20 गुंठे शेतातील करटोली पीक देत आहे आठवड्याला 30 हजाराचा नफा

विविध व्याधींवर रामबाण तसेच बहुसंख्य जीवनसत्वांनी परिपूर्ण असलेली रानभाजी म्हणजे करटोली. या करटोलीची फक्त 20 गुंठे शेतात लागवड करून बोरगावचा एक शेतकरी लखपती झाला आहे. जालना तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी दीपक डोके यांनी पारंपरिक कापूस आणि सोयाबीन पिकावर होणारा एकंदर खर्च लक्षात घेऊन त्यांच्या शेतात या पिकांऐवजी करटोली ची लागवड केली असून आता त्यातून मिळणारे उत्पन्न पाहून परिसरातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारटोली, कंटोली, रानकारली, कर्कोटकी,करटुली़, करटोली तसेच इंग्रजीत वाइल्ड करेला फ्रूट असे असंख्य नावे कर्टुला वनस्पतीला आहेत.

करटोली शेती भरघोस उत्पन्न हमखास

सध्या करटोली चे भाव प्रती किलो 150 ते 250 रुपये असून दीपक डोके हे आठवड्यातून 2 वेळा त्यांच्या शेतात डोलत असलेल्या करटोली फळांची तोडणी करून बाजारात जाऊन विकतात अन् चक्क 20 हजार रुपयांचे उत्पन्न फक्त 20 गुंठे शेतातून घेतात.

या शेतकऱ्याने निवडला वेगळा मार्ग

पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता थोडीशी चौकस बुद्धी वापरून शेतीतील नवीन नवीन संधी शोधून त्या आत्मसात करणे काळाची गरज आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काही वेगळे करण्याची हिम्मत ठेवली त्यांनीच भरघोस उत्पन्न घेऊन लाखों करोडो रुपयांची कमाई केल्याचे आपल्याला रोज प्रसारमाध्यमांमध्ये बघायला मिळते. आता जालन्यातील या अल्पभूधारक शेतकऱ्याने सुद्धा याची प्रचिती आणून दिली आहे.

दीपक डोके यांचे शेतीविषयक मत

दीपक डोके यांच्या मते पारंपरिक पिकांच्या लागवड पासून काढणी पर्यंतचा खर्च लक्षात घेता शेतीमाल विकून येणारी रक्कम काही जास्त नफा देणारी नसते. त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे होत्याचे नव्हते कधी होईल हे सुद्धा सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी करटोली लागवडीचा प्रयोग करायचे ठरवले. आणि त्यांचा हा प्रयोग त्यांना भरघोस उत्पन्न देण्यास कारणीभूत ठरला. गाव असो की शहर, करटोली ची मागणी काही केल्या कमी होत नाही. शिवाय बाजारभाव सुद्धा एकदम झक्कास. त्यामुळे करटोली पिकाची लागवड हा शेतकऱ्यांसाठी नफ्याचा सौदा नक्कीच होऊ शकतो असेही दीपक यांनी सांगितले.

करटोली एक अत्यंत गुणकारी औषधी वनस्पती

करटोली भाजीला लोक आपल्या आहारात का महत्व देतात तर करटोली सेवनमुळे लोकांचे आरोग्य चांगले राहते.बऱ्याच दुर्धर आजारांवर रामबाण उपाय म्हणून करटोली कडे बघितल्या जाते. चला तर जाणून घेऊया करटोली चे औषधी उपयोग कोणते आहेत.

करटोली चा आहारात समावेश केल्यास होणारा लाभ
करटोली ही आरोग्यदायी भाजी असून या भाजीला आपल्या आहारात आपण का समाविष्ट केले पाहिजे त्यासाठी या भाजीचा लाभ काय होतो ते जाणून घेऊया.

करटोली चे आपल्या आहारातील अनन्यसाधारण महत्त्व

१) करटोली आपल्या यकृत साठी अत्यंत गुणकारी आहे. आपल्या यकृताला क्रियाशील राहण्यास अन् सुस्थितीत ठेवण्यास ही भाजी कमालीची गुणकारी आहे.

२) ही भाजी बिटा कारोटिन, व्हिटॅमिन सी तसेच, अँटी ऑक्सीडेंट मॅग्नेशियमच्या गुणांनी परिपूर्ण असते. तसेच यात अन्नद्रव्यांचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते.

३) या भाजीच्या कंदाचा उपयोग मुतखडा, हत्तीरोग, मूळव्याध, ताप आणि दमा यांसारख्या आजारांच्या उपचारासाठी होतो.

४) या फळांचे सेवन केल्यास पचनसंस्था बळकट होते.

५) या भाजीच्या कोवळ्या फळाच्या सेवनाने शरीरातील पित्तस्राव योग्य प्रमाणात होतो. तसेच पोट साफ होते.

६) या भाजीचा जेवणात नियमित वापर केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते.

७) थंडीताप, आतड्यांचे आजार, बद्धकोष्ठता, शवसंविषयक आजार, उचकी इत्यादी बाबतीत ही वनस्पती अत्यंत प्रभावीपणे काम करते.

८) एखाद्याला बोलताना जास्त लाळ येत असल्यास, मळमळ होत असल्यास कर्टोलीचे चे सेवन आराम देण्याचे सामर्थ्य ठेवते.

९) याशिवाय पावसाळ्यात हमखास उद्भवणारे सर्दी, ताप खोकला यांसारख्या व्हायरल आजारांवर तर करटोली ही अगदी रामबाण उपाय म्हणूनच कामात येते.

करटोली भाजीचा अन्य समस्यांवर गुणकारी औषध म्हणून उपयोग

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत करणाऱ्या आरोग्याविषयी जागरूक लोकांसाठी ही भाजी अत्यंत गुणकारी ठरते. या भाजीत कॅलरीचे प्रमाण नगण्य असते तसेच फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्याने भूक कमी लागते परिणामी आपले वजन नियंत्रणात राहते.

करटोली भाजीत ल्युटीन आढळते, ज्याच्या मदतीने हृदयाच्या समस्यांसह कर्करोगदेखील टाळता येणे शक्य होते. व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्त्रोतम्हणुन सुद्धा करटोली सर्वमान्य आहे, व्हिटॅमिन सी हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य करतात.

करटूला भाजीने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. पाण्याप्रमाणेच यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त प्रमाणत असते, त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहून मधुमेह ग्रस्त लोकांना याचा फायदा मिळतो. कर्टुला भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याच्या सेवनाने मुरुमे नष्ट होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

आता जनसामान्यात इतकी लोकप्रिय अन् प्रचंड मागणी असलेली करटोली ची लागवड आपणही करावी अस तुमच्या मनात एक शेतकरी म्हणून येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. जर तुम्ही पक्का विचार करून तुमच्या शेतात करटोली ची लागवड करायचं दृढनिश्चय केलाच आहे तर तुम्हाला करटोली ची लागवड कशी करावी याबद्दल सुद्धा इत्यंभूत माहिती देणे आमचे कर्तव्य आहे. चला तर जाणून घेऊया करटोली लागवड कशी करावी, करटोली बियाण्याची निवड कशी करावी, यासाठी लागणारे हवामान कसे असते याबद्दल सविस्तर माहिती.

करटोली लागवड पद्धती

करटोली लागवड पद्धती

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हफ्त्यात करटोली ची लागवड पूर्ण करावी. त्यासाठी जमीन नांगरणी करून चांगली भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीत दीड ते दोन मीटर अंतर ठेवून 60 सेंटीमीटर रुंदीचे पाट काढून घ्यावेत. काढलेल्या पाटाच्या दोन्ही बाजूस एक मीटर अंतर ठेवून 30बाय 30 बाय 30 आकाराचे खड्डे खणून घ्यावे. प्रत्येक खड्ड्यामध्ये दीड ते दोन किलो कुजलेले शेणखत टाकायला विसरू नये.तसेच प्रत्येक अळ्यात 10 ग्रॅम युरिया, 10 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश, 60 ग्रॅम सुपर फॉस्फेट, आणि 50 ग्रॅम कार्बरील इत्यादी कीटकनाशक मातीत चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. काढलेल्या प्रत्येक आळ्यात करटोली चे एक कंद लावावे. (कार्बरीलच्या वापरावर केंद्रीय कृषी विभागाने बंदी घातली असून पर्यावरणाचा समतोल राहील याचे काटेकोरपणे भान ठेवून वापर करावा.

करटोली लागवड नंतर खत व्यवस्थापन कसे करावे?

यासाठी प्रती हेक्टरी 20 टन शेणखत, दीडशे किलो नत्र,एक क्विंटल स्फुरद आणि 60 किलो पालाश चा वापर करावा. लागवड करतेवेळी स्फुरद आणि पालाश ची संपूर्ण मात्रा द्यावी.नत्राची मात्रा: लागवडी वेळी 50 किलो, लागवडीनंतर 50 दिवसांनी 50 किलो तसेच 60 दिवसांनी 50 किलो पिकाला द्यावे. नंतर वेळ एक महिन्याचा झाल्यानंतर प्रत्येक करटोली वेलास 10 ते 15 ग्राम युरिया दिल्याचं गेला पाहिजेत.करटोली लागवडीसाठी ओलसर हवामान आवश्यक आहे आणि त्याच वेळी सुमारे १५००-२५०० मिली पाऊस असावा. २० ते ३० अंश तापमान त्याच्या रोपांची योग्य वाढ होण्यासाठी योग्य आहे.

लागवडीसाठी करटोली जाती कोणत्या वापराव्या?

लागवडीसाठी अंडाकृती आकाराच्या हिरव्या रंगाची 10 ते 12 ग्राम वजन असलेली फळे घ्यावी. या फळांवर मऊ काटे असून त्यांचा आकार अंडाकृती असतो. याशिवाय मध्यम गोड फळांची जात असते. अशी फळे मध्यम गोल आकाराची असून त्यांच्यावर टणक काटे असतात अन् त्यांचे वजन 13 ते 15 ग्रॅम असते. तसेच मोठ्या आकाराची जी फळे असतात त्यांचा रंग फिक्कट हिरवा असून त्यात बियाणे कमी असते.

करटोली पीक 2024

लागवडीसाठी अनेक प्रकारचे सुधारित वाण तयार करण्यात आले असून त्यामध्ये इंदिरा कानकोड-१, अंबिका-१२-१, अंबिका-१२-२, अंबिका-१२-३ अशा अनेक जाती आहेत.

करटोली लागवड करताना बीज प्रक्रिया कशी करावी?

एक लिटर पाण्यात 2 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड घेऊन त्याचे मिश्रण करून घ्यावे आणि लागवडीसाठी असणारे कंद त्यात बुडवून घ्यावेत. त्यामुळे कंद जमिनीत कुजत नाहीत.

करटोली लागवड करण्यासाठी शेतजमीन कशी असावी?

पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणारी डोंगरउताराची जमीन असावी. हलक्या किंवा मध्यम जमिनीत करटोली चे लोक घेता येते. करटोली पिकाच्या वाढीसाठी उष्ण ते दमट हवामान लाभदायक ठरते. कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये केले जाऊ शकते, परंतु सेंद्रिय पदार्थ असलेली वालुकामय जमीन योग्य राहते.

करटोली लागवड नंतर आंतरमशागत कशा पद्धतीने करावी?

लागवडीनंतर अधिक जोमाने वेलींची वाढ होत असल्याने त्यांना बांबूचा आधार द्यावा. वेल मांडवावर वाढू देणे फायद्याचे असते. वेलीच्या योग्य वाढीसाठी आजूबाजूच्या तणाचा बंदोबस्त करावा.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment