करटोली वनस्पतीचे आहारातील अनन्यसाधारण महत्त्व, एक गुणकारी वनस्पती अनेक व्याधींवर पडते भारी

सर्वगुणसंपन्न असे एकाच शब्दात वर्णन केल्या जाऊ शकेल अशी भाजी म्हणजे रानकारली ची भाजी. ताप, सर्दी, खोकला या व्हायरल विकारांपासून ते हत्तीरोग दमा, विषबाधा या जटिल समस्यांवर गुणकारी औषध म्हणजे करटोली ची भाजी. आपल्या आहारात समाविष्ट केलीच पाहिजे अशी करटोली ची भाजी. बाजारात विकायला गेलो तर खूप भाव येईल अशी करटोली ची भाजी. आज या करटोली फळाची आणि त्याच्या जमिनीतील कंदाची किमया काय आहे याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

करटोली ला अनेक नावांनी ओळखले जाते.

करटोलीला अनेक नावांनी ओळखले जाते. कारटोली, रानकारली, कंटोली, कर्कोटकी, कर्टोला, कर्टूला, करुटुले इतकी सारी नावे या कंद भाजीला आहेत. रानकारली हे भोपळ्याच्या कुळातील पीक आहे. हे एक आरोग्यदायी पीक असल्यामुळे या भाजीच्या सेवनाने अनेक आजार दूर होतात. इतकेच काय तर या भाजीचे जमिनीच्या आतमध्ये असलेले कंद सुद्धा औषधनिर्मिती साठी उपयुक्त ठरतात. या पिकाला जून ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान आधी फुले येतात अन् मग त्या फुलांपासून फळे तयार होतात.

रानकारली भाजीचे औषधी गुणधर्म

करटोलीचा आहारात समावेश केल्यास होणारा लाभ

रानकारली ही आरोग्यदायी भाजी असून या भाजीला आपल्या आहारात आपण का समाविष्ट केले पाहिजे त्यासाठी या भाजीचा लाभ काय होतो ते जाणून घेऊया.

करटोली चे आपल्या आहारातील अनन्यसाधारण महत्त्व

१) रानकारली आपल्या यकृत साठी अत्यंत गुणकारी आहे. आपल्या यकृताला क्रियाशील राहण्यास अन् सुस्थितीत ठेवण्यास ही भाजी कमालीची गुणकारी आहे.

२) ही भाजी बिटा कारोटिन, व्हिटॅमिन सी तसेच, अँटी ऑक्सीडेंट मॅग्नेशियमच्या गुणांनी परिपूर्ण असते. तसेच यात अन्नद्रव्यांचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते.

३) या भाजीच्या कंदाचा उपयोग मुतखडा, हत्तीरोग, मूळव्याध, ताप आणि दमा यांसारख्या आजारांच्या उपचारासाठी होतो.

४) या फळांचे सेवन केल्यास पचनसंस्था बळकट होते.

५) या भाजीच्या कोवळ्या फळाच्या सेवनाने शरीरातील पित्तस्राव योग्य प्रमाणात होतो. तसेच पोट साफ होते.

६) या भाजीचा जेवणात नियमित वापर केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते.

७) थंडीताप, आतड्यांचे आजार, बद्धकोष्ठता, शवसंविषयक आजार, उचकी इत्यादी बाबतीत ही वनस्पती अत्यंत प्रभावीपणे काम करते.

८) एखाद्याला बोलताना जास्त लाळ येत असल्यास, मळमळ होत असल्यास कर्टोलीचे चे सेवन आराम देण्याचे सामर्थ्य ठेवते.

९) याशिवाय पावसाळ्यात हमखास उद्भवणारे सर्दी, ताप खोकला यांसारख्या व्हायरल आजारांवर तर करटोली ही अगदी रामबाण उपाय म्हणूनच कामात येते.

20 गुंठे शेतात पेरलेली रानकारली देताहेत आठवड्याला 30 हजाराचे उत्पन्न

रानकारली भाजीचा अन्य समस्यांवर गुणकारी औषध म्हणून उपयोग

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत करणाऱ्या आरोग्याविषयी जागरूक लोकांसाठी ही भाजी अत्यंत गुणकारी ठरते. या भाजीत कॅलरीचे प्रमाण नगण्य असते तसेच फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्याने भूक कमी लागते परिणामी आपले वजन नियंत्रणात राहते.

रानकारली भाजीत ल्युटीन आढळते, ज्याच्या मदतीने हृदयाच्या समस्यांसह कर्करोगदेखील टाळता येणे शक्य होते. व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्त्रोतम्हणुन सुद्धा रानकारली सर्वमान्य आहे, व्हिटॅमिन सी हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य करतात.

करटूला भाजीने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. पाण्याप्रमाणेच यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त प्रमाणत असते, त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहून मधुमेह ग्रस्त लोकांना याचा फायदा मिळतो. कर्टुला भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याच्या सेवनाने मुरुमे नष्ट होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

आपल्या रोजच्या आहारात रानकारली सामाविष्ट कराच.

मित्रांनो, वनस्पती कुठलीही असो त्यात अनेक गुणकारी गुणधर्म असतातच. पण इतक्या सगळ्या बाबतीत खरंच किमयागार ठरणारी अन् शहर असो वा खेडे, प्रत्येक ठिकाणी आवडीने आहारात समाविष्ट करण्यात येणारी भाजी म्हणजे करटोली. आता आपण या वनस्पतीचे इतके सारे गुणधर्म पाहून ही भाजी आपल्या आहारात समाविष्ट केल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे या भाजीची चव सुद्धा अत्यंत लज्जतदार असते. करटोली ही चवीला अत्यंत चवदार आणि पचनास हलकी असते. या वनस्पतीचे सेवन म्हणजे डॉक्टर पासून बचाव हेच खरे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment