रब्बी हंगामात या ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करून घ्या भरघोस उत्पादन

ज्वारी हे राज्यात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणारे एक महत्वाचे पीक आहे. ही एक गवत वर्गीय वनस्पती असून देशातील बहुतांश भागात ज्वारीचा प्रमुख अन्नधान्य म्हणून उपयोग होतो. याशिवाय या पिकातून पशूंना चारा उपलब्ध होतो. आज आपण या लेखातून ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करून भरघोस उत्पादन कसे घेता येईल याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपल्या राज्याशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांसारख्या विविध राज्यात ज्वारीचे पीक घेतल्या जाते.

कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ज्वारी हे लोक खूपच महत्वाचे असते.प्रमुख अन्नधान्य याबरोबरच ज्वारीच्या कोवळ्या दाण्यांचा हुरडा, ज्वारीच्या दाण्याच्या लाह्या यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी असते.ज्वारीपासून दारू सुद्धा निर्माण केल्या जाते. याशिवाय ज्वारीच्या काही प्रजाती खांडसरी साखर निर्मिती केल्या जाते. ज्वारीची शेती करताना आपल्याला ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करणे अगत्याचे ठरते. आपल्या भागातील हवामान, शेतजमीन हंगाम यानुसार योग्य वाणाची निवड करून पेरणी केल्यास निश्चितच उत्पादन वाढीसाठी त्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड, हुरडा, लाह्या, पापड यासाठी योग्य वाणांची माहिती

या रब्बी हंगामासाठी राज्यातील बरेच शेतकरी बांधव त्यांच्या शेतात ज्वारीची लागवड करण्यासाठी शेतीची कामगिरी करत असतील. त्यांना ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करून भरघोस उत्पादन मिळाल्यास त्यांची आर्थिक प्रगती होऊ शकते. चला तर जाणून घेऊया ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करण्यासाठी कोणती आहेत ही सुधारित वाणे आणि त्यांची वैशिष्ट्ये याबद्दल सविस्तर माहिती.

1) फुले यशोदा (SPV 1359)

ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करण्यासाठी आपण हे वाण वापरू शकता. या वाणाच्या पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवसांचा असतो. हे वाण 30 ते 32 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देण्यास सक्षम आहे. तसेच या वणापासून सात ते साडेसात टन कडबा सुद्धा प्रती हेक्टर क्षेत्रावर मिळू शकतो. या पिकाची लागवड कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असते.

2) फुले रेवती

ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करण्यासाठी हे सर्वाधिक उत्पादन देऊ शकणारे वाण आहे. या वाणाच्या पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवसांचा असतो. हे वाण प्रति हेक्टर 44 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवून देऊ शकते. तसेच या वणापासून 11 टन कडबा सुद्धा प्रती हेक्टर क्षेत्रावर मिळू शकतो. या पिकाची लागवड बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खोडमाशी, खोडकिडा, आणि खडखड्या रोगांना प्रतिकारक असे हे रब्बी हंगामासाठी उत्कृष्ट उत्पादन देणारे वाण आहे.

3) पीकेव्ही क्रांती (PKV KRANTI)

ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करण्यासाठी प्रती हेक्टर 25 ते 30 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित वाण विचारात घेतल्या जाऊ शकते. या वाणाच्या पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवसांचा असतो. खोडमाशी, खोडकिडा, आणि खडखड्या रोगांना प्रतिकारक असणाऱ्या या वाणाचा पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. तसेच या वणापासून सात ते आठ टन कडबा सुद्धा प्रती हेक्टर क्षेत्रावर मिळू शकतो. या पिकाची लागवड कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असते.

4) फुले सुचित्रा

एकरी 24 ते 28 क्विंटल उत्पादन देणाऱ्या या ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड केली जाऊ शकते. या वाणाच्या पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवसांचा असतो. तसेच या वणापासून 1सहा ते साडे सहा टन कडबा सुद्धा प्रती हेक्टर क्षेत्रावर निघू शकतो. या पिकाची लागवड बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खोडमाशी, खोडकिडा, आणि खडखड्या रोगांना प्रतिकारक तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी लागवडीचा पर्याय म्हणून रब्बी हंगामासाठी उत्कृष्ट उत्पादन देणारे हे वाण आहे.

5) स्वाती

बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या जातीच्या ज्वारीच्या सुधारित वाणांची पेरणी करणे हे सर्वाधिक उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्याचा दृष्टीकोनातून एक महत्वाचा निर्णय ठरू शकतो. या वाणाच्या पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवसांचा असतो. हे वाण प्रति हेक्टर 24 ते 28 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवून देऊ शकते. तसेच या वणापासून साडे पाच ते सहा टन कडबा सुद्धा प्रती हेक्टर क्षेत्रावर उत्पादित होऊ शकतो. या वाणाची लागवड बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करण्यासाठी रब्बी हंगामासाठी तयार केलेले हे एक उत्तम वाण आहे.

6) परभणी मोती (SPV 1411)

मध्यम ते भारी शेतजमिनीत या ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करता येते. या वाणाच्या पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवसांचा असतो. हे वाण प्रति हेक्टर 25 ते 30 क्विंटल उत्पादन देण्यास कार्यक्षम असते. या वाणापासून सात ते आठ टन कडबा सुद्धा प्रती हेक्टर क्षेत्रावर मिळू शकतो. या पिकाची लागवड कोरडवाहू तसेच बागायती शेती अशा दोन्ही प्रकारच्या लागवडीसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. या वाणाच्या जातीच्या ज्वारीचे दाणे टपोरे आणि मोत्यासारखे चमकदार असतात. या वाणाच्या ज्वारीची भाकरी चवीला अत्यंत स्वादिष्ट असते.

7) सी. एच. एस. 19R (CSH 19R)

हे एक संकरित वाण असून ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करण्यासाठी हे सर्वाधिक उत्पादन देऊ शकणारे वाण आहे. या संकरीत वाणाच्या पिकाचा कालावधी 115 दिवसांचा असतो. हे वाण प्रति हेक्टर 30 ते 32 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवून देऊ शकते. तसेच या वणापासून 8 ते 9 टन कडबा सुद्धा प्रती हेक्टर क्षेत्रावर निघतो. या पिकाची लागवड बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खोडमाशी, खोडकिडा, आणि खडखड्या रोगांना प्रतिकारक असे हे रब्बी हंगामासाठी उत्कृष्ट उत्पादन देणारे वाण आहे. या संकरित वाणाच्या ज्वारीचा दाणा टपोरा असतो. तसेच चवीला स्वादिष्ट अशी भाकरी हे या संकरित वाणाचे वैशिष्टय आहे.

8) फुले उत्तरा (हुरडा उत्पादनासाठी)

हुरडा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता येते. कारण मुंबईसारख्या शहरात हुरडा आवडीने खाल्ली जातो आणि त्यासाठी अतिशय चांगली किंमत लोक मोजतात. या वाणाच्या पिकाचा कालावधी फक्त 85 ते 100 दिवसांचा असतो. हे वाण प्रति हेक्टर 20 ते 25 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवून देऊ शकते. या पिकाची लागवड बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. रब्बी हंगामासाठी या ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत पैसा हातात खेळता ठेवल्या जाऊ शकतो.

9) फुले पंचमी (लाह्या साठी)

लाह्या उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करण्यासाठी हे सर्वाधिक उत्पादन मिळवून देऊ शकणारे वाण आहे. या वाणाच्या पिकाचा कालावधी 115 ते 120 दिवसांचा असतो. हे वाण प्रति हेक्टर 12 ते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवून देऊ शकते. तसेच या वणापासून चार ते साडे चार टन कडबा सुद्धा प्रती हेक्टर क्षेत्रावर मिळू शकतो. या पिकाची लागवड बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खोडमाशी, खोडकिडा, आणि खडखड्या रोगांना प्रतिकारक असे हे रब्बी हंगामासाठी उत्कृष्ट उत्पादन देणारे वाण आहे.

10) फुले रोहिणी (पापड साठी)

ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड मुख्यत्वे या ज्वारीपासून पापड बनविण्यासाठी वापर होत असल्यामुळे सर्वाधिक उत्पादन देऊ शकणारे वाण आहे. या वाणाच्या पिकाचा कालावधी 115 ते 120 दिवसांचा असतो. हे वाण प्रति हेक्टर 18 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवून देऊ शकते. तसेच या वणापासून 11 टन कडबा सुद्धा प्रती हेक्टर क्षेत्रावर मिळू शकतो. या पिकाची लागवड बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. विशेषकरून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी शिफारस केलेले ज्वारीच्या पापड निर्मितीसाठी उत्कृष्ट असे देणारे वाण आहे. या वाणाच्या ज्वारीचे पापड खाण्यास अत्यंत चविष्ट असून त्यांचा रंग तपकिरी लालसर असतो.

ज्वारी लागवडीयोग्य जमीन

तुम्हाला जर ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करायची असेल तर चिकण मातीची, पोयटयाची, मध्यम काळी, तांबडी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी शेतजमीन असणे गरजेचे असते मात्र रब्बी ज्वारीची लागवड करण्यासाठी मध्यम ते भारी जमिन असावी लागते. सिलेक्शन3 आणि माऊली या जाती हलक्या शेतजमिनीसाठी योग्य असतात. मध्यम ते भारी जमिनीत ओल जास्त काळ टिकवून रहात असल्याने अशी जमीन रब्बी ज्वारीच्या पेरणी साठी योग्य असते. 5.5 ते 8.5 इतके सामु असणाऱ्या जमिनीत ज्वारीचे पीक घेता येते. ज्वारीच्या सुधारित वाणांची पेरणी मोठया प्रमाणात कोरडवाहू क्षेत्रावर केली जाते. कोरडवाहू क्षेत्रावर अधिक उत्पादन पाहिजे असल्यास जमिनीच्या खोली अनुसार योग्य सुधारीत वाणाची लागवड करावी.

यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याच्या या सुधारीत जातीची लागवड करून मिळवा भरघोस उत्पादन

ज्वारी लागवडीचा हंगाम

आपल्या राज्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता ज्वारीचे पीक हे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाऊ शकते. राज्यातील असंख्य शेतकरी बांधव बांधव खरीप आणि रब्बी हंगामात ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करून भरघोस उत्पादन घेत असतात.

ज्वारी लागवड संपूर्ण माहिती, पूर्वमशागत,  बीजप्रक्रिया,  पेरणी पद्धत, आंतरमशागत  जमीन/हवामान पाणी, खत व्यवस्थापन,  काढणी आणि उत्पादन, पिकाची राखण

ज्वारी लागवडीयोग्य हवामान

ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करण्यासाठी वार्षिक सरासरी पाऊस 400 ते एक हजार मिलीमीटर आवश्यक असतो. तसेच 37 ते 32 अंश सेल्सिअस तापमान या पिकाला पोषक ठरते. आपल्या राज्यातील हवामान ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करण्यास योग्य आहे. म्हणुनच ज्वारीची शेती राज्यातील जवळपास प्रत्येक भागात केल्या जाते.

शेतजमिनीची पूर्वमशागत

शेतात नांगरणी करून झाल्यानंतर 5 ते 6 टन शेणखत प्रती हेक्टर शेतजमिनीत टाकावे. त्यानंतर कुळवाच्या पाळया देऊन शेतातील काडी कचरा व धसकटे वेचून शेतजमीन साफ करून घ्यावी. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीच्या उतारावर वाफे तयार करावे. (3.6 x 3.6 चौरस मीटर आकाराचे वाफे तयार करत असताना सारा यंत्राने सारे करुन घ्या. ट्रॅक्टरने वाफे तयार करत असाल तर एकावेळी 6×2 चौरस मीटर आकाराचे वाफे तयार करता येऊ शकतील.

हे वाफे रब्बी ज्वारीच्या पेरणीपूर्वी दीड महिन्याअगोदर तयार करावे जेणेकरून 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर हा ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करण्यास अतीशय योग्य कालावधी असल्यामुळे या कालावधीत तुम्हाला पेरणी उरकून घेता येईल. साधारणपणे वाफे तयार करण्याचा काळ हा ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा असावा. पेरणी करण्यापूर्वी या मध्यंतरीच्या काळात जेवढा पाऊस पडेल तेवढा त्यामध्ये जिरवा.

पेरणी करताना वाफे मोडून पेरणी करा आणि पून्हा सारा यंत्राच्या सहायाने गहू, हरभरा पिकासारखे वाफे पाडून आडवे दंड पाडून घ्या. यामुळे पेरणीनंतर पाऊस पडल्यावर तो अडवून जिरवता येईल. यामुळे जमिनीत जास्त वेळ ओलावा टिकून राहील.ही प्रक्रिया म्हणजेच मुलस्थानी पाणी व्यवस्थापन तंत्र. या तंत्रामुळे रब्बी ज्वारीचे 30 ते 35 टक्के अधिक उत्पादन वाढते.

