजेचे का आहे हे जाणून घेतानाच येथील शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा आपण विचारात घेतले पाहिजे.

देशाचे मुख्य अन्न असलेल्या गहू आणि तांदळाच्या विपरीत पर्यायी पिके घेतल्यास नुकसान होण्याची येथील शेतकऱ्यांना भीती वाटते. कारण गहू आणि तांदळाच्या तुलनेत या बदललेल्या पिकांची कमी मागणी तसेच विक्री करण्याच्या सुलभ मार्गाच्या अभावामुळे येथील शेतकरी इतर पिके घेण्यास धजवत नाहीत. तर शेतकरी मित्रांनो पंजाबच्या शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करणे गरजेचे का आहे या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला बऱ्यापैकी मिळाले असेल ही आशा आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!