वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून विकसित केल्या गेलेल्या ‘गोदावरी’ तुरीच्या वाणाची लागवड कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे. या शेतकऱ्याला गोदावरी जातीच्या बियाण्याने दिले तुरीचे एकरी साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन आणि इतकेच नव्हे तर याआधी केवळ 3 ते 5 क्विंटल प्रति एकर उत्पादन देणाऱ्या शेतीतून गोदावरी तुरीच्या वाणाची लागवड या शेतकऱ्यांचं नशीब उजळवणारे ठरले आहे. आज आपण या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत म्हणजेच त्यांना गोदावरी जातीच्या बियाण्याने दिले तुरीचे एकरी साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन, हे सर्व कसे शक्य झाले याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल याची खात्री आहे.
करमाळा जिल्ह्यातील शेतकरी झाला मालामाल
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील फिसरे हे एक छोटेसे गाव. याच गावातील शेतकरी हनुमंत रोकडे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी विकसित ‘गोदावरी’ तुरीच्या वाणाची त्यांच्या बागायती शेतीत प्रती एकर तब्बल साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन घेऊन कमाल करून दाखवली आहे. यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेला तुरीचा गोदावरी वाण हा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी रामबाण ठरत असल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून मराठवाड्यासह महाराष्ट्रातील बहुतांश भागातील शेतकरी विशेषतः सोलापूर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच जिल्ह्यामध्ये तुरीचे गोदावरी वाण शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अत्यंत लाभदायक ठरले आहे.

तुती लागवडकरण्यासाठी सरकारकडून लाखोंचे अनुदान मिळत आहे, असा करा ऑनलाईन अर्ज
खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिली शेतकऱ्याच्या शेतीत भेट
हनुमंत रोकडे यांनी घेतलेले रेकॉर्ड ब्रेक उत्पादन पाहून या शेतकऱ्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. आजूबाजूचे शेतकरी या शेतकऱ्याला भेट देऊ लागले. एवढेच काय तर गोदावरी जातीच्या बियाण्याने दिले तुरीचे एकरी साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन घेणाऱ्या या शेतकऱ्याच्या शेतास प्रत्यक्ष परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी भेट दिली.
कृषी विद्यापीठाचा सल्ला पडला कामात
शेतकरी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील या शेतकऱ्याने त्याच्या शेतीत जे अभूतपूर्व उत्पादन मिळवले आहे त्यासाठी त्यांना विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि संशोधन शास्त्रज्ञ डॉ. किरण जाधव, डॉ. दीपक पाटील आणि डॉ. व्ही के गित्ते यांनी ठरवून दिलेली मानके आणि सुधारित तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे या शेतकऱ्याला गोदावरी जातीच्या बियाण्याने दिले तुरीचे एकरी साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन. तसेच यासाठी स्थानिक पाणी फाउंडेशनचे सहकार्य सुद्धा यासाठी मोलाचे ठरले. त्यामुळेच या शेतकऱ्याला प्रति एकर तब्बल साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन मिळवणे शक्य झाले. गोदावरी जातीच्या बियाण्याने दिले तुरीचे एकरी साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन मिळवून देण्यात या सर्व लोकांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण महत्वाचे ठरले.

फिसरे गावातील शेतकऱ्यांना मिळाले कृषी विद्यापीठाकडून प्रशिक्षण
शेतकरी मित्रांनो तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की आपल्याला कधी एकरी 10 क्विंटल तुरीचे उत्पादन मिळत नाही. मग या शेतकऱ्याने असे काय विशेष केले की त्यांना हे यश मिळाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की फिसरे गावातील कृषी योद्धा नावाचा एक शेतकरी गट गावातील शेतकऱ्यांनी मिळून तयार केला आहे.
या गावातील त्यांच्या शेतकरी गटाला प्रत्यक्ष वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या शास्त्रज्ञांनी सुधारित तुरी लागवडीसाठी विशेष प्रशिक्षण दिले असल्यामुळे या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतील नावीन्यपूर्ण पद्धतींचा खोलवर परिचय झाला. याशिवाय योग्य खतांचा वापर तसेच पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन याबद्दल ज्ञान प्राप्त करून त्यांनी शेतीत या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर केल्यामुळेच या शेतकऱ्याला गोदावरी जातीच्या बियाण्याने दिले तुरीचे एकरी साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. फक्त याच शेतकऱ्याला नाही तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा या गोदावरी जातीच्या वाणाने सरासरी 15 ते 19 दरम्यान भरघोस उत्पादन मिळाले आहे.
बारामती कृषी प्रदर्शनातील या अद्भूत गोष्टी पाहून व्हाल चकित
राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण
आज आपण शेती भरवशाची राहिली नाही म्हणून कुरकुर करत असतो. निसर्ग साथ देत नाही शेतीत काही खर नाही असेच नकारात्मक सुर गाव खेड्यात अनेक शेतकऱ्याकडून कानावर पडत असतात. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील फिसरे गावातील या शेतकऱ्याला गोदावरी जातीच्या बियाण्याने दिले तुरीचे एकरी साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन या बातमीने पुन्हा एकदा सिद्ध केले की शेतीला जर आधुनिकतेची जोड देऊन त्यातील नावीन्य स्वीकारलं तर परिमाण निश्चितच सकारात्मक दिसून येऊ शकतात.

हनुमंत रोकडे आणि त्यांच्या शेतकरी गटाचे यश संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. या गावातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीत मार्गदर्शन व योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना केवळ अधिक उत्पादनच मिळत नाही तर त्यांची आर्थिक उन्नती सुद्धा होते, हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.
बेफाम वायरल झाले शेतकरी हनुमंत रोकडे
हनुमंत रोकडे यांची “गोदावरी जातीच्या बियाण्याने दिले तुरीचे एकरी साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन” ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हा शेतकरी सोशल मीडियावर जाम वायरल झाला. तुरीच्या पिकात काढलेला एक फोटो प्रचंड वायरल होत असून ही बातमी ऐकून इतर शेतकऱ्यांना त्यांचे खूप कौतुक वाटले तसेच त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली.
गोदावरी तुरीच्या वाणाचे महत्व खुद्द मंत्रांनी अधोरखित केले
या शेतकऱ्याला गोदावरी जातीच्या बियाण्याने दिले एकरी साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन ही बातमी तर प्रेरणादायी आहेच. मात्र पुणे येथील राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त प्रदर्शनात 23 डिसेंबर रोजी केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गोदावरी जातीच्या वाणाची लागवड करून प्रती एकर 14 क्विंटल उत्पादन घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले होते.
गोदावरी जातीच्या वाणापासून एकरी एक लाख उत्पादन
गोदावरी वाणाचा लागवडीसाठी वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे सरासरी एक लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्याकडून मराठवाडा कृषी विद्यापीठाला प्राप्त होत आहेत. गोदावरी वाण हा शेतकरी प्रिय असल्यामुळे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक, उप संचालक यांनी देखील गोदावरी वाणाचा उल्लेख केला होता. पुसा येथून विकसित राष्ट्रीय पातळीवर बासमती जातीचा 1121 हा वाण जसा देशपातळीवर यशस्वी ठरला होता, तसाच गोदावरी वाणाचा डंका जगभर वाजेल असा तज्ञांकडून विश्वास व्यक्त केल्या जात आहे.
या पद्धतीने करा गावरान कोंबडीपालन, तीन महिन्यातच मिळेल भरपूर नफा
कोरडवाहू शेतीत सुद्धा सरासरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन
पूर्णपणे कोरडवाहू क्षेत्रावर हा वाण अतिशय उत्कृष्ट स्थितीमध्ये सरासरी 8 ते 10 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळवून देत आहे. तर शेतकरी मित्रांनो आजचा हा “गोदावरी जातीच्या बियाण्याने दिले तुरीचे एकरी साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन ” हा प्रेरणादायी लेख कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा.