या रब्बी हंगामासाठी एकरी 40 क्विंटल उत्पादन देणारी गव्हाची सुधारित जाती

गव्हाची सुधारित जाती 2024 : आपल्या देशात तसेच संपूर्ण जगातील बहुतांश राज्यात गहू हे अन्नधान्य खूपच महत्वाचे आहे. राज्यात अंसख्य शेतकरी गव्हाची शेती करतात. आज आपण भरघोस उत्पादन देणाऱ्या सुधारित जाती बद्दल माहिती घेणार आहोत, जेणेकरून शेतकरी बांधव जास्तीत जास्त उत्पादन घेऊन त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन त्यांनी प्रगती साधता येईल. चला तर पाहूया गव्हाची सुधारित जाती वाणांची सविस्तर माहिती

गव्हाची शेती, गव्हाची सुधारित जाती बद्दल माहिती

HD 3410 (एचडी 3410)

भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR) व्दारे फेब्रुवारी 2023 मध्ये गव्हाची HD3410 जात संशोधित करून उपलब्ध केल्या गेली होती. केंद्र सरकार सुद्धा या जातीला पेरणीसाठी मान्यता दिली होती. ही गव्हाची सुधारित जाती रब्बी हंगामासाठी योग्य बागायत शेतजमिनीत पेरणीसाठी योग्य ठरू शकते. ही गव्हाची सुधारित जाती शिघ्रगतीने वाढणारी असून ही जाती गहू पिकावर पडणाऱ्या अनेक रोगांशी लढण्यास सक्षम आहे. परिणामी या गव्हाच्या सुधारित जाती वापरून लागवड केल्यास कमी खर्चात जास्त उत्पादन घेता येऊ शकते. गव्हाची सुधारित जाती HD3410 च्या उत्पादनाचा कालावधी फक्त 130 दिवस असून इतक्या कमी वेळात गहू परिपक्व होऊन माल काढण्यास योग्य होतो. ही गव्हाची सुधारित जाती इतर अनेक गव्हाच्या जातीपेक्षा तुलनेने खूप कमी वेळेत उत्पादन देऊ शकते.

गव्हाची सुधारित जाती HD 3410 ची वैशिष्ट्ये

ही गव्हाची सुधारित जाती उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांसह योग्य सिंचन क्षेत्रामध्ये लागवड करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे. ही गव्हाची सुधारित जाती कमी प्रमाणात पाणी असेल तरीही भरपूर उत्पादन देण्यास सक्षम आहे, मात्र या लागवडीत सिंचनास उशीर झाला तर मात्र रोपासाठी हानिकारक ठरून उत्पादनावर याचे विपरीत परिणाम होऊ शकतो.

म्हणूनच कालवे, नद्या, तलाव किंवा कूपनलिका यांची उत्तम सोय ज्या भागात आहे, अशा भागातील शेतकरी बांधवांना ही गव्हाची सुधारित जाती आपल्या शेतात पेरून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता येऊ शकते. प्रथिनांचे प्रमाण मुबलक असल्यामुळे या जातीच्या गव्हाला चांगल्यात चांगला बाजारभाव भेटतो. शिवाय ही गव्हाची सुधारित जाती मागणीच्या बाबतीत सुद्धा इतर बऱ्याच जातींपेक्षा सरस ठरते. ज्या शेतकऱ्यांना लवकर पेरणी करायची आहे, अशा शेतकरी बांधवांनी ही गव्हाची सुधारित जाती पेरणीसाठी उत्तम पर्याय म्हणून लक्षात घ्यायला हरकत नाही.

HD 3385 (एचडी 3385)

कृषी शास्त्रज्ञांनी अलीकडेच ही गव्हाची सुधारित जाती विकसित केले असून गव्हाची ही जात मोठ्या प्रमाणात उत्पादन देण्यासाठी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. HD3385 ही गव्हाची सुधारित जाती तुम्हाला तुमच्या शेतात पेरायची असेल तर पेरणी वेळेवर करावी लागेल ही बाब लक्षात घ्या. अनुकूल परिस्थितीत ही गव्हाची सुधारित जाती तुम्हाला 80 ते 100 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत भरघोस उत्पादन मिळवून देण्याच्या क्षमतेची आहे. भारतीय कृषी संशोधन संस्था कर्नालच्या शास्त्रज्ञांनी HD 3385 ही गव्हाची सुधारित जाती विकसित केली असून त्यांच्या सल्ल्यानुसार या उत्कृष्ट जातीची लागवड देशाच्या उत्तर-पश्चिम आणि उत्तर-पूर्व मैदानी क्षेत्रासाठी योग्य आहे.

या सुधारीत जातीची वैशिष्ट्ये

ही गव्हाची सुधारित जाती हवामानात होणाऱ्या बदलांना प्रतिरोध तर करतेच शिवाय गंज प्रतिरोध करण्यास देखील सक्षम आहे. गव्हाच्या या जातीला कर्नल बंट नावाचा रोग होत नाही आणि तो उच्च तापमान देखील सहन करू शकतो. या गव्हाच्या ओंब्या 98 सेंटीमीटर उंच वाढतात. HD3385 या नवीन गव्हाच्या वाणाला मशागतीची समस्या उद्भवत नाही. शिवाय या गव्हाच्या लागवडीत पिकावर पिवळा, तपकिरी आणि काळ्या रंगाचा गंज सुद्धा येत नाही. या जातीची पंजाब, हरियाणा, यूपी आणि दिल्ली NCR या भागांत लागवड केल्या जात आहे. ऑक्टोबरच्या शेवटी आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी ही गव्हाची सुधारित जाती त्यांच्या शेतात पेरू शकतात. या गव्हाचे सरासरी उत्पन्न 60 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर असून कमाल उत्पादन क्षमता 80 ते 100 क्विंटल प्रति हेक्टर आहे.

हरभऱ्याच्या या सुधारित जातीच्या वाणांची पेरणी करून मिळवा भरघोस उत्पादन, जाणून घ्या संपुर्ण माहिती

पुसा शरबती HI 1665

पुसा शरबती गव्हाची नव्याने विकसित केलेली जात 110 दिवसांत उत्पादन देण्यास तयार होते.तसेच प्रति हेक्टर 33 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्यासाठी ही गव्हाची सुधारित जाती विकसित करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या वाणाला जास्त सिंचनाची आवश्यकता नाही. ही जात तीव्र उष्णता आणि दुष्काळ सहन करण्यास सक्षम आहे. पुसा गहू शरबती (HI 1665) जातीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील चांगले दाणे. या दाण्यांमध्ये झिंकचे प्रमाण 40.0 पीपीएम पर्यंत असते, शिवाय ही बायोफोर्टिफाइड जात आहे. ही गव्हाच्या वाणाची नवीन जात विशेषत: मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या मैदानी भागात लागवडीसाठी विकसित केली गेली आहे.

या वाणाची वैशिष्ट्ये

पुसा शरबती HI 1665 ही गव्हाची सुधारित जाती बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यास प्रबळ आहे, मुख्यतः पश्चिम आणि दक्षिण भारतात गव्हाच्या विस्तारासाठी हे वाण विकसित करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारद्वारे काही दिवसांपूर्वी पिकांच्या सुधारित 109 जाती जाहीर करण्यात आल्या होत्या.यामध्ये दोन जाती गव्हाच्या वाणाच्या होत्या त्यापैकी ही एक जात असून महाराष्ट्र राज्यातील भौगोलिक हवामान बघता या जातीची लागवड करणे फायदेशीर ठरू शकते. आपल्या महाराष्ट्र राज्याशिवाय तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही गव्हाची सुधारित जाती भरघोस उत्पादन मिळवून देऊ शकते.

फुले समाधान (NIAW 1994)

ही गव्हाची सुधारित जाती 2016 सरकारकडून मान्यता देऊन पेरणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्या राज्यातील बागायती क्षेत्रात वेळेवर किंवा उशिरा पेरणीसाठी ही शरबती गव्हाची सुधारित जाती वापरता येऊ शकते. ही जाती इतर बऱ्याच गव्हाच्या सुधारित जातींपेक्षा वरचढ असून लवकर आणि उशिरा दोन्ही प्रकारच्या पेरण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेली फुले समाधान ही गव्हाची सुधारित जाती शेतकरी त्यांच्या शेतात लागवड करून भरघोस उत्पादन घेऊ शकतात. ही गव्हाची सुधारित जाती सरासरी 45 क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळवून देण्यास सक्षम आहे.

फुले समाधान जातीचे वैशिष्ट्ये

ही गव्हाची सुधारित जाती इतर बऱ्याच प्रचलित जातीपेक्षा 9 ते 10 दिवस आधीच काढणी योग्य होते. शेतकरी बांधवांनी या जातीचे वाण त्यांच्या शेतात पेरल्यास महत्वाची बाब म्हणजे तांबेरा रोग आणि मावा किडीस ही गव्हाची सुधारित जाती प्रतिरोध करून पिकांचे रक्षण करू शकते. या जातीच्या गव्हाचे दाणे मोठे टपोरे असतात आणि हजार दाण्याचे वजन सरासरी 43 ग्रॅम असते. या गव्हाच्या चापतीत प्रथिनांचे प्रमाण 12 ते 13 टक्के इतके असते. उशिरा पेरणी आणि लवकर पेरणी दोन्ही साठी हे गव्हाचे उत्कृष्ट वाण फायदेशीर ठरून भरघोस उत्पादन मिळवून देते.

ज्वारी लागवडीसाठी भरघोस उत्पादन मिळवून देणाऱ्या सुधारित जाती

गोदावरी (NIDW-295)

ही गव्हाची सुधारित जाती तुम्हाला तुमच्या शेतात लागवड करायची असल्यास फायदेशीर ठरू शकते. या जातीच्या गव्हाचे दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक असतात. तसेच तांबेरा रोगास प्रतिकारक अशा प्रकारची ही उत्कृष्ट जाती आहे. ज्या शेतकऱ्यांची शेती बागायती आहे तसेच जे शेतकरी वेळेवर पेरणी करतात, त्यांच्यासाठी उत्तम अशा प्रकारचे हे वाण आहे. या वाणाचे पीक 110 ते 115 दिवसात कापणीस तयार होऊन उत्पादन देते. ही गव्हाची सुधारित जाती उत्पादन क्षमतेच्या बाबतीत सुद्धा चांगली असून प्रती हेक्टर 45 ते 50 क्विंटल उत्पादन देण्यास सक्षम आहे.

या वाणाची वैशिष्ट्ये

गोदावरी ही गव्हाची सुधारित जाती महाराष्टातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. शरबती जातीचा हा गहू कपातीसाठी उत्तम असतो. तसेच हे वाण तांबेरा रोगास प्रतिकाक्षम असते. ही गव्हाची सुधारित जाती तापमान सुद्धा सहन करते आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. महाराष्ट्र राज्यातील भौगोलिक हवामान बघता या जातीची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरून भरघोस उत्पादन घेतले जाऊ शकते.

गहू लागवडीसाठी योग्य हवामान गहू हे राज्यातील बहुतांश भागात घेतले जाणारे महत्वाचे पीक आहे. तुम्हाला जर वर सांगितलेल्या गव्हाच्या सुधारित जाती पैकी योग्य वाणाची लागवड करायची असेल तर हवामानाची माहीती असणे आवश्यक आहे. गहू पिकाला थंड आणि कोरडे हवामान पोषक ठरते. मात्र उष्ण व दमट हवामान या पिकास नुकसानकारक असते. बीयाणे उगवण होण्याच्या काळात 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान असावे लागते.

तसेच पीक कायिक वाढीच्या अवस्थेत असताना 8 ते 10 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक आहे. तसेच पीक तयार होत असते त्या काळात 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. सरासरी 7 ते 21 अंश सेल्सिअस तापमान गव्हाची वाढ होण्यास फारच उपयुक्त असते. तीव्र उन्हामुळे या पिकाला फुटवे कमी येतात. तसेच उगवण झाल्यानंतर हवा उष्ण व ढगाळ असेल तर या पिकावर मुळकुजव्या रोग पडतो आणि त्यामुळे उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम होतो.

गव्हाची सुधारित जाती, गाव्हाची ओंबी

लागवडीसाठी जमिनीची निवड कशी करावी?

वर दिलेल्या गव्हाची सुधारित जाती पैकी योग्य वाणाची लागवड करण्यासाठी जमीन सुद्धा योग्य निवडणे आवश्यक असते. पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या लागवडीसाठी निवडा. सामान्यतः गाळयुक्त पोयट्याच्या जमिनी गव्हासाठी जास्त उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. गहू लागवडीसाठी दलदलीची किंवा वरकस जमीन अयोग्य असते. कोरडवाहू लग्वडसाठी ओलावा टिकवून ठेवणारी भारी जमीन निवडा.

ज्या शेतजमिनीत चिकणयुक्त कणांचे प्रमाण 55 ते 60% पर्यंत असते तसेच उपलब्ध सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 60 ते 65% असते अशा भारी दर्जाच्या शेतजमिनीत भरघोस उत्पादन घेता येऊ शकते. याशिवाय खरीप हंगामात आपण जर या गहू पेरत असलेल्या शेतात द्विदलवर्गीय (कडधान्य) पीक घेतले असेल तर गहू लागवड साठी ही अतिशय योग्य शेतजमीन आहे. कारण तुम्ही आधी घेतलेल्या पिकाचा बेवड या पिकाला मिळून उत्पादनात वाढ होते.

वाटाण्याच्या या सुधारीत जातीची लागवड करून 2 महिन्यात कमवा लाखो रुपये नफा

गहू लागवडीसाठी पूर्वमशागत

तुम्ही जर वर दिलेल्या गव्हाची सुधारित जाती पैकी योग्य वाणाची लागवड करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या. गहू पिकाच्या मुळ्या जमिनीत 60 ते 70 सेंटिमीटर खोलवर जात जातात त्यामूळे तुमची शेतजमीन चांगली भुसभुशीत करून घ्या. शेतात 20 सेंटिमीटर खोल नांगरणी करा. त्यानंतर 2 – 3 कुळवाच्या उभ्या आणि आडव्या पाळ्या द्या. तुम्ही देत असलेल्या शेवटच्या पाळीपूर्वी शेतातील तण धसकटे वेचून जमीन चांगली स्वच्छ करा. गहू लागवडीसाठी पूर्वमशागत करताना शेतजमिनीत 10 ते 12 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्या.

कुळवाची शेवटची पाळी देताना शेणखत शेतजमिनीत योग्यरित्या मिसळा. कोरडवाहू गव्हाची लागवड करण्यासाठी पावसाला सुरूवात होण्याआधीच शेतजमिनीची खोलवर उताराला आडवी नांगरणी करा. पहिला पाऊस पडला मी एक कुळवणी करा. हे केल्यामुळे तणांचा तन नियंत्रण होऊन शेतजमिनीत ओलावा जास्त कालावधीसाठी टिकून राहते. बागायती लागवडीसाठी एकरी शंभर किलो बियाणे लागते तसेच कोरडवाहू लागवडीसाठी 75 ते 90 किलो बियाणे लागते.

बीज प्रक्रिया कशी करावी?

तुम्ही जर तुमच्या शेतात वर दिलेली गव्हाची सुधारित जाती पैकी योग्य वाणाची लागवड करण्याचे ठरविले आहे तर या वाणावर बीजप्रक्रिया करायला विसरू नका. पेरणी करण्याच्या अगोदर 40 किलो बियाण्यास 500 मिली जर्मिनेटर + 500 ग्रॅम प्रोटेक्टंटचे 3 ते 5 लिटर पाण्यात द्रावण तयार करून त्यात बियाणे व्यवस्थितरीत्या घोळून घ्या. असे करताना पेरणीसाठी लागणाऱ्या संपूर्ण बियाण्यावर ही प्रक्रिया व्हायलाच हवी ही बाब लक्षात ठेवा. असे केल्याने या बियाण्याची उगवण कमी दिवसात आणि एकसारखी होण्यास मदत होते. तसेच हवेतील नत्र जमिनीत स्थिर होऊन उत्पादनात भरघोस वाढ होते. बीजप्रक्रिया हा उत्पादन वाढीसाठी एक महत्वाचा घटक असतो.

पेरणीची योग्य वेळ कोणती?

तुम्ही जर तुमच्या कोरडवाहू वर दिलेली गव्हाची सुधारित जाती वापरून पेरणी करत असाल तर ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात करा. बागायती लागवडीसाठी पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वार्धात करा. कोणत्याही पिकाची वेळेवर पेरणी करणे म्हणजे भरघोस उत्पादन घेण्याची संभाव्यता वाढवणे हे मात्र नक्की. बागायती लागवड करताना गव्हाची पेरणी तुम्ही उशिरा सुद्धा करू शकता. मात्र वेळेवर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांशी तुलना केल्यास तुम्हाला तुमच्या उत्पादनावर याचा परिणाम नक्की जाणवेल. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात केल्यास दर पंधरा दिवसांच्या कालावधी साठी प्रती हेक्टर शेतीस अडीच क्विंटल उत्पादन क्षमता कमी झाल्याचे दिसून येईल.

पेरणी करताना हे करा

वर दिलेली गव्हाची सुधारित जाती पैकी योग्य वाणाची पेरणी करताना गव्हाची पेरणी पाभरीने कराव. तसेच दोन ओळीतील अंतर बागायत लागवडीसाठी वेळेवर पेरणीसाठी 22.5 सेंटीमीटर ठेवा. उशिरा पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर 18 सेंटिमीटर इतके ठेवा. तसेच कोरडवाहू लागवडीसाठी दोन ओळींतील अंतर 22.5 ते 30 सेंटिमीटर ठेवा.

अशी करा प्रत्यक्ष पेरणी

वर दिलेल्या गव्हाची सुधारित जाती पैकी योग्य बियाणे 5 ते 6 सेंटिमीटर खोल अंतरावर पेरणी करा. जास्त खोल पेरणी करू नका अन्यथा उगवणी उशिरा होईल. पेरणी उभी – आडवी अशा दुबार पद्धतीने करू नका त्याऐवजी एकेरी पद्धतीने करा. असे केल्यास शेतीची मशागत करणे सोईस्कर ठरते. पेरणी प्रक्रियेत बियाणे मातीने झाकण्यासाठी पेरलेल्या क्षेत्रावर हलका लोड म्हणजेच उलटा कुळव फिरवा. पेरणी दक्षिण उत्तर दिशेने केल्यास पिकाला सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात मिळू शकेल.

अडीच ते तीन मीटर रुंदीचे आणि सात ते दहा मीटर लांबीचे सारे/ वाफे सारा यंत्राने तयार करा. कमाल उत्पादन घेण्यासाठी प्रती एकर गव्हाची अंदाजे 880000 रोपे असावी. योग्य अंतरावर पेरणी केल्यास लागवड क्षेत्रावर रोपांची योग्य संख्या प्राप्त होते. तुम्हाला तुमच्या शेतात टोकण पद्धतीने लागवड करायची असेल तर दोन ओळीतील अंतर 22.5 ते 30 सेंटिमीटर अंतर ठेवा. तसेच दोन बियांमधील अंतर 15 सेंटिमीटर ठेवून एका ठिकाणी दोन बिया 5 ते 6 सेंटिमीटर खोल टोका. टोकणी केल्यानंतर लगेचच बियाणे ओल्या मातीने हे खड्डे बुजवा.

खत व्यवस्थापन असे करा

पूर्वमशागत करताना 25 ते 30 गाड्या शेणखत प्रती हेक्टर कुळवाच्या पाळीने मिसळा. बागायती लागवड केली असल्यास वेळेवर पेरणी केली असेल तर प्रती हेक्टर 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 40 किलो पालाश पिकास द्या. यापैकी अर्धे नत्र व संपुर्ण स्फुरद आणि पालाश पेरणी करते वेळी पिकास द्या. लागवडीनंतर 3 आठवड्यांनी खुरपणी करून घ्या.

आता तुमच्याकडे असलेले उरलेले अर्धे नत्र पेरणीनंतर पिकास द्या. जे शेतकरी उशीरा पेरणी करणार आहेत त्यांनी प्रती हेक्टर 80 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश ही खते वर सांगितलेल्या मात्रेतच दोन हप्त्यात द्या. तुम्हाला जर कोरडवाहू शेतीत गव्हाची सुधारित जाती पेरायची असेल तर यासाठी प्रत्यक्ष पेरणी करताना 40 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश पिकास द्या.

आंतरमशागत कशी कराल?

तुम्ही तुमच्या शेतात गव्हाची सुधारित जाती वाण पेरले की या पिकांमध्ये जमिनीत विविध प्रकारच्या तणांचा प्रादुर्भाव आढळून येईल. तण नियंत्रण करणे सुद्धा खूप गरजेचे आहे. त्यामुळे आवश्यक प्रमाणात एक ते दोन वेळा खुरपणी आणि कोळपणी करून जमीन मोकळी करून घ्या. आंतरमशागत योग्यरीत्या केल्या शेतातील तण नियंत्रित राहून शेतजमिनीत ओलावा टिकून राहतो.

गहू पिकातील अरूंद पानांचे आणि रूंद पानांच्या तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर साधारणतः एका महिन्याने फवारणी करावी लागते. यासाठी प्रती हेक्टर साठी आयसोप्रोटयुरॉन (50%) दोन ते तीन किलो किंवा मेटसल्फ्यूरॉन मीथाईल (20%) हेक्टरी + 20 ग्रॅम किंवा 2, 4-डी (सोडीयम) + 2 टक्के युरिया 600 ते 1250 ग्रॅम + 600 ते 800 लिटर पाण्यात मिसळून गव्हाच्या 2 ओळीत फवारणी करा. लक्षात घ्या तणनाशक फवारणीनंतर 10 ते 12 दिवस शेतीला पाणी देणे टाळावे.

एकरी 40 क्विंटल उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या या सुधारित जाती ठरतील फायदेशीर

रोग व्यवस्थापन कसे करावे?

तांबेरा रोग

गव्हाच्या पिकावर प्रादुर्भाव करणारा हा रोग वाऱ्या द्वारे पसरणारा एक बुरशीजन्य रोग असून या रोगामुळे पानांवर विखुरलेले नारिंगी रंगाचे फोडे आल्याचे दिसून येते. याचे रूपांतर थोडाच अवधीत नारिंगी ते काळ्या रंगात होते. या फोडांमध्ये बुरशीची बीजे असतात.

तांबेरा रोगावरील उपाय

तुमच्या pukalavतांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला असे लक्षात येताच मॅन्कोझेब (डायथेन एम 45) हे बुरशीनाशक 25 ग्रॅम मात्रेत 10 लिटर पाण्यात मिसळून याची गहू पिकावर फवारणी करा. ज्या प्रमाणात तांबेरा रोगाची लागण झाली आहे त्याची तीव्रता बघून सुमारे दीड ते 2 आठवड्याच्या अंतराने फवारण्या कराव्या.

काजळी किंवा काणी रोग

गव्हाच्या पिकावर पडणाऱ्या या रोगाचा प्रसार बियाण्याव्दारे होत असतो. रोगाट ओंब्यामध्ये दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होणे हे या रोगाचे लक्षण आहे. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी पेरणी करण्याअगोदर बियाण्याना वर सांगितलेली बीजप्रक्रिया करा. याशिवाय तुमच्या शेतात गव्हाची जी रोगट झाडे तुमच्या निदर्शनास येतील त्यांना मुळासकट उपटून टाका.

पानावरील करपा रोग

गव्हावर पडणाऱ्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचे प्रादुर्भाव लक्षात येताच एखादे चांगले बुरशीनाशक 25 ग्रॅम + 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करा.

कीड आणि व्यवस्थापन

गहू पिका अनेक किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. खोडमाशी, गुलाबी खोडकिडा, मावा, लष्करी अळी, घाटेअळी वाळवी किंवा उधई इत्यादी. या सर्व किडींचा बंदोबस्त करणे आवश्यक असते. यासाठी कीड व्यवस्थापन महताचे असते. जमिनीची खोल नांगरणी करून दोन ते तीन कूळवणी करुन कचरा साफ करून शेती साफ ठेवा. जमिनीच्या उताराला आडव्या सरी/सारे पाडून पेरणीसाठी तयारी करा. पिकाची फेरपालट करा.

वाळवीचा बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली वारुळे खणुन काढून त्यातील राणीचा नाश करा. खोडकिडी ग्रस्त झाडे समूळ नष्ट करून टाका. शेतात पक्षी थांबे प्रती हेक्टर 25 लावा. याशिवाय 5% निंबोळी अर्कांची फवारणी करा. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनीस या मित्र कीटकांनी परोपजीवीग्रस्त अंडी 1.5 लाख प्रति हेक्टर प्रमाणात उगवणीनंतर 15 दिवसांनी सुरूवात करून दर 10 दिवसाच्या अंतराने तीन ते चार वेळा सोडा.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!