फक्त एका एकरात ड्रॅगन फ्रूट ची लागवड करून वर्षाला चक्क 8 लाख रुपये उत्पन्न

जेमतेम एक एकर शेती असलेला एक शेतकरी. पारंपरिक मका, सोयाबीन या पिकांचा लागवड खर्च जास्त, तुलनेत उत्पन्न अगदीच तटपुंजे. त्यावर विचार करून इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मनात बाळगून या शेतकऱ्याने आधी 10 गुंठे शेतीत ड्रॅगन फ्रूट ची लागवड करायचं निर्णय घेतला. मग हळूहळू संपूर्ण एका एकरात ड्रॅगन फ्रूट ची लागवड केली. ड्रॅगन फ्रूट ची बाजारात मागणी बघता या शेतकऱ्याने वर्षाला चक्क 8 लाख रुपये नफा फक्त एक एकर शेतीतून कमवला असून परिसरातील अन्य शेतकऱ्यांसाठी एक लाभदायी पायंडा या शेतकरी बांधवाने घालून दिला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

अहमदनगर मधील दहेगाव बोलका येथील शेतकरी

गोष्ट आहे ती अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या तालुक्याच्या ठिकाापासून जेमतेम 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या दहेगाव बोलका या गावातील शेतकरी बाबासाहेब लांडगे यांची. लांडगे यांनी आपल्याकडे असलेल्या शेतापैकी एक एकर शेतात यशस्वीरीत्या ड्रॅगन फ्रूट फुलविले. यासाठी त्यांनी ड्रॅगन फ्रूट लागवडीशी संबंधित आवश्यक ज्ञान आत्मसात केले. त्यासाठी ड्रॅगन फ्रूट ची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भेट दिली.

Dragon Fruit Farming 2024

या जातीच्या ड्रॅगन फ्रूट ची निवड

आपल्या शेतात ड्रॅगन फ्रूट ची लागवड करण्यासाठी त्यांनी कोलकाता येथूदन रेड रेड जातीच्या ड्रॅगन फ्रूट ची मदर प्लांट मधून रोपे मागवली. सुरुवातीच्या काळात त्यांनी फक्त 10 गुंठे शेतात सिमेंट पोल पद्धतीचा अवलंब करून 8 फूट बाय 10 फूट अंतरावर ड्रॅगन फ्रूट ची लागवड केली. त्यात त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. परिणामी त्यांनी एकरभर शेतात ड्रॅगन फ्रूट लागवड केली. या एक एकरावर पसरलेल्या ड्रॅगन फ्रूट शेतीत ते 4 ते 5 ट्रॉली शेणखत पिकाला देत असतात. याचबरोबर ते कंपोष्ट आणि सेंद्रिय खतांचा प्रमाणात वापर करतात. वर्षातून एकदा किंवा दोनदा या पिकावर ते बुरशीनाशक फवारतात.

10 ते 11 टन उत्पन्न फक्त एक एकर लागवडीतून साध्य

बाबासाहेब लांडगे यांच्या या एक एकर ड्रॅगन फ्रूट शेतात वर्षाला चक्क 10 ते 11 टन इतके भरघोस उत्पादन होते. बाजारात ड्रॅगन फ्रूट ची चांगलीच मागणी असल्यामुळे किंमत सुद्धा सरासरी दीडशे ते दोनशे रुपये मिळते. काही माल लोक थेट त्यांच्याकडे येऊन खरेदी करतात तर उर्वरित मालाची ते नाशिकला जाऊन विक्री करतात. यातून लांडगे यांना सरासरी 8 ते 10 लाखाचे उत्पन्न मिळते. यातून लागवड आणि इतर खर्च वगळता त्यांना सरारारी 7 ते 8 लाख रुपये वर्षाकाठी कमाई होते.

👉 हे सुध्दा वाचा

फक्त 20 गुंठे शेतजमीनवर करटोली लागवड करून हा शेतकरी कमावतो आठवड्याला 30 हजार रुपये

ड्रॅगन फ्रूट रोपांच्या विक्रीतून सुद्धा होते भरपूर कमाई

बाबासाहेब लांडगे हे वेळोवेळी आपल्या शेतातील रोपांची छाटणी करत असतात. त्या फांद्यांतील लगवडक्षम रोपांची ते प्रती रू 10 ते 15 रुपये दराने इतर शेतकऱ्यांना विक्री करतात आणि त्यातूनही त्यांना चांगला नफा प्राप्त होत असल्याचे लाडंगे यांचे म्हणणे आहे.

या फळांचे मानवी आरोग्य आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी अत्यंत लाभकारी उपयोग आहेत. त्याबद्दल थोडी माहिती घेऊया.

ड्रॅगन फ्रूट चे औषधी गुणधर्म

ड्रॅगन फ्रूट सेवन आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे. ड्रॅगन फ्रुट हे सर्वांसाठी उपयुक्त फळ आहे. आजारी असणारे आणि नसणाऱ्यांनीही हे फळ आवर्जून खावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आपला दिवस चांगला जाण्यासाठी हे फळ फायदेशीर ठरते. दोन रंगात उपलब्ध आहे. पण त्यातील आरोग्यदायी गुणधर्म अतिशय लाभकारक असल्यामुळे हे फळ खाल्ल्यामुळे पचन संस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती सुदृढ होते.

Dragon Fruits

या फळांमध्ये भरपूर रीच सोर्स ऑफ अँटिऑक्सिडेंट आहेत. तसेच ते पचण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. मात्र, एकदा कापलेलं ड्रॅगन फ्रुट जास्त काळ ठेवू नये लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न करावा. कारण या फळावर केमिकल रिएक्शन होण्याचा धोका अधिक असतो. फ्रुट हे दिवसातून फक्त तीनशे ग्रॅम एवढेच खाणे फायदेशीर ठरते.ते सुद्धा हे तीनशे ग्रॅम एकदाच नाही तर दोन दोन फोडी करून दिवसभरातून चार ते सहा वेळेस खाल्ल्या जाऊ शकते. उपाशी पोटी हे फळ न खाता नाश्ता झाल्यानंतरच ड्रॅगन फ्रुट खायला पाहिजे, जेणेकरून काहीही समस्या उद्भवणार नाही. व्हायरल आजार, डेंगू, मलेरिया, कावीळ आणि इतर सर्वच आजारांसाठी ड्रॅगन फ्रुट हे अत्यंत गुणकारी असते.

ज्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत अशा रुग्णांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर असते. या फ्रूट मध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप मदत होते. यामध्ये ए जीवनसत्व, सी जीवनसत्व आणि ई जीवनसत्व हे शरीरासाठी आवश्यक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. सगळ्यांनीच आपल्या आहारात ड्रॅगन फ्रूट चा योग्य प्रमाणात समावेश करण्यासाठी आरोग्यदायी ठरते.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment