ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी अशी घ्या, परभणी कृषी विद्यापीठाचा सल्ला

नवीन वर्षाचा पहिला महिना वातावरणात अनेक बदल घेऊन आला. अशा बदललेल्या हवामानाच्या परिस्थितीत बळीराजाच्या पिकाला नुकसान होण्याची शक्यता असते. तर हे नुकसान टाळण्यासाठी ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी कशी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांनी दक्षतापूर्वक उपाययोजना करण्याची गरज आहे. ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी कशी घ्यावी या बाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषी सल्ला आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

पावसाच्या शक्यातेबाबत हवामान खात्याचा अंदाज

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात आज दिनांक 16 आणि उद्या 17 जानेवारी रोजी आकाश काही प्रमातात ढगाळ राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत असणार नाही. येत्या दोन दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढत जाणार असून त्यानंतर तापमानात जास्त चढ उतार दिसून येणार नाही. ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष करू नका.

शेतकऱ्यांनी या वातावरणात घ्यावयाची पिकांची काळजी

ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी घेण्यासाठी काय करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समिती कडून पुढील प्रमाणे हवामान आधारीत ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी घेण्यासाठी विशेष सल्ल्याची शिफारस करण्यात आली आहे आहे. ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी कशी घ्यावी हे सविस्तर पाहूया.

ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी अशी घ्या, परभणी कृषी विद्यापीठाचा सल्ला

तूर

काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करून घ्या. आणि तुरीची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून घ्या.

गहू

ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी घेताना ज्या शेतकऱ्याने गव्हाची लागवड केली आहे अशा शेतकऱ्यांनी गहू पिकाला कांडी धरण्याच्या अवस्थेत म्हणजेच पेरणी झाल्यानंतर 40 ते 45 दिवसांनी आणि गव्हाचे पिक फुलावर असतांना म्हणजेच पेरणीनंतर 65 ते 70 दिवसांनी गव्हाला पाणी द्यावे.

ज्वारी

शेतकऱ्यांनो जर तुम्हाला तुमच्या रब्बी ज्वारी पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 20 लिटर पाण्यात मिसळावे आणि किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करा. मात्र फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल याची विशेष दक्षता घेऊन फवारणी करा. रब्बी ज्वारी पिकाला आवश्यकतेनुसार पाणी द्या.

सामान्य शेतकरी असा करू शकतात शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय चा प्रभावी वापर

कापूस

शेतकऱ्यांनी ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी घेण्यासाठी विशेष काळजी कशी घ्यावी याबद्दल आपण महत्वाची माहिती जाणून घेत आहोत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कापूस लागवड केलेली आहे त्यांनी कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नका. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करा आणि त्यांची योग्य विल्हेवाट लावा.

मका

ज्या शेतकऱ्यांनी मक्याची पेरणी वेळेवर केली असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या मका पिकाला गरजेनुसार पाणी द्या. जर तुम्हाला वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करा. तसेच मका पिकावर फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल याची दक्षता घ्या.

ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी कशी घ्यावी याबद्दल परभणी कृषी विद्यापीठाच्या तज्ञांचे विशेष मार्गदर्शन आपण जाणून घेतले. आता फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी अशी घ्या, परभणी कृषी विद्यापीठाचा सल्ला

आंबा

आंबा फळबाग लावलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या आंबा बागेला गरजेनुसार पाणी द्यावे. आंबा बाग सध्या फुलधारण अवस्थेत आहे त्यामुळे बागेत परागीकरण व्यवस्थित होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या किटकनाशकाची फवारणी करण्याची चूक टाळा. ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी घेणे खूप आवश्यक असते.

भाजीपाला

ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी घेण्याबरोबरच भाजीपाला पेरलेल्या शेतकऱ्यांनी जाणून घ्यायची बाब म्हणजे जर तुम्हाला तुमच्या वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर अशा प्रादुर्भावग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करून टाका. तसे h त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करून घ्या.

याशिवाय तुमच्या भाजीपाला पिकात खुरपणी करून घ्या म्हणजे भाजीपाला पिक तण विरहीत राहील. तसेच या भाजीपाल्याला गरजे अनुसार पाटाने पाणी द्या. महताचे म्हणजे काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्या म्हणजे पाऊस पडल्यास नुकसान होणार नाही.

ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी अशी घ्या, परभणी कृषी विद्यापीठाचा सल्ला

केळी

ज्या शेतकऱ्यांनी केळी लागवड केलेली आहे त्यांनी त्यांच्या केळीबागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सकाळी फळबागेला पाणी द्या. केळी बागेस 00:52:34 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा. जर तुम्हाला तुमच्या केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असेल, तर याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 10% ईसी 10 मिली किंवा मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन 5% डब्ल्यू जी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. याशिवाय केळी बागेत तण जास्त वाढू देऊ नका. आणि केळी पिकाच्या बोधांना माती लावा. ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी घेण्यासाठी उपाययोजना केल्यास उत्पादनात वाढ तर होतेच शिवाय पिकांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते.

शेतात एक खड्डा खोदून सरकारकडून मिळवा 4800 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात

द्राक्ष

सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे तापमानात घसरण दिसून येत आहे. अशा परिस्थितीत द्राक्षाच्या बागेला रात्री पाणी दिले तर फायद्याचे ठरते. द्राक्ष वेलींच्या खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करा. किमान तापमानात सध्याच्या वातावरणामुळे जी घट झाली आहे, त्यामुळे अशा कमी तापमानाच्या वातावरणात तुमच्या द्राक्ष बागेत पिंक बेरीची समस्या उद्भवू नये तसेच द्राक्षांच्या घडात उबदारपणा राहण्यासाठी द्राक्ष घड पेपरने किंवा पिशव्यांच्या साहाय्याने झाकून ठेवा.

फुलशेती

ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी घेऊन तुम्ही तुमचं पीक वाचवू शकता तसेच वेळेत योग्य उपाययोजना करून उत्पादनात वाढ करू शकता. आता ज्या शेतकऱ्यांच्या फुलांच्या बागा आहेत त्यांनी कशी काळजी घ्यावी हे जाणून घ्या. तर फुल पिकात खुरपणी करून करून ते तणविरहीत राहील याची काळजी घेतली पाहिजे. याशिवाय फुलाच्या बागेला पाटाने पाणी देणे सुद्धा महत्वाचे आहे. तसेच बागेतील जी फुले काढणीस तयार आहे अशा फुलांची काढणी करून घ्या. शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी कशी घ्यावी या महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण लेखातून दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून तुमचा अभिप्राय अवश्य कळवा.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!