मोदी सरकारने 2016 साली शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली पीएम किसान सन्मान निधी योजना ही संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त आणि सहाय्यकारी ठरत आलेली आहे. मात्र पीएम किसान ची वेबसाईट आल्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांची चुकून एक चूक होत आहे. ज्यामुळे पीएम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होत आहेत. घाबरु नका मात्र तुमच्या हातून सुद्धा ही चूक होऊ नये यासाठी ही चूक नेमकी आहे तरी काय हे जाणून घेऊया.
साईट वरील या नवीन पर्यायाचा चुकीने झालेला वापर ठरतो पैसे बंद होण्यास कारणीभूत
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर नव्याने Voluntary Surrender of PM-KISAN benefits हा पर्याय समाविष्ट करण्यात असून अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकून या पर्यायाचा वापर केल्या गेल्याने हे लाभार्थी योजनेसाठी अपात्र ठरत आहेत. एकदा का चुकून शेतकऱ्यांनी voluntary surrender म्हणजेच शेतकऱ्याने स्वतः च्या इच्छेने केलेले योजनेच्या लाभाचा त्याग असा त्याचा अर्थ होत असून चुकून या पर्यायाचा वापर शेतकऱ्याच्या हातून झाल्यास अशा लाभार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज सुद्धा करता येत नाही. त्यामुळे पीएम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होतात.

परिणामी voluntary surrender हा पर्याय वापरताना खबरदारी घेणे खूपच आवश्यक आहे. कारण आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांसाठी हा पर्याय चुकून क्लिक होत असल्यामुळे नुकसानदायक ठरत आहे. पीएम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होऊ नये यासाठी ही वेबसाईट वापरताना काय खबरदारी घ्यावी याबद्दल पुढे सविस्तर माहिती दिली आहे.
सदर वेबसाईट वर कुठे आहे हा पर्याय?
शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर आल्यानंतर जे मोठमोठे मेनू दिसतात त्यात सर्वात शेवटी Voluntary Surrender of PM KISAN benefits हा पर्याय आपल्याला दिसून येईल. व्हॉलेंटरी सरेंडर फॉर पीएम किसान बेनिफिट्स अर्थात स्वतः च्या इच्छेने पीएम किसान योजनेमधून बाहेर निघण्याचा पर्याय असा त्याचा अर्थ आहे. चुकून जरी त्या पर्यायाला हात लागला तरी पीएम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात. हा पर्याय म्हणजेच या योजेनच्या माध्यमातून आपल्याला दिलेला नोंदणी क्रमांक आणि आधार नंबरच्या साहाय्याने यातून बाहेर पडण्याचा हा पर्याय आहे.

शेतात एक छोटा खड्डा खोदून सरकारकडून मिळवा 4800 रूपये थेट तुमच्या बँक खात्यात
शेतकऱ्यांचे लाभ बंद होण्याची भीती का आहे?
बरेच शेतकरी बांधव हे इंग्रजी भाषेची अडचण असल्यामुळे त्यांना सदर वेबसाईट वरील सर्वच इंग्रजी वाचता येईलच अस नाही. आजकाल जवळपास सर्वच शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन हा असतोच. अनेक शेतकऱ्यांना मोबाइल मधून ऑनलाईन पद्धतीने विविध योजनांचे अर्ज भरण्याची तसेच माहिती घेण्याची अन् इतर आवश्यक कामे करण्याची जिज्ञासा असते. मात्र अशा शेतकऱ्यांना जर पी एम किसान योजनेच्या वेबसाईट वरील voluntary surrender हा पर्याय न कळून चुकून त्यावर क्लिक झाले तर त्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात. यामुळे शेतकरी मित्रांनो या वेबसाईटचा काळजीपूर्वक वापर करणे खूप आवश्यक आहे.
केंद्र सरकारच्या काही योजनांतून करता येतो योजनांचा स्व-ईच्छेने त्याग
केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या काही योजना अशा असतात की ज्यामध्ये सबसिडी मिळत असेल, किंवा आर्थिक सहाय्य मिळत असेल अशा योजनांमधून एखाद्या लाभार्थ्याला जर एखाद्या शासकीय योजना लाभ नको असेल तर ते लाभार्थी गा योजनांमधून voluntary surrender हा पर्याय वापरून योजनेच्या लाभातून बाहेर पडू शकतात. सदर पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपली माहिती भरून ओटीपी टाकल्यानंतर अशा पीएम किसान सन्मान निधी योजनेसारख्या केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून मिळणारे लाभ बंद केले जातात.
माझी लाडकी बहिण योजनेतून या महिलांना वगळण्यात येणार
…तर पीएम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होणार
तुम्हाला आता या voluntary surrender या पर्यायाबद्दल जागरूक राहून याचा चुकूनही वापर होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे volunary surrender या पर्यायावर चुकूनही क्लिक करू नका. असे झाल्यास तुम्हाला पी एम किसान योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येऊन तुमचे पीएम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होऊन तुम्हाला डोक्याला हात लावून बसण्याची पाळी येईल.
पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता कधी मिळणार?
या माहितीपूर्ण लेखातून आपण voluntary surrender हा पर्याय चुकीने वापरल्यास पीएम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात याबद्दल माहिती जाणून घेतली. मात्र बहुसंख्य शेतकऱ्यांचा मनात एक प्रश्न असेल तो म्हणजे पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता कधी मिळणार? तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता कधी मिळणार याबद्दल अद्यापपर्यंत कुठलीही अधिकृत माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली नाही. मात्र काही वृत्त चॅनलच्या वेबसाईट अनुसार फेब्रुवारी महिन्याच्या मध्यंतरी किंवा शेवटच्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता मिळणार असल्याचा बातम्या येत आहेत.