शेतात दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदून सरकारकडून 4800 रुपये मिळवा, जलतारा योजना

तुम्ही जर एक शेतकरी आहात तर तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती आहे. सरकारने नुकतीच जलतारा योजना या नावाने एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्हाला फक्त तुमच्या शेतात दीड बाय दीड मीटरचा एक शोषखड्डा खोदायचा आहे. हा खड्डा खोदून झाला की तुमच्या बँक खात्यात सरकारकडून चक्क 4800 रुपये जमा करण्यात येतील. भूजल पातळी वाढविण्यासाठी सदर योजना ही रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविल्या जात आहे. शेतात दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदून सरकारकडून 4800 रुपये थेट बँकेत जमा होणार आहेत. यालाच जलतारा योजना असे नाव देण्यात आले आहे. मात्र या जलतारा योजना अंतर्गत लाभासाठी कोणकोणते निकष आहेत आणि कागदपत्रे कोणती लागणार याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेऊन बळीराजा सधन व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नेहमीच विविध योजना राबवित असते. मात्र शेतात भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे खूप गरजेचे असते हे आणि जाणताच. शेतातील विहीर, कूपनलिकांची पाणीपातळी कमी होऊ नये तसेच भूजल पातळीत लक्षणीय वाढ व्हावी आणि अधिकाधिक जमीन लागवडीखाली यावी या उदात्त हेतूने राज्य सरकारद्वारे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलतारा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. यात शेतात दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदून सरकारकडून 4800 रुपये मिळणार आहेत.

शेतात दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदून सरकारकडून 4800 रुपये मिळवा, जलतारा योजना संपूर्ण माहिती

शेतात दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदण्याचे फायदे

शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतातील पाण्याची पातळी जर खालावली असेल तर तुमच्या शेतात हा दीड बाय दीड मीटरचा शोषखड्डा खोदून भूजल पातळीत वाढ होण्यास मोलाचा हातभार लागणार आहे. यासाठी जलतारा योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याने त्याच्या शेतातील विहीर, बोअरच्या परिसरात किंवा नेहमी पाणी साचणाऱ्या भागाजवळ दीड बाय दीड मीटरचा शोषखड्डा खोदावा. खाद्य खोदून झाला की त्यात दीड इंचाची गिट्टी भरावी लागेल. फक्त एवढं केलं की झाले तुम्ही योजनेचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी पात्र. फक्त शेतात दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदून सरकारकडून 4800 रुपये तर मिळणार आहेतच याशिवाय तुमच्या शेतातील भूजल पातळीत वाढ होऊन तुमच्या शेतात तुम्हाला भरघोस उत्पादन सुध्दा घेता येईल.

जलतारा योजना कोणत्या उद्देशाने कार्यान्वित करण्यात आली?

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत येणारी ही योजना शेतात खड्डा खोदून सरकारकडून 4800 रुपये मिळवून देणार आहे. यामागे सरकारचा हेतू शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतातील पाण्याचा योग्य निचरा करून भूजल पातळी वाढावी हा सरकारचा जलतारा योजना राबविण्यामागे उद्देश आहे. तुम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की राज्यभरात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

शेतात दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदून सरकारकडून 4800 रुपये मिळवा, जलतारा योजना

जलतारा योजना कोणाच्या अंमलबजावणीत होईल?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेतात दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदून सरकारकडून 4800 रुपये मिळणारी ही जलतारा योजना नक्कीच फायदेशीर वाटत असेल. मात्र तुमच्या मनात शंका असेल की या योजनेची अंमलबजावणी कोणता अधिकारी करणार? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की, ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत येत असल्यामुळे तुमच्या गावातील ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतीच्या सिंचनासाठी मोठ्या धरणाचे बांधकाम सरकारला शक्य नाही. म्हणूनच मागेल त्याला विहीर हे धोरण सुरू करण्यात आले आहे.

विहिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा केला जात आहे. परिणामी दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी कमी कमी होत आहे. अशीच पाणी पातळी खालावत राहिली तर एक दिवस शेतातील विहिरींना पाणीच राहणार नाही. जमिनीतील पाण्याचा उपसा करण्याबरोबरच पाण्याचा भराव निर्माण करण्यासाठी देखील प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न म्हणून शासनाने जलतारा या योजनेची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला आहे. ग्रामीण भागात शेतात दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदून सरकारकडून 4800 रुपये मिळविता यावे यासाठी जलतारा या योजनेबद्दल जनजागृती झाली पाहिजे म्हणून हा उपयुक्त लेख तुमच्या मित्रांना अवश्य पाठवा.

महिलांना मिळत आहेत 10 हजाराची घरगुती भांडी, असा करा घरबसल्या अर्ज

अशाप्रकारे मिळेल योजनेचा लाभ

जलतारा’ योजना सुरू करून या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी रोजगार हमी योजना विभागावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या परिसरातील ग्रामसेवक, कृषीसहायक, रोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला जलतारा योजनेचा लाभ घेता येईल.
राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात धानाची शेती आहे. धनाच्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज पडते. आपल्या राज्यात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. कधीकधी तर इतके पर्जन्यमान होते की पूर परिस्थितीच निर्माण होते. परंतु पावसाळ्यातील हे संपूर्ण पाणी वाहून जात असल्यामुळे उन्हाळ्यात सर्वत्र पाणी टंचाई निर्माण होते. पावसाचे हेच पाणी जर जमिनीत मुरले तर ही भयावह स्थिती निर्माण होणार नाही. करीता शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदून सरकारकडून 4800 रुपये मिळवून जलतारा योजना अंतर्गत लाभ घेणे शेतकऱ्यांच्या शेतीतील भूजल पातळी आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.

बांधकाम कामगार योजनेचा घरबसल्या असा करा ऑनलाईन अर्ज, दलालांना दीड हजार देण्याची गरज नाही

जलतारा योजना अंतर्गत लाभासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जलतारा योजना अंतर्गत तुमच्या शेतात दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदून सरकारकडून 4800 रुपये अनुदान मिळविण्यासाठी तुम्हाला खालील अर्जासोबत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

1) लाभार्थी शेतकऱ्याचा सात बारा

2) लाभार्थी शेतकऱ्याच्या जमिनीचा आठ अ उतारा

3) लाभार्थी शेतकऱ्याच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत

4) महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गतचे जॉबकार्ड

5) पासपोर्ट आकाराचे 2 फोटो

6) जलतारा योजनेचा छापील अर्ज

7) लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्याची झेरॉक्स प्रत

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!