1) फुले प्रगती जे. एल. 24
हे भुईमूग सुधारित वाण लागवडीस अत्यंत फायदेशीर असून या जातीच्या पिकाचा कालावधी 90 ते 95 दिवसांचा असतो. प्रति हेक्टर 18 ते 20 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित वाण आहे. ही एक उपटी जात असून या जातीची लागवड हमखास पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आणि फक्त खरीप हंगामासाठी करावी.
2) एस. बी. 11
हे भुईमूग सुधारित वाण लागवडीस अत्यंत फायदेशीर असून या जातीच्या पिकाचा कालावधी खरीप हंगामासाठी 105 ते 110 दिवसांचा असतो तसेच रब्बी हंगामासाठी 120 ते 125 दिवसांचा असतो. खरीप लागवडीसाठी प्रति हेक्टर 12 ते 14 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित वाण आहे. तर रब्बी हंगामासाठी प्रती हेक्टर 15 ते 18 क्विंटल उत्पादन या वाणाच्या लागवडीतून मिळते. ही सुद्धा भुईमुगाची एक उपटी जात असून या जातीची लागवड संपूर्ण महाराष्ट्रात केल्या जाऊ शकते. रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामासाठी या सुधारित जातीचा लागवडीसाठी उपयोग फायदेशीर आहे.
3) फुले उन्नती
हे भुईमूग सुधारित वाण लागवडीस अत्यंत फायदेशीर असून या जातीच्या पिकाचा कालावधी 90 ते 95 दिवसांचा असतो. प्रति हेक्टर 16 ते 18 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित वाण आहे. ही एक उपटी जात असून या जातीची लागवड हमखास पाऊस पडणाऱ्या प्रदेशात तसेच उन्हाळी आणि खरीप हंगामासाठी करावी. हे सुधारित वाण टिक्का, खोडकुज आणि तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे.
4 ) फुले व्यास (जे. एल. 220)
खरीप हंगामातील भरघोस उत्पादन मिळवून देण्यास सक्षम असे हे भुईमूग सुधारित वाण आहे. हे भुईमूग सुधारित वाण लागवडीस अत्यंत फायदेशीर असून या जातीच्या पिकाचा कालावधी 90 ते 95 दिवसांचा असतो. प्रति हेक्टर 20 ते 28 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित वाण आहे. ही एक उपटी जात असून या जातीची लागवड हमखास पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आणि फक्त खरीप हंगामासाठी करावी.
वाटाण्याच्या या सुधारित जातींची लागवड मिळवून देईल 2 महिन्यांत लाखोंचे उत्पादन
5) कोकण गौरव
हे भुईमूग सुधारित वाण लागवडीस अत्यंत फायदेशीर असून या जातीच्या पिकाचा कालावधी 105 ते 110 दिवसांचा असतो. प्रति हेक्टर 18 ते 20 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित वाण आहे. ही एक उपटी जात असून या जातीची लागवड रब्बी आणि खरीप हंगामासाठी केल्यास फायदेशीर ठरेल.
6) टी. पी. जी. 41
हे भुईमूग सुधारित वाण लागवडीस अत्यंत फायदेशीर असून या जातीच्या पिकाचा कालावधी 125 ते 130 दिवसांचा असतो. प्रति हेक्टर 25 ते 28 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित वाण आहे. या भुईमुगाच्या सुधारित जातीची लागवड रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी करावी. या जातीच्या वाळलेल्या शेंगांचे अधिक उत्पादन मिळते. यामध्ये तेलाचे प्रमाण 48 टक्के असते. अँप्लॉटॉक्सीन रोगास प्रतिकारक असे हे भुईमूग सुधारित वाण आहे. या जातीच्या शेंगात टपोरे दाणे पाहायला मिळतात तसेच 100 दाण्यांचे वजन सुमारे 70 ग्रॅम असते. उन्हाळी हंगामासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लागवड करण्याची शिफारस करण्यात येते.
7) फुले उनप (जे. एल.286)
हे भुईमूग सुधारित वाण पश्चिम महाराष्ट्रात लागवडीस अत्यंत फायदेशीर असून या जातीच्या पिकाचा कालावधी 90 ते 95 दिवसांचा असतो. प्रति हेक्टर 18 ते 24 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित वाण आहे. या सुधारित वाणाची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये तेलाचे प्रमाण 49% असते. मुळकुजव्या रोगास प्रतिकारक असे हे भुईमूग सुधारित वाण आहे. या जातीच्या शेंगात मध्यम टपोरे दाणे पाहायला मिळतात.
8) टी. जी. 26
हे भुईमूग सुधारित वाण लागवडीस अत्यंत फायदेशीर असून या जातीच्या पिकाचा कालावधी 95 ते 100 दिवसांचा असतो. प्रति हेक्टर 18 ते 20 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित वाण आहे. ही एक उपटी जात असून या जातीची लागवड संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात केल्या जाऊ शकते. तसेच फक्त खरीप हंगामासाठी लागवड करावी.
हेक्टरी 100 क्विंटल पर्यंत भरघोस उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या सुधारित जाती
9) आय. सी. जी. एस. 11
हे भुईमूग सुधारित वाण उन्हाळी हंगामात लागवडीस अत्यंत फायदेशीर असून या जातीच्या पिकाचा कालावधी 125 ते 130 दिवसांचा असतो. प्रति हेक्टर 26 ते 30 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित वाण आहे. ही एक उपटी जात असून या जातीची फक्त उन्हाळी हंगामासाठी करावी. यामध्ये तेलाचे प्रमाण 49 ते 55 % असते. मुळकुजव्या रोगास प्रतिकारक असे हे भुईमूग सुधारित वाण आहे. या जातीच्या शेंगात मध्यम टपोरे दाणे पाहायला मिळतात. उन्हाळी हंगामासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लागवड करण्याची शिफारस करण्यात येते.
10) टी. ए. जी. 24
हे भुईमूग सुधारित वाण विदर्भातील भागांत लागवडीस अत्यंत उपयुक्त असून या जातीच्या पिकाचा कालावधी 100 ते 105 दिवसांचा असतो. प्रति हेक्टर 12 ते 14 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित वाण आहे. ही एक भरघोस उत्पादन देणारी जात असून या जातीची लागवड रब्बी आणि खरीप हंगामात केल्यास अपेक्षीत उत्पादन घेता येईल. विदर्भासह राज्यातील इतर भागात सुद्धा या भुईमुगाच्या सुधारित जातीची लागवड केल्या जाऊ शकते.
11) कराड 4-11
हे भुईमूग सुधारित वाण कोरडवाहू लागवडीसाठी अत्यंत फायदेशीर असून या जातीच्या पिकाचा कालावधी 135 ते 140 दिवसांचा असतो. प्रति हेक्टर 20 ते 25 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित वाण आहे. या जातीच्या शेंगांत 58% तेलाचे प्रमाण दिसून येते. या वाणाच्या भुईमुगाचे दाणे चवदार असतात. ही एक पसरी जात असून या जातीची लागवड खरीप हंगामासाठी केल्यास फायदेशीर ठरेल. राज्य सरकारच्या वतीने 1939 साली ही जात पहिल्यांदा प्रसारित केल्या गेली होती.
12) कोयना (बी. 95)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून 1993 साली प्रसारित करण्यात आलेले हे भुईमूग सुधारित वाण लागवडीसाठी अत्यंत फायदेशीर असून या जातीच्या पिकाचा कालावधी 135 ते 140 दिवसांचा असतो. प्रति हेक्टर 30 ते 35 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित उन्हाळी हंगामासाठी असलेले भुईमूग सुधारित वाण आहे. या जातीच्या शेंगांत 48% तेलाचे प्रमाण दिसून येते.
या वाणाच्या भुईमुगाचे दाणे चवदार असतात. ही एक प्रचंड उत्पादन मिळवून देणारी जात असून या जातीची लागवड उन्हाळी हंगामासाठीच करावी. स्पोडोपटेरा, टिक्का, तांबेरा तसेच खोडकुज रोगास प्रतिकारक्षम असलेले हे वाण असून या वाणाच्या 100 दाण्यांचे 90 ते 92 ग्रॅम एवढे असते. या शेंगित मध्यम आकाराचे लाल रंगाचे दाणे आढळून येतात.
13) फुले 6021 (आर. एच. आर. जी. 6021)
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे भुईमूग सुधारित वाण तयार करण्यात आले असून हे वाण उन्हाळी लागवडीसाठी अत्यंत फायदेशीर असून या जातीच्या पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवसांचा असतो. प्रति हेक्टर 35 ते 40 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित वाण आहे. या जातीच्या शेंगांत 51% तेलाचे प्रमाण दिसून येते. या वाणाच्या भुईमुगाचे दाणे चवदार असतात. ही एक पसरी जात असून या जातीची लागवड उन्हाळी हंगामासाठी केल्यास उपयुक्त ठरते.
भुईमूग सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यावतीने 2011 साली ही जात पहिल्यांदा प्रसारित केल्या गेली होती. स्पोडोपटेरा, टिक्का, तांबेरा तसेच खोडकुज रोगास प्रतिकारक्षम असलेले हे वाण असून या वाणाच्या 100 दाण्यांचे 37 ते 40 ग्रॅम एवढे असते. या शेंगित मध्यम आकाराचे गुलाबी रंगाचे दाणे आढळून येतात. या सुधारित जातीच्या लागवडीचा योग्य कालावधी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा असतो.
या हरभरा सुधारीत जातींची लागवड करून मिळवा भरघोस उत्पादन
14) फुले भरती (जे. एल. 776)
हे भुईमूग सुधारित वाण तेलबिया संशोधन केंद्र जळगाव यांच्याकडून 2014 साली संशोधित केल्या गेले असून खरीप तसेच उन्हाळी हंगामात लागवडीस योग्य असते. मध्यम ते हलक्या जमिनीत हे वाण फायदेशीर ठरते. या भुईमुगाच्या सुधारित वाणाचे पीक 105 ते 110 दिवसांत काढणीस तयार होते. उत्पादनाचा विचार केला तर प्रती 30 ते 35 क्विंटल इतके भरघोस उत्पादन देणारे हे भुईमूग सुधारित वाण आहे.या वाणाच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते.
तसेच खरिप हंगामासाठी महाराष्ट्र राज्यासह मध्यप्रदेश राज्यात या वाणाची लागवड लाभदायक ठरते. तसे उन्हाळी हंगामासाठी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांत लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. खरीप लागवडीसाठी जून ते जुलै 15 ही पेरणीची योग्य वेळ असून उन्हाळी लागवड 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत करणे आवश्यक असते.
15 फुले मोरणा (के. डी. जी 123)
कृषी संशोधन केंद्र दिग्रज यांच्याकडून 2016 साली प्रसारित करण्यात आलेले हे भुईमूग सुधारित वाण लागवडीसाठी अत्यंत फायदेशीर असून या जातीच्या पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवसांचा असतो. प्रति हेक्टर 25 ते 30 क्विंटल उत्पादन देणारे हे सुधारित उन्हाळी हंगामासाठी असलेले सुधारित वाण आहे. या जातीच्या शेंगांत 46 ते 48% तेलाचे प्रमाण दिसून येते.
ही एक प्रचंड उत्पादन मिळवून देणारी उपट्या प्रकारातील जात असून या जातीची लागवड फक्त खरीप हंगामासाठीच करावी. स्पोडोपटेरा, टिक्का, तांबेरा तसेच खोडकुज रोगास प्रतिकारक्षम असलेले हे वाण असून या वाणाचे मध्यम टपोरे दाणे पहायला मिळतात. दक्षिण महाराष्ट्रातील भागांत लागवडीस उपयुक्त असे हे भुईमूग सुधारित वाण आहे. देशातील विवीध राज्यांत या वाणाची खरीप हंगामासाठी लागवड करण्यात येते.
भुईमुग पिकाविषयी साधारण माहिती
शेतकरी मित्रांनो भुईमूग हे तेलबिया पिकातील अत्यंत महत्वाचे पीक असून भुईमूगात तेलाचे 48 ते 50% इतके सरासरी प्रमाण असते. भुईमूगात झाडाच्या मूळापासून ते फांद्या पाने शेंगाचे टरफल दाणे या सर्वांचा उपयोग केला जात असल्यामुळे या भुईमूग लागवड एक फायदेशीर सौदा ठरू शकतो. भुईमूगाच्या शेंगदाण्यांपासून मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल उत्पादित होते.
त्यापासून मिळालेल्या पेंडीचा उपयोग गुरांसाठी खुराक म्हणून व सेंद्रिय खत म्हणून केला जातो. शेंगा तोडून राहिलेला वनस्पतीचा भाग जनावरांना चारा म्हणून उपयोगी पडतो. रोजच्या आहारात भुईमूगाचे दाणे कुटून भाजी आमटीत मोठ्या प्रमाणात वापरतात. भुईमूगाच्या दाण्यामध्ये 25.33% प्रथिनाचे प्रमाण आढळून येते.
भुईमुगाचे भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी काही टिप्स
भुईमूग सुधारित वाण लागवड करण्यासाठी मध्यम आणि चांगल्या निचऱ्याची मऊ भुसभुशीत वाळू मिश्रीत चुना व सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिन निवडा. भारी चिकण मातीच्या जमिनीत लागवड केल्यास अशा शेतजमिनी वाळल्यानंतर कडक होतात हे लक्षात असू द्या.
त्यामूळे काढणीच्या वेळी शेंगा जमिनीत राहून जातात.
भुईमूग हे उष्ण व समशितोष्ण हवामानातील पीक असल्यामूळे उष्णप्रदेशात हे पीक चांगले येते. त्यामुळे तुमच्या भागातील हवामान भुईमूग पिकास पोषक आहे की नाही हे पडताळून पहा. भुईमूगाला जास्त प्रमाणात थंडी किंवा जास्त पाऊस नुकसानकारक ठरतो. या पिकाला सर्वसाधारण 27 ते 30 अंश सेल्सिअस इतके तापमान पोषक ठरते.
पूर्वमशागत करताना जमिनीची खोल नांगरट करून जमीन भुसभुशीत करण्यासाठी 3 ते 4 उभ्या आडव्या कुळवाच्या पाळ्या द्या. शेवटची कुळवणी करत असताना प्रती हेक्टरी 10 टन शेणखत अथवा कंपोस्टखत जमिनीत मिसळा.
भुईमूग सुधारित वाण वापरून भुईमूगाची पेरणी खरीप आणि उन्हाळी हंगामात करा. खरीप हंगामात जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या पहिला आठवडा ही पेरणीची योग्य वेळ आहे. तर उन्हाळी भुईमूगाची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत करा म्हणजे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल.
शेतकरी मित्रांनो पेरणी करण्याआधी मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळा. याशिवाय रायझोबियम 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावा.
भुईमूगाच्या वाणांच्या प्रकारानुसार पेरणीसाठी बियाणे कमी जास्त प्रमाणात लागते. मित्रांनो उपट्या जाती प्रती हेक्टर 100 ते 120 किलो बियाणे वापरा. तसेच निमपसऱ्या जातीची लागवड करत असाल तर 80 ते 90 क्विंटल प्रति हेक्टर बियाणे पेरणी करण्यासाठी लागेल हे लक्षात घ्या. याशिवाय पसऱ्या जातीच्या वाणाची लागवड करत असाल तर प्रती हेक्टरी 70 ते 80 क्विंटल बियाणे लागते.
शेतकरी बांधवांनो, तुम्हाला भुईमुग पीक घ्यायचे असेल तर पेरणीचे योग्य अंतर माहीत असणे आवश्यक आहे. उपट्या जातीसाठी पेरणीचे अंतर 30 X 10 सेंमी इतके ठेवा. याशिवाय निमपसऱ्या जातीसाठी पेरणीचे अंतर 30 x 15 सेंमी ठेवा. तसेच पसऱ्या जातीसाठी पेरणीचे अंतर 45 x 15 सेंमी. इतके असणे आवश्यक असते. अशाप्रकारे योग्य अंतर ठेवून पेरणी करा.