जवस सुधारित वाण 2024 ; शेतकरी मित्रांनो जवस हे एक तेलवर्गीय रब्बी हंगामातील पीक आहे हे आपल्या सर्वांना परिचित आहे. सध्या रब्बी लागवडीची लगबग सुरू असून राज्याच्या बऱ्याच भागात जवस लागवड करण्यासाठी घेण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. जवस हे एक अत्यंत महत्वाचे आणि फायदेशीर पीक आहे. तुम्हाला जर जवस लागवड करून भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर त्यासाठी जवस सुधारित वाण यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. या माहितीपूर्ण लेखात जवस पिकाच्या एकूण 10 सुधारित जातींची माहिती देण्यात आली आहे.
1) लातूर जवस 93
हे जवस सुधारित वाण कमी कालावधीत पक्व होते म्हणजेच फक्त या वाणाचे पीक 95 फक्त 95 दिवसांत काढणीस तयार होते. जल्हे जवस सुधारित वाण कमी लागवड अंतरासाठी, कोरडवाहू लागवडीसाठी तसेच मर, भुरी, अल्टरनेरीया इत्यादी रोगास तसेच गादमाशी
किडीला प्रतिकारक आहे. या जवसाच्या सुधारित जातीपासून प्रती हेक्टर 10 ते 16 क्विंटल
सरासरी उत्पादन मिळते. या जातीच्या जवस बियांमध्ये तेलाचे प्रमाण 40% असते.
2) एन. एल. 97
हे जवस सुधारित वाण भरघोस उत्पादन देणारे असून 115 ते 230 दिवसांत तयार पीक काढणीस
होते. या जवासाच्या सुधारित जातीपासून 6 ते 12 क्विंटलपर्यंत प्रती हेक्टर उत्पादन मिळते. हे जवस सुधारित वाण विविध रोग जसे मर, भुरी, अल्टरनेरिया या रोगांना तसेच गादमाशी किडीस प्रतिकारक आहे.
3) एन. एल. 142
हे जवस सुधारित वाण 118 ते 123 दिवसांत उत्पादन देण्यास कार्यक्षम ठरते. या सुधारीत जातीपासून प्रती हेक्टर 12 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते. या जातीच्या जवस बियामध्ये 42% तेलाचे प्रमाण आहे. कोरडवाहू तसेच बागायती अशा दोन्ही प्रकारच्या लागवडीसाठी हे वाण चांगले उत्पादन देणारे ठरू शकते.
4) एन.एल. 165
हे जवस सुधारित वाण 116 ते 121 दिवसांत पूर्णपणे काढणीस योग्य होत असून कोरडवाहू शेतीतील लागवडीसाठी या सुधारित जातीपासून 10 ते 15 क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन प्राप्त होऊ शकते. तसेच बागायती पिकाचे प्रती हेक्टर 16 ते 23 क्विंटल पर्यंत उत्पादन होऊन प्रचंड उत्पन्न कमावता येऊ शकते. या जातीच्या जवस मध्ये तेलाचे प्रमाण 41% आहे. कोरडवाहू शेतकरी या वाणाची लागवड करून भरघोस उत्पादन घेऊ शकतात. मात्र स्थानिक तज्ञांचे मार्गदर्शन यासाठी घ्यावे.
5) एन. एल. 260
हे जवस सुधारित वाण भरघोस उत्पादन मिळवून देण्याच्या क्षमतेचे आहे. जवसाच्या या जातीपासून किमान 15 क्विंटल ते 17 क्विंटल पर्यंत उत्पादन घेणे सहज शक्य आहे. जवसाच्या या जातीमध्ये तेलाचे प्रमाण 43% इतके असते. हे वाण अनेक रोगांना प्रतिकारक असून मर, भुरी, अल्टरनेरिया रोगांना आला घालण्यास सक्षम असून गादमाशी किडीस सुद्धा प्रतिकारक ठरते.
एकरी 40 क्विंटल पर्यंत देणाऱ्या गव्हाच्या सुधारित जाती
6) शारदा
जे शेतकरी बांधव कोरडवाहू शेतजमिनीत जवस लागवड करत आहेत त्यांच्यासाठी हे जवस सुधारित वाण खूपच फायदेशीर आणि अधिक उत्पन्न मिळवून देणारे ठरू शकते. या जवसाच्या सुधारित वाणाच्या पिकाचा कालावधी 100 ते 105 दिवसांचा असून या सुधारित जातीपासून कोरडवाहू शेतीत प्रती हेक्टर 8 ते 9 क्विंटलपर्यंत उत्पादन सहज मिळते. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण 41% असते. याशिवाय मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस हे जवस सुधारित वाण प्रतिकारक असते.
7) आर.एल. 102-71 (त्रिवेणी)
सन 1994 साली प्रसारित झालेले हे जवस सुधारित वाण धान्य आणि फायबर दोन्ही बाबतीत योग्य ठरते. या सुधारित जवस जातीच्या पिकाचा कालावधी 115 ते 120 दिवसांचा असून या जातीची उंची 70 से.मी. असते. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण 41% असते. उत्पादनाबाबत बोलायचे झाल्यास 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर एवढे भरघोस उत्पादन हे जवस सुधारित वाण मिळवून देऊ शकते. हे सुधारित वाण जवस लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असून ही जात क्षार सहनशील असते. तसेच करपा रोगास प्रतिकारक असते.
8) चंबळ
सन 1976 साली प्रसारित झालेल्या या सुधारित वाणाची पीक उत्पादन देण्यास तयार होण्याची कालावधी 120-125 दिवस असते. हे जवस सुधारित वाण उत्कृष्ट असून यात तेलाचे प्रमाण 45% असते. या वाणाच्या एक हजार दाण्यांचे सरासरी वजन 9 ते 10 ग्रॅम असते. तसेच या सुधारित वाणाची लागवड केल्यास प्रति हेक्टरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन आरामात मिळू शकते.
9) जवाहर 23
भरघोस उत्पादन देणारे हे जवस सुधारित वाण 115 ते 120 दिवसांत काढणीस योग्य होते. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण 41% असते. उत्पादनाबाबत बोलायचे झाल्यास 10 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर एवढे भरघोस उत्पादन हे जवस सुधारित वाण आरामात देते. हे सुधारित वाण जवस लागवडीसाठी उपयुक्त असून ही जात क्षार सहनशील असल्यामुळे थोड्या हलक्या आणि क्षारयुक्त जमिनीत सुद्धा लागवड करून अपेक्षित उत्पादन मिळवता येऊ शकते. मात्र जास्त क्षारयुक्त जमिनीत जवस लागवड करणे टाळावे. हे जवस सुधारित वाण करपा रोगास सुद्धा प्रतिकारक असते.
10) सुरभी
हे जवस सुधारित वाण धान्य आणि फायबर दोन्ही बाबतीत योग्य ठरते. या सुधारित जवस जातीच्या पिकाचा कालावधी 115 ते 120 दिवसांचा असून या जातीची उंची 70 से.मी. असते. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण 41% असते. उत्पादनाबाबत बोलायचे झाल्यास 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर एवढे भरघोस उत्पादन हे जवस सुधारित वाण मिळवून देऊ शकते. हे सुधारित वाण जवस लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असून ही जात क्षार सहनशील असते. करपा रोगास प्रतिकारक असे हे जवस सुधारित वाण भारतातील बऱ्याच राज्यांत लागवडीसाठी वापरल्या जाते.
वरील जवस सुधारित वाण आपण बघितले. याशिवाय जवसाच्या अनेक सुधारित जाती आहेत. उदा. जानकी, हिमालिनी, नगरकोल, गरिमा, शुभ्रा, नीलम इत्यादी जाती भारतातील अनेक राज्यांतील शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या लोकप्रिय आहेत. मात्र आपल्या राज्याचा विचार करता शेती तज्ज्ञ महाराष्ट्रातील शेतजमिनी मध्ये आर- 552, किरण, शितल इत्यादी या जवसाच्या सुधारित जातींची लागवड करण्याची शिफारस करतात. वरील सर्व जवस सुधारित वाणांची माहिती केवळ तुमचे ज्ञान वाढविण्याच्या दृष्टीकोनातून दिलेली असून लागवड करण्यापूर्वी तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच योग्य वाणाची निवड करावी.
वाटाण्याच्या या सुधारित जाती देतील फक्त 2 महिन्यांत लाखो रुपयांचे उत्पन्न
जवस पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी काही टिप्स
जवसाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी दर्जाची तसेच पाण्याचा निचरा होणारी शेतजमीन निवडा. मात्र काही भागात हलक्या जमिनीतही हे पीक घेता येऊ शकते.
खरीप हंगामातील पिकाची काढणी केल्यानंतर एक कुळवाची पाळी द्या.
जमिनीतील ओलावा उडून जाणार नाही याची काळजी घ्या. कारण बहुतेक भागात जवस हे कोरडवाहू पीक म्हणून घेतात.
जवस या पिकाची पेरणी रब्बी हंगामात ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात करा.
शेतकरी मित्रांनो पेरणी करण्यापूर्वी एक किलो बियाण्याला दीड ग्रॅम बावीस्टीन किंवा तिन ग्रॅम थायरम चोळा.
जवसाची पेरणी २२.५ सें.मी. किंवा २५ सें.मी. इतके दोन ओळीतील अंतर ठेवा. तसेच 2 ते 3 सेंमी. खोलीवर पेरणी करा.
जमिनीत ओलावा कमी असल्यास तर बीयाणे थोडे खोल 3 ते 4 सें.मी. खोलीवर पेरा.
पाभरीने पेरणीसाठी हेक्टरी ३० किलो बियाणे वापरा.
वर माहिती दिलेले जवस सुधारित वाण स्थानिक शेती तज्ञांच्या मार्गदर्शन खाली योग्य वाण निवड करा.
जवस खताला उत्तम प्रतिसाद देत असल्यामुळे पिकाला 40 : 20 : 20 किलो नत्र, स्फुरद आणि पालाश द्या. पैकी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणी करतेवेळी द्या आणि उर्वरित अर्धे नत्र पेरणी झाल्यानंतर एका महिन्याने द्या.
जवस हे मुख्यत: कोरडवाहू पीक म्हणून लागवड केले जाणारे पीक असले तरीही अधिक उत्पादन घेता यावे या हेतूने पाण्याची व्यवस्था करणे शक्य झाल्यास पीक उगवल्यानंतर 35 दिवसांनी तसेच त्यानंतर दाणे भरण्याच्या काळात 60 ते 70 दिवसांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाला पाणी द्या.
लागवड करताना प्रत्येक बाबतीत तज्ञांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो एवढे विसरू नका म्हणजे झालं.
जवस पिकाचे उत्पादन आणि महत्व
जवस हे आपल्या देशात फार पूर्वीपासून वापरण्यात येत असलेल्या तेलबिया असून याचा
उपयोग भारतात प्राचीन काळापासून केला जात असल्याचे पुरावे आपल्याला इतिहासात पाहायला मिळतात. जवसाचे तेल अत्यंत गुणकारी असून भारताशिवाय इतर देशांमध्ये सुद्धा जवस पिकाला फार महत्व असून मागणी सुद्धा प्रचंड आहे. उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे हे पीक आहे. जगाचा विचार केल्यास अमेरिका, रशिया, बेल्जियम या देशात जवस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केल्या जाते.
अमेरिकेत जवसाच्या काडीवर तंतू काढून त्याचे धागे बनविण्याचा उद्योग सर्वश्रुत आहे. अशाप्रकारे जवसाचा वापर करून बंविनलेले कापड लीनेन क्लॉथ म्हणून ओळखले जाते. आपल्या राज्यात मराठवाड्यात जवस लागवडीचे क्षेत्र सर्वात मोठे आहे. विदर्भात जवसाची लागवड रब्बी हंगामात केल्या जाते तसेच नाशिक, सोलापूर या भागात सुद्धा जवस एक प्रमुख रब्बी पीक म्हणून प्रचलित आहे. भारतातील इतर राज्यात उदा. कर्नाटक, पश्चिम बंगाल, उडीसा, छत्तीसगड या राज्यात सुद्धा जवस हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते.
जवस वनस्पतीचे शास्त्रीय नाव लीनम युसिटासिमम एल. असून लिनासि या प्रवर्गात ही वनस्पती मोडते. जवसाचे झाड हे झुडूप या प्रकारात येते. तसेच जवसाची पाने बिजांकुरण झाल्यानंतर बुडापासून अनेक फुटवे फुटतात. जवसाची पाने हिरवी, अतिशय बारीक, लांब गोल असतात. जवस वनस्पतीला जांभळ्या रंगाची फुले येऊन गोलसर टोकदार फळ लागते. याच फळात गर्द करड्या रंगाच्या चपट्या आकाराच्या बिया असतात. एका फळात सुमारे दहा पर्यंत बिया दिसून येतात.
जवस मधील पौष्टिक तत्वे जाणून घ्या
जवसमध्ये 20 टक्के प्रथिने 41 टक्के स्निग्ध पदार्थ 29 टक्के कर्बोदके असून यामधून 50 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. जवसात स्निग्धता मोठ्या प्रमाणात असूनसुद्धा जवसांमध्ये संतृप्त
सिन्धतेचे प्रमाण कमी आढळून येत असल्यामुळे ते आरोग्याला लाभदायक ठरते. जवस मध्ये
मेदाचे प्रमाण जास्त असते. मानवी आरोग्यासाठी महत्वाचे ओमेगा 3 आणि ओमेगा 6 असलेले अल्फा लीनोलेनिक ॲसिड आणि लीनोलिक ॲसिड अधिक असतात या गुणांमुळे
हृदयविकारासारख्या आजारांना नियंत्रित तसेच प्रतिकार करण्यासाठी खूप महत्वाचे असल्याचे निदर्शनास आले आहे.