चिया लागवड देईल एकरी 6 लाखांपर्यंत प्रचंड उत्पादन, अशी करा लागवड

आजच्या या आधुनिक युगात कमी दिवसांत जास्तीत जास्त उत्पादन घेऊन भक्कम आर्थिक कमाई करण्याची प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते. तर आज आपण अशीच बक्कळ कमाई करून देणारी चिया लागवड बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. बरेच शेतकरी काहीतरी हटके करण्याचे धाडस करून पारंपरिक पिकांना फाटा देतात अन् प्रयोगशील शेती करून शेतीला एक यशस्वी व्यवसाय बनवून दाखवतात. मात्र बरेच शेतकरी बांधव असे करत नाहीत.

परिणामी आजच्या या चंचल वातावरणात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडून शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा होतो. मात्र बरेच शेतकरी अशा दरवर्षीच्या संकटांना सामोरे जाऊन पुन्हा नव्याने अधिक जोमाने कामाला लागतात. अशाच प्रयत्नशील शेतकऱ्यांसाठी चिया लागवड करून भरघोस कमाई कशी करून घेता येईल हे सांगणारा हा माहितीपूर्ण लेख आहे. या लेखात तुम्हाला चिया लागवड बद्दल इत्यंभूत माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. चला तर बघुया चिया ही प्रचंड मागणी असलेली फायदेशीर वनस्पती नेमकी आहे तरी काय याचे सविस्तर मार्गदर्शन.

चिया लागवड 2024 संपुर्ण माहिती, चिया बिया

चिया वनस्पती विषयी थोडक्यात माहिती

साल्व्हिया हिस्पॅनिका हे चिया वनस्पतीचे शास्त्रीय नाव असून प्रामुख्यानं फुलांचं रोप असते. चिया हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला या भागातील आहे. मात्र मागील काही वर्षांपासून चिया बियाण्याची लागवड आपल्या राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा तसेच पुणे विभाग यासह मध्य प्रदेशातील मंदसौर, नीमच आणि इतर काही भागात शेतकरी त्याची लागवड करत आहेत. हळूहळू या पिकाचा विस्तार संपूर्ण देशातील अनेक राज्यांत होत असून चिया लागवडीसाठी लागणारा कमी खर्च मात्र मिळणारे भरघोस उत्पन्न या सर्व बाबींमुळे चिया पीक घेऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त करता येऊ शकते.

चिया लागवडीचे 2 प्रकार

शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर चीया लागवड करून भरघोस उत्पादन प्राप्त करायचे आहे तर त्यासाठी चिया शेती कशी करतात याबद्दल सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो की, चिया लागवड दोन प्रकारे करतात. तसेच चिया बियाणे पेरणी पूर्णपणे सेंद्रिय तसेच सोईस्कर असते. चिया बियाणे पेरणी दोन प्रकारे करण्यात येते. पहिली पद्धत म्हणजे सुमारे एक ते दीड किलो बियाण्याची एक एकर शेतात फवारणी तंत्राद्वारे पेरणी करता येऊ शकते. आणि दुसरी पद्धत म्हणजे रोपं तयार करुन त्या रोपांची लागवड करून सुद्धा पेरणी करता येते. या पद्धतीसाठी सर्वात आधी रोपवाटिकेत बियाण्याद्वारे रोपे तयार करून घ्यावी लागतात.

त्यानंतर या रोपांची भातासारखी याची लावणी/ पेरणी केल्या जाते. या पेरणी पद्धतीमध्ये लावणी करण्यासाठी एका एकर शेतजमिनीसाठी सुमारे अर्धा किलो बियाणे लागते. विशेष म्हणजे फवारणीद्वारे पेरणीच्या पद्धतीमध्ये कमी मेहनत लागते तर बियाणे अधिक लागते. याउलट रोपे तयार करून लागण पद्धतीतचा वापर केल्यास जास्तीची मेहनत लागते. मात्र बियाणे कमी लागते. दोन्ही चिया लागवड पद्धती योग्य असून याचा उत्पादन क्षमतेवर काही जास्त परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे तुमच्या सोई अनुसार दोनपैकी कोणत्याही एका पेरणी पद्धतीचा अवलंब करू शकता.

लागवडीसाठी योग्य हवामान आणि शेतजमीन

शेतकरी मित्रांनो चिया बियाणे पिकाच्या लागवडीसाठी योग्य हवामान कोणते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मध्यम स्वरूपाचे तापमान चिया लागवड करण्यासाठी अतिशय पोषक मानल्या जाते. चिया शेती करण्यासाठी थंड हवामान आणि डोंगराळ भागातील शेतजमीन वगळता संपूर्ण देशात चिया पिकाचे उत्पादन घेता येऊ शकते. कृषी तज्ञांच्या मतानुसार चिया लागवड करण्यासाठी तपकिरी माती उत्तम असून अशाप्रकारच्या शेतीत भरघोस उत्पादन मिळते. पाण्याचा चांगला निचरा असलेली जमीन चिया बियाण्याच्या लागवडीसाठी अतिशय चांगली मानल्या जाते.

चिया लागवड पूर्वमशागत

शेतकरी मित्रांनो कुठ्ल्याही पिकाचे प्रचंड अपेक्षित उत्पादन घ्यायचे असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे शेताची चांगली मशागत करणे हा असतो. तुम्ही चिया लागवड करायचं ठरवलं असेल तर लागवड करण्यापूर्वी सर्वप्रथम दोन किंवा तीन वेळा नांगरणी करून माती बारीक घ्यावी लागेल. तसेच बियाण्याच्या चांगल्या उगवणीसाठी पेरणीपूर्वी शेताला चागंली घात असणं आवश्यक असते हे आणि जाणताच. परिणामी चीय शेती करण्यासाठी शेतीची पूर्वमशागत उत्तमरीत्या करणे हा भरघोस उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने केलेला प्रथम यशस्वी टप्पा आहे.

चिया शेतीचा रब्बी हंगाम

सध्या राज्यातील सर्वत्र सगळेच शेतकरी रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतीच्या कामांच्या लगबगीत आहेत. चिया हे सुद्धा रब्बी हंगामातील पीक असून चिया बियाण्यांच्या पेरणीसाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर ही पेरणीची कालावधी उत्तम समजली जाते. या कालावधीत म्हणजेच वेळेत पेरणी झाल्यास त्याचा उत्पादवाढीसाठी सकारात्मक परिणाम दिसून येतो हे मात्र नक्की.

चिया वनस्पती झाडे, चिया लागवड 2024

चिया शेती आंतर मशागत

चिया लागवड करून प्रचंड उत्पादन मिळविण्यासाठी लागवड केल्यानंतर खुरपणी सुद्धा आवश्यक असते. कमीत कमी दोन वेळा पिकातील तण काढणे गरजेचे असते. शेतकरी मित्रांनो एक बाब लक्षात घ्या ती म्हणजे चिया हे अत्यंत नाजुक स्वरूपाचे पीक असल्यामुळे तणनाशक अजीबात वापरू नका. असे केल्यास तणासोबतच पीक सुध्दा जळून जाते. चिया लागवड केल्यानंतर 21 ते 30 दिवसांनी खुरपणी करणे म्हणजेच पिकाच्या वाढीस जोमदार हातभार लावून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी योग्यप्रकारे मार्गक्रमण असते.

हेक्टरी 35 क्विंटलपर्यंत उत्पादन देणाऱ्या भुईमुगाच्या 15 सुधारित जाती

बीजप्रक्रिया अशी करा

शेतकरी मित्रांनो चिया बियाण्यास ओली बीजप्रक्रिया करणे टाळा कारण त्यामुळे बियाण्याच्या गाठी बनून उगवण व्यवस्थित होत नाही. चिया बियाण्यास बायोमिक्स कोरड्या पावडरची बीजप्रक्रिया करा. असे केल्यास मर रोगाचा धोका कमी होतो. बीजप्रक्रिया करून चिया बियाण्याची पेरणी केल्यास बी 5 ते 8 दिवसांत उगवते.

खत व्यवस्थापन कसे कराल?

चिया लागवड केल्यास इतर पिकांप्रमाणे खत व्यवस्थापन योग्य रित्या करणे सुद्धा अती आवश्यक असते. शेतजमीन तयार करतेवेळी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत मिसळा. पेरणी करत असताना गांडूळ खत, सेंद्रिय खत, डीएपी खत यापैकी कोणतेही एक खत प्रती एकर 50 किलो असे प्रमाण ठेवा. पेरणी नंतर साधारणपणे एक ते दीड महिन्याच्या कालावधीत जिवाणू स्लरी दिल्यास पिकाची वाढ वेगाने होते. तसेच दूसरी जिवाणू स्लरी 55 ते 60 दिवसांच्या कालावधीत दिल्यास उत्पादन वाढीत याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. याशिवाय पीकला फुले येण्याच्या अवस्थेत फुलविक ॲसिड/टाटा बहार फवारणी करा.

चिया लागवड पाणी व्यवस्थापन

पाणी देण्याची सोय असल्यास दर हफ्त्याला एकदा पाणी द्या म्हणजे जितके वाफसा देणारे पाणी अधिक असेल तितकेच पिकाची वाढ होण्यासाठी उत्तम असते. पाण्याची पूर्तता असल्यास पीक टवटवीत दिसते. एक गोष्ट लक्षात घ्या स्प्रिंकलर ने पाणी देत असाल तर माती वर उडून बसते. त्यामुळे बर बियाणे खाली दबून गेल्यास उगवण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे लागवड केल्यानंतर पाहिले 2 पाणी रेनपाईप ने द्या म्हणजे चांगली उगवण होण्याचा मार्ग मोकळा होईल.

पिकाला नसते राखण करायची गरज

शेतकरी मित्रांनो अनेकदा शेतातील पीक प्राणी धुडगूस घालून नष्ट करत असतात. परिणामी शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन उत्पादनात घट होत असल्यामुळे बऱ्याच पिकांचे जंगलातील प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना राखण करावी लागते. तसेच पिकाची काळजी घ्यावी लागते. मात्र चिया शेती बाबत ही झंझट नसते. चिया पिकाला प्राण्यांचा धोका असतो. कारण चिय वनस्पतीला एक विशेष वास असतो. हा वास दुरूनच येत असल्यामुळे प्राणी या पिकाला खात नाहीत किंवा नुकसान सुद्धा पोहचवत नाहीत. या वनस्पतीच्या पानांवर केससदृश्य घटक वाढत असल्यामुळे भीतीने जंगली प्राणी या चिया झाडापासून सुरक्षित अंतर ठेवतात. परिणामी या पिकाला हानी पोहोचत नाही. तद्वतच शेतकऱ्यांचे नुकसान सुद्धा होत नाही.

एकरी 40 क्विंटलपर्यंत उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या सुधारित जाती जाणून घ्या

चिया पिकाची काढणी आणि उत्पादन

चिया पिकाची कापणी आणि काढणी करते सर्वप्रथम हे पीक उपटून काढले जाते. यानंतर ते उन्हात 2 ते 3 दिवस वाळविल्या जाते. त्यानंतरची प्रक्रिया म्हणजे मळणीद्वारे झाडांपासून बिया वेगळ्या केल्या जातात. तुम्हाला ऐकून आनंद होईल की चिया लागवड केल्यास एक एकर शेतजमिनीत सरासरी 5 ते 6 क्विंटल एवढे उत्पादन मिळवणे सहज शक्य असते. या मालास उच्च मागणी असल्यामुळे प्रती क्विंटल मागे 20 ते 25 हजार रुपये आरामात मिळतात.

अशी होते शेतीमालाची विक्री

अजून एक महत्वाची बाब म्हणजे चिया बियाणे विकायला बाजारात जाण्याची गरज नसल्याचे अनेक शेतकरी सांगतात. चिया लागवड करत असतानाच जर शेतकऱ्यांनी ही माहिती संबंधित कंपन्यांना दिली तर त्या कंपन्यांचे एजंट स्वतः शेतात येऊन शेतातून शेतीमालाची म्हणजेच बियांची खरेदी करतात. वेगवेगळ्या कंपन्या चिया बियाणे वेगवेगळ्या दराने खरेदी करतात. त्यामुळे तुमचा वाहतूक खर्च वाचतो.

चिया लागवड करताना हे करा

चिया पेरणी रोप लागवड पद्धतीने केल्यास उत्पादन थोडे वाढते. त्यामुळे शक्य असल्यास रोप लागवड पद्धतीने पेरणी करा.

