स्वीडनचे दाम्पत्य भारतीय शेती प्रेमात आकंठ बुडाले
प्रत्येक माणसाला मातीची ओढ आणि शेतीची आवड असते असे म्हटल्या जाते. मात्र ते आपल्या भारतात. पाश्चात्य देशांत असे काही घडते याबद्दल खूपच कमी उदाहरणे दिसून येतील. पाश्चात्य देशातील लोक हे जास्त भावनिक नसून अतिशय व्यावहारिक असतात असा आपला घट्ट समज आहे. मात्र आज एक अशी बातमी घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला आपल्या भारतातील शेती व्यवसाय किती महान आहे याची प्रचिती येईल. कारण स्वीडनचे दाम्पत्य भारतीय शेती प्रेमात पडल्याचे दिसून आले आहे. इतकेच नाही तर सामान्य शेतकऱ्यासारखे त्यांनी शेतात काम सुद्धा केले. ही रोचक बातमी सविस्तर पाहूया.
शिक्षक दाम्पत्य रमले निसर्गाच्या सानिध्यात
स्वीडन देशात राहणारे टायबेरिअस नावाचे गृहस्थ आणि त्यांची पत्नी आमंडा स्वीडन देशातून भारतातील सुधागड या छोट्याशा गावात आले होते. सुधागड येथील तुषार केळकर यांच्या निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये हे स्वीडनचे पती पत्नी डिसेंबर महिन्यातील एक आठवड्यापेक्षा जास्त काळ राहून गेले. यावेळी हे स्वीडनचे दाम्पत्य भारतीय शेती प्रेमात पडलेले दिसून आले. बांबूने बनवलेल्या व शेणाने सारवलेल्या झोपडीत अतिशय कमी संसाधनाचा वापर करून हे स्वीडिश दांपत्य अधिवास करत होते.
भारतात शेतीचा अनुभव कसा घेता आला?
स्वीडन देशातील या दांपत्याची ओळख दोघांची तुषार केळकर यांच्यासोबत सोशल मीडियाद्वारे होऊन त्यांच्यात मैत्री झाली. आणि त्यांना भेटायला तसेच भारताची ग्रामीण संस्कृती पाहण्यासाठी हे स्वीडन देशातील दाम्पत्य थेट भारतात दाखल झाले. भारतातील ग्रामीण जीवन तसेच सांस्कृतिक विविधता हे किती व्यापक आहे याची त्यांना जवळून प्रचिती आली. स्वीडनचे दाम्पत्य भारतीय शेती प्रेमात आकंठ बुडाले. त्यांनी येथील शेतात राबून कलिंगड भाजपला पूर्वलागवड करण्यासाठी थेट हातात फावडे घेऊन सामान्य शेतकऱ्याप्रमाणे शेतात काम सुद्धा केले. ग्रामीण भागात लोक कशा पद्धतीने राहतात, कशा प्रकारचे जीवन जगतात हे जवळून पाहून त्यांना खूप आनंद झाला.

हातात कुदळ फावडे घेऊन केले काम
स्वीडनचे दाम्पत्य भारतीय शेती प्रेमात इतके मश्गूल झाले की त्यांनी शेतात घाम गाळून त्यांची भारतीय शेतीविषयी असलेली आत्मीयता दाखवून दिली. मागील महिन्यात स्थानिक तुषार केळकर त्यांच्या शेतात कलिंगडाची लागवड करत होते तेव्हा या परदेशी पती पत्नीने त्यांच्या शेतात स्वतः काम केले. आणि लागवड कशी केली जाते याची माहिती घेतली. याशिवाय जमिनीची मशागत कशी केल्या जाते, मातीचे आळे कसे बनवितात, टरबुजाच्या बियांची पेरणी कशी करतात, तसेच या पिकाला पाणी व्यवस्थापन कसे केले जाते इत्यादी बाबतीत त्यांनी स्वतः काम करून त्यांचे शेतीविषयक ज्ञान वाढविले.
सिंगापूर देशातील शेती भारतातील शेतीपेक्षा कशी आहे वेगळी?
स्वीडन देशातील टायबेरियस आणि त्यांची पत्नी आमंडा शेतीत खूप रमले. त्यांनी विविध प्रकारचा भाजीपाला सुद्धा स्वतः शेतात राबून पेरला. एवढेच काय तर अगदी गाईंचे शेण काढण्यापासून ते हातात फावडे अन् कुदळ घेऊन खोदकाम सुद्धा आनंदाने करताना दिसले. या सर्व नैसर्गिक गोष्टी या पती पत्नीला इतक्या आवडल्या की हे स्वीडनचे दाम्पत्य भारतीय शेती प्रेमात भारावून गेले.
भारतीय खाद्य पदार्थाचं वाटल कुतूहल
आपल्या देशातील खाद्य संस्कृती ही जगातील कित्येक देशातील लोकांना भुरळ घालणारी आहे. भारतात आल्यानंतर अन् येथील खाद्य पदार्थांची चव चाखल्या नंतर कुठलाही विदेशी भारतीय खाद्य संस्कृतीच्या प्रेमात पडला नाही तरच नवल. स्वीडनचे दाम्पत्य भारतीय शेती प्रेमात तर आकंठ बुडालेच, मात्र अजून एका गोष्टीचे त्यांनी भरभरून कौतुक केले. ती गोष्ट म्हणजे अर्थातच भारतीय खाद्य पदार्थ. हे दोघे पती पत्नी खाद्य संस्कृतीच्या प्रेमात पडले असून, त्यांनी अनेक स्वादिष्ट खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.

तुरीच्या या वाणाने मिळवून दिले एकरी तब्बल साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन
याशिवाय ते भारतातील ग्रामीण भागात बनविल्या जाणारे वेगवेगळे खाद्य पदार्थ सुद्धा स्वतः च्या हाताने बनवायला हे स्वीडन देशातील पती पत्नी शिकले आहेत. केवळ काही दिवसांतच या दांपत्याची ग्रामीण संस्कृतीशी आणि निसर्गाशी नाळ घट्ट झाली आहे. त्यांनी दरवर्षी भारतात येण्याचा मानस व्यक्त केला. भारत हा एक उत्कृष्ट आणि मानवतापूर्ण देश आहे असे गौरवोद्गार सुद्धा त्यांनी काढले. तर अशा प्रकारे स्वीडनचे दाम्पत्य भारतीय शेती प्रेमात रमून त्यांच्या देशी निघून गेले. मात्र त्यांनी भारतातून ज्या आठवणी, जे प्रेम सोबत घेतल ते त्यांना आयुष्यभर भारत देशाची ओढ लावून ठेवण्यासाठी पुरेस आहे.
आपण काय बोध घ्यावा?
शेतकरी मित्रांनो स्वीडनचे दाम्पत्य भारतीय शेती प्रेमात पडल्याची ही बातमी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जाते. पहिली गोष्ट म्हणजे आपण शेतकरी आहोत म्हणजे आपण भाग्यवान आहोत ही गोष्ट लक्षात घ्या. संपूर्ण आयुष्यभर निसर्गाच्या सान्निध्यात वावरण्याचं सौभाग्य शेतकऱ्याला लाभलेलं असतं. आपली भू आई ही तिच्या लेकराची मेहनत कधीच वाया जाऊ देत नाही. आज शेतीतून समृद्ध झालेले अनेक शेतकरी तुम्हाला तुमच्या आसपास दिसतील. मात्र शेतीला जर फायदेशीर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतात नवनवीन प्रयोग करणे अनिवार्य ठरते. आधुनिक आणि नावीन्यपूर्ण शेती कशी केल्या जाते याबद्दल आपण नेहमीच नवनवीन माहिती घेऊन येत असतो. तर तुम्हाला हा लेख आवडला ना? तुमची प्रतिक्रिया देऊन आम्हाला प्रेरित करा.