आधुनिक शेतीचे महत्व आज एवढे वाढले आहे की नोकरदार माणसांना सुद्धा शेती आकर्षित करत आहे. आपण बऱ्याच वेळा चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती व्यवसायात यशस्वी झालेल्या लोकांची यशोगाथा वर्तमानपत्रातून पाहत असतो. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा जाणून घेऊया.
शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये आणि या तरुणाचे प्रती एकर उत्पन्न चार लाख रुपये इतके आहे हे ऐकून तुम्हाला कुतूहल वाटेल. कारण शेती हा व्यवसाय आजच्या काळात नुकसानकारक ठरत आहे असेच चित्र आपल्या अवती भोवती पाहायला मिळत असते. मात्र योग्य ज्ञान घेऊन योग्य पद्धतीने शेती केल्यास नोकरी पेक्षा सुद्धा शेती हा व्यवसाय फायदेशीर आहे याची प्रचिती आजच्या या तरुण शेतकरी बांधवांच्या शेतीतील प्रगतीतून दिसून येतो. चला तर जाणून घेऊया कशाप्रकारे शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये ही प्रेरणादयी यशकथा.
प्रती एकर चक्क 4 लाखाचे भरघोस उत्पन्न
शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावतो लाखो रुपये तर आपल्या मनात हा प्रश्न आलाच असेल की कोण आहे हा शेतकरी? मित्रांनो या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे योगेश रघुवंशी असं या तरुण शेतकऱ्याचे नाव असून मध्य प्रदेशमधील रहिवाशी आहेत. शेती करण्यासाठी एमबीए ची भक्कम पगाराची नोकरी सोडणारे योगेश रघुवंशी आज यशस्वी शेतकरी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये.
एमबीए आणि बँकिंग करिअर ज्यामध्ये बक्कळ पैसा असतो अशी लठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहण्याचे धाडस केले. या तरुण शेतकऱ्याने शाश्वत शेती आणि आधुनिक तंत्राद्वारे प्रती एकर 4 लाख रुपये नफा मिळवून त्यांच्या जिवनात आर्थिक भरभराट निर्माण केली. तसेच शेती क्षेत्रात आपला ठसा उमटवला. मध्य प्रदेशातील हा शेतकरी 50 एकर शेती तंत्राचा वापर करून नोकरी पेक्षा जास्त आर्थिक उत्पन्न मिळवत आहे ही निश्चितच उल्लेखनीय कामगिरी आहे.
योगेश यांनी अशी केली धाडसी सुरुवात
शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये मात्र या शेतकरी बांधवाने शेतीकडे वळण्याचे हे धाडस 2017 सालीच केले होते. 2012 मध्ये एमबीए पूर्ण केल्यानंतर सरकारी बँकेत नोकरी करत असलेले योगेश त्यांच्या कर्तबगारीमुळे आणि 2017 मध्ये व्यवस्थापक हे उच्च दर्जाचे पद त्यांना मिळाले. मात्र इतक्या मनाची आणि भक्कम पगाराची नोकरी असूनही योगेशला त्यांच्या कामात स्वारस्य वाटत नव्हते. त्यांची खरी आवड शेतीत आहे असे त्यांना प्रकर्षाने जाणवत होते. त्यांना गावाकडची माती खुणावत होती तसेच ग्रामीण लोकांच्या हितासाठी काहीतरी करायचे अशी मनात तळमळ होती.
भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी 2024 साठी सन्मानित कोण आहेत या महिला शेतकरी?
मग काय योगेश यांनी मनाशी ठाम निश्चय केला. आणि मोठे धाडस करून योगