आजकाल अनेक कुतूहल वाटणाऱ्या विचित्र गोष्टी पाहायला मिळत आहेत. शेती करणारा शेतकरी जरी नैसर्गिक संकटाना सामोरे जात शेती व्यवसाय करणे परवडत नाही असे म्हणताना दिसत असला तरी एक अशी व्यक्ती निदर्शनास आली आहे की जी व्यक्ती चक्क डोक्यावर गव्हाची शेती करत आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे ही व्यक्ती? आणि अशाप्रकारे डोक्यावर गव्हाची शेती करण्या मागील त्यांचा हेतू आहे तरी काय याबद्दल सविस्तर माहिती.
इथे आढळली डोक्यावर गव्हाची शेती करणारी ही व्यक्ती
उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराजमध्ये प्रदीर्घ काळानंतर म्हणजेच चक्क 12 वर्षांनंतर महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला देशातील कोट्यवधी लोक आपली उपस्थिती दर्शवित आहेत. येत्या 13 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या या मेळ्यात विविध आखाड्यांमधील संतांचे प्रयागराजमध्ये आगमन होत आहे. हा मेळ्याची विशेषता म्हणजे यावर्षीच्या महाकुंभात देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असलेल्या अनेक संत-महात्मांची विविध रूपे पाहायला मिळत आहेत. या विलक्षण कुंभमेळ्यात अनेक अद्भूत संत आपली उपस्थिती दर्शवित आहेत.
लठ्ठ पगाराची नोकरी सोडून एम बी ए युवक शेतीतून कमावतो लाखो रुपये, उत्पन्न ऐकून व्हाल चकित
डोक्यावर गव्हाची शेती करणारे संत अनाजवाले बाबा म्हणून प्रसिद्ध
तर मित्रांनो चक्क डोक्यावर गव्हाची शेती करणारे हे संत नेमके कोण आहेत याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल. तर हे अनाज बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले बाबा मूळचे यूपीच्या सोनभद्र जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचे खरे नाव अमरजीत आहे. या बाबांनी आपल्या डोक्यावर फक्त गहुच नव्हे तर बाजरी, हरभरा आणि वाटाणा इत्यादी धान्य पिकवले आहे. हे विलक्षण साधू बाबा हठ योगाचा सराव करण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. पर्यावरणप्रेमी असल्यामुळे पर्यावरण विषयी जागृती व्हावी आणि समाजात संदेश जावा यासाठी ते त्यांच्या डोक्यावरच विविध पिके उगवतात. अमरजीत हे खरे नाव असलेल्या या अनाज बाबांनी चक्क आपल्या डोक्यावर गव्हाची शेती करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.मात्र त्यांची डोक्यावर गव्हाची शेती कशी पहिल्यांदा नाही. मागील पाच वर्षांपासून ते डोक्यावर गव्हाची शेती करून जनजागृती करत असतात.
फक्त अर्धा एकर शेतात 3 महिन्यांत 2 लाख नफा, केली ही कमी खर्चिक लागवड
हा आहे अनाज बाबांच्या डोक्यावर गव्हाची लागवड करण्याचा उद्देश
अनाज बाबा यांनी डोक्यावर गव्हाची लागवड करण्याबाबत सांगितलं आहे की, मागील काही दशकांपासून जंगलतोड झपाट्याने वाढत असून त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. लोकांना अधिक झाडे लावण्यासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने त्यांनी चक्क डोक्यावर गव्हाची लागवड करून आपला संदेश सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात यश मिळवले आहे. हे अनाज बाबा दररोज त्यांच्या डोक्यावर गव्हाची शेती करण्यासाठी पिकाला पाणी देतात आणि त्यांना बघितले असता छान असे गव्हाचे हिरवेगार पीक दिसून येते. डोक्यावर गव्हाची शेती करणारे अनाज बाबा कुंभमेळ्यात ते आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत. हे अनाजवाले बाबा पर्यावरण संरक्षणाचा वासा हाती घेऊन अतिशय चांगले कार्य पूर्णत्वास नेत आहेत. सामान्य लोकांनी सुद्धा पर्यावरण विषयी जागरूक होऊन पर्यावरणाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.