सरकार आज शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी अनेकानेक योजना तसेच अनुदान देत असते. याच अनुदानाचा फायदा घेऊन राज्यातील अनेक शेतकरी बांधव त्यांच्या शेतीला एका नव्या उंचीवर घेऊन जात आहेत. सरकारी अनुदानावर शेडनेट घेऊन अर्ध्या एकरात 3 महिन्यात 2 लाखांचा नफा मिळविण्याची किमया एका शेतकऱ्याने करून दाखवली आहे. या प्रगतशील शेतकऱ्याची यशकथा आजच्या या प्रेरणादायी लेखातून आपण जाणून घेणार आहोत. अर्ध्या एकरात 3 महिन्यात 2 लाखांचा नफा घेणे काही अशक्य गोष्ट नाही, मात्र त्यासाठी या शेतकऱ्याने नेमके काय पेरले आणि काय नियोजन केले हे आपल्याला माहीत असायला हवे. जेणेकरून आपण सुद्धा शेती व्यवसाय आपल्यासाठी हितावह करू शकू असा आत्मविश्वास ठेवून या शेतकऱ्याच्या यशोगाथेला सुरूवात करूया.
पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्याने केली कमाल
पुरंदर तालुक्यातील अर्ध्या एकरात 3 महिन्यात 2 लाखांचा नफा अपेक्षित असलेल्या ज्ञानदेव कोरडे नावाच्या शेतकऱ्याने राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या योजनेतून शेडनेट उभारले आणि हवामान नियंत्रित शेतीपद्धतीच्या पहिल्याच प्रयत्नात काकडीचे पीक घेणाऱ्या पुरंदर तालुक्यातील कोरडे कुटुंबियांना भरघोस उत्पन्न मिळत आहे. त्यांनी त्यांच्या फक्त अर्धा एकर शेतात शेडनेट लावून काकडीची लागवड केली अन् अवघ्या 3 महिन्यांत ते पैशांत खेळायला लागले. पुरंदर तालुक्यातील कोरडे परिवाराने अर्ध्या एकराच्या काकडी पिकाची लागवड केली असून त्यांना फक्त तीन महिन्यात जवळपास २ लाखांचा निव्वळ नफा होणार आहे. अर्ध्या एकरात 3 महिन्यात 2 लाखांचा नफा घेणारे काकडी हे पीक त्यांच्यासाठी निर्णायक अन् फायदेशीर ठरले आहे हे मात्र नक्की.
माजी सरपंच कोरडे यांनी शेतीत केले नवनवीन प्रयोग
शेतकरी मित्रांनो शेतीत काही फायदा नाही, शेती करायला परवडत नाही अशी कारणे आणि नकारात्मक विचार आपण अनेक शेतकऱ्यांकडून ऐकत असतो. मात्र पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका अन् या तालुक्यातील सिंगापुर हे एक छोटेसे गाव. याच गावातील माझी सरपंच असलेले ज्ञानदेव कोरडे यांनी त्यांच्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचे काही थांबवले नाही. ते मुळातच शोधक बुद्धीचे असल्याने ते शेतीत नवनवीन उपक्रम नेहमी सुरूच ठेवतात. यातूनच त्यांनी कृषी विभागाच्या अनुदानातून त्यांच्या अर्ध्या एकरात शेडनेट उभारून काकडीची लागवड केली.
कढीपत्ता शेती आणि व्यवसाय करून हा शेतकरी करतो वर्षाला कोटींची उलाढाल
पुरंदर हा मुळातच दुष्काळी तालुका म्हणून प्रचलित आहे. असे असूनही फक्त अर्ध्या एकरात 3 महिन्यात 2 लाखांचा नफा घेणाऱ्या कोरडे साहेबांनी एक गोष्ट मात्र सिद्ध केली की प्रबळ इच्छाशक्ती असल्यास अन् मेहनत करण्याची तयारी असल्यास शेती हा व्यवसाय कायापालट करू शकतो. या भागात पाण्याची कमतरता असल्यामुळे पूर्वीपासूनच या परिसरात कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्यात येते. सिंगापूर येथील माजी सरपंच ज्ञानदेव कोरडे यांना त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा कित्येक वर्षांपासून शेतीमध्ये मदत करत असतात. या मेहनतीच्या जोरावरच केवळ अर्ध्या एकरात 3 महिन्यात 2 लाखांचा नफा उपसरपंच कोरडे यांना अपेक्षित आहे. या कोरडे कुटुंबीयांचा शेतीबरोबरच फळझाडांच्या नर्सरीचा व्यवसाय सुद्धा आहे.
कृषी विभागाच्या योजनेमुळे मिळालं यश
कोरडे यांना मागील काही दिवसांत कृषी विभागाच्या एका योजनेतून शेडनेट मंजूर झाले आणि तीन महिन्यापूर्वीच त्यांच्या शेडनेटच्या उभारणीचे काम पूर्णत्वास गेले. शेडनेटमध्ये सुरूवातीला जास्त जोखमीचे पीक नको असा विचारपूर्वक निर्णय त्यांनी घेतला. मग सर्वात आधी कोणते पीक लावायचे याचा त्यांनी शोध घेतला. शेवटी त्यांनी काकडीचे पीक घेण्याचे ठरवले आणि अडीच महिन्यापूर्वी त्यांच्या अर्ध्या एकर शेडनेटमध्ये काकडी पिकाची लागवड केली आणि अर्ध्या एकरात 3 महिन्यात 2 लाखांचा नफा अगदी सहज मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
एमबीए शिकलेला हा युवक गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीतून कमावतो लाखो रुपये
सेल्फ पॉलिनेटेड काकडीची केली निवड
आता कमी खर्चात लागवड करण्यासाठी त्यांनी सेल्फ पॉलिनेटेड काकडीची लागवड केली. सेल्फ पॉलिनेटेड म्हणजे ज्या काकडीच्या वाणाला परागीभवनाची आवश्यकता भासत नाही. लागवड केल्यानंतर अवघ्या दीड महिन्यातच काकडीच्या हार्वेस्टिंगला सुरूवात झाली. वृत्त लिहीपर्यंत त्यांचा 15 टनापेक्षा जास्त माल बाजारात विकल्या गेला आहे. या काकडीला बाजारात 20 रूपयांपासून 50 रूपयापर्यंत दर मिळत असून त्यामुळे त्यांना अर्ध्या एकरात 3 महिन्यांत 2 लाखाचा नफा होणार हे उघड आहे.
काकडी पिकासाठी एकूण एक लाख येणार खर्च
कोरडे बंधूंनी फक्त अर्ध्या एकरात 3 महिन्यांत 2 लाखाचा नफा मिळणार असल्याचे गणित काढले आहे. मात्र यासाठी त्यांना सर्व मिळून एकूण 1 लाख खर्च येणार असल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. सेल्फ पॉलिनेटेड काकडीच्या एक बियाची किंमत 6 ते 7 रूपये त्यांना पडली. बियाण्याचा खर्च 25 हजार रूपये झाला. यासोबतच काकडी लागवड, शेणखते, रासायनिक खते, फवारण्या, वेल बांधणी, जाळी, ठिबक, मल्चिंग पेपर आणि मजुरी हे सर्व लक्षात घेता एकूण एका लाखांचा खर्च होणार आहे.
अर्ध्या अवघ्या 3 महिन्यांत 3 लाख उत्पन्नाची खात्री
अर्ध्या एकरात 3 महिन्यात 2 लाखांचा नफा कसा मिळेल हे जाणून घेऊया. माजी उपसरपंच कोरडे यांनी दोन हजार 500 काकडीच्या बियांची लागवड केली होती. त्यामध्ये प्रत्येक रोपाला सरासरी 10 किलो माल म्हणजेच एकूण 25 टन काकडीचे उत्पादन होण्याची अपेक्षा कोरडे साहेबांना आहे. बाजारात विक्रीसाठी नेताना या काकडीला 10 ते 15 रूपयांचा सरासरी दर मिळत असून एकूण उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा अधिकच होणार हे स्पष्ट आहे. यातून झालेले खर्च एक लाख रुपये वगळता कोरडे यांना दोन लाखांचा शुध्द नफा मिळणार आहे.
3 महिन्यात तब्बल 2 लाखाचा नफा ही शेतीची पॉवर
निसर्गाच्या लहरीपणामुळे आज शेतकरी अगदी मेटाकुटीस आला असल्याचे चित्र जरी सर्वदूर दिसत असले तरी अर्ध्या एकरात 3 महिन्यात 2 लाखांचा नफा घेणारे कोरडे सारखे बरेच शेतकरी प्रतिकुलता असून सुद्धा शेती फायदेशीर असल्याचे सिद्ध करून दाखवतात हेसुद्धा तितकेच खरे आहे. शेडनेटमधील पहिल्याच प्रयत्नात काकडी पिकाचा केलेला यशस्वी प्रयोग हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. पुढील 10 ते 15 दिवसांत कोरडे यांच्या शेतातील सर्व माल काढणी होऊन बाजारात विक्रीसाठी जाणार आहे. शेती मोकळी झाल्यावर ते दुसऱ्या पिकांची पिकाची लागवड करायला मोकळे असणार आहेत. दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांसाठी शेतीत नवनवीन प्रयोग करणे किती आवश्यक आहेत याची प्रचिती आणून देणारे हे दैदिप्यमान यश आहे.