गाजर गाव म्हणून प्रसिद्ध झाले एक चिमुकले गाव : आपल्या विदर्भात एक गावरान म्हण आहे की गाजर गोड लागले म्हणून बुडखापासून खाऊ नये.” मात्र राज्यातील एका गावात पिकणारे गाजर इतके गोड आणि चविष्ट आहे की या गावाला चक्क गाजर गाव ही उपाधी मिळाली आहे. विशेष म्हणजे या गावातील जवळपास सगळेच शेतकरी गाजराची शेती करतात. आजच्या या माहितीपूर्ण लेखातून आपण गाजर गाव म्हणून संपूर्ण राज्यात ओळखल्या जाणारे हे गाव कोणते आहे? या गावातील लोकांना गाजर शेतीतून किती नफा मिळतो, या गावचे गाजर इतके स्वादिष्ट का आहे, आणि गाजर लागवड करणे कसे फायदेशीर ठरते या सर्व बाबींची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
धाराशिव जिल्ह्यातील हे गाव आहे “गाजर गाव” म्हणून प्रसिद्ध
धाराशिव जिल्हा हा नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यादीत अग्रेसर असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. आपण प्रसारमाध्यमांवर धाराशिव जिल्ह्यातील यशस्वी शेतकऱ्यांची माहिती नेहमीच वाचत असतो. त्यामध्ये आणखी भर पडली आहे. ते म्हणजे याच जिल्ह्यातील परंडा तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा गावातील शेतकऱ्यांचं शेतीतील अभूतपूर्व यश मिळवून इतर सामान्य शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे असे म्हणायला हरकत नाही. गाजर गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या छोट्याशा गावाचं नाव आहे भांडगाव. गावाच्या गावात जरी भांड असेल तरी येथील गावकरी कधीच कुणाशी भांडत नाहीत. ते खूपच मेहनती आहेत. मेहनत करून त्यांनी गाजत लागवडीत कमाल करून दाखवली आहे. उत्कृष्ट दर्जाचे स्वादिष्ट गाजर उत्पादित करून त्यांनी भरघोस असा आर्थिक नफा सुद्धा मिळविला आहे.

भांडगावच्या स्वादिष्ट गाजरांना संपूर्ण देशात प्रचंड मागणी
आज गाजर गाव म्हणून प्रसिद्ध झालेल्या या गावातील जवळपास सगळेच शेतकरी गाजराचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात. आणि विशेष बाब म्हणजे यांना गाजराचे बक्कळ उत्पादन घेण्यासाठी उत्पादन खर्च काहीच लागत नाही, किंवा अत्यंत नगण्य लागतो.धाराशिव जिल्ह्यातील या गावात पिकणाऱ्या स्वादिष्ट गाजरांना केवळ आपल्या राज्यातच नाही तर संपूर्ण देशात प्रचंड मागणी आहे. परंडा तालुक्यातील गाजर गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भांडगाव येथील गाजर एकदा ज्यांनी ज्यांनी खाल्ले, ते या गोड, रुचकर आणि गुणवत्तापूर्ण गाजराचा गोडवा गायल्याशिवाय राहणार नाहीत. हे गाजर गाव अगदी छोटे असून या गावची लोकसंख्या फक्त 2 हजार आहे. मात्र या चिमुकल्या गावातील शेतकऱ्यांनी गाजराची लागवड करून एकरी सरासरी तब्बल अडीच लाख रुपयांचे उत्पन्न घेतल्यामुळे आज राज्याच्या कानाकोपऱ्यात या गावाचा डंका वाजत आहे.

काय आहे भांडगावची झीरो बजेट शेती?
गाजर गाव म्हणून प्रसिद्ध झालेल्या भांडगाव येथील तब्बल 750 एकर शेतीत फक्त आणि फक्त गाजराची लागवड केली जाते. येथील शेतकऱ्यांना गाजर हंगामात फक्त तीन महिन्यात प्रति एकर लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. गाजर गाव म्हणून प्रसिद्ध या गावात आता रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामात गाजर लागवड करण्यात येत आहे. या गावातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी अजिबात खर्च लागत नाही यामागचे प्रमुख कारण म्हणजे येथील शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करतात.
भारताच्या एका खेड्यात शेतीत काम का करत आहे हे स्वीडन देशातील जोडपं?
या शेतीसाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर केल्या जात असल्यामुळे या शेतीला अत्यंत नगण्य खर्च लागतो. म्हणूनच सेंद्रिय किंवा जैविक शेतीला झिरो बजेट असं म्हटल्या जाते. धाराशिव जिल्ह्यातील हे गाजर गाव सुद्धा सेंद्रिय शेती करत आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळत आहे. शिवाय जैविक शेतीसाठी रसायनांचा वापर करण्यात येत नसल्यामुळे ही शेती पर्यावरणपूरक सुद्धा आहे.
फक्त तीन महिन्यात एकरी अडीच लाख रुपये उत्पन्न
शेतकरी मित्रांनो तुम्हाला ऐकून नवल वाटेल धाराशिव जिल्ह्यातील हे गाजर गाव त्यांच्या जैविक शेतीतून फक्त तीन महिन्याच्या कालावधीत प्रती डकर तब्बल सरासरी अडीच लाख रुपयांचे भरघोस उत्पादन घेतात. गाजर हे केवळ तीन महिन्यात काढणीस तयार होणारे पीक आहे. आणि गाजराची लागवड करण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता पडत नाही. येथील जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी जैविक शेतीची कास धरली असून या शेतीमुळे गावकऱ्यांच्या आयुष्यात केवळ आर्थिक संपन्नता आली असे नाही तर निसर्गाचं रक्षण करण्यात सुद्धा या गावाने खारीचा इवलासा वाटा दिला असे म्हणण्यास हरकत नाही. आधुनिकीकरणाच्या या युगात पर्यावरणाची अत्यंत मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळे ऋतुचक्र बदलले आहे. माणूस जर वेळीच जागा झाला नाही तर डायनासोर प्रमाणे नजिक भविष्यात आपली प्रजाती सुद्धा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.

या जातीच्या वाणाने मिळवून दिले शेतकऱ्याला एकरी तब्बल साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन
गाजरे इतकी गोड आणि स्वादिष्ट कशी?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की गाजर तर सगळीकडेच पिकतात, मात्र या गावातील गाजर इतके गोड आणि स्वादिष्ट का आहेत? तर याच उत्तर तुम्हाला कळलंच असेल. उगाच नाही म्हणत या गावाला गाजर गाव. या गावात शेतीसाठी रासायनिक खतांचा अजिबात वापर होत नाही. कुठलीही रासायनिक औषधांची फवारणी केल्या जात नाही. त्यांनी पिकविलेल्या या गाजरांना चव येते ती पिकण्याच्या नैसर्गिक पद्धतीमुळे. येथील गाजर शेती 100 टक्के सेंद्रिय शेती आहे. आणि जे निसर्ग स्वतः हुन पिकवतो त्याची गोडी मानवनिर्मित फळांना येईल? हे का तुम्हीच सांगा. म्हणूनच या गावातील गाजर इतर गाजरापेक्षा वेगळे ठरतात.
चवीला अतिशय गोड असल्याने त्याची मागणी अधिक आहे. या गाजराचा चविष्ट गोडी असल्याने अत्यंत चांगला बाजारभाव मिळतो. सर्वोत्कृष्ट दर मिळाल्यास येथील शेतकऱ्यांची प्रती एकर अडीच लाख रुपयांची बक्कळ कमाई होते असे स्थानिक शेतकरी सांगतात. तर तुम्हाला या गाजर गाव म्हणून प्रसिद्ध झालेल्या छोट्याशा गावच्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले गोड आणि चविष्ट गाजर खाण्याची इच्छा होत आहे का? कमेंट करून नक्की सांगा.