नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पाचवा हफ्ता लवकरच

नविन अपडेट

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हफ्त्याचे वितरण करण्यासाठी 2254.96 कोटी रुपयांचा निधी मंजुर

राज्यातील शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत होते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पाचव्या हप्त्याच्या अनुदानासाठी 2254.96 कोटी रुपयांचा निधी वितरणास आज (30 सप्टेंबर 2024) च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली देण्यात आली आहे.

पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार वितरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 5 ऑक्टोबर रोजी वाशिम येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याचे अनुदान वितरण करण्यात येणार आहे. या माध्यमातून 9.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपये डीबीटीद्वारे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. नमो शेतकरी महा सन्मान योजना अंतर्गत पाचवा हफ्ता सुध्दा नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते वाटप केल्या जाऊ शकतो.

महायुती सरकार राज्यातील महिलांसाठी अनेक योजना यशस्वीपणे राबवत असताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान योजना मात्र बंद होते की काय अशी भीती अनेक शेतकऱ्यांच्या मनात होती. यासंदर्भात आलेल्या नवीन शासन निर्णय अनुसार नमो शेतकरी निधीच्या पुढील हफ्त्याची वाट पाहत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदची बातमी आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

नमो शेतकरी योजनेचा पाचवा हफ्ता लवकरच

राज्यातील असंख्य शेतकरी शेतीच्या कामांसाठी मदत होईल म्हणून नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाचवा हफ्ता कधी मिळेल याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सर्व शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपणार असून पाचवा हफ्ता वितरण साठी निधी मंजुर झाल्यामुळे योजनेतील निधी वाटपाच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हफ्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे.

काय आहे नमो शेतकरी महासन्मान योजना?

केंद्र सरकारच्या पीएम् किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक दृष्ट्या मदत व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकरी बांधवांना या योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.

राज्य सरकारने 2023-24 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत तीन हप्त्यांचे सहा हजार रुपये जमा केले आहेत. आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असून राज्य सरकारकडून नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी 2041 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्रता काय आहे?

फक्त महाराष्ट्रात कायमचा अधिवास असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे.

सदर शेतकऱ्याचे आधार कार्ड हे बँक खात्याशी जोडलेले असणे गरजेचे आहे.

सदर शेतकरी हा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

१) शेतकऱ्यांचे आधार कार्ड

२) शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र

३) सदर शेतकऱ्याचा रहिवासी दाखला

४) सदर शेतकऱ्याची मालकी सिद्ध करणारा शेतीचा सात बारा आणि आठ अ नमुना

५) पासपोर्ट साईजचा फोटो

६) आधार कार्ड सोबत संलग्न असलेला मोबाइल क्रमांक

नमो शेतकरी योजने साठी तुम्हाला रेजिस्ट्रेशन करण्याची आवशक्यता नाही महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सम्मान निधीचे अनुदान मिळत आहे त्या सर्व शेतकरऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, जर का तुम्ही पी एम किसान सम्मान निधी योजने साठी अर्ज केला नाही तर लवकरात लवकर करून घेऊन या दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कार्यान्वित केलेली ही योजना सर्व शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा मुख्य हेतू समोर ठेवून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामांसाठी लागणारे अर्थसहाय्य या योजनेच्या माध्यमातून देण्याचे करू महाराष्ट्र शासन करत आहे. सरकारद्वारे या योजनेचे एक स्वतंत्र नवीन पोर्टल सुद्धा उघडण्यात आले असून राज्य शासन शेतकरी बांधवांच्या हितासाठी कटिबद्ध आहे.

या योजनेसाठी सध्या किती शेतकरी पात्र आहेत?सदर योजनेमध्ये सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केलेले राज्यातील एकूण 4 लाख 89 हजार 271 शेतकरी लाभार्थी आहेत. नवीन शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसन सन्मान योजनेत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तांत्रिक अडचणींमुळे सुद्धा अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. अशा शेतकऱ्यांना सुद्धा सर्व तांत्रिक बाबी दूर करून योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक बाबी लक्षात घेऊन त्यावर कामाला लागावे म्हणजे जर आपल्याला अजूनही नमो शेतकरी महासन्मान निधीचा एकही हफ्ता मिळाला नसेल तर तो मिळेल आणि आपल्याला आर्थिक मदत होईल.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment