माझी लाडकी बहिण योजनेच्या अपार यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या लाडक्या बहिणीने अजून एक कल्याणकारी योजना घेऊन आले आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांचे सध्या पाचही बोटे तुपात आहेत असे म्हणायला हरकत नाही. या योजनेचे नाव आहे मोलकरीण योजना. या योजनेचे कार्यान्वयन करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे.
कोणत्या महीलांसाठी आहे ही कल्याणकारी योजना?
घरेलु कामगार महिला ह्या आर्थिक दृष्ट्या गरीब असतात त्यांच्यावर मुलांच्या शिक्षणाची तसेच त्यांच्या संगोपनाची जबाबदारी असते तसेच स्वतःच्या कुटुंबाला सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी असते. त्यामुळे ते अत्यंत कमी पगारात कोणाच्या तरी घरी धुणीभांडी, जेवण बनविणे, साफसफाई अशी घरकामे करतात. परंतु त्यांना तुटपुंजा पगारात स्वतःच्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करणे शक्य होत नाही त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने घरगुती महिला कामगारांसाठी कल्याणकारी अशी मोलकरीण योजना लवकरच सुरु करण्याचा विचार सुरू आहे.
सुमारे 12 लाख नोंदणीकृत घरेलु कामगार महिलांना मिळणार लाभ
लाडकी बहिण योजनेद्वारे लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजाराची भरघोस रक्कम अनुदान स्वरूपात देऊन शिंदेंनी सर्वच महिलांच्या आनंदात भर घातली आहे. अशातच अजून एक गिफ्ट महिलांना देण्यासाठी मोलकरीण योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. असंघटित क्षेत्रातील घरेलु कामगार महिलांसाठी ही योजना कार्यान्वित होणार आहे. राज्यात सुमारे 10 ते 12 लाख घरेलु कामगार महिलांची संख्या असल्याची माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे.
या योजनेच्या लाभाचे स्वरूप कसे असेल?
मुख्यमंत्री मोलकरीण योजनेच्या माध्यमातून महिलांना घरगुती भांड्यांचा संच मिळणार असून या संचाची किंमत सुमारे दहा हजार रुपये इतकी असणार आहे. या संचामध्ये कुकर सहित एकूण इतर 21 भांड्यांचा समावेश असणार आहे.
काय आहे मोलकरीण योजनेची पात्रता?
ज्या महिलांनी घरेलु कामगार म्हणून नोंदणी केली आहे फक्त अशाच नोंदणीधारक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परिणामी आधी लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी गडबडीत असणाऱ्या महिला आता मोलकरीण म्हणून अधिकृतरित्या नोंदणी करून घेण्याच्या गडबडीत आहेत.
योजनेअंतर्गत मिळणार सुमारे दहा हजार रूपये किंमतीचा घरगुती भांड्यांचा संच
एका वृत्तपत्र वार्ताहार सोबत बोलताना मोलकरीण योजना बद्दल माहिती देताना एका सरकारी अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी भोजन योजना आणि कामावरील साहित्य संच वाटपाच्या धर्तीवरच नोंदणीकृत घरेलु कामगार तसेच मोलकरणी साठी सुमारे 10 हजार रुपये किमतीचा घरगुती भांडी-उपकरणे, कुकर इत्यादी साहित्य सामाविष्ट असलेला संच सदर लाभार्थी महिलांना वितरीत करण्याचा शासनाचा मोलकरीण योजनेच्या माध्यमातून मानस आहे.
मोलकरीण योजनेच्या पात्रतेचे निकष काय आहेत?
फक्त महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवास असलेल्या नोंदणीकृत घरेलु कामगार महिलांनाच मोलकरीण योजनेचा लाभ दिला जाईल.अर्जदार घरगुती कामगार महिला असणे आवश्यक आहे.घरकाम करणारी महिला केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत घरकाम कामगार योजनेअंतर्गत लाभ घेत नसावी किंवा आधी लाभ घेतलेला नसावा.अर्जदार व्यक्तीने घरकाम कामगार संघटनेमध्ये नोंदणी केलेली असणे अनिवार्य आहे.
मोलकरीण योजना चे लाभार्थी होण्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
१) अर्जदार महीलेचे आधार कार्ड
२)अर्जदार महिलेचे रहिवाशी प्रमाणपत्र
३) अर्जदार महिलेचे पासपोर्ट आकाराचे फोटो
४) घरगुती महिला नोंदणी प्रमाणपत्र
५) अर्जदार महलेच्या कुटुंबाची शिधापत्रिका
६) बँक खात्याचा तपशील/बँक पासबुक
७) अर्जदार महिलेची स्वाक्षरी/अंगठा असलेले स्वयं घोषणापत्र
राज्यात एकूण किती घरगुती कामगार आहेत?
यावेळी काँग्रेसचे दिवंगत आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते तेव्हाच घरेलु कामगारांची संख्या 10 लाख असल्याची माहिती विधिमंडळात देण्यात आली होती. त्यावर तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनीही शिक्कामोर्तब केलं होतं. राज्यात सध्यस्थितीत सुमारे 12 ते 13 लाख घरेलु कामगार असून, त्यात 99 टक्के इतकी महिलांची सख्या आहे. परंतु यामध्ये एकूण किती महिलांनी नोंदणी केली आहे हे मात्र निश्चित नाही. आपल्याला जर मोलकरीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वात आधी घरगुती कामगार म्हणून नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी आपण आतापासूनच कामाला लागा आणि सदर योजनेचा लाभ घ्या.
मोलकरीण योजना लाभासाठी घरेलु कामगार म्हणून नोंदणी कशी आणि कुठे कराल?
महाराष्ट्र शासनाकडून लवकरच या योजनेच्या अंमलबजावणी बाबत शासन निर्णय प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. तरी ज्या इच्छुक महिलांना मोलकरीण योजना अंतर्गत लाभ घ्यायचा आहे त्यांनी घरेलु कामगार म्हणून आपल्या नावाची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या महाकामगार पोर्टल वर आपण घरगुती कामगार म्हणून अधिकृतरित्या नोंदणी करू शकता. शासनाच्या महाकामगार संकेतस्थळाची लिंक पुढीप्रमाणे आहे.
https://mahakamgar.maharashtra.gov.in/worker.htm
घरेलु कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर घरेलु कामगार नोंदणीचा ऑनलाईन अर्ज येईल.
वैयक्तिक माहिती
या अर्जात तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्म तारीख, मोबाइल नंबर, लिंग, वैवाहिक स्थिती, राष्ट्रीयत्व, ईमेल, आधार क्रमांक तसेच तुमचा प्रवर्ग (एससी, एसटी,ओबीसी इत्यादी) ही सर्व माहिती सादर अर्जात भरावी लागेल. याशिवाय
तुम्ही ज्याच्याकडे काम करत आहात त्या मालकाची माहिती
तुम्ही काम करत असलेल्या मालकाचे नाव, मालकाचा पत्ता, तुमच्या कामाचे स्वरूप, तुम्हाला मिळणारी दैनंदिन मजुरीची रक्कम,
वारसदार व्यक्तीची माहिती
अर्जदार वारस लावू इच्छित व्यक्तीचे नाव, अर्जदाराचे त्या व्यक्तीशी असलेले नाते, वारसदार म्हणून लावलेल्या व्यक्तीचे वय ही सर्व माहिती अचूकपणे भरावी.
अर्जदाराच्या बँकेचा तपशील
अर्जदाराने त्यांच्या बँकेचा तपशील व्यवस्थित भरावा यामध्ये बँके शाखेचे नाव, बँकेचे ठिकाण, अकाउंट नंबर, आयएफएससी कोड इत्यादी माहिती भरायची असेल.
रकान्यात विचारलेली संपूर्ण माहिती
वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुमच्या समोर एक तक्ता येईल. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या राशन कार्ड वर असलेल्या सर्व सदस्यांची खालील माहिती भरणे आवश्यक आहे. या तक्त्यात कुटुंबातील सदस्यांचे संपूर्ण नाव, वय, जन्मतारीख, अर्जदारासोबत असलेले नाते, शिक्षण आणि व्यवसाय या सर्व बाबींचा समावेश असेल. एका सदस्याची माहिती भरून झाली असेल तर तुम्ही तक्त्या खाली दिलेल्या Add new row, म्हणजेच नवीन रकाना समाविष्ट करा या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला एका पाठोपाठ एक अशी तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरावी लागेल.
व्हेरिफिकेशन कोड आणि फोटो अपलोड
अर्जाच्या सुरुवातीलाच अर्जदाराला त्यांचा फोटो अपलोड करण्यासाठीचे ऑप्शन आहे. या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे. एक लक्षात घ्या तुम्ही अपलोड करत असलेल्या फोटोची साइज 20 ते 50 kb असायला हवी. 50 kb पेक्षा जास्त size तुम्ही अपलोड करू शकणार नाहीत. त्यामुळे तुम्ही जो पासपोर्ट फोटो अपलोड करणार आहात, त्या फोटोची साइज आठवणीने 50 kb पेक्षा कमी करून घ्या. तुमची ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर शेवटी दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून अर्ज सबमिट करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल. असे केल्यावर तुम्हाला अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाला अस पॉप अप येईल. तसेच तुम्ही दिलेल्या मोबाइल क्रमांकावर आणि ईमेल वर त्याचा मेसेज प्राप्त होईल.
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी करून मिळवा पेटी आणि घरगुती भांडी संच तसेच विविध योजनांचा लाभ
पडताळणी आणि अर्ज मंजूर
तुम्ही सादर केलेल्या अर्जाची संबंधित अधिकारी पडताळणी अन् मूल्यमापन करतील. त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला 1 रुपया फी भरून पावती काढता येईल.
नोंदणी झाल्यानंतर घेता येतील विविध लाभ
एकदा तुमची घरेलु कामगार म्हणून यशस्वीरीत्या नोंदणी पूर्ण झाली की तुम्हाला घरेलु कामगार मंडळातर्फे अनेक योजना आणि सुविधांचा लाभ घेता येणार आहे. यात कोणत्या योजना आणि सुविधा असतील त्याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
घरेलु कामगार नोंदणीसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
घरेलु कामगार नोंदणी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध नसल्यास सदर नोंदणी ऑफलाईन पद्धतीने करता येते. त्यासाठी कामगार आयुक्त कार्यालय यांच्याकडे सदर अर्ज व्यवस्थित भरून सबमिट करावा लागतो.
मोलकरीण योजना लाभासाठी लाभार्थी घरेलू कामगार नाव नोंदणीचे निकष
पात्रता: ज्या अर्जदाराने वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली असतील परंतू त्याचे वय 60 वर्ष पेक्षा कमी असेल आणि जो कोणतेही घरेलू काम करीत असेल तो प्रत्येक घरेलू कामगार लाभार्थी म्हणून नावनोंदणी करण्याकरीता पात्र ठरतो.
घरेलु कामगार नाव नोंदणी अर्ज नमुना खालील लिंक वरून डाऊनलोड करून घ्या. आणि हा अर्ज अचूकपणे भरून तो मंडळाने प्राधिकृत केलेल्या कामगार आयुक्त कार्यालय येथील अधिकारी यांच्याकडे सादर करावा. लाभार्थीं म्हणून नोंदणीसाठी करावयाच्या अर्जासोबत खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
सध्याच्या मालकाचे प्रमाणपत्र किंवा तो घरेलू कामगार आहे हे नमूद करणारे लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.रहिवाशी प्रमाणपत्र.
घरेलू कामगाराच्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या तीन प्रती.
लाभार्थी म्हणून घरेलू कामगाराची नोंदणी झाल्यानंतर,सचिव त्याची नोंद नोंदवहीत घेईल.
ओळखपत्र :-लाभार्थी म्हणून घरेलू कामगाराची नोंदणी झाल्यानंतर मंडळ प्रत्येक लाभार्थींला ओळखपत्र देण्यात येते.
घरेलु कामगार नोंदणी फी किती असते?
रु.३०/ इतके शुल्क चलन / डिमांड ड्राफ्ट/ पोस्टल ऑर्डर / रोखीने भरावे लागणार आहे.
ई श्रम कार्ड ऑनलाईन बॅलेन्स चेक आणि ekyc करा घरबसल्या, ही आहे लिंक
घरेलू कामगारांचे अंशदानाचे स्वरूप काय असते?
ज्या घरेलू कामगाराची लाभार्थी म्हणून नोंदणी झाली असेल त्याला,नोंद झालेल्या मंडळाकडे रु.५/- इतके अंशदान दर महिन्याला द्यावे लागेल.
ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घरेलु कामगार म्हणुन अर्ज भरून यशस्वीरित्या नोंदणी केली तरच मोलकरीण योजना अंतर्गत लाभासाठी आपण पात्र ठराल. लवकरच या योजनेसंबंधी प्रशासनाकडून सविस्तर नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.
घरेलु कामगारांच्या कुटुंबांसाठी असलेल्या विवध योजनांची माहिती
घरेलु कामगार व्यक्तीच्या कुटुंबांसाठी कामगार मंडळाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1) सर्वसाधारण शिष्यवृत्ती
2) परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
3) क्रीडा शिष्यवृत्ती
4) पाठ्यपुस्तक खरेदीसाठी अर्थसहाय्य
5) MS-CIT कोर्स साठी अर्थसहाय्य
6) गुणवंत विद्यार्थी गौरव
7) साहित्य प्रकाशन अनुदान
8) शिवण मशीन अनुदान योजना
9) गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य
10) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
11) आत्महत्याग्रस्त कुटुंबास अर्थसहाय्य
12) अपघाती विकलांग झाल्यास अर्थसहाय्य
कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
13) वाहन चालक प्रशिक्षण
14) इंग्रजीसह विदेशी भाषा संभाषण प्रशिक्षण
15) स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण
घरेलु कामगारांच्या कुटुंबांसाठी असलेल्या विवध योजनांचे शासन निर्णय तसेच अधिक माहिती PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
https://public.mlwb.in/public/showPage/3807?language=mar
दिलेल्या लिंक वर जाऊन आपण घरेलु कामगार मंडळातर्फे कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती pdf स्वरूपात डाऊनलोड करू शकता.
घरेलु कामगार अंतर्गत माहिती अपडेट करण्यासाठीची वेबसाईट
राज्यातील ज्या कामगारांनी घरेलु कामगार अंतर्गत यशस्वीरीत्या नोंदणी केलेली आहे अशा कामगारांना त्यांची माहिती अपडेट करण्यासाठीची अधिकृत वेबसाईटची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
https://public.mlwb.in/public/googleForm
कामगारांचे वैयक्तिक तपशील अपडेट करण्याची प्रक्रिया
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इन असे ऑप्शन येईल
त्यावर क्लिक केल्यानंतर नोंदणी करतेवेळी दिलेला मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. तुम्ही मोबाइल नंबर टाकून सेंड OTP पर्यायावर क्लिक केलं की तुमच्या मोबाइल क्रमांकावर एक OTP प्राप्त होईल. तो OTP दिलेल्या बॉक्स मध्ये भरल्यानंतर एक नवीन पेज उघडुन तुमची सर्व माहिती त्यात तुम्हाला दिसेल. त्यावर आपल्याला जी माहिती अद्ययावत करायची आहे त्यापुढे एडिट या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा वैयक्तिक तपशील अद्ययावत करू शकता.
पिंपरी चिंचवड येथे कामगार मंत्र्यांकडून 1820 घरेलु कामगार महिलांना भांडी संच वाटप संपन्न
चिंचवड येथे 20 सप्टेंबर 2024 रोजी रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजित नोंदणीकृत घरेलू कामगार महिलांना घरगुती भांडी संच कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आले. या घरेलु कामगार भांडी वाटप कार्यक्रमासाठी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, सदाशिव खाडे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, उप आयुक्त अभय गिते इत्यादी मान्यवरांसह घरेलू कामगार विविध संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा हजर होते. कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे केवळ १ रुपयांमध्ये नोंदणी करता येत असून या मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता कामगारांनी नोंदणी करावी असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी कार्यक्रमात बोलताना आवाहन केले.
1 रुपयात घरेलु कामगार नोंदणी करून विविध योजनांचा लाभ घ्या. – कामगार मंत्री डॉ. खाडे
यावेळी बोलताना डॉ. खाडे म्हणाले, घरेलू कामगारांना या घरगुती भांडी संच वाटप माध्यमातून लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. घरेलू कामगार महिलांना मोलकरीण योजना अंतर्गत लाभासाठी सरकारने ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. घरेलु कामगार मंडळामार्फत यासह विविध प्रकारचे लाभ देण्यात येत असतात. यामध्ये घरेलू कामगार महिलांना दोन अपत्यापर्यंत ५ हजार रुपये प्रसुती निधी, सन्मानधन योजनेमार्फत वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या नोंदणीकृत पात्र घरेलू कामगार व्यक्तींना १० हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केल्या जातात असतात. मोलकरीण योजना अंतर्गत संसार उपयोगी भांडी संच तसेच घरेलु कामगार व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या वारसास २ हजार रुपये आर्थिक मदत मिळते, अस ही त्यांनी स्पष्ट केलं.
कामगार विभागाच्या मुख्य सचिव श्रीमती सिंघल यांचे मनोगत
या कार्यक्रमात कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सिंघल यांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, घरेलू कामगारा व्यक्तींना त्यांच्या हक्काच घरं, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, महिलांच्या आरोग्याची काळजी याशिवाय पेन्शनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार युद्धस्तरावर प्रयत्न करत आहे. घरेलू कामगार मंडळाकडे अधिकाधिक महिलांनी नोंदणी करून इतरांना सुद्धा नोंदणीसाठी प्रेरित करावे. त्यामुळे जास्तीत जास्त नोंदणीकृत कामगारांना लाभ देणे शक्य होईल. घरेलु कामगार मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या लाभासाठी नोंदणीचे नुतनीकरण करणे सुद्धा आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बांधकाम कामगारांना सुद्धा मिळतात विविध लाभ
घरेलु कामगार मंडळ प्रमाणेच राज्यात बांधकाम कामगारांनाही विविध लाभ देण्यास प्रशासन तत्पर आहे. कामगारांची नोंदणी सुलभतेने व्हावी या हेतूने नुकतेच तालुकास्तरावर ३०४ सेतू केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून प्रशासन सर्वसामान्यांच्या कल्याणार्थ अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे मंडळाचे प्रयत्न असल्याचे तसेच सरकार कामगारांच्या पाठीशी असल्याची त्यांनी ग्वाही दिली.
जळगाव जिल्ह्यात मोलकरीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना भांडी संच वाटप
जुलै महिन्यात माळी समाज मंगल कार्यालय, जामनेर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगार महिला- पुरुषांसाठी मोफत गृहपयोगी साहित्य संचाचे (भांडे) वाटप गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह घरेलु कामगार महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मोलकरीण योजना अंतर्गत मिळणारे विविध लाभ
महाराष्ट्र राज्यात कामगार आयुक्त कार्यालयामार्फत कल्याणकारी योजना राबविण्यासाठी कामगार कल्याण मंडळाची (Labor Welfare Board) स्थापना करण्यात आलेली आहे. या मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असतात. याआधी इमारत व बांधकाम कामगार मंडळाकडून राबविण्यात आलेल्या साहित्य वाटप योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. याच धर्तीवर विकास आयुक्त (असंघटित कामगार ) यांच्याकडून मोलकरीण योजना अंतर्गत घरेलू कामगार महिला (Domestic workers) यांच्यासाठी संसारोपयोगी साहित्य वाटप करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावास प्रशासनाने मंजुरी दिल्याने आता घरेलू कामगारांसाठी (मोलकरीण योजना अंतर्गत घरेलु कामगार महिलांना (Domestic workers) संसारोपयोगी साहित्य (भांडी) भेटवस्तू वाटप करण्यात येणार आहेत. यामध्ये घरगुती उपयोगासाठी लागणाऱ्या सर्वच भांड्यांचा अन् इतर साहित्यांचा समावेश असणार आहे. या योजनेचा लाभ जिल्हास्तरीय कार्यालयामार्फत घरेलू कामगारांना दिला जाणार आहे. यापूर्वी कामगार कल्याण मंडळाकडून मोलकरणींसाठी प्रसूतीदरम्यान पाच हजार रुपये तसेच मृत्यूपश्चात वारसांना तत्काळ दोन हजार रुपये अनुदान देण्याची योजना राबविली जात आहे. तसेच कोरोना काळात वय वर्ष 55 पूर्ण झालेल्या घरेलू कामगाराच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे दहा हजार रुपये देण्यात आले होते.
आता मोलकरीण योजना या नवीन योजनेमुळे घरेलू कामगारांच्या (मोलकरीण स्त्रियांच्या (Domestic workers) संसाराला काहीसा हातभार लागणार आहे. (Labor Welfare Board) शासनाकडून घरेलू कामगार तसेच मोलकरणींना संसार साहित्य वाटप करण्याची योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या जाणार आहे. त्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू केली जाईल. नोंदणीकृत घरेलु कामगारांना या मोलकरीण योजनेअंतर्गत हा लाभ मिळणार आहे. यापासून कोणतीही घरेलु कामगार महिला वंचित राहणार नाही, याची दक्षता मंडळाकडून घेण्यात येणार आहे. असे नाशिकचे कामगार उपायुक्त विलास माळी यांनी स्पष्ट केले आहे.
घरेलु कामगार महिलांचे इतर प्रश्न सुद्धा सुटले पाहिजे अशी मागणी
घरेलू, मोलकरणी कामगारांना पेन्शन, राहण्यासाठी हक्काचे घर, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असे अनेक प्रश्न अजून जैसे थे आहेत. याबाबत शासनाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मोलकरीण योजना अंतर्गत घरेलु कामगार महिलांना संसाराला उपयोगी पडणारी भांडी वितरीत करण्याचा निर्णय योग्य असला तरी इतरही महत्त्वाचे निर्णय मार्गी लागले पाहिजे अशाप्रकारची राजपालसिंग शिंदे, लोकराज्य घरेलू कामगार संघटना, नाशिक यांनी मागणी केली आहे.
घरेलु कामगारांनी अमिषाला बळी पडू नये – अभय गीते, कामगार उपायुक्त, पुणे
बांधकाम व घरेलू कामगारांना अनुक्रमे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या मोलकरीण योजना सारख्या योजनांचे लाभ देण्याबाबत दलाल, त्रयस्थ व्यक्तीमार्फत आमिष दाखविण्यात येऊन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत त्याला कामगारांनी बळी पडू नये असे आवाहन करण्यात कामगार उपायुक्त यांनी केले आहे.
फसवणुकीचे प्रकार वाढले, सतर्कता आवश्यक
घरेलु कामगार मंडळात नोंदणी करण्याचे आणि त्याअंतर्गत घरेलू व बांधकाम कामगारांना लाभ देण्याचे आमिष दाखवून कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्या नावाखाली पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी मंडळाला प्राप्त होत असून घरेलु कामगारांनी कोणत्याही दलाल, संघटना अथवा त्रयस्थ व्यक्ती यांच्या आमिषाला व दबावाला बळी पडून फसू नये किंवा अशा लोकांसोबत कुठलाही आर्थिक व्यवहार करु नये. अशा व्यक्तींनी जर तुमच्याकडे नोंदणी करून देतो, नूतनीकरण करून लाभ मिळवून देतो अशाप्रकारचे प्रलोभन दाखवून पैशाची मागणी केल्यास त्यांच्या विरोधात जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल नोंदवावी. अस केल्याने गैरप्रकारांना आळा बसेल तसेच घरेलु कामगारांची फसवणूक होणार नाही.
मोलकरीण योजना अंतर्गत गृहपयोगी संच (भांडी वाटप) आदीचे वितरण शासनाने नियुक्त केलेल्या अधिकृत एजन्सीमार्फत करण्यात येत असल्यामुळे मोलकरीण योजना मधून मिळणारा भांडी संचाचा लाभ मिळण्यासाठी कोणतेही शुल्क वेगळे आकारण्यात येत नाही. त्यामुळे कुठ्ल्याही प्रलोभनांना भाळून आपली फसवणूक होऊ देऊ नका अशाप्रकारचे आवाहन कामगार उपायुक्त अभय गीते यांनी केले आहे.
घरेलु कामगार भांडी वाटप संदर्भात नवीन शासन निर्णय शुद्धिपत्रक
दिनांक 12 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जिवीत नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर जीआर काढून शुद्धिपत्रकात मध्ये म्हटले आहे की महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनीयम, २००८ च्या कलम १५ पोटकलम 2 (ग) अन्वये प्राप्त अधिकारान्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून जिवीत/सक्रिय नोंदणीकृत घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्याकरीता खर्च करण्यात येणार आहे
असंगठीत तसेच घरेलु कामगारांच्या वेतनात केंद्र सरकारकडून घसघशीत वाढ
देशातील असंख्य असंगठीत कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या वतीने कामगारांच्या किमान वेतन दरांमध्ये सरकारनं वाढ करण्यात आली आहे. विशेषत: असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अन् आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने परिवर्तनीय महागाई भत्ता (VDA) मध्ये सुधारणा करून किमान वेतन दरांमध्ये घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या कामगारांचे वाढले वेतन?
इमारत बांधकाम कामगार, हमाल, चौकीदार किंवा पहारेकरी, केर काढणे, साफसफाई, घरकाम, खाणकाम आणि शेतमजूर तसेच अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या असंगठीत तसेच घरेलु कामगारांना सुधारित वेतन दरांचा लाभ देण्यात येणार आहे. हे नवीन वेतन दर 1 ऑक्टोबर 2024 पासून संपूर्ण देशात लागू होणार आहेत. वेतनदरांमध्ये शेवटची सुधारणा एप्रिल 2024 मध्ये करण्यात आली होती. किमान वेतन दरांचे कौशल्य स्तरांच्या आधारे वर्गीकरण केले जाते. यामध्ये अकुशल, अर्ध-कुशल, कुशल आणि सर्वाधिक कुशल-तसेच भौगोलिक क्षेत्रानुसार-ए, बी आणि सी असे वर्गीकरण करण्यात येतं.
कामगार श्रेणी नुसार झालेली सुधारित पगारवाढ
शासन निर्णयाप्रमाणे अकुशल कामासाठी उदा. बांधकाम, झाडूकाम, साफसफाई, हमाली या क्षेत्रातील कामगारांसाठी अ श्रेणीत किमान वेतन दर 783 रुपये प्रतिदिन (मासिक वेतन 20358 रुपये) अर्ध-कुशल कामगारांना प्रत्येक दिवशी 868 रुपये (महिन्याला 22568 रुपये) इतकं असेल.
कुशल आणि अर्ध कुशल कामगारांना नवीन निर्णयानुसार मिळणारे किमान वेतन याप्रमाणे
या निर्णयानुसार कुशल, कारकुनी आणि विना शस्त्र चौकीदार किंवा पहारेकरीसाठी दिवसाला 954 रुपये (महिन्याला 24804 रुपये) तसेच कुशल आणि शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या चौकीदार किंवा पहारेकऱ्यासाठी 1035 रुपये प्रतिदिन (26910 रुपये) इतका पगार मिळणार आहे. याशिवाय औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकातील सहा महिन्यांच्या सरासरी वाढीच्या आधारे केंद्र सरकार वर्षातून दोनदा 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरपासून प्रभावीपणे परिवर्तनीय महागाई भत्ता वाढीत सुधारणा करते. केंद्र सरकारच्या मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) यांच्या संकेतस्थळावर (https://clc.gov.in) कार्य , श्रेणी आणि क्षेत्रानुसार किमान वेतन दरांबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.