मूळ नसलेल्या फळझाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर होण्यामागे या शेतकऱ्याची प्रचंड मेहनत असून त्यांच्या शेतीविषयक भरीव कार्याचा आढावा आपण या लेखातून घेणार आहोत.
नुकतेच पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून कृषी क्षेत्रात महाराष्ट्राच्या सुभाष शर्मा यांना त्यांच्या सेंद्रिय शेतीबद्दल योगदानामुळे तसेच हिमाचल प्रदेशात राहणाऱ्या हरिमन शर्मा यांना त्यांच्या देशाच्या सर्व भागात सफरचंदाची शेती यशस्वी होऊ शकते याबद्दल केलेल्या भरीव कार्याची दाखल घेत सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक मानाचा असा पद्मश्री पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. कृषी क्षेत्रात आणखी एका शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ते शेतकरी म्हणजे नागालँडमधील नोकलाक येथील अग्रगण्य फळ शेतकरी एल. हँगथिंग. या शेतकऱ्यास त्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
30 वर्षांहून अधिकचा मूळ नसलेल्या फळपिकांची लागवड करण्याचा अनुभव अनुभव असलेले एल. हँगथिंग यांनी त्यांच्या प्रदेशात स्थानिक नसलेली विविध नावीन्यपूर्ण फळे उगवली आहेत तसेच शेतीच्या पद्धती बदलल्या आहेत आणि स्थानिक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यांच्या या शेती क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मूळ नसलेल्या फळझाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नागालँड मधील शेतीत आणली क्रांती
शेतकरी मित्रांनो मूळ नसलेल्या फळझाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर होण्यामागे या शेतकऱ्याची प्रचंड मेहनत आणि शेतीविषयक समाजकार्य आहे. नागालँडचा डोंगराळ प्रदेश आणि बदलत्या हवामानामुळे मोठ्या प्रमाणावर शेती करण्यास आव्हानात्मक होत चालला आहे. मात्र एल. हँगथिंगने अथक परिश्रमांची पराकाष्ठा करून नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरून या शक्यतांना कमी करून शेती फुलवली आहे. पारंपारिक शेतीचे तंत्र आणि आधुनिक शेती तंत्र यांची सांगड घालण्यात त्यांना यश मिळाले आहे.
त्यांनी नागालँड प्रदेशात फळांच्या लागवडीला लक्षणीय चालना देण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावली आहे. या शेतकऱ्याच्या यशाने राज्याच्या कृषी संस्थांना सुद्धा त्यांनी विकसित केलेल्या शेतीच्या नवनवीन पद्धतींची दखल घेण्यास प्रवृत्त केले आहे. ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक व्यवहार्य स्रोत म्हणून फळांच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार-समर्थित उपक्रम सुद्धा सुरू झाले आहेत. एका माणसाच्या दृढ निश्चयाने आज नागालँड भागातील शेती क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडून येताना दिसत आहे. म्हणूनच मूळ नसलेल्या फळझाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

मूळ नसलेल्या फळांच्या शेतीचा तीन दशकांपेक्षा जास्त अनुभव
शेतकरी मित्रांनो मूळ नसलेल्या फळझाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. मात्र तुमच्या मनात हा प्रश्न असेल की मूळ नसलेल्या फळझाडांची शेती करणे कसे शक्य आहे? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या नागालँड राज्यातील एल हँगथिंग या शेतकऱ्याने ही संकल्पना सत्यात उतरवली आहे. या शेतकऱ्यास मूळ नसलेल्या फळांची लागवड करण्याचा 30 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. तसेच त्यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी आज संपूर्ण देशात ओळखल्या जाते. आता तर मूळ नसलेल्या फळझाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांच्या कार्याची त्यांना जणू पोचपावतीच मिळाली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणला
शेतकरी बांधवांनो नागालँड येथील शेतकरी एल हँगथिंग यांनी त्यांच्या प्रदेशात बिगर-नेटिव्ह फळे म्हणजेच त्या भागात लागवड होत नसलेली फळपिके आणि भाजीपाल्याची रोपे आणून त्यांची यशस्वी लागवड करून दाखवली. इतकेच काय तर त्यातून भरघोस उत्पादन सुद्धा मिळवून दाखवले. याशिवाय नागालँडमधील 40 गावांमधील 200 हून अधिक शेतकऱ्यांना त्यांनी निस्वार्थी भावनेने त्यांच्या ज्ञानाची आणि अनुभवाची शिदोरी देऊन त्या शेतकऱ्यांच्या जिवनात बदल घडवून आणला आहे.
जिद्द आणि चिकाटी हेच यशचे गमक
नागालँड राज्यातील होतकरू शेतकरी एल हँगथिंग यांनी केलेले कार्य काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत. खर तर त्यांच्यापासून बऱ्याच गोष्टी शिकून आपण सुद्धा आपली शेती फायद्याची करून घेणे आवश्यक ठरते मूळ नसलेल्या फळझाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्या जिद्दी शेतकऱ्याची जीवनगाथा जाणून घ्यायची झाल्यास या शेतकऱ्याला फळांबद्दलची आवड लहानपणापासूनच निर्माण झाली होती. एकदा लहानपणी त्यांनी विक्रेत्यांकडून टाकून दिलेल्या फळांच्या बिया गोळा केल्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या शेतजमिनीवर त्यांचा प्रयोग केला. त्यातून त्यांना मुळे नसलेल्या फळझाडांची लागवड करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. सतत त्याबद्दल ज्ञान घेऊन प्रयत्न करत राहिले आणि आज त्यांनी त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यास सरकार सुद्धा भाग पडले. मूळ नसलेल्या फळझाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर करून सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली.
400 पेक्षा जास्त शेतकरी करतात त्यांच्या तंत्राचा अवलंब
नागालँड राज्यातील शेतकरी एल हँगथिंग यांचे नाविन्यपूर्ण शेती तंत्र हे अनुकरण करण्यासारखे आहे. ज्यामध्ये लिची आणि संत्री यांसारख्या फळांच्या लागवडीचा समावेश असून ज्या प्रदेशात ही विशिष्ट फळपिके जगूच शकत नाहीत असा लोकांचा समज होता, त्याच भागातील 400 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी यांचे मूळ नसलेल्या फळझाडांची लागवड करण्याचे तंत्र अवलंबले आहे. आणि या नवीन तंत्राचा शेतकऱ्यांना खुप फायदा सुद्धा झाला आहे. एल हँगथिंग यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होऊन त्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडून आले आहेत. मूळ नसलेल्या फळझाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून अवश्य कळवा.