नुकतेच पद्म पुरस्कार 2025 सरकारकडून जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बऱ्याच दिग्गजांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील एकूण 14 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये एक शेतकरी सुद्धा आहात. तर या शेतकऱ्यांचं नाव आहे सुभाष खेतुलाल शर्मा. सुभाष शर्मा या महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला असून कोण आहेत हे सुभाष शर्मा आणि त्यांची शेतीतील कामगिरी काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.
सुभाष शर्मा यांचा थोडक्यात परिचय
सुभाष शर्मा हे यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील एक सामान्य शेतकरी आहेत. शेतकरी आत्महत्येमुळे चर्चेत असलेल्या महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे की, सुभाष शर्मा या महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे सेंद्रिय शेती करून इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे फायदे आणि महत्व समजावून सांगून त्यांना सेंद्रिय शेती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी खर्ची घातले आहे. सुभाष शर्मा या महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ही राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.

सुभाष खेतुलाल शर्मा- शाश्वत शेतीचे पुरस्कर्ते
सुभाष खेतुलाल शर्मा हे शाश्वत शेती पद्धतींचे एक तज्ञ शेतकरी असून मागील अनेक दशकांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. ‘स्मार्ट शेतकरी’ म्हणून ओळखले जाणारे आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे शर्मा यांनी 1994 मध्ये उत्पादकतेत लक्षणीय घट झाल्यानंतर ते रासायनिक शेतीपासून दूर गेले आणि त्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली. त्यांच्या या भरीव कड्याचे फलित म्हणून सुभाष शर्मा या महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.
मागील सुमारे तीन दशकांहून जास्त काळ त्यांनी सेंद्रिय पद्धतींचा एक व्यवहार्य आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून प्रचार करण्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे. म्हणूनच सुभाष शर्मा या महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. सेंद्रिय शेती कशी फायदेशीर ठरते आणि पर्यावरणपूरक सुद्धा ठरते हे या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात मागील 30 वर्षांपासून अधिक काळ सेंद्रिय शेती कडून दाखवून दिले.

जेमतेम दहावी शिकलेल्या शेतकऱ्याला का मिळाला पद्मश्री पुरस्कार, कोण आहेत हरीमन शर्मा?
सुभाष शर्मा यांचे सेंद्रिय शेतीत योगदान
यवतमाळचे शेतकरी सुभाष खेतूलाल शर्मा यांनी शेतीशी संबंधित आव्हानांमध्ये एक असा मार्ग शोधला आहे, जो शेतकऱ्यांचे जीवन बदलू शकतो. नैसर्गिक शेती करताना त्यांनी अनेक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. शेतीची ही पद्धत परंपरा तसेच शेतीतील नावीन्य या दोन्हीं बाबींचा मेळ घालते. परिणामी शेती उत्पन्नात लक्षणीय वाढ होते. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुभाष शर्मा ‘आशेचा किरण’ बनले आहेत. सुभाष शर्मा ‘युनिक’ शेती पद्धतीचा अवलंब करत असून या शेतीत तीन गोष्टींवर विशेष भर दिला जातो. पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाशी संबंध, सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा आदर आणि घातक केमिकल पासून मुक्ती. सेंद्रिय शेतीचे हे फायदे त्यांनी आजवर अनेक शेतकऱ्यांना समजावून सांगून त्यांना सेंद्रिय शेती करण्यास प्रवृत्त केले आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याने जीवन बदलून गेले आहे. म्हणूनच सुभाष शर्मा या महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
आजवर मिळाले अनेक पुरस्कार
सुभाष शर्मा यांच्या शेतीविषयक प्रयोगांना आजवर अनेक प्रख्यात लोकांनी भेट दिली आहे. यामध्ये हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. स्वामिनाथन, भारत सरकारचे अतिरिक्त सचिव पी. डी. मिश्रा, नाबार्डचे अध्यक्ष उमेशचंद्र सारंगी, महाराष्ट्राचे कृषी सचिव सुधीरकुमार गोयल, समाजसेवक अण्णा हजारे, रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक भय्याजी जोशी, आफ्रिकेचे राजदूत असदाक के, इंडियन ऑरगॅनिक असोसिएशनचे क्लाउड अल्वारीस यांच्यासह देश विदेशातील अनेक तज्ज्ञ मंडळी आणि मान्यवरांचा समावेश आहे. सुभाष शर्मा यांच्या या भरीव कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘कृषिभूषण’ पुरस्कार, अग्रोवनचा ‘स्मार्ट शेतकरी’ अवॉर्ड, दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचा ‘पंडित दीनदयाल उपाध्याय सेवा पुरस्कार’ आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती बद्दल मार्गदर्शन
सुभाष शर्मा यांनी गेली तीन दशके शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या शेती क्षेत्रातील भरीव योगानाबद्दल सुभाष शर्मा या महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. शेतकऱ्यांना शेण आणि गूळ वापरणे, तसेच पावसाच्या पाण्याची साठवण प्रणाली लागू करणे यासारख्या पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करत आहेत. त्यांच्या अथक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे सुभाष शर्मा यांनी गावकऱ्यांना अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक अशा शाश्वत पद्धतीने शेती करण्याकडे यशस्वीपणे वळविले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे जतन होऊन अनेक शेतकऱ्यांची शेती अधिक उत्पादन देत आहे. या सर्व कार्याची दखल शासनाकडून घेतल्या गेली आणि सुभाष शर्मा या महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

शेतकऱ्यांसाठी घेतात सेंद्रिय शेती कार्यशाळा
शेतकरी मित्रांनो सुभाष शर्मा या महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली आहे. दारव्हाजवळ असलेले सुभाष शर्मा यांचे शेत शेतकऱ्यांसाठी ‘शाळे’पेक्षा कमी नाही. अनेक शेतकरी दररोज त्यांच्या शेतात येत असतात. शर्मा त्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबद्दल प्रात्यक्षिके दाखवत असतात. सुभाष त्यांच्या शेतात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला शेती या व्यवसायासोबतच पशुपालन, वृक्ष संवर्धन, बायोमास यांच्याविषयी मोलाचा सल्ला देत असतात. शेतीसाठी उत्कृष्ट सेंद्रिय खत कसे बनवता येते तसेच कीड नियंत्रण कसे करावे या सर्व गोष्टी सुभाष शर्मा त्यांच्या कार्यशाळेत शेतकऱ्यांना शिकवत असतात.
सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही होईल सेंद्रिय शेती करायची इच्छा
सेंद्रिय शेती का आहे शेतकऱ्यांचं उज्वल भविष्य?
सुभाष शर्मा यांची कहाणी प्रेरणादायी आहे. बरीच वर्षे प्रयत्न करत राहिल्यावर त्यांची सेंद्रिय शेती यशस्वी ठरू लागली. त्यांचे कष्ट फळाला आले. शेतीतून रासायनिक प्रोडक्ट्स वापरणे बंद केल्यापासून सुमारे सहा वर्षांनंतर त्यांच्या उत्पन्नात मोठा बदल दिसून आला, ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. पूर्वी शेतीतून खूपच कमी उत्पादन मिळायचे. मागे नैसर्गिक शेतीमुळे उत्पादनात आठ पटीने वाढ झाली. एवढेच नाही तर शेतीचा खर्च सुद्धा अत्यल्प झाला. सेंद्रिय शेतीचा प्रसार प्रचार केल्यामुळेच सुभाष शर्मा या महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
सुभाष शर्मा यांच्यानुसार नैसर्गिक शेतीत शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. रासायनिक शेती भविष्यासाठी विध्वंसक आहे असे ते मानतात. त्यांच्या मते ज्या पद्धतीत जमिनीचे पोषण होते अशीच शेतीची पद्धत कल्याणकारी असते. विषारी रसायनांचा वापर असाच वाढत राहिला तर त्याचे घटक परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील सुभाष शर्मा म्हणतात.