या रब्बी हंगामात या हरभरा सुधारित जाती वाणांची लागवड करून मिळवा भरघोस उत्पादन

रब्बी हंगाम येत आहे. रब्बी हंगामातील एक महत्वाचे कडधान्य पीक म्हणून हरभरा लागवड प्रसिद्ध आहे. पण जर आपण योग्य हरभरा सुधारित जाती निवडून हरभरा लागवड केली तर भरघोस उत्पादन घेतले जाऊ शकते. हरभरा हे एक महत्वाचे पीक आहे. राज्यात हरभरा उत्पादन देशाच्या तुलनेत 24 टक्के होते. लागवड करणारे असंख्य शेतकरी आता कामाला लागणार आहेत. चला तर जाणून घेऊया हरभरा लागवड करण्यासाठी भरघोस उत्पादन देणाऱ्या काही हरभरा सुधारित जाती कोणत्या आहेत याची सविस्तर माहिती.

हरभरा लागवड करण्यासाठी हरभरा सुधारित जाती खालीलप्रमाणे

विजय, विशाल, दिग्विजय, फुले विश्र्वराज, विक्रम, फुले विक्रांत या सर्व देशी सुधारित वाणांच्या जाती आहेत. मर रोग प्रतिकारक्षमता असलेल्या या हरभरा लागवड सुधारित जाती बागाईत तसेच कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त उत्पन्न देण्याचे काम करतात.

काबुली हरभरा सुधारित जाती खालीलप्रमाणे आहेत.

पिकेव्ही 2, पिकेव्ही 4, विराट, काक 2, कृपा ही सुधारित वाणे भरघोस उत्पादन मिळवून देण्याच्या क्षमतेची आहेत. यापैकी फुले विक्रम, फुले विश्र्वराज, विजय, दिग्विजय हे हरभरा सुधारित वाण कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचे आहेत. कोरडवाहू हरभरा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा हे हरभरा सुधारित वाण भरघोस उत्पादन देण्यासाठी फायदेशीर ठरतात.यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यासाठी फुले विक्रम हे वाण विशेष प्रसिद्ध आहे. चला तर या सर्व वाणांची उत्पादन क्षमता, कालावधी आणि वैशिष्ट्ये सविस्तर जाणून घेऊया.

1) विराट (हरभरा सुधारित जाती)

ही हरभरा सुधारित जाती लागवड करण्यास योग्य असते. या पिकाचा कालावधी 115 ते 120 दिवस असतो. या जातीचे सरासरी उत्पन्न हेक्टरी कोरडवाहू साठी 10 ते 12 क्विंटल तसेच बागायती साठी 30 ते 32 क्विंटल एवढे असते. हे एक कबुली वाण असून याचे दाणे अधिक टपोरे असतात. याशिवाय ही हरभरा सुधारित जाती मर रोग प्रतिकारक्षम असते. या हरभरा वाणाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते.

2) जाकी 9218 (हरभरा सुधारित जाती)

बागायती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही हरभरा सुधारित जाती जास्त उत्पादन देणारी असते. या पिकाचा कालावधी 105 ते 110 दिवस असतो. या जातीचे सरासरी उत्पन्न हेक्टरी बागायती साठी 30 ते 32 क्विंटल एवढे असते. हे एक कबुली वाण असून याचे दाणे अधिक टपोरे असतात. याशिवाय ही हरभरा सुधारित जाती मर रोग प्रतिकारक्षम असते. या हरभरा वाणाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते. या हर हरभरा सुधारित जाती उत्पादनाला भरपूर बाजारभाव मिळतो.

3) विशाल (हरभरा सुधारित जाती)

ही हरभरा सुधारित जाती लागवड करण्यास योग्य असते. या पिकाचा कालावधी 110 ते 115 दिवस असतो. या जातीचे सरासरी उत्पन्न हेक्टरी कोरडवाहू साठी 14 ते 15 क्विंटल तसेच बागायती साठी 30 ते 35 क्विंटल एवढे असते. हे एक कबुली वाण असून याचे दाणे अधिक टपोरे असतात. याशिवाय ही हरभरा सुधारित जाती मर रोग प्रतिकारक्षम असते. या हरभरा वाणाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते. अधिक उत्पादन मिळवून देणारी ही हरभरा सुधारित जाती विशेषकरून महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी तयार करण्यात आली आहे.

4) विजय (हरभरा सुधारित जाती)

ही हरभरा सुधारित जाती लागवड करण्यास योग्य असते. या पिकाचा कालावधी 110 ते 115 दिवस असतो. या जातीचे सरासरी उत्पन्न हेक्टरी कोरडवाहू साठी 14 ते 15 क्विंटल तसेच बागायती साठी 30 ते 35 क्विंटल एवढे असते. हे एक कबुली वाण असून याचे दाणे हे पिवळे अन् अधिक टपोरे असतात. याशिवाय ही हरभरा सुधारित जाती मर रोग प्रतिकारक्षम असते. या हरभरा वाणाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते.

5) दिग्विजय (हरभरा सुधारित जाती)

ही अधिक उत्पादन देणारी हरभरा सुधारित जाती लागवड करण्यास योग्य असते. या पिकाचा कालावधी कोरडवाहू साठी 90 ते 95 दिवस तसेच पाण्याच्या शेतीसाठी 105 ते 110 दिवस असतो. उशिरा पेरणी केली तरी हे हरभरा सुधारित जाती वाण भरपुर उत्पादन देण्यास सक्षम असते. या जातीचे सरासरी उत्पन्न हेक्टरी कोरडवाहू साठी 10 ते 12 क्विंटल तसेच बागायती साठी 30 ते 32 क्विंटल एवढे असते. हे एक कबुली वाण असून याचे दाणे अधिक टपोरे असतात. याशिवाय ही हरभरा सुधारित जाती मर रोग प्रतिकारक्षम असते. या हरभरा वाणाची आपल्या राज्यात लागवड करण्यास शेतकरी वर्गाकडून पसंती दिली जाते.

6) पिकेव्ही 4 (हरभरा सुधारित जाती)

ही हरभरा सुधारित जाती लागवड करून अधिक उत्पादन घेता येऊ शकते. या पिकाचा कालावधी 100 ते 110 दिवस असतो. या जातीचे सरासरी उत्पन्न हेक्टरी 15 ते 16 क्विंटल एवढे असते. हे एक कबुली वाण असून याचे दाणे अधिक टपोरे असतात. याशिवाय ही हरभरा सुधारित जाती मर रोग प्रतिकारक्षम असते. या हरभरा वाणाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते. हे एक काबुली हरभरा सुधारीत जाती आहे.

बांबु लागवड करून वर्षाला 25 लाखांचे उत्पन्न घेणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्याची यशोगाथा

7) फुले विक्रम (हरभरा सुधारित जाती)

ही हरभरा सुधारित जाती कोरडवाहू लागवड करण्यास फायदेशीर ठरते. या पिकाचा कालावधी 105 ते 110 दिवस असतो. या जातीचे सरासरी उत्पन्न हेक्टरी कोरडवाहू साठी 16 ते 18 क्विंटल तसेच बागायती साठी 20 ते 22 क्विंटल एवढे असते. हे एक कबुली वाण असून याचे दाणे मध्यम आकाराचे असतात. याशिवाय ही हरभरा सुधारित जाती मर रोग प्रतिकारक्षम असते. या हरभरा वाणाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते. या जातीची वाढ उंच होत असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास सुलभ होते. महाराष्ट्र राज्यासह मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांत या हरभरा सुधारित जाती लागवड साठी शेतकरी प्राधान्य देतात.

8) पिडीकेव्ही कनक (हरभरा सुधारित जाती)

ही हरभरा सुधारित जाती यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास तसेच अधिक उत्पादन देण्यास कार्यक्षम असते. या पिकाचा कालावधी 108 ते 110 दिवस असतो. या जातीचे सरासरी उत्पन्न हेक्टरी 18 ते 20 क्विंटल एवढे असते. हे एक कबुली वाण असून याचे दाणे अधिक टपोरे असतात. याशिवाय ही हरभरा सुधारित जाती मर रोग प्रतिकारक्षम असते. या हरभरा वाणाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते. हे एक काबुली हरभरा सुधारीत जाती आहे. या सुधारित जातीची ओलिताखाली असलेल्या शेतीत लागवड करण्यास शिफारस करण्यात येते.

9) फुले विश्र्वरज (हरभरा सुधारित जाती)

ही हरभरा सुधारित जाती लागवड करून अधिक उत्पादन घेणे शक्य होते. या पिकाचा कालावधी 95 ते 105 दिवस असतो. या जातीचे सरासरी उत्पन्न हेक्टरी बागायती शेतीसाठी 28 ते 29 क्विंटल एवढे असते. हे एक कबुली वाण असून याचे दाणे हे पिवळसर तसेच अधिक टपोरे असतात. याशिवाय ही हरभरा सुधारित जाती मर रोग प्रतिकारक्षम असते. या हरभरा वाणाची पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते.

10) फुले विक्रांत (हरभरा सुधारित जाती)

ही हरभरा सुधारित जाती लागवड करून अधिक उत्पादन घेता येऊ शकते. या पिकाचा कालावधी 105 ते 110 दिवस असतो. या जातीचे सरासरी उत्पन्न पाण्याच्या शेतीसाठी हेक्टरी 35 ते 42 क्विंटल एवढे असते. हे एक कबुली वाण असून याचे दाणे पिवळसर रंगाचे आणि अधिक मध्यम आकाराचे असतात. याशिवाय ही हरभरा सुधारित जाती मर रोग प्रतिकारक्षम असते. या हरभरा वाणाची बागायती शेती लागवड करणारे शेतकरी महाराष्ट्रात पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात वापरतात. या वाणाची हरभरा सुधारीत जाती राज्यात तसेच मध्य प्रदेश, राजस्थानआणि गुजरात या राज्यांत सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड काय जाते.

हरभरा सुधारीत जाती, हरभरा झाड

हरभरा पीक उत्पादन वाढीसाठी खालील गोष्टींचा अवलंब करावा

तुम्हाला जर तुमच्या शेतात हरभरा सुधारित जाती पैकी जमीन अनुसार योग्य वाणाची लागवड करायची असेल आणि हरभरा पिकाचे चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर प्रामुख्याने खालील गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक ठरते.

हरभरा लागवड करताना योग्य जमिनीची निवड करावी लागते. आणि त्यानुसार वरील हरभरा सुधारित जाती पैकी योग्य वाण पेरावे लागेल. यासाठी शेत जमिनीची योग्यरित्या पुर्व मशागत सुद्धा करणे गरजेचे असते. मोठ्या प्रमाणावर उत्पादन देणाऱ्या हरभरा सुधारित जाती योग्य ते बियाणे निवडा वरील सगळ्याच जाती रोग प्रतिकारक्षम आहेत. पेरणी वेळेवर पूर्ण करा. वेळेवर पेरणी, पेरणी करताना योग्य अंतर ठेवा.

प्रतिहेक्टरी रोपांची संख्या योग्य असणे आवश्यक असते. हरभरा लागवड साठी योग्य बीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धनाचा वापर सुद्धा करणे हे आलेच. याशिवाय तुमच्या शेतात जास्त तण होऊ नये यासाठी निंदणी किंवा तणनाशक मारून तण नियंत्रित करा. तुमच्या शेतात जर पाणी देण्याची सोय असेल तर पाण्याचे योग्य नियोजन करा. वेळोवेळी योग्य माहिती घेऊन पिकांचे निरीक्षण करा आणि रोग किंवा किडींपासून तुमच्या पिकाचे संरक्षण करा.

हेक्टरी 35 क्विंटल उत्पादन देणाऱ्या बाजरीच्या या सुधारित आणि संकरित जाती

हरभरा लागवड योग्य जमीन

तुम्हाला जर तुमच्या शेतात हरभरा सुधारित जाती पैकी एखाद वाण पेरायच असेल तर त्यासाठी जमीन कशी हवी याबद्दल थोडी माहिती. हरभरा पिकाला मध्यम ते भारी दर्जाची शेतजमीन मानवते. ही जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. तसेच कसदार आणि भुसभुसीत असावी.ज्या भागात वर्षाला 700 ते 1000 मिलीमीटर पाऊस होतो अशा भागात मध्यम ते भारी शेतजमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो.

परिणामी अशा जमिनीत जिरायत हरभऱ्याचे पीक उत्तम प्रकारे येते. याशिवाय उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा सुधारित जाती पैकी योग्य वाण वापरून भरघोस उत्पादन घेणे शक्य असते. मात्र यासाठी शेतात पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. जी शेतजमीन हलकी चोपन किंवा पाणथळ आणि क्षारयुक्त आहे, अशा शेतजमिनी हरभरा लागवडीसाठी योग्य नसतात ही गोष्ट लक्षात घ्या.

हरभऱ्याच्या वाढीसाठी पोषक हवामान

हरभरा पिकाला थंड तसेच कोरडे हवामान मानवते. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा सुद्धा पिकाच्या वाढीसाठी महत्वाचा असतो. हरभऱ्याचे रोप 20 दिवसाचे झाल्यानंतर तापमान कमीत कमी 10 ते 15 अंश सेल्सिअस असावे लागते. तर जास्तीत जास्त 25 ते 30 अंश सेल्सिअस असावे लागते.
अशाप्रकारचे तापमान मिळाल्यास पिकाची वाढ चांगली होते. आणि झाडांना भरपूर फांद्या, फुले आणि घाटे लागतात. आपल्याकडे असे वातावरण नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात म्हणजेच हिवाळ्यात असते.

हरभरा लागवड पूर्वमशागत

हरभरा झाडांची मुळे खोलवर जातात त्यामुळे जमीन भुसभुशीत असणे फारच उपयुक्त असते. खरीप पीक काढल्या बरोबरच जमिनीची खोल नांगरणी करून घ्यावी. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्या. खरीप हंगामात शेणखत किंवा कंपोस्ट दिलेले असेल तर आता देण्याची गरज नाही. परंतू खत दिलेले नसेल तर मात्र ५ टन प्रति हेक्टर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत नांगरणीपूर्वी शेतात पसरून घ्यावे. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर शेतजमीन स्वच्छ करावी आणि सप्टेंबर महिन्याच्या शेवटी हरभरा पेरणी करता येईल.

हरभरा पेरणीची योग्य वेळ

कोरडवाहू शेतात हरभऱ्याची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असतांना म्हणजेच
सप्टेंबर महिन्याचा शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी. सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस पडणाऱ्या पावसाचा जिरायत हरभरा बियांची उगवण छान होते. तसेच रोपांच्या वाढीसाठी हे वातावरण उपायुक्त ठरते.

जिरायत क्षेत्रात खोलवर बियाणे पेरणी करा म्हणजे फायदेशीर ठरेल. बागायत क्षेत्रात पाणी पुरवठा करता येत असल्यामुळे हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान केली तरी चालते. कमी खोलीवर हरभरा पेरणी केली तरी काही फरक पडत नाही. समजा पेरणी करण्यास जास्त उशीर झाला तर अशा परिस्थितीत पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले, घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभरा सुधारित जाती पैकी योग्य वाणाची पेरणी वेळेवर करणे खूप महत्वाचे असते.

प्रत्यक्ष पेरणी करताना आवश्यक बाबी

हरभरा पिकाची प्रत्यक्ष पेरणी करतेवेळी दोन ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर 10 सेंटिमीटर ठेवावे. प्रती हेक्टरी 333000 अपेक्षित रोपाची संख्या असते.

हरभरा लागवड बीजप्रक्रिया

तुमच्या शेतात हरभरा पेरणी करण्यासाठी वर दिलेल्या हरभरा सुधारित जाती पैकी योग्य वाणाची बीजप्रकिया आणि जीवाणूसंवर्धन करणे महत्वाचे ठरते. पेरलेल्या बियाण्याची उगवण योग्यरीत्या होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी हे बियाणे (प्रती किलोसाठी) 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे अथवा 2 ग्रॅम थायरम + 2 ग्रॅम कार्बेन्डेझीम एकत्र करुन प्रति किलो मात्रेत बियाण्यांना चोळावे.

ज्वारीच्या या सुधारित जाती देतील प्रचंड प्रमाणात उत्पादन, अशी करा लागवड

हरभरा सुधारित जाती प्रमाणे बियाण्यांचे योग्य प्रमाण

तुमच्या शेतात हरभरा लागवड करायचे ठरले असेल आणि त्या अनुषंगाने तुम्ही वरील दिलेल्या हरभरा सुधारित जाती पैकी एखादे बियाणे आणले असेल तर आता त्या बियाण्याची मात्रा आपण बघणार आहोत.

1) विजय या मध्यम दाण्यांच्या वाणासाठी प्रती हेक्टर 65 ते 70 किलो बियाणे 2) विशाल
दिग्विजय आणि विराट या टपोऱ्या दाण्यांच्या वाणाकरिता एक क्विंटल प्रति हेक्टर या प्रमाणात पेरणीसाठी वापर करण्यात यावा. याशिवाय 3) कृपा आणि पी. के. व्ही. 4 या जास्त टपोऱ्या काबुली वाणांकरीता 125-130 किलो प्रति हेक्टर बियाणे शेतात पेरा. सरी वरब्यांवर सुद्द्धा हरभरा पीक उत्तम प्रकारे येते. 90 सेंमी रुंदीच्या सऱ्या सोडून वरब्यांच्या दोन्ही बाजूला 10 सेंमी अंतरावर बियाणे पेरावे. काबुली वाणासाठी आधी शेतजमीन ओली करुन घ्यावी अन् वापशावर पेरणी करावी, यामुळे उगवण मस्तपैकी होते.

खत व्यवस्थापन बद्दल थोडक्यात

हरभरा सुधारित जाती पैकी लागवड केल्यास हे नवे वाण खत आणि पाणी ये घटकांना चांगला प्रतिसाद देत असते मात्र त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे अनिवार्य ठरते.
चांगले कुजलेले 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रति हेक्टर शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात मिसळावे. पिकाची प्रत्यक्ष पेरणी करताना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टर म्हणजेच 125 किलो डायअमोनियम फॉस्फेट (डी.ए.पी) अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश अथवा 50 किलो युरीया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी पिकास द्यावे.

संतुलीत खतांच्या वापरामुळे उत्पादनात भरघोस वाढ होईल. पीक फुलोऱ्यात असताना 2 टक्के युरियाची पहिली फवारणी आणि त्यांनतर दोन आठवड्यांनी पुन्हा दुसरी फवारणी अवश्य करण्यात यावी. असे केल्याने हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य होईल.

हरभरा लागवड पाणी व्यवस्थापन

कोरडवाहू हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असल्यास एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी दिल्यास खूप फायदा होतो. बागायत हरभरा लागवड असेल तर शेताची रानबाधणी करताना दोन साऱ्यातील अंतर तसेच लांबी जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवली तर पिकाला योग्य प्रमाणात पाणी देणे सुलभ होते. मध्यम जमिनीत 20 ते 25
दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी देण्यात यावे. भारी जमिनीसाठी पाण्याच्या दोनच पाळया पुरेशा असतात. 30 ते 35 दिवसांनी पहिले व 60-65 दिवसांनी दुसरे पाणी पिकास द्या.

हरभरा पिकाला सुमारे 25 सेंटिमीटर पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणात म्हणजेच 7 ते 8 सेंटिमीटर पाणी दिल्या गेले पाहिजे. मात्र पिकाला यापेक्षा जास्त पाणी झाले तर हरभरा पीक उभळण्याचा संभव असतो. यासाठी स्थानिक हवामान आणि परिस्थितीनुसार तसेच जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळयांमध्ये योग्य अंतर ठेवले पाहिजे. यावेळी शेतजमिनीस फार मोठया भेगा पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. हरभरा पिकाला एक पाणी दिल्यास 30 टक्के, दोन पाणी दिल्यास 60 टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात 90 टक्के वाढ संभव असते.

तुषार सिंचन पद्धतीने पाणी देण्याचे फायदे

हरभरा पिकाला तुषार सिंचन पध्द्तीने पाणी पुरवठा केला आणि वर दिलेल्या हरभरा सुधारित जाती पैकी योग्य वाणाची लागवड केली उत्पादनात मोठी वाढ होते. हरभरा पीक पाण्याच्या बाबतीत अत्यंत संवदेनशील असते त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी देऊ नये. असे केल्यास पीक उभळते परिणामी उत्पादन कमी होऊन नुकसान होते. या पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तुषार सिंचन पध्दती वापरावी. यामुळे शेतात उगवलेले तण काढणे अतिशय सोप्पे होते. नेहमीच्या पारंपरिक पध्दती नुसार अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्या जाते त्यामुळे पिकावर मुळकुजसारखे रोग येतात आणि पीक उत्पादन कमी होते. मात्र तुषार सिंचनाने पाणी अतिशय प्रमाणात देता येत असल्याने मुळकुज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

एकरी 40 क्विंटल पर्यंत भरघोस उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या सुधारित जाती

हरभरा पिकात घेता येणारी आंतरपीके

हरभरा पिकात मोहरी, करडई, ज्वारी, ऊस इत्यादी पिकांचे आंतरपीक घेता येते. हरभऱ्याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घेणे फायद्याचे असते. हरभऱ्याच्या सहा ओळी आणि रबी ज्वारीच्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक सुद्धा अधिक उत्पन्न मिळवून देण्यास सक्षम आहे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूला किंवा वरंब्याच्या टोकावर 10 सेंटीमीटर अंतरावर हरभऱ्याची एक ओळ टोकण केली तर हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. याशिवाय हरभऱ्याचा बेवड ऊस पिकाला फायदेशीर ठरून उसाच्या उत्पादनात सुद्धा वाढ होते.

रोग व्यवस्थापन कसे करावे?

हरभरा पिकावर मुख्यकरून मर, मुळमुजव्या, मान कुजव्या आणि खुजा हे रोग पडल्याचे दिसून येते. बीजप्रक्रिया केल्यास रोगांपासून जास्तीत जास्त संरक्षण मिळते. पिकाची फेरपालट करणे हे सुद्धा रोगांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. वर माहिती दिलेल्या हरभरा सुधारित जाती पैकी जमीन अनुसार योग्य जातीचे वान निवडल्यास हरभरा मर रोग मर रोगाचा धोका कमी होतो. हरभरा पिकाला वरचेवर पाणी दिल्यास मूळकुजव्या रोग होऊ शकतो. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी देणे गरजेचे असते. तसेच पिकात पाणी साचणार नाही याची सुद्धा काळजी घेतली तर आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment