ही करडई सुधारित जात कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ठरेल संजीवनी

भरघोस उत्पादन देणारी करडई सुधारित जात 2024 : करडई हे रबी हंगामातील एक महत्वाचे पीक असून पावसाळ्यानंतर शेतजमिनीत उपलब्ध ओलाव्यावर सुद्धा हे पीक चांगल्या प्रकारे येते. त्यामुळे इतर रबी पिकापेक्षा कोरडवाहू क्षेत्रासाठी करडई पीक वरदान ठरते. करडई हे एक कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणारे पीक असून करडी मध्ये चार प्रकारचे वाण उपलब्ध आहेत. संकरीत काटेरी, संकरीत बिन काटेरी, सुधारीत काटेरी, सुधारीत बिन काटेरी.

मात्र या सर्व जातींपैकी सुधारीत काटेरी वाणाची निवड करणे फायदेशीर ठरते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले ए.के.एस. 207 तसेच नविन वाणापैकी पी.के.व्ही. पिंक, महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले भिमा, फुले कुसुमा, एस.एस.एफ. 708 या वाणांची शिफारस करण्यात येते. याशिवाय मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले पी.बी.एन.एस 12 (परभणी कुसुम) इत्यादी सुधारित जाती उत्पादनास उत्कृष्ट आहेत.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने अलीकडेच विकसीत केलेले पी.के.व्ही. पिंक हे करडई सुधारित वाण जास्त उत्पादन तर देतेच, शिवाय या वाणात तेलाचे प्रमाण सुद्धा सर्वाधिक अस्त. या जातीच्या दाण्याचा आकार लहान असतो मात्र हा वाण मर रोगास प्रतिकारक ठरतो. गत
काही दशकांत करडई उत्पादनाच्या बाबतीत भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर होता. जगातील ५० टक्के करडईचे उत्पादन आपल्या देशात व्हायचे. मात्र काळानुसार लागवडीखालील क्षेत्र कमीकमी होत गेले.

भारतात जवळपास सर्व राज्यात करडई पिकाची लागवड बियांतील तेल मिळविण्यासाठी केल्या जाते. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि मध्य प्रदेश ही करडई पिकाचे उत्पादन घेणारी काही आघाडीची राज्ये आहेत. तर आपल्या महाराष्ट्रात उस्मानाबाद, परभणी, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, लातूर, पुणे, सोलापूर, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि अमरावती हे जिल्हे करडी पिकाच्या लागवडीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. आज आपण करडई पिकाचे भरघोस उत्पादन देणाऱ्या 20 संकरित आणि सुधारित वाणांची सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत. करडई सुधारित जात यादी खालीलप्रमाणे आहेत.

करडई लागवड, करडई पीक, करडई सुधारित जात

1) फुले भिवरा (एस.एस.एफ. 13-71)

ही करडई पिकाची सुधारित जात कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी संपूर्ण देशात शिफारस केल्या गेली आहे. या सुधारित जातीच्या पिकाचा कालावधी 125 ते 126 दिवसांचा असतो. हे वाण पानावरील ठिपके रोगास प्रतिकारक्षम असून यात तेलाचे प्रमाण 29.2 % इतके असते. हे सुधारित वाण मर आणि मावा किडीस मध्यम प्रतिकारक्षम असते. तुम्ही या करडई सुधारित जात तुमच्या शेतात पेरली तर तुम्हाला 20 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन सहज मिळू शकते.

2) फुले निरा (एस.एस.एफ. 12-40)

भारतातील कुठ्ल्याही क्षेत्रात कोरडवाहू तसेच
बागायती लागवडीसाठी ही करडई सुधारित जात 2020 साली प्रसारित करण्यात आली असून 120 ते 125 दिवसांत हे पीक तयार होते. ही करडई सुधारित जात मावा किडीस आणि मर रोगास मध्यम प्रतिकारक असते. यात तेलाचे प्रमाण 32.9% असते. हे करडई सुधारित वाण कोरडवाहू शेतजमिनीत 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते, तसेच बागायती शेतजमिनीत प्रती हेक्टर 20 ते 22 क्विंटल उत्पादन मिळवून देते.

3) फुले गोल्ड (एस.एस.एफ. 15- 65

सन 2021 रोजी प्रसारित केलेली ही करडई सुधारित जात भारताच्या सर्वच भागात लागवड योग्य असून कोरडवाहू आणि बागायती लागवडीसाठी अत्यंत फायदेशीर आणि अधिक उत्पन्न मिळवून देणारे आहे. या जातीच्या पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवस इतका असतो. या करडई पिकाच्या सुधारित जातीचे वैशिष्टय म्हणजे यात तेलाचे प्रमाण 34.6% इतके असून इतर जातीच्या तुलनेत हे सर्वाधिक आहे. ही करडई सुधारित जात मर रोगास मध्यम प्रतिकारक असून याची उत्पादकता कोरडवाहू लागवडीसाठी 14 ते 16 क्विंटल असून बागायती क्षेत्रासाठी 30 ते 22 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळवून देण्यास ही करडई सुधारित जात सक्षम आहे.

एकरी 40 क्विंटल पर्यंत भरघोस उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या सुधारित जाती जाणून घ्या

4) फुले किरण (एस.एस.एफ. 16-02 )

ही करडई सुधारित जात देशातील विविध भागात कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य आहे. या करडईच्या सुधारित जातीच्या पिकाचा कालावधी 125 ते 130 दिवसांचा असतो. या सुधारित वाणाच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण 30.5% इतके असते. मावा किडीस मध्यम प्रतिकारक अशी ही जात आहे. या जातीची उत्पादन क्षमता कोरडवाहू लागवडीसाठी साठी 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर तसेच बागायती क्षेत्रासाठी 24 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर असते.

5) पी.बी.एन. एस. – 12

ही करडई सुधारित जात मराठवाडा विभागात लागवड करण्यास योग्य असून या जातीच्या पिकाचा कालावधी 130 ते 135 दिवसांचा असतो. मावा किडीस मध्यम प्रतिकारक असलेले हे करडई सुधारित वाण हेक्टरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन देण्यास सक्षम ठरते.

6) भीमा

ही करडई सुधारित जात 130 ते 135 दिवसांत लागवडीयोग्य होते. कोरडवाहू शेतजमिनीत 13 ते 15 क्विंटल उत्पादन देणारे हे वाण कोरडवाहू क्षेत्रात लागवड करण्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. कोल्हापूर, सातारा, सांगली,
पुणे, नाशिक, जळगाव, संभाजीनगर, बुलढाणा आणि जालना जिल्ह्यांत या सुधारित वाणाची लागवड करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

7) फुले – कुसुमा

ही करडई सुधारित जात पिकाच्या कालावधी बाबत विचार केल्यास सरासरी
135 ते 140 दिवसांत तयार होते. हेक्टरी सरासरी 14 ते 16 क्विंटल उत्पादन देणारी ही करडई सुधारित जात कोरडवाहू तसेच संरक्षित पाण्याखालील शेतजमिनीसाठी उपयुक्त ठरते.

8) एस.एस. एफ. 658

हेक्टरी 12 ते 13 क्विंटल उत्पादन देणारी ही करडई सुधारित जात 115 ते 120 दिवसांत पूर्णपणे काढणीसाठी तयार होते. या जातीचे दाणे पांढरे असतात. या सुधारित जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण 28 ते 29 टक्के असते.

9) एस.एस.एफ. 708

ही करडई सुधारित जात कोरडवाहू शेतजमिनीत 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते. हा जातीच्या पिकाचा कालावधी 115 ते 120 दिवसांचा असतो. तसेच बागायती शेतजमिन मधून प्रती हेक्टर 22 ते 24 क्विंटल उत्पादन आरामात मिळू शकते. या करडई सुधारित जातीचे बिगर काटेरी वाण भारतातील सर्वच क्षेत्रात लागवडीसाठी योग्य असते. मुख्यकरून पश्चिम महाराष्ट्र भागातील शेतजमिनीसाठी या सुधारित वाणाची शिफारस केल्या गेली आहे. या करडई सुधारित जातीची लागवड कोरडवाहू तसेच बागायती दोन्ही शेतजमिनीसाठी लाभदायक ठरते.

ज्वारीच्या या सुधारित जाती देतात कोरडवाहू शेतीत प्रचंड उत्पादन, मिळते अधिक उत्पन्न

10) फुले करडई 733

कोरडवाहू लागवडीसाठी अतिशय योग्य आणि अधिक उत्पन्न मिळवून देणारे हे वाण असून या वाणाचे पीक 120 ते 120 दिवसांत तयार होते. कोरडवाहू शेतजमिनीत ही करडई सुधारित जात हेक्टरी 13 ते 15 क्विंटल उत्पादन देणाऱ्या जातींपैकी एक आहे.

11) एस.एस.एफ. 748

या सुधारित जातीच्या पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवसांचा असतो. कोरडवाहू शेतजमिनीसाठी या जातीच्या लागवडीतून प्रती हेक्टर 15-17 क्विंटल उत्पादन मिळू शकते. तर बागायती क्षेत्रात सुमारे 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादनक्षम असे हे करडई सुधारित वाण आहे.

12) एस.एस.एफ 16-02

पांढऱ्या रंगाच्या बिया असलेले हे करडई सुधारित वाण कोरडवाहू शेतजमिनीत 15 ते 17 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते. तर बागायती शेतजमिनीत 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळवून देण्यास कार्यक्षम असते.

13) नारी 6

ही करडई सुधारित जात शेतात पेरली असता 130 ते 135 दिवसांत काढणी योग्य होते.
बिन काट्याची असलेली ही करडई सुधारित जात हेक्टरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन देते. या करडई सुधारित वाणाच्या दाण्यांचा रंग पांढरा असतो. या जातीच्या पिकाच्या पाकळ्या गोळा करण्यास योग्य असतात.

14) अकोला पिंक

विदर्भातील शेतजमिनीसाठी विशेष करून तयार केलेली ही करडई सुधारित जात हेक्टरी 130 ते 135 क्विंटल उत्पादन देते. या सुधारित जातीच्या वाणाची उत्पादन क्षमता प्रती हेक्टर 12 ते 15 क्विंटल एवढी असते. विदर्भात या जातीची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्या जाते.

15) गिरणा

ही करडई सुधारित जात जळगाव आणि धुळे जिल्ह्यासाठी अत्यंत फायदेशीर असून या भागात या सुधारित जातीच्या लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. सुमारे 130 ते 135 दिवसांत या जातीचे पीक तयार होते. तसेच उत्पादनाचा विचार करता प्रती हेक्टर 15 ते 17 क्विंटल उत्पादन मिळवून देणारे ही करडई सुधारित जात आहे.

बाजरीच्या या सुधारित आणि संकरित जाती ठरत आहेत कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान

16) शारदा

ही करडई सुधारित जात मराठवाड्यातील बागायती शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाची असून मराठवाडा भागात या सुधारित जातीच्या लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. सुमारे 122 ते 125 दिवसांत या जातीचे पीक काढणीयोग्य होते. या जातीची लागवड केल्यास प्रती हेक्टर 15 ते 17 क्विंटल उत्पादन होते. ही करडई सुधारित जात बागायती शेतजमिनीसाठी प्रभावशाली आहे.

17) जे. एल. एस. एफ. 414

ही करडई सुधारित जात कोरडवाहू शेतजमिनीसाठी उपयुक्त असून महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात या सुधारित जातीच्या वाणाची लागवड केल्या जाऊ शकते. 125 ते 140 दिवसांत या जातीचे पीक काढणी करण्यास तयार होते. तसेच उत्पादनाचा विचार करता प्रती हेक्टर 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळवून देणारे ही करडई सुधारित जात कोरडवाहू शेतजमिनीसाठी फायदेशीर आहे. या जातीचे दाणे भुरकट पांढरे असतात.

18) डी. एस. एच. 129

हे करडईचे संकरित वाण असून सुमारे 125 ते 130 दिवसांत या जातीचे पीक तयार होते. या वाणाच्या 100 दाण्यांचे वजन 6.1 ग्रॅम असते. तसेच उत्पादनाचा विचार करता प्रती हेक्टर 18 ते 20 क्विंटल उत्पादन मिळवून देणारे ही करडईची संकरित जात आहे. हा जातीच्या दाण्याचा रंग मळकट पांढरा असून यात तेलाचे प्रमाण 30 टक्के असते.

19) एम. के. एच. 11

हे सुद्धा करडईचे संकरित वाण असून सुमारे 125 ते 130 दिवसांत या जातीचे पीक तयार होते. या वाणाच्या 100 दाण्यांचे वजन 5.8 ग्रॅम असते. तसेच उत्पादनाचा विचार करता प्रती हेक्टर 18 ते 20 क्विंटल उत्पादन मिळवून देणारे ही करडईची संकरित जात आहे. हा जातीच्या दाण्याचा रंग पांढरा असतो. तसेच यात तेलाचे प्रमाण 30 टक्के असते.

20) पी. एच. 6 (एन. एच. 1)

हे करडईचे विनाकाटेरी संकरित वाण असून सुमारे 235 ते 140 दिवसांत या जातीचे पीक तयार होते. या वाणाच्या 100 दाण्यांचे वजन 6.14.3 ग्रॅम असते. तसेच उत्पादनाचा विचार करता प्रती हेक्टर 18 ते 20 क्विंटल उत्पादन मिळवून देणारे ही करडईची संकरित जात आहे. हा जातीच्या दाण्याचा रंग पांढरा असून यात तेलाचे प्रमाण 31 टक्के असते.

तुमच्या शेतात वाटाण्याच्या या सुधारित जाती पेरून 2 महीन्यात मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न

करडई पिकाच्या कमी उत्पादनाची काही महत्वाची कारणे

कोरडवाहू लागवडी खालील क्षेत्र, हलक्या जमिनीत लागवड, पिकाची फेरपालट न करणे, जमिनीची
पूर्वमशागत करतांना ओल तुटणे, उशिरा ते अति उशिरा पेरणी करणे, बियाणे ओळीत न पडणे, विरळणीकडे दुर्लक्ष, रासायनिक खतांच्या मात्रेत बदल न करणे, बीज प्रक्रिया न करणे, योग्यवेळी संरक्षित ओलीत न करणे व मावा किडींचे व्यवस्थापन नीट न करणे ही आहेत.

करडई पिकाचे उत्पादन वाढविण्याचा दृष्टीकोनातून काही महत्वाच्या बाबी

1) पिकाला पाणी देणे शक्य असल्यास पाण्याच्या एक ते दोन पाळ्या अवश्य द्याव्यात. यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते.

2) विविध रोगांना प्रतिबंध करण्यासाठी करडई सुधारित जात बियाण्यावर प्रती किलो साठी 3 ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया अवश्य करावी.

3) पूर्वमशागत करताना शेतजमिनीत 10 ते 12 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिळाल्यास खूपच उपयुक्त ठरते. त्यानंतर करडई सुधारित जात शेतात पेरून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाऊ शकते.

4) कोरडवाहू शेतीत करडई सुधारित जात शकतो वेळेवर पेरावी. पेरणीची योग्य वेळ सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा असते. यामुळे सुद्धा उत्पादनक्षमता भरपूर वाढते.

5) करडई पिकाचे खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण योग्य प्रकारे करावे. जेणेकरुन शेतजमीन आणि भौगोलिक परिस्थितीनुसार योग्य करडई सुधारित जात शेतात पेरून करून कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक प्रगती साधता येईल.

माहिती स्त्रोत: 1) महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी 2) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!