शेतकरी मित्रांनो आपण जागतिक शेती कशाप्रकारे केल्या जाते तसेच या शेतीत काय नावीन्य असते आणि शेती क्षेत्रात कोणते आधुनिक तंत्रज्ञान त्या त्या देशातील शेतकरी वापरत असतात याबद्दल ज्ञान प्राप्त करून आपण आपल्या शेतीत त्यांच्या पद्धतींचा काही उपयोग करून घेऊ शकतो का याबाबत नेहमीच जिज्ञासू वृत्ती बाळगली पाहिजे. म्हणूनच या आपल्या कामाची या शेतीविषयक वेबसाईटवर आपण विविध देशातील शेतीबद्दल रोचक अशी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण सिंगापूर देशातील शेती कशी केल्या जाते तसेच या देशातील शेती बरोबरच इतर कोणते व्यवसाय करून तेथील नागरिक उदरनिर्वाह करतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग उशीर न करता जाणून घेऊया सिंगापूर देशातील शेती बद्दल अधिकची उपयुक्त माहिती.

सिंगापूरच्या सुमारे एक टक्का भूभागाचा वापर शेतीसाठी केला जातो. सिंगापूरचे कृषी-अन्न क्षेत्र प्रामुख्याने स्थानिक वापरासाठी अंडी, समुद्री खाद्य म्हणजेच प्रामुख्याने मासे आणि भाज्यांच्या उत्पादनात सक्रिय असल्याचे दिसून येते. 2021 सालाच्या शेवटपर्यंत 150 जमीन-आधारित फूड फार्म आणि 110 समुद्र-आधारित मत्स्य फार्म सिंगापूर या देशात निर्मित होते.
मस्त्यशेती आणि मासेमारी हा सिंगापूर देशातील प्रमुख व्यवसाय
सीफूड उत्पादनामध्ये प्रामुख्याने मासे आणि त्यापासून तयार होणाऱ्या मत्स्यपालन या व्यवसायाचा सुद्धा समावेश होतो. सिंगापूर हा प्रगत देश परदेशी जहाजांद्वारे पकडलेल्या माशांची आयात, निर्यात आणि ट्रान्सशिप देखील करण्यात अग्रेसर असल्याचे पाहायला मिळते. जोहोरच्या सामुद्रधुनीमध्ये वसलेले बहूसंख्य लोक समुद्रावर आधारित मत्स्य शेती करतात. दक्षिणेकडील पाण्यात तीन खोल समुद्र शेत आहेत. हे शेत लाइव्ह फिश मार्केट आणि सुपरमार्केटसाठी आशियाई सीबास, मिल्क फिश, म्युलेट, पोम्पानो, ग्रुपर्स, रेड स्नॅपर, मरीन टिलापिया आणि थ्रेडफिन यासारख्या विविध माशांच्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. सिंगापूर देशातील शेती ही मत्स्य शेतीच जास्त आहे. चिखल आणि फ्लॉवर क्रॅब्ससारख्या कोळंबी आणि खेकडे यांचेही अल्प प्रमाणात उत्पादन करण्यात येते.

जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी केल्या जाते? रोचक माहिती
ऑर्चर्ड फुलांचा अग्रेसर निर्यातदार देश
शेतकरी मित्रांनी तुमच्या लक्षात आलेच असेल की सिंगापूर देशात भारताप्रमाणे शेती केल्या जात नसून येथील बहुतांश लोक मत्स्य शेती किंवा मासेमारीचा व्यवसाय करतात. मात्र काही शेतकरी विविध फुलांची शेती सुद्धा करतात. सिंगापूर हा अगदीच छोटा देश असल्यामुळे येथील शेतीचे क्षेत्र फक्त एक टक्का आहे. या क्षेत्रात सिंगापूर देशातील शेतकरी ऑर्किड्स, शोभेच्या आणि पर्णसंभार वनस्पती (उदा. कुंडीतील झाडे, पर्णसंभार, शोभेच्या वनस्पती, जलचर वनस्पती आणि ऊती-संवर्धित वनस्पती) यांची मोठ्या प्रमाणावर शेती करतात.
इतकेच नाही तर या फुलांची निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात केल्या जाते. मात्र देशांतर्गत बाजारपेठेसाठी माशांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केल्या जाते. तुम्हाला कदाचित माहीत नसेल मात्र सिंगापूर हा दर्जेदार कट ऑर्किड आणि माशांचा जागतिक निर्यातदार देश आहे. हा अगदी छोटा देश असला तरी सिंगापूर देशाची शेती 1 टक्का जरी सक्रिय असली तरी ती अत्यंत प्रभावीपणे केल्या जाते.
पाकिस्तानी शेतीची आजची अवस्था आणि भारतीय शेतीशी तुलना
सिंगापूर देशातील शेती क्षेत्राची सध्याची अवस्था
शेतकरी मित्रांनो शेती हा व्यवसाय सिंगापूर मध्ये कमी प्रमाणात होतो. त्यामुळे या व्यवसायातून सिंगापूर देशाला जीडीपीच्या फक्त अर्धा टक्के महसूल प्राप्त होतो. सिंगापूर देशातील शेती किती कमी आहे याची कल्पना तुम्हाला यावरून येईल किया देशाला सुमारे 90% अन्न आयात करावे लागते. यावर उपाय म्हणून सिंगापूर देशाने 2030 सालापर्यंत त्यांच्या अन्नविषयक गरजांपैकी 30% अन्न स्थानिक पातळीवर शेती करून निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
सिंगापूर देशातील शेती कमी का झाली?
सिंगापूर हा आशियातील विकसित देशांपैकी एक देश असला तरीही या देशात अन्नसुरक्षा साठी या देशाजळ पुरेसा स्त्रोत नाही. याचे कारण येथे असलेली अल्प जमीन. 1987 च्या सुरुवातीला सिंगापूर देशातील शेती मोठ्या प्रमाणावर कमी झाली. त्यावर्षी या देशात अधिकृतपणे 2075 शेततळे होते. आणि एकूण सुमारे 2037 हेक्टर (5030 एकर) शेतीक्षेत्र होते. एका शेतकऱ्याकडे सरासरी 1 हेक्टर म्हणजेच अडीच एकर शेती होती. आधुनिकीकरण होण्यापूर्वी ऑर्चर्ड रोड हा शेतीच्या बागांचा एक भाग होता. मात्र आधुनिकीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे सिंगापूर देशातील शेती कमी कमी होत गेली. आणि आज या देशातील शेतजमिनी पूर्णपणे नाहीशा होऊन आज फक्त एक टक्का जमिनीवरच शेती केल्या जाते. परिणामी सिंगापूरला त्यांच्या रोजच्या अन्नाच्या गरजा भागविण्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते.

अंटार्क्टिका खंडात शेती करणे शक्य आहे का? उत्तर ऐकून हैराण व्हाल
सिंगापूरमध्ये शेतीत होते मशरूम आणि फुले उत्पादन
तुम्हाला आता कळून चुकले असेल की सिंगापूर देशातील शेती काही आपल्या देशातील शेतीसारखी विविधता संपन्न शेती अजिबात नाही. सिंगापूर देशातील काही शेतकरी फळांची शेती सुद्धा करतात. हे शेतकरी ड्युरियन्स , रॅम्बुटन्स आणि मँगोस्टीन्स इत्यादी फळांचे भरघोस उत्पादन सुद्धा घेतात. मात्र गहू, ज्वारी आणि इतर अन्नधान्य इथे अजिबात पिकत नाही.
अल्प प्रमाणात होते भाजीपाला उत्पादन
सिंगापूर देशात पालेभाज्यांचे उत्पादन सुद्धा अल्प प्रमाणात घेतल्या जाते. हा देश 22458 टन भाजीपाला उत्पादित करतो. तर 2016 वर्षीच्या आकडेवारी अनुसार येथील लोकसंख्या 524462 टन भाजीपाला त्यांच्या रोजच्या जेवणात वापरतात.शेती मुख्यतः सिंगापूर देशाच्या ग्रामीण भागात होते. सिंगापूरच्या भागात तुम्हाला अनेक शेततळे दिसून येतील. सिंगापूर देशातील शेती उत्पादन हे या देशातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फारच अपुरे आहे. म्हणूनच या देशातील सुमारे 90 टक्के अन्न जगाच्या वेगवेगळ्या देशांतून आयात केल्या जाते.
सिंगापूर देशात शहरी शेतीला प्रोत्साहन
सिंगापूर हा देश अन्नाच्या पूर्ततेसाठी इतर देशांकडून आयात करण्यावर अवलंबून असल्यामुळे या देशाने 2023 पर्यंत देशातील लोकांच्या अन्नाच्या गरजा लक्षात घेऊन अन्नधान्याचे 30 टक्के उत्पादन घेण्याचा निश्चय केला आहे. सिंगापूर देशातील शेती क्षेत्र अत्यंत कमी आहे. मात्र या प्रगत देशाने हार मानली नाही. येथील सरकार त्यांच्या नागरिकांना शहरी शेती म्हणजेच urban Farming करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
शहरी शेती (Urban Farming) काय असते?
यासाठी स्थानिक सरकार विविध उपाययोजना तयार करत आहे, तसेच नागरिकांना शहरी शेती करण्यास म्हणजेच आपल्याकडे असलेली घराच्या छतावरील किंवा पटांगणात केल्या जाणारी शेती करण्यास अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहे. सिंगापूरमध्ये शहरी शेतीसाठी अनेक आव्हाने आहेत कारण हा एक आधुनिक तसेच विकसित देश असून येथे उच्च-शहरी क्षेत्र आहे. त्यामुळे शेतीसाठी जागा शोधणे कठीण आहे. म्हणूनच शहरी शेती ही संकल्पना या देशाला सुचली असावी. शहरी शेती म्हणजे जमिनीच्या वापराच्या क्रिएटिव्ह पद्धती ज्या पद्धतींत शेतीसाठी छताचा वापर केला जातो. तसेच येथील शाळांचा वापर लहान भाज्यांच्या बागा उभारण्यासाठी केला जात आहे. सिंगापूर देशातील शेती लवकरच एक वेगळी ओळख निर्माण करेल यात शंका नाही.
शहरी शेती कोणत्या ठिकाणी करता येते?
शहरी शेती (Urban Farming) बद्दल ही माहिती वाचत असताना तुम्हाला सुद्द्धा ही शेती करण्याची इच्छा होत असेल. मात्र ही शेती कोणकोणत्या ठिकाणी होऊ शकते? हा प्रश्न तुमच्या मनात घोळवत असेल. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भूखंड, बागा, कडा, बाल्कनी आणि कंटेनर यांसारख्या छोट्या भागात सुद्धा शेती करून पिके वाढवणे हे शहरी रहिवाशांसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते. यामुळे अन्न म्हणून पौष्टिक आहार तर मिळवता येतोच शिवाय उत्पन्नाचे स्रोत म्हणून सुद्धा शहरी शेती उपयुक्त ठरते. शहरी शेतीतून उत्पादित केलेली उत्पादने हे स्वतःच्या वापरासाठी किंवा शेजारच्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी म्हणजेच वैयक्तिक आरोग्याचा लाभ तसेच आर्थिक पाठबळ असा दुहेरी फायदा शहरी शेती केल्याने होतो.
सिंगापूर हा एक छोटा बेट देश आहे आणि त्याच्या मर्यादित भूभागामुळे (सुमारे ७२० चौरस किमी) पारंपारिक शेतीसाठी खूपच आव्हाने आहेत. यामुळे सिंगापूर देशातील शेती प्रामुख्याने नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञान-आधारित पद्धतींवर अवलंबून आहे. येथे काही मुख्य मुद्दे आहेत:
१. शेतीचे प्रमाण आणि महत्त्व:
- सिंगापूरच्या एकूण भूभागापैकी फक्त १% पेक्षा कमी भाग शेतीसाठी वापरला जातो.
- देशाच्या अन्न गरजेपैकी फक्त १०% स्थानिक पातळीवर उत्पादन केले जाते (२०२३ पर्यंत). बाकीचे आयात केले जाते.
- सरकारने “३० बाय ३०” हे ध्येय ठेवले आहे: २०३० पर्यंत ३०% अन्न स्थानिक पातळीवर उत्पादन करणे.
२. नाविन्यपूर्ण शेती पद्धती:
- उभ्या शेती (Vertical Farming): मर्यादित जागेत जास्त उत्पादनासाठी इमारतींमध्ये उभ्या पद्धतीने पिके घेतली जातात. उदा., Sky Greens (जगातील पहिले व्यावसायिक उभे शेत).
- हायड्रोपोनिक्स (Hydroponics): मातीऐवजी पाण्यात पोषक द्रव्ये वापरून पिके घेतली जातात. उदा., ComCrop.
- एक्वापोनिक्स (Aquaponics): मासेपालन आणि वनस्पतींचे उत्पादन एकत्रित केले जाते. माशांचे अपशिष्ट पिकांसाठी खत म्हणून वापरले जाते.
- शहरी शेती (Urban Farming): छतावर, टेरेसमध्ये किंवा समुदायातील बागांमध्ये (community gardens) शेती केली जाते. उदा., Edible Garden City.
३. प्रमुख पिके आणि उत्पादने:
- पालेभाज्या: पालक, लेट्यूस, कॅबेज (हायड्रोपोनिक पद्धतीने).
- फळे: लहान प्रमाणात पपई, केळी.
- मासेपालन (Aquaculture): सिंगापूरमध्ये समुद्री मासे (उदा., सीबास, पोम्फ्रेट) आणि श्रिम्प्स पाळले जातात. जोहोर सामुद्रधुनी येथे अनेक मासे पालन केंद्रे आहेत.
- अंडी: स्थानिक पातळीवर अंडी उत्पादन वाढविण्यासाठी हाय-टेक पोल्ट्री फार्म्स.
४. सरकारी धोरणे आणि प्रोत्साहन:
- सिंगापूर अन्न प्राधिकरण (SFA) शेती आणि अन्न सुरक्षेसाठी जबाबदार आहे.
- Agri-Food Cluster Transformational (ACT) Fund: तंत्रज्ञान आधारित शेतीसाठी सब्सिडी.
- शोध आणि विकास (R&D): जलवायू-नियंत्रित शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आणि रोबोटिक्सचा वापर.
५. आव्हाने:
- जागेची कमतरता आणि जमिनीची महागडी किंमत.
- हवामान बदल: उष्णता आणि पावसाचे अप्रत्याशित स्वरूप.
- उर्जेचा खर्च: इनडोर फार्मिंगसाठी सतत वीज आवश्यक.
६. भविष्यातील दिशा:
- “फार्म-टू-टेबल” संकल्पना: स्थानिक उत्पादकांना थेट ग्राहकांशी जोडणे.
- आंतरराष्ट्रीय सहकार्य: नेदरलँड्स, जपानसारख्या देशांशी तंत्रज्ञानाची देवाणघेवाण.
- सर्क्युलर इकॉनॉमी: अपशिष्ट पुनर्वापर आणि स्थायित्वावर भर.
सिंगापूर देशातील शेती ही शहरीकरण आणि पर्यावरणीय स्थायित्व यांच्यातील संतुलनाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तंत्रज्ञान आणि नाविन्यतेद्वारे हा देशजगाला दाखवत आहे की लहान भूभागात सुद्धा शेती करून देशाची अन्न सुरक्षा शक्य आहे! 🌱🏙️