नागालँडची झूम शेती पद्धती काय आहे? रोचक माहिती जाणून घ्या

भारतात वेगवेगळ्या राज्यांत शेतीच्या पद्धती काही ना काही प्रमाणात बदललेल्या दिसून येतात. त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थिती अनुसार तेथील पीक पद्धती तसेच शेती पद्धतीत बदल दिसून येतो. आज आपण नागालँड, अरुणाचल प्रदेश या पूर्वांचल राज्यांत प्रसिद्ध असलेली झूम शेती पद्धती काय आहे आणि ही झूम शेती कशी केल्या जाते याबद्दल सविस्तर तसेच रोचक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या राज्यात पारंपरिक पद्धतीने शेती केल्या जाते. मात्र नागालँड सारख्या राज्यात अशी शेती दिसून येत नाही. या राज्यातील बहुतांश लोक जंगलतोड करून शेती करतात. चला तर पाहूया या नागालँड राज्यातील झूम शेती पद्धती मध्ये असलेल्या महत्वाच्या गोष्टी ज्या ऐकून तुम्हाला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.

नागालँडची झूम शेती पद्धती काय आहे? रोचक माहिती जाणून घ्या

काय आहे नागालँडची झूम शेती पद्धती?

शेतकरी मित्रांनो पूर्वेकडील नागालँड, अरुणाचल प्रदेश व्यांसारख्या राज्यात झूम शेती पद्धती प्रचलित आहे. विशेषकरून नागालँड राज्यात काही वर्षे पिके घेण्यासाठी वनक्षेत्र साफ करण्यात येते म्हणजेच जंगलतोड करण्यात येते.जमीन शेतीसाठी तयार झाल्यावर त्यात काही वर्षे शेती केल्या जाते. आणि जमिनीची सुपीकता पुनर्संचयित करण्यासाठी अनेक वर्षे ही जमीन पडीक ठेवल्या जाते. यांचा समावेश होतो. सुपीक माती तयार करण्यासाठी झाडे तोडून आणि वनस्पती जाळून झुमची लागवड सुरू होते.

खूप मेहनत करून जमीन मशागत करावी लागते. ही जमिनीची मशागत काही वर्षांपर्यंत केली जात असून साधारणपणे मातीची सुपीकता कमी होईपर्यंत शेती केल्या जाते. नंतर सुपीकता वाढावी या दृष्टीने जमीन पडीक राहू दिल्या जाते. मातीची सुपीकता पुन्हा भरून काढण्यासाठी जमीन किमान 15 वर्षे लागतात. हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा जाण्याच्या शेतीच्या या पद्धतीला झूम शेती पद्धती असे म्हणतात.

शेकडो वर्षांपासून सुरू आहे झूम शेती पद्धती

भारतातील नागालँड राज्यात मागील बऱ्याच काळापासून, गावातील प्रमुखांच्या नेतृत्वाखाली गावातील संपूर्ण समुदाय जंगल क्षेत्राचा एक भाग लागवडीसाठी निवडण्याचा निर्णय घेतो, आणि त्यात सेंद्रिय पद्धतीने शेती करतो. याच शेतीला झूम शेती असे म्हटक्या जाते. झुम लागवड म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास स्थलांतरित शेती. या शेतीत बरीच आव्हाने या शेतकऱ्यांपुढे उभी ठाकतात. या आव्हानांची माहिती सुद्धा आपण घेणार आहोतच.

नागालँडची झूम शेती पद्धती काय आहे? रोचक माहिती जाणून घ्या

नागालँड मधील झूम शेतीतून प्राप्त होणारे उत्पादन

शेतकरी मित्रांनो नागालँडची झूम शेती पद्धती अवलंबून 105 पिके घेतली जातात. नागालँडच्या कृषी विज्ञान आणि ग्रामीण विकास शाळेतील आनुवंशिकता आणि वनस्पती प्रजनन विभागाचे प्राध्यापक डॉ. सपू चंगकिजा यांच्या मते, झूम शेती करून लागवड केलेल्या पिकांची एकूण संख्या 105 होती. राज्यात उपलब्ध असलेल्या पाळीव वनस्पती आणि भाजीपाल्याची तुलना केल्यास या वनस्पती ‘मुबलक प्रमाणात’ आढळतात. नागालँडमध्ये 248 प्रकारची वन्य खाद्य फळे आणि 128 हून अधिक वन्य खाद्य भाज्या आढळतात, अशी माहिती चांगकिजा यांनी दिली.

जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती, एका किलो भाजीची किंमत तब्बल 90 हजार रुपये

नागालँड झूम शेतीमध्ये या पिकांची लागवड

नागालँड राज्यात एकूण 52 प्रकारची जंगली खाद्य फुले आणि आणखी 58 प्रकारचे जंगली खाद्य मशरूम आढळतात, असे ते म्हणाले. पाळीव फळे 26 पेक्षा जास्त प्रकारात आढळतात. खाण्यायोग्य मुळे आणि कंद 42 प्रकारचे आढळून येतात. खाद्य बियाणे आणि काजू यांची संख्या 54 आहे. औषधी वनस्पती 656 पेक्षा जास्त आहेत. बांबूच्या प्रजाती 57 असून ऑर्किड प्रजाती (जंगली) 345 पेक्षा जास्त तर उसाच्या एकूण 7 प्रजाती आहेत.

याशिवाय फर्न पिकाची संख्या 280 आहे. नागालँड राज्यात स्थानिक उपयुक्त झाडे ही 560 आहेत. व्यावसायिक इमारती लाकडांची संख्या 147 आहे.तसेच 68 प्रकारचे मसाले सुद्धा नागालँड राज्यात उत्पादित होतात. ईशान्येकडील प्रदेशात अद्याप अनेक प्रजाती सापडल्या नाहीत आणि त्यावर संशोधन झाले आहे असे चांगकिजा यांनी सांगितले. नागालँडची झूम शेती आजही पारंपरिक पाणी पुरातन आहे हे मात्र आपल्याला कळून चुकले असेल.

नागालँडची झूम शेती पद्धती काय आहे? रोचक माहिती जाणून घ्या

झूम शेती पद्धतीतून किमान उत्पादन

झूम शेती ही एक पारंपारिक कृषी प्रथा आहे जिथे जमिनीची तात्पुरती लागवड केली जाते आणि नंतर जमीन पुन्हा निर्माण होऊ देण्यासाठी सोडून दिली जाते. या झूम शेती पद्धतीला स्लॅश आणि बर्न ॲग्रीकल्चर असे सुद्धा म्हटले जाते. या शेतीतून शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पादन मिळण्याची कुठलीही हमी नसते. ही झूम शेती पद्धती अतिशय पारंपरिक शेती पद्धती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. तेथील शेतकरी मुख्यतः स्वतः साठी धान्य लागते म्हणून शेती करतात. खूपच मर्यादित उत्पन्न या शेतीतून मिळत असल्यामुळे ही शेती करून शेतकऱ्यांची आर्थिक दृष्ट्या प्रगती होणे खूपच कठीण आहे.

नागालँड राज्यातील या शेतकऱ्याला का मिळाला पद्मश्री पुरस्कार? जाणून घ्या यशोगाथा

झूम शेतीतील शेतकऱ्यांपुढे असलेली आव्हाने

शेतकरी मित्रांनो पूर्वेकडील काही राज्यांत सुरू असलेली झूम शेती करण्यात शेतकऱ्यांना काही आव्हानांचा सामना करावा लागतो. या झूम शेती केल्यामुळे मातीची धूप मोठ्या प्रमाणावर धूप होते. जेव्हा जमीन लागवडीसाठी मोकळी केली जाते तेव्हा मातीची धूप होऊ शकते. तसेच या झूम शेती केल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते.

कालांतराने ही झूम शेती पद्धती अवलंबून केलेली शेतीतील माती तिची सुपीकता गमावून बसते. तसेच बदलत्या हवामानामुळे केव्हा लागवड करावी हे सांगणे कठीण होऊन जाते. कारण सध्याच्या या काळात पाऊस कधी चांगला पडेल अन् कधी अजिबात पडणारच नाही याबद्दल कुठलीही शाश्वती नसते. तसे झूम शेती केल्यास पिकांना कीड आणि रोग यांची लागण सुद्धा होऊ शकते.

झूम शेतीत रासायनिक पदार्थांचा वापर शून्य

शेतकरी मित्रांनो झूम शेतीमध्ये बरीच आव्हाने दिसून येत असली तरी या झूम शेतीमध्ये एक गोष्ट कौतुकास्पद आहे ती म्हणजे ही शेती संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने केल्या जात असून कुठ्ल्याही प्रकारची रासायनिक तणनाशके, कीटकनाशके अथवा रासायनिक खतांचा अजिबात वापर या झूम शेती पद्धतीत केल्या जात नाही. शेकडो वर्षांपासून पूर्वापार चालत आलेल्या झूम शेतीचा वापर करून नागालँड, अरुणाचल प्रदेश या राज्यातील शेतकरी लागवड करत आहेत.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!