खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेणारा शेतकरी

वाळूचे कण रगडता तेलही गळे ही एक प्रचलित म्हण सार्थक केली आहे ती पुणे येथील शेतकऱ्याने. अत्यंत खडकाळ माळरानावर जमीन असूनही हार न मानता पठ्ठ्याने या खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेऊन कमाल केली आहे. अनेक शेतकरी चांगली उच्च दर्जाची शेती असूनही शेतीत काही खर नाही अशी कुरकुर करताना दिसून येतात. मात्र आपण अशी अनेक उदाहरणे बघतो की प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून शेतीतून धनिक झालेले अनेक शेतकरी आहेत जे नवनवीन कल्पनेला तंत्रज्ञानाची आणि आधुनिकतेची जोड देऊन त्यांचे जीवन शेतीतून समृद्धीकडे घेऊन जात असतात.

अशीच किमया राहू येथील युवकाने खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेऊन इतर शेतकऱ्यांपुढे यशाचा एक पायंडा घालून दिला आहे. तर आजच्या या माहितीपूर्ण लेखातून जाणून घेऊया खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेणाऱ्या युवा शेतकरी प्रेरणादायी निलेश कुल यांची यशकथा.

खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेणारा शेतकरी

शिक्षण कमी मात्र जिद्द आभाळाएवढी

यवतच्या राहू येथे राहणाऱ्या निलेश कुल यांचे जेमतेम माध्यमिक शिक्षण झाले आहे. कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडल्याने त्यांना पुढील शिक्षण घेणे शक्य झाले नाही. मात्र माणूस जे काही करेल त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन केले तर नक्कीच यश प्राप्त होते. हीच गोष्ट निलेश यांची जिद्द आणि चिकाटी पाहून तुमच्या लक्षात येईल. निलेश यांनी शेती करण्याचा जेव्हा ठरवलं तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांनी खडकाळ जमिनीत काय काय करता येईल याचं ज्ञान मिळवत त्यांच्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचे सुरूच ठेवले.

दुसरा एखादा शेतकरी असता तर या खडकाळ माळरानात त्याने काहीच न पेरून जमीन पडीक ठेवली असती. मात्र कंपनीत नोकरी करण्यापेक्षा खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन निलेश कुल यांनी पूर्णपणे त्यांच्या शेतीत लक्ष घातले. आणि उसाची लागवड करायचे ठरवले. त्यांनी खडकाळ जमिनीत ऊस चांगल्या पद्धतीने येण्यासाठी काय उपयुक्त ठरेल या सर्व बाबींची माहिती घेतली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सकारात्मक भूमिका ठेवली. त्याचेच फळ म्हणजे या होतकरू तरुण शेतकऱ्याने खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेऊन परिसरात विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या या भरघोस उत्पादनाची बातमी ज्या शेतकऱ्यांना कळली त्यांनी निलेश कुल यांचे भरभरून कौतुक केले.

खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेणारा शेतकरी

सेंद्रिय शेती करुन या जिल्ह्यातील तब्बल 2 हजार महिला झाल्या मालामाल, काय आहे त्यांचे अर्धा एकर मॉडेल?

असे घेतले खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन

निलेश कुल यांनी खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उत्पादन घेण्यासाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीपेक्षा सुद्धा जास्त पैसै कमवून त्यांच्या कर्तबगारीची धमक दाखवली आहे. येते. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक्टरच्या एक फाळी पलटीच्या साहाय्याने नांगरणी केली. मे महिन्यात 5 ट्रॉली शेणखत आणि 15 टन कंपोस्ट खत शेतात पसरवून नांगरट करून घेतली. साडेचार फुटाच्या सरी काढत दीड फूट अंतरावर को 86032 जातीच्या उसाची एक डोळा पद्धतीने लागवड केली आणि पुन्हा पाणी दिले.

खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेणारा शेतकरी

तसेच शेतीची आंतरमशागत सुद्धा मन लावून आणि वेळेवर केली. लागवड केल्याच्या तीन महिन्यांनंतर त्यांनी भरणी केली. यासाठी रासायनिक खतांचे सहा डोज दिले. याशिवाय जीवाणू खते, किटकनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके यांची वेळेवर फवारणी करून आळवण्या घेतल्या. निलेश कुल यांना खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेण्यासाठी खंडेराव चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती, जाणून घ्या शेती करण्याची पद्धत

यावर्षी 140 टन उसाचे उत्पादन घेण्याचा विश्वास

खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेऊन आत्मविश्वास बळवलेल्या तर निलेश कुल यांनी या हंगामात आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोग आणि योग्य मार्गदर्शन यांच्या साहाय्याने त्यांच्या खडकाळ माळरानावर 140 टन उसाचे उत्पादन घेण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांना आता उसाच्या शेतीचा खूप छान अनुभव आला असून या अनुभवाचा त्यांना त्यांच्या शेतीतील उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी नक्कीच फायदा होईल यात शंका नाही. मेहनत घेण्याची तयारी, जिद्द, आत्मविश्र्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन या सर्व गुणांना चिकाटीची जोड मिळाली की यश मिळाल्याशिवाय राहत नाही. हा गुणांच्या साहाय्याने अनेक शेतकरी शून्यातून विश्व निर्माण करून जगाला शेतीची शक्ती दाखवून देत आहेत, हे मात्र नक्की.

उठा आणि लागा तयारीला

शेतकरी बांधवांनो खडकाळ जमिनीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेणाऱ्या निलेश कुल या होतकरू तरुणाची यशोगाथा आपण आपण संपूर्ण वाचली याचा अर्थ आपल्याला सुद्धा शेतीत स्वारस्य आहे आणि आपण सुद्धा यशस्वी शेती करून जीवन उन्नत करण्याचा विचार करत आहात हे स्पष्ट आहे. लक्षात घ्या कुठलीही महान गोष्ट सत्यात उतरण्यासाठी ती आधी मनातील एक कल्पना आणि एक सकारात्मक विचारच असतो. शेती यशस्वी करण्यासाठी तुम्हाला शेतीविषयी आवश्यक ज्ञान घेऊन हिंमतीने नावीन्यपूर्ण शेती करण्याचा निश्चय करावा लागेल. एकदा तुमचा निश्चय पक्का झाला की मग शेतीत योग्य दिशेने मेहनत केल्यास तुम्ही सुद्धा भविष्यात यशस्वी शेतकरी म्हणून तुमचा ठसा उमटवू शकाल यात शंका नाही.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!