पेरणी पातळ स्वरूपात केल्यास फुटवे भरपूर फुटतात. पण जर पेरणी दाट झाल्याचे आढळल्यास पिकाची विरळणी करायला विसरु नका.

चिया लागवड करण्यासाठी प्रती एकर अंदाजे 1250 ग्रॅम बियाण्याची गरज पडते. पेरणी करताना त्यात गांडूळ खत मिसळल्यास उत्तम परिणाम मिळू शकतात.

चिया लागवड करताना जमिनीत ओलावा असावा परंतु वाफसा सुद्धा असणे अत्यंत आवश्यक असते. कमी जास्त पाणी झाल्यास उगवण व्यवस्थीत होत नाही ही बाब लक्षात घ्या. समजा उद्या पेरणी करायची असेल तर आजच शेती शक्य असल्यास sprinkler ने भिजवा. कारण जसजसा वाफसा भेटतो तसतशी उगवण होत जाते.

फक्त 2 महिन्यांत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या वाटाण्याच्या सुधारित जाती

ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करत असाल तर 26 ते 27 एचपी चे छोटे ट्रॅक्टर झीरो सेटिंगवर ठेऊनच पेरणी करा. पेरणी व्यवस्थीत पार की शेतकरी निश्चिंत होतो. कारण योग्य आणि वेळेवर पेरणी हा भरघोस उत्पन्नाचा एक मार्ग आहे हे विसरून चालणार नाही. योग्य व्यवस्थापन हा चिया पिकाच्या उत्पन्नासाठी खूपच महत्त्वाचा घटक आहे.

चिया बियांची मागणी आणि महत्व

5 फूट उंच वाढणाऱ्या चिया वनस्पतीला मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्व आहे. या बियांचे सेवन खूपच लाभदायक ठरते. चिया बियांचे दाणे काळे, पांढरे, राखाडी आणि तपकिरी अशा अनेक रंगांचे असतात. मात्र चिया बियांचा प्रकार आणि पौष्टिक मूल्य समान असते. काळ्या रागांच्या चिया बिया सहज उपलब्ध होणाऱ्या आणि जास्तीत जास्त वापर करण्यात येणाऱ्या बिया आहेत.

काळ्या चिया बियांमध्ये प्रथिनांचे प्रमाण थोडेसे अधिक असते तसेच पांढऱ्या चिया बियांमध्ये थोडे अधिक ओमेगा 3 घटक आढळून येतात. चिया बियांचे सेवन हृदय विकार दूर करण्यास लाभदायक असतात. त्याशिवाय पोटावरील चरबी कमी करण्यासाठी सुद्धा या औषधी गुणधर्म असलेल्या बियांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्या जातो. चिया बिया हे कॅल्शियमचे समृद्ध स्रोत असून या बीयांमध्ये दुधाच्या पदार्थांपेक्षा अधिक कॅल्शियम असते.

या बियांचे एकवेळ सेवन रोजचा 18% आहाराची गरज पूर्ण करू शकते. याशिवाय चिया बियांमध्ये इतर मॅक्रोन्यूट्रिएंट्स सुद्धा मुकबक प्रमाणात आढळतात. उदा. मॅग्नेशियम, जस्त आणि मॅंगनीज हे घटक हाडे तसेच दातांच्या सुदृढतेसाठी अतिशय उपयुक्त असतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे काम सुद्धा या बिया करू शकतात.

या सर्व कारणांमुळे संपूर्ण जगभरात सुपरफूड म्हणून चिया बियांचा बोलबाला आहे. या बियांची शेती केल्यास भक्कम उत्पादन मिळते. शिवाय या चिया शेतीसाठी खर्च सुद्धा नगण्य येतो. शिवाय पिकाला संरक्षणाची गरज नसते. या सर्व बाबी लक्षात घेता चिया लागवड करून शेतकरी बांधव भरपूर उत्पादन घेऊ शकतात. आणि नक्कीच एक वेळ नोकरी पेक्षा आपली शेतीच बरी ही विचारसरणी आगामी काळात तरुणांच्या मनात रुजवू शकतात हे नाकारता येणार नाही.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment