विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांची शेतीची ओढ आणि शेतीप्रेम : विदर्भाची भाषा महाराष्ट्राच्या घराघरात चला हवा येऊद्या हा हास्य कार्यक्रमातून पोहोचविणारे आणि मराठी चित्रपट सृष्टीत आपला एक वेगळा ठसा उमटविणारे विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे आज संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. नुकताच इंस्टाग्राम अकाऊंटवर एक छोटा व्हिडिओ बनवून भारत गणेशपुरे यांची शेतीची ओढ आणि शेतीप्रेम महाराष्ट्राला दाखवून दिले. त्यांचा हा व्हिडिओ पाहून असंख्य चाहत्यांनी प्रसिद्धीच्या झोतात असूनही मातीशी इमान राखलेल्या या अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक केलं.
सध्या गावात राहून शेती करत आहेत भारत गणेशपुरे
चला हवा येऊ द्या हा हास्य कार्यक्रम बंद झाला तेव्हापासून भारत गणेशपुरे हे त्यांच्या विदर्भातील मूळ गावी आले आहेत. इथे ते सध्या स्वतः शेती करत आहेत. चित्रपट सृष्टीत असलेला झगमगाट सोडून काही दिवस आपल्या गावी राहून भारत गणेशपुरे यांची शेतीची ओढ आणि शेतीप्रेम किती अस्सल आहे याची प्रचिती येते. माणूस कितीही मोठा झाला तरी गावाची ओढ आणि शेतीची रम्यता त्याला भुरळ घालतेच.

मात्र बरेच लोक प्रसिद्ध झाल्यावर गावाकडे न जाता त्या झगमगाटात गढून जातात. मात्र आनंद शिंदे आणि परिवार, नाना पाटेकर आणि भारत गणेशपुरे यांची शेतीची ओढ आणि शेतीप्रेम जेव्हा जगाला दिसते तेव्हा नक्कीच त्यांचे कौतुक केल्याशिवाय चाहते राहू शकत नाही. असाच एक मनोरम्य असा शेतीतील काम करत असलेला व्हिडिओ टाकून भारत गणेशपुरे यांची शेतीची ओढ आणि शेतीप्रेम याची प्रचिती जगाला आली, यात तिळमात्र शंका नाही.
आजही गावी जाऊन शेती करतात सुप्रसिध्द गायक आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे आणि कुटुंब
गणेशपुरे यांनी शेतात पेरला आहे गहू
विनोदी अभिनेते म्हणून संपूर्ण राज्यात त्यांच्या भाषाशैलीने त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनात घर करून असलेले भारत गणेशपुरे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये भारत गावाकडे जाऊन शेती करताना दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या शेतात गहू या पिकाची शेती केली आहे. भारतने त्याच्या शेतात गहू पिकवला असून काम नसले की ते त्यांच्या गावी जाऊन शेती करताना दिसून येतात यातूनच भारत गणेशपुरे यांची शेतीची ओढ आणि शेतीप्रेम तुमच्या मनात त्यांच्याविषयी आत्मीयता नक्कीच निर्माण करेल असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या व्हिडीओमध्ये भारत यांची गव्हाची शेती आपलयाला पाहायला मिळते. त्यांनी बऱ्याच मोठ्या शेतजमिनिवर गहू पेरलेला दिसत आहे.

नाना पाटेकर यांचे शेतीविषयक योगदान आणि परखड भूमिका
स्वतः पिकवलेक्या धान्याची चव काही निराळीच…
भारत गणेशपुरे यांची शेतीची ओढ आणि शेतीप्रेम जाणून घ्यायचे झाल्यास ते या छोट्याशा व्हिडिओत काय म्हणतात याकडे लक्ष द्यायला हवे. गणेशपुरे यांनी व्हिडिओत म्हटले आहे की, स्वतःच्या हाताने स्वतःच्याच शेतात पिकविलेल्या धान्याची चव काही निराळीच..चाहत्यांना नमस्कार करून ते पुढे चाहत्यांना उद्देशून म्हणतात की, “तुम्ही मला नेहमी विचारता सारखा सारखा गावी का जातो?”, तर हे पाहा. हे सुख, समृद्धी पाहायला गावी यावं लागतं. आता शेतात गहू पेरला आहे. आता साधारण एका महिन्याने हा गहू घरच्या ताटात येऊ शकतो, गहू पूर्ण झाल्यावर मी एखादी झलक तुम्हाला नक्की दाखवेन.” या त्यांच्या बोलण्यातून आजही त्यांच्यात असलेल्या शेतकऱ्याची झलक मात्र दिसते. गणेशपुरे हे आज सुद्धा त्यांचे गाव आणि त्यांची शेती याबद्दल किती आत्मीयता ठेवतात या गोष्टीचं कुतूहल वाटण्यासारखं आहे.
कोण आहेत भारत गणेशपुरे?
भारत गणेशपुरे हे एक मराठी चित्रपट अभिनेते आहेत. त्यांनी फू बाई फू आणि चला हवा येऊ द्या यांसारख्या हास्य मालिकांमध्ये काम केले. वऱ्हाडी भाषेतील त्यांच्या अनेक विनोदी भूमिका फार गाजलेल्या आहेत. सागर कारंडे बरोबर फू बाई फूच्या आठव्या पर्वाचे विजेतेपद या जोडीने मिळवले आहे. चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रकारच्या विनोदी भूमिका साकारल्या आहेत आहेत. त्यांनी 50 पेक्षा जास्त सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत.
भारत गणेशपुरे यांचा खडतर प्रवास
भारत गणेशपुरे हे विदर्भातील अत्यंत साध्या कुटुंबातून आलेले आहेत. मुंबईतील मराठी चित्रपट सृष्टीविषयी काहीही माहिती नसताना ते मुंबईत आल्यानंतर त्यांनी खूप अडचणींचा सामना केला. त्यांचा स्ट्रगल. इतका खडतर होता की प्रारंभीच्या काही दिवसांत तर त्यांच्याकडे खाण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे. त्या दिवसांत कामाच्या शोधासाठी सुद्धा त्यांना खूप दिवस संघर्ष करावा लागला होता. मात्र वर्हाडी भाषेवर प्रभुत्व तसेच विनोदी भाषाशैली तसेच छाप पाडणारा विविधांगी अभिनय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मेहनत घेऊन हाती आलेले कोणतेही काम पूर्ण करायची जिद्द या गुणांच्या बळावर ते एक प्रभावी मराठी अभिनेते म्हणून नावारूपाला आले.