सफरचंद शेती ही फक्त थंड हवामान असलेल्या भागातच केली जाते असं मानलं जायचे पण आता हरीमन शर्मा यांनी शेतकऱ्यांच्या मनातील समज दूर करून इतर प्रदेशात सुध्दा सफरचंद शेती करता येऊ शकते अशाप्रकारचे मोलाचे प्रोत्साहन देणाऱ्या सफरचंद शेतकरी हरीमन शर्मा यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक असलेला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्र सरकारने शनिवारी 2025 च्या पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित होणाऱ्या व्यक्तींची नावे जाहीर केली. या यादीत अनेक मोठ्या दिग्गज व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत.
हरीमन शर्मा कोण आहेत. तसेच त्यांचे कार्य काय?
सफरचंद सम्राट म्हणून ओळख असणारे हरीमन शर्मा हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील रहिवासी आहेत. त्यांना कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हरीमन शर्मा आता 67 वर्षांचे आहेत, पण संपूर्ण भारतात सफरचंद लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी केल्या जाणाऱ्या कामाबद्दलची हरीमन शर्मा यांना प्रचंड आवड आहे. आतापर्यंत त्यांनी या जातीची 17 लाख रोपे वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.

शर्मा यांना का जाहीर झाला मानाचा पद्म पुरस्कार?
शेतकरी मित्रांनो सफरचंद शेती ही फक्त थंड हवामान असलेल्या भागातच केली जाते असं बहुतेक शेतकरी मानतात. मात्र या शेतकऱ्यांची ही गैरसमजूत हरीमन शर्मा दूर करून इतर प्रदेशातही शेतकऱ्यांना सफरचंद शेती करता येऊन भरघोस उत्पादन प्राप्त करता येऊ शकते असा विश्वास त्यांच्यात निर्माण केला. त्यांच्यामुळे आज देशाच्या विविध भागांतील अनेक शेतकरी त्यांच्या शेतीत सफरचंद लागवड करून चांगले उत्पन्न मिळवायला लागले. त्यांनी दिलेल्या या प्रोत्साहनामुळे तसेच मार्गदर्शनामुळे अनेक शेतकऱ्यांचे आयुष्य बदलले. त्यांच्या याच कार्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
“हरीमन-99” (HRMN 99) नावाची जात स्वतः केली विकसीत

शेतकरी मित्रांनो बिलासपूर येथील सफरचंद शेतकरी हरीमन शर्मा यांनी कमी थंडी असलेल्या सफरचंदाच्या जातीची ‘हरीमन-99’ (HRMN 99)विकसित केली आहे, जी कोणत्याही शास्त्रज्ञाने नव्हे तर दहावीपेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या हरीमन शर्मा यांनी विकसित केली आहे. हरीमन शर्मा सध्या 67 वर्षांचे आहेत, मात्र या वयात सुद्धा संपूर्ण भारतात सफरचंद लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी ते सतत सक्रिय असतात. या शेतकऱ्याच्या माध्यमातून अनेक भागांतील शेतकरी आज सफरचंदाची यशस्वी शेती करत आहेत. सफरचंद शेती ही कल्पना सुद्धा ज्या भागांत कुणाला शिवली नव्हती अशा बऱ्याचशा भागांत आज सफरचंदाचे टवटवीत फळ अनेक शेतकऱ्यांच्या शेतात दिसून येत आहे. एकटा माणूस काहीच बदल घडवून आणू शकत नाही असा समज असणाऱ्या लोकांसाठी सफरचंद शेती करणारे शेतकरी हरीमन शर्मा एक आदर्श आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
शर्मा यांनी विकसित केलेल्या सफरचंदाच्या जातीबद्दल माहिती
सफरचंद शेतकरी हरीमन शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की हरिमन-99 (HRMN 99)या रोपाची 15 X 15 फूट अंतरावर लागवड केल्या जाते. तसेच या रोपांमध्ये भाजीपाला, गहू, मका आणि कडधान्य पिके सुद्धा आंतरपिके म्हणून लावल्यास उत्पन्नात भरघोस वाढ करता येते. सुमारे आठ वर्षांच्या एका सफरचंदाच्या झाडापासून दरवर्षी एक क्विंटलपर्यंत उत्पादन आरामात मिळू शकते.

आठवीत शिकणाऱ्या मुलाने बनवले फक्त 100 रुपयांत हरभरा खुडणी यंत्र
जे सरकारला जमलं नाही ते एकट्याने शक्य करून दाखवलं
शेतकरी मित्रांनो हरीमन शर्मा यांच्या कार्याबद्दल बोलायचं झालं तर अस म्हणता येईल की जे सरकारला सुद्धा जमलं नाही ते या एकट्या व्यक्तीने शक्य करून दाखवलं. अस म्हणायचं कारण म्हणजे हिमाचल प्रदेश सरकारने 1965 मध्ये सिरमौर जिल्ह्यातील नाहन जवळील बागथान येथे खालच्या हिमाचल प्रदेशात सफरचंद लागवडीसाठी एक संशोधन केंद्र स्थापन केले होते. कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा शास्त्रज्ञांच्या दहा वर्षांच्या संशोधनाला त्यावेळी अपयश आले. परिणामी 1975 मध्ये हा प्रकल्प बंद करण्यात आला. मात्र शर्मा यांनी हार न मानता त्यांचे अथक प्रयत्न सुरूच ठेवले आणि त्यांचे कार्य पूर्णत्वास नेले.
सेंद्रिय शेती का करावी हे जाणून घेण्यासाठी या शेतीचे फायदे काय आहेत याची सविस्तर माहिती वाचा
शर्मांनी विकसित केलेल्या वणाला विदेशातून सुद्धा प्रचंड मागणी
तुम्हाला ऐकून नवल वाटेल की एक दशकाच्या कठोर परिश्रमानंतर शर्मा यांनी भारतातील इतर भागांत सुद्धा सफरचंदाची शेती यशस्वी होऊ शकते याचा प्रचार प्रसार आणि मार्गदर्शन करून त्यांचे उद्दिष्ट साध्य केले. हरीमन शर्मा यांचे शिक्षण फक्त दहावी पर्यंत असले तरी त्यांची कामगिरी मात्र भरीव आणि अद्वितीय आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याने प्रारंभीपासूनच ग्राफ्टिंगवर काम सुरू ठेवून शेवटी 1999 मध्ये सफरचंदाची अशी जात शोधून काढली जी देशातील बऱ्याच भागांत यशस्वी ठरून भरघोस उत्पादन मिळवून देऊ शकते. म्हणूनच त्यांनी शोधलेल्या या सफरचंदाच्या जातीला हरिमन-99 (HRMN 99)असे नाव देण्यात आले. आज केवळ भारतातीलच नव्हे तर अनेक देशांतील शेतकरी या जातीच्या रोपांची ऑर्डर करत असल्यामुळे हरिमन-99 (HRMN 99) या जातीची प्रसिद्धी सातासमुद्रापार पोहोचली असे म्हणायला हरकत नाही.
शेतकरी मित्रांनो सुमारे दोन दशकांच्या आधी आपल्यापैकी कोणी विचार सुद्धा केला नव्हता की बर्फाळ टेकड्यांवर वाढणारे सफरचंद उबदार ठिकाणी सुद्धा यशस्वीरीत्या पिकू शकतात. मात्र एका शेतकऱ्याच्या जिद्दीने आणि कठोर परिश्रमाने आज संपूर्ण देशातील लोकांची गैरसमजूत दूर केली. माणसात काहीतरी वेगळे करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तसेच जीवतोड मेहनत करण्याचा निश्चय असेल ते एकटा माणूस सुद्धा आपल्या कर्तबगारीने जग जिंकू शकतो, हेच आपल्याला पद्म पुरस्काराने सन्मानित हरीमन शर्मा यांच्या या यशकथेमधून पाहायला मिळते.