राज्यातील अनेक क्षेत्रे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अवस्थेत आहेत. त्यात चंद्रपूर हा जिल्हा सुद्धा समाविष्ट आहे. या मात्र या जिल्ह्यातील एका गावातील शेतकऱ्यांनी नुकसानीच्या शेतीला रामराम ठोकून मिरचीची शेती करून लाखो रुपये कमाविण्यास सुरूवात केली आहे. राजुरा हे गाव वर्धा नदीच्या काठावर असल्यामुळे पुर क्षेत्र आहे. नदीच्या पुरामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांचे पीक वाहून जाते. या सर्व संकटांवर मात करून मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती, मात्र हे सर्व कसे शक्य झाले याबद्दल आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
चंद्रपूर जिल्ह्याविषयी थोडक्यात आढावा
चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असून या जिल्ह्यातील 67 टक्के लोक शेती आणि संबंधित व्यवसायावर अवलंबून आहेत. यापैकी सुमारे 70 टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. 35 टक्के भात या पिकाने तर 33 टक्के क्षेत्र हे कापूस या पिकाने व्यापलेलं आहे. चंदपूर जिल्ह्यातील 68 टक्के क्षेत्र या दोन पिकाने व्यापलं असलं तरी यामधून उत्पन्न अत्यंत कमी उत्पन्न मिळत असल्याचं शेतकरी सांगतात. याला सोशिओ इकॉनॉमिक रिव्ह्यू 2019 चा सुद्धा हातभार आहे.
या पार्श्वभूमीवर राजुरा येथील शेतकरी कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या मदतीने मिरची लागवडीकडे वळले आहेत. आणि मागील 4 ते 5 वर्षात मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती आणि त्यांनी आर्थिक उन्नती करण्यास सुरुवात केली आहे.
ही शेतकरी संघटना आली शेतकऱ्यांच्या मदतीला धावून
राजुरा या छोट्याशा गावात आधी लोक कापूस आणि सोयाबीन या पिकांची लागवड करायचे. मात्र यात दरवर्षी त्यांच्या हाती काहीच लागत नाही. यामुळे सर्व शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र आज चित्र वेगळे आहे. मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती. यासाठी कृषक स्वराज शेतकरी उत्पादक संस्था या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली. आणि त्यांच्या मार्गदर्शनात राजुरा येथील अनेक शेतकऱ्यांनी मिरची लागवड सुरू करून वर्षाला लाखो रुपयांचा नफा मिळविण्यास सुरुवात केली. इतकेच काय तर मागील 3..4 वर्षातच मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती. तर या गावातील काही शेतकऱ्याची कहाणी आपण जाणून घेऊया. यातून निश्चितच इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल आणि प्रेरणा मिळेल यात शंका नाही.
या शेतकऱ्यांनी मिरची शेतीतून घेतले लाखो रुपयांचे उत्पन्न
मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती. मात्र ही सुरुवात काही सोपी नव्हती.शेतकऱ्यांची जिद्द आणि मेहनत या दोन प्रमुख गोष्टींना सदर शेती संघटनेची साथ मिळाल्याने आज हे शक्य झाले. सुलभा बोरेकर ही राजुरा गावातील एक विधवा महिला आहे. या महिलेने सुद्धा मिरची लागवड करून एकरी तीन लाख रुपये नफा मिळविला आहे. त्या सांगतात की नांगर चालविण्यापासून ते शेतीतील इतर सर्व कामे त्या करतात.
त्यांनी सध्या एक एकर शेतात मिरची लावली आहे. त्यांना या एक एकर मिरची लागवड मधून चक्क 3 लाख रुपये निव्वळ नफा झाला. त्या आता त्यांच्या तीन अपत्यांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करायला सक्षम झाल्या आहेत. मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती ही गोष्ट तर प्रेरणादायी आहेच, मात्र एक महिला शेतकरी जेव्हा सर्व संकटांवर मात करून प्रगती साधते हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती. या लखपती शेतकऱ्यांपैकीच एक यशस्वी शेतकरी आहेत, ज्यांचे नाव आहे जगदीश वांढरे. या शेतकऱ्याने सांगितले की पारंपरिक कापूस आणि सोयाबीन या पिकांची लागवड करून त्यांना नेहमीच नुकसान व्हायचे. कधीकधी तर शेतीचा खर्च सुद्धा निघायचा नाही. मात्र मागील 5 वर्षांपासून ते मिरचीची शेती करत असून यात त्यांना इतका फायदा झाला की त्यांनी गावातच टुमदार अस घर 16 लाख रुपये खर्च करून बांधलं.
मिरचीला हमीभाव नसतो त्यामुळे बाजारभावात चढ उतार दिसून येतो. मात्र या शेतकऱ्याला मागील 2 वर्षापासून खूप चांगला भाव मिळत आहे. जगदीश वांढरे हे त्यांच्या 3 एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड करत आहेत. ज्यामध्ये त्यांना सरासरी 12 लाखाचे उत्पन्न मिळते. 4 लाख खर्च वगळता त्यांना 8 लाख रुपयांचा निव्वळ नफा होत आहे. या यशासाठी त्यांनी कृषक स्वराज शेतकरी उत्पादक संस्था यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले असे सांगितले.
सेंद्रिय शेती करुन बचत गटाच्या तब्बल दोन हजार महिला शेतकरी झाल्या मालामाल
मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती, तब्बल 500 एकरावर होते मिरचीची शेती
आज चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या गावातील असंख्य शेतकरी कापूस आणि सोयाबीन या पिकांना फाटा देऊन मिरचीची शेती करुन त्यांची आर्थिक स्थिती बळकट करताना दिसून येत आहेत. या गावातील आणखी एक मिरची लागवड शेतकरी बालाजी निखाडे यांनी सांगितले की आज त्यांच्या राजुरा या गावात सुमारे 400 ते 500 एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड केल्या जात आहे. गावातील जवळपास सर्वच प्रचंड उत्पन्न शेतकरी मिरचीची शेती करण्याकडे मोहित झाले आहे. पूरबुडी क्षेत्र म्हणून गणल्या जाणारे राजुरा गाव आता मिरची लागवड साठी प्रसिद्ध झाले आहे. या गावाची दखल बीबीसीने सुद्धा घेतली आहे. आणि एक रिपोर्ट तयार केला आहे. ज्याचा व्हिडिओ तुम्हाला या लेखाअखेर पाहायला मिळेल.
राजुरा गावातील मिरची आता थेट जाते विदेशात
कृषक स्वराज्य शेतकरी उत्पादक संस्था या शेतीविषयक संस्थेच्या मार्गदर्शन आणि मदतीने राजुरा या गावातील मिरची आता विदेशात सुद्धा निर्यात होत आहे. शेतकऱ्यांना आता मिरचीचा चांगला दर मिळताना दिसून येत आहे. आता राजुरा या गावातील शेतकऱ्यांचं पुढील महत्वाचं लक्ष्य म्हणजे युरोपियन स्टँडर्ड नुसार मिरची तयार करणे हे आहे. मागील 5 वर्षात मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती. आणि हे सर्व शक्य झाले ते येथील शेतकऱ्यांची बदल घडवून आणण्याची मानसिकता आणि कृषक स्वराज्य शेतकरी उत्पादक संस्था या संस्थेची मोलाची मदत आणि मार्गदर्शन. एरवी कर्जबाजारी असणारे राजुरा येथील शेतकरी आता थाटात जीवन जगत असून याचे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.
कृषक स्वराज्य संस्थेने केली ही मोलाची मदत
आज मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती. मात्र हे सर्व शक्य होण्यास कारणीभूत असलेल्या कृषक स्वराज्य शेतकरी उत्पादक संस्था या संस्थेची शेतकऱ्यांना मोलाची मदत झाली. या कृषी संस्थेने या शेतकऱ्यांचा दारात मिरचीसाठी बाजारपेठ उभी केली. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी केला. युरोपमध्ये येथील मिरची निर्यात होण्याचे ध्येय ठेवून त्या गुणवत्तेची मिरची पिकविण्याची सुरुवात केली. येथील शेतकऱ्यांना के वापर कमी करण्यास प्रवृत्त केले. शेतकऱ्यासाठी उत्तम दर्जाची कृषी निविष्ठा निर्माण केली.त्यांना मिरचीच्या रोपवाटिका पुरविल्या. दर आठवड्याला येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी सभा आयोजित केल्या. इतकेच काय तर मिरचीची कापणी झाल्यानंतर विविध योजना सुद्धा उपलब्ध करून दिल्या.
अजित पवार यांची शेती फार्महाऊस आणि प्रशस्त गोठा पाहून व्हाल चकित
उच्च दर्जाची मिरची जगभरात निर्यात करण्याचे उद्दिष्ट
कृषक स्वराज्य शेतकरी उत्पादक संघटनेचे कार्य राजुरा येथील शेतकरी बांधवांसाठी खूपच लाभदायक ठरले आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेली मिरची खरेदी करणे, त्यांना उच्च पॅकेजिंग ग्रेडिंग बद्दल ज्ञान दिले. या भागातील मिरचीची गुणवत्ता वाढवून ही मिरची जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे हे कृषक स्वराज्य शेतकरी उत्पादक संघटनेचे उद्दिष्ट आहे. अशाप्रकारच्या कृषी संघटना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आणि राज्यातील शेतकरी जर असाच सक्षम झाला तर खूप बरे होईल. यासाठी गरज आहे ती सरकारच्या सकारात्मक भूमिकेची आणि कृषी संघटनांच्या आणि शेतकऱ्यांच्या सकारात्मकतेची.
मिरची उत्पादनात भारताची कामगिरी
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात पिकांत विविधता दिसून येते. कापूस, मिरची यांसारख्या पिकांचे भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतल्या जाते.भारत हा लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेणारा जगातील प्रथम क्रमांकाचा देश आहे. स्पाईसेस बोर्ड ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार 2023-24 या वर्षात भारताने तब्बल 6 लाख टन पेक्षा जास्त मिरची आणि मिरची उत्पादनांची निर्यात केली आहे. राजुरा गाव सुद्धा याच उत्तम दर्जाची मिरची पिकवून जगभरात निर्यात करण्याच्या मार्गावर आहे. मिरचीची शेती करून या गावातील शेतकरी बनले लखपती. या गावातील शेतकऱ्याकडून प्रेरणा घेऊन राज्यातील इतर भागातील शेतकऱ्यांनी सुद्धा मिरची लागवड करण्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहण्याची गरज आहे.