एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण 2024 : शेतकरी मित्रांनो फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. के.पी. मोते यांनी दिलेल्या माहतीनूसार राज्यातील इच्छुक शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पाद विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून या प्रशिक्षण अभियानात तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर त्यासाठी काय करावे लागेल याची इत्यंभूत माहिती तुम्हाला या लेखात मिळणार आहे.
काय आहे या योजनेचा उद्देश?
राज्यात अनेक शेतकरी फळबाग लागवड करण्यासाठी आशावादी आहेत. असंख्य शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात फळबाग लागवड करून भरघोस उत्पन्न सुद्धा कमावले आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान बाबत पाहिजे तसे ज्ञान नाही. परिणामी उत्पादनावर याचा अनिष्ट परिणाम दिसून येतो. हीच बाब लक्षात घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पादन वाढविण्याच्या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी तसेच, उत्पादनांचे काढणी केल्यानंतर करावयाचे व्यवस्थापन कसे असावे या सर्व बाबींचे ज्ञान देण्यासाठी तसेच त्यांचा शेतीमालाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना फलोत्पादन बाबत आधुनिक तंत्रज्ञान माहीत होऊन त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ व्हावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
किती दिवसांचे असेल हे प्रशिक्षण
शेतकरी बांधवांनो मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत 3 ते 5 दिवसांचे निवासी प्रशिक्षण असणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यास प्रत्येक दिवसाला एक हजार रूपये भत्ता देण्यात येणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2024-25 साठी मनुष्यबळ विकास घटकांतर्गत संस्थानिहाय शेतकरी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या अभियानासाठी 56 लाख रुपयांचा निधी सुद्धा शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.
कोणाला आणि कोठे मिळणार हे प्रशिक्षण?
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राज्यातील शेतकरी बांधव, क्षेत्रिय अधिकारी तसेच कर्मचारी यांना सदर प्रशिक्षण देण्यात येणार असून याशिवाय प्रात्यक्षिकांचे आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी तसेच इतर यशस्वी व प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून अशा यशस्वी शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देण्याचा कार्यक्रम सुद्धा असणार आहे. राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था, एन.आय.पी.एच.टी., तळेगाव दाभाडे या संस्थेमार्फत ठाणे, पुणे व कोल्हापूर व अमरावती विभाग येथे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक शेतकरी बांधवांनी अर्ज कसा करायचा याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
रब्बी हंगाम मोफत बियाणे अनुदान योजना 2024 व्दारे 100 टक्के अनुदानावर बियाणे वाटप
या केंद्रांवर मिळणार प्रशिक्षण
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था (NHRDF), नाशिकच्या आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, नागपूर येथील वरोरा, दापोली येथील हापूस आंबा गुणवत्ता केंद्र, पुणे येथील राहूरी डाळिंब गुणवत्ता केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील केशर आंबा गुणवत्ता केंद्र, नागपूर येथील संत्रा गुणवत्ता केंद्र या सर्व ठिकाणी प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणात सामाविष्ट असणारे विविध विषय
शेतकरी मित्रांनो तुमच्या मनात एक प्रश्न असेल तो म्हणजे नेमक्या कोणत्या विषयांवर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो की, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला रोपवाटीका यांची लागवड ते विक्री या सर्व बाबींबाबत मार्गदर्शन देण्यात येणार असून याशिवाय कृषी व्यापाराबाबत धोरण याबाबत माहिती.
तसेच निर्यात करण्या आवश्यक माहिती, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन कसे करावे? (आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी इत्यादी फळबागा), ड्रॅगन फ्रुट व जिरेंनियम यांसारख्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी नाविण्यपूर्ण पिकांचे उत्पादनाचे प्रगत तंत्रज्ञान, औषधी, सुगंधी व मसाला पिकांचे उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन, हरितगृह, पॉली हाऊस व्यवस्थापन, हॉर्टीकल्चर निर्यात प्रशिक्षण कोर्स, पिकांची काढणी केल्यानंतर त्याचे व्यवस्थापन (फळे व भाजीपाला), पीकनिहाय लागवड व प्रक्रिया (डाळींब, हळद आणि आद्रक) या विविध शेतीविषयक विषयावर प्रशिक्षण राज्यातील शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत पुरविण्यात येणार आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेण्यासाठी संपर्क कुठे साधावा?
राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार सदैव तत्पर असते. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत जे कल्याणकारी प्रशिक्षण राबविण्यात येणा र आहे. या प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सोयी पुरविण्यात येणार आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमात साहित्य, चहा नाश्ता, जेवण पुरविण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची राहण्याची सोय सुद्धा करण्यात येणार आहे. तरीही जास्तीत जास्त इच्छुक शेतकऱ्यांनी या प्रशिक्षण अभियानात सहभागी होऊन प्रगत शेतीसाठी आवश्यक असलेले ज्ञान प्राप्त करून आपली आधुनिक शेतीतून आर्थिक उन्नती साध्य करून घेऊ शकता.
पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या नवीन नियमावली नुसार हे शेतकरी ठरणार अपात्र
प्रशिक्षणासाठी या ठिकाणी साधा संपर्क
ज्या शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत प्रशिक्षण घ्यायचे असेल अशा इच्छुक शेतकऱ्यांनी प्रशिक्षणासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या संस्थांना कॉल करून किंवा अधिक माहिती घेण्यासाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करून सविस्तर माहिती जाणून घेता येईल.
विविध संस्थांचे भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे आहे. पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था, एनआयपीएचटी संस्था ( विश्वास जाणव, 0211- 4223980/9423085894), कृषी विज्ञान केंद्र, बारामती जि.पुणे (श्री. यशवंतराव जगदाळे, 0211- 2255227/9623384287), राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था (NHRDF), चितगाव फाटा, दारणा. ता. निफाड, जि. नाशिक, (डॉ. पी. के. गुप्ता – 9422497764), आनंदनिकेतन कृषी महाविद्यालय वरोरा, जि. चंद्रपूर (डॉ. अनिल भोगावे – 9579313179), हापूस आंबा गुणवत्ता केंद्र, दापोली (डॉ. महेश कुलकर्णी – 8275392315),
डाळिंब गुणवत्ता केंद्र, राहुरी (डॉ. सुभाष गायकवाड 9822316109), केशर आंबा गुणवत्ता केंद्र, छत्रपती संभाजीनगर (डॉ. जी. एम. वाघमारे – 7588537696), संत्रा गुणवत्ता केंद्र, नागपूर (डॉ. विनोद राऊत – 9970070946) या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपण आपले नाव प्रशिक्षणार्थी यादीत समाविष्ट कसे करून घेता येईल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतात. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत या प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त इच्छुक शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. के.पी. मोते यांनी केले आहे.