एकरी 40 क्विंटल पर्यंत उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या या सुधारित वाणांची लागवड करून यंदाच्या रब्बी हंगामात मिळवा प्रचंड नफा

बीजप्रक्रिया अशी करा

तुमच्या शेतात ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करण्यापूर्वी प्रति किलो बियाण्यास 4 ग्रॅम गंधक (३०० मेश पोत असलेले) चोळा. याशिवाय 25 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर आणि पी. एस. बी. कल्चर सुद्धा बियाण्यावर चोळा. तुम्हाला जर तुमच्या बागायती शेतीत वर दिलेल्या ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करून ज्वारीचे भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर 45×12 सेंटिमीटर अंतरावर पेरणी करणे योग्य राहील. बीजप्रक्रिया नक्की करा आणि प्रती हेक्टर पेरणीसाठी 10 किलो बियाणे वापरा. पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरून एकाचवेळी खत व बियाणे पेरल्यास फायदेशीर ठरते.

प्रत्यक्ष पेरणी करताना हे लक्षात घ्या

शेतकरी बांधवांना जर रब्बी हंगामासाठी ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करायची असेल आणि अधिक धान्य आणि कडबा यांचे भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर निव्वळ नफा मिळविण्याच्या दृष्टीकोनातून पेरणी करण्यापूर्वी 10 ते 12 तास ज्वारी बियाणे 0.05% पोटॅशियम नायट्रेटच्या द्रावणात (5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट 10 लिटर पाण्यात) भिजवून शिफारशीत खत मात्रेसह (40
किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद प्रति हेक्टर) पेरणी करा. तसेच पेरणीनंतर सुमारे 2 महिन्यांनी 2% पोटॅशियमची फवारणी करायला विसरू नका. रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वर दिलेल्या पेरणीच्या योग्य वेळी करा. ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवण्यासाठी सुमारे एक लाख 45 हजार रोपे प्रती हेक्टर ठेवावी. ज्वारीची पेरणी 45×15 सेंटिमीटर अंतरावर केल्यास हे शक्य होईल.

ज्वारी पिकाची आंतर मशागत

ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करून झाली की पुढचा टप्पा म्हणजे आंतरमशागत. पेरणी करून झाली की अंदाजे तीन आठवड्यांनी पिकाला कोळपणी द्या. मजुरांच्या साहाय्याने निंदणी करून ओळीतील तण काढून घ्या. यानंतर दर पंधरा दिवसांनी ज्वारी पिकाला कोळपणी देण्याचा कार्यक्रम सुरू ठेवा. यामुळे तुमच्या ज्वारीच्या पिकात तण वाढणार नाही. लक्षात घ्या कोळपणीमुळे शेतजमीन भेगाळत नाही. याशिवाय पिकाच्या मुळांना हवेचा, वनस्पतिपोषक द्रव्यांचा मुबलक पुरवठा होतो तसेच पाण्याचे सुद्धा योग्य प्रमाण मिळते. ज्वारी पिकाला एकूण 3 ते 4 कोळपण्या आणि दोन-तीन खुरपण्या देत असतात. दुष्काळी किंवा अवर्षणग्रस्त भागात म्हणजे विदर्भातील बऱ्याच भागात कोळप्यासारख्या कोळप्याने कोळपणी केल्या जाते.

बाजरीच्या या सुधारित आणि संकरित जाती ठरतील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी संजीवनी

पाणी व्यवस्थापन

तुम्ही जर कोरडवाहू शेतीत ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड करायचे ठरवले असेल तर ज्वारीचे पीक गर्भावस्थेत असतांना म्हणजेच पेरणीनंतर साधारणतः एका महिन्याने पाहिले पाणी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास पीक पोटरीत असताना सुद्धा पिकाला पाणी द्यावे. तुम्ही जर ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड बागायती शेतात करत असाल तर मध्यम जमिनीत तिसरे पाणी फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर सुमारे अडीच महिन्यांनी आणि कणसात दाणे भरतांना पेरणीनंतर सुमारे 3 महिन्यांनी पाणी देणे गरजेचे असते. मात्र तुमची शेतजमीन भारी दर्जाची असेल तर तुम्हाला चौथ्या वेळा पाणी देण्याची शक्यतो गरज पडत नाही.

ज्वारी पिकावरील रोग नियंत्रण

रब्बी हंगामातील ज्वारी पिकावर सामान्यतः खडखड्या, पानावरील करपा, तांबेरा, चिकटा आणि कणसातील काणी हे रोग दिसून येतात. या रोगांना आळा घालण्यासाठी पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास गंधकाची प्रक्रिया करा त्यामुळे काणी रोगाची लागण होत नाही. 1 किलो बियाण्यास गंधक 80 डब्ल्यु. पी. 4 गॅम या मात्रेत चोळा. जमिनीतील पाण्याची कमतरता आणि जास्त उष्णतामान या कारणांमुळे खडखड्या रोगाचा पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो.

खडखड्या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी पीक फुलोऱ्यात असतांना पाण्याचा ताण असल्यास पिकांस एखादे पाणी देणे ही महत्वाची बाब आहे. याशिवाय 5 टन प्रति हेक्टर या प्रमाणात पेरणीनंतर चौथ्या आठवड्यात तूरकाटयाचे आच्छादन केल्यास खडखड्या रोगामुळे ताटे लोळण्याचे प्रमाण 42 टक्क्यांनी कमी होते. परिणामी धान्य उत्पादनात 24 टक्क्याने वाढ झालेली पाहायला मिळते. अँन्थ्रक्नोज या रोगाच्या नियंत्रणासाठी प्लुक्झॅपायरोक्झॅड 333 ग्रॅम प्रती लिटर आणि एफ. एस. 1 मिली या मात्रेत प्रती किलो बियाण्यास चोळा म्हणजे अँन्थ्रक्नोज रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी मदत होईल.

ज्वारी पिकाची राखण

ज्वारीचे कोवळे दाणे पक्षांचे आवडते खाद्य असते. त्यामुळे अनेक पक्षी हे दाणे आवडीने खायला
पिकात येतात. परिणामी ज्वारीच्या पिकाचे पक्ष्यांपासून संरक्षण करणे सुद्धा गरजेचे असते. कोवळ्या मधुर दाण्यांनी भरलेल्या ज्वारीच्या कणसांवर चिवळ, भोरड्या, चिमण्या यांसारखे अनेक पक्षी सकाळी आणि संध्याकाळी शेतात येतात आणि कणसांतील दाणे टिपून खातात. परिणामी पिकाचे नुकसान होते, यासाठी स्वतः सकाळ संध्याकाळ शेतात जाऊन किंवा बुजगावणे तसेच इतर तत्सम उपायांनी या पक्षांवर नियंत्रण ठेवावे लागते.

ज्वारीची काढणी करताना घ्यावयाची काळजी

ज्वारीचे पीक वर दिलेल्या ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड केल्यास सरासरी 110 ते 130 दिवसांत काढणीयोग्य होते. काढणीच्या वेळी कणसातील दाणे टणक झाल्याचे दिसून येते. ज्वारीचे बारकाईने निरीक्षण केले तर जाणता येऊ शकते की दाण्याच्या टोकाकडील भागाजवळ काळा ठिपका पडलेला असतो. अशाप्रकारची लक्षणे तुमच्या निदर्शनास आली की ज्वारीची काढणी करून घ्या. ज्वारीची काढणी केल्यानंतर सुमारे 8 ते 10 दिवस कणसे उन्हात वाळू द्यावी आणि नंतर त्यांची मळणी करा. हे ज्वारीचे सुधारित वाणांची निघालेले पीक धान्य उफणनी करुन तयार करून घ्या. या धान्याची साठवणुक करण्ये पुन्हा एकदा उन्हात वाळू घाला.

वाटाण्याच्या या सुधारित जातींची लागवड करून फक्त 2 महिन्यात मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न

ज्वारीच्या सुधारित वाणांची उत्पादन क्षमता

ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड आधुनिक तंत्राने केल्यास कोरडवाहू शेतात ज्वारीचे 8 ते 10 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन हलक्या जमिनीत घेता येईल. मध्यम जमिनीवर प्रति हेक्टर 20 ते 25 क्विंटल तसेच भारी जमिनीवर 25 ते 30 क्विंटल उत्पादन घेणे सहज शक्य होते. तुम्ही जर ज्वारीच्या सुधारित वाणांची लागवड बागायती शेतीत केली असेल तर ज्वारीचे 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन आरामात मिळते. कडब्याचा विचार केला तर साधारणपणे कोरडवाहू क्षेत्रात ज्वारी धान्यापेक्षा दुप्पट तर बागायती शेतात अडीच ते तीनपट कडब्याचे उत्पादन होऊ शकते.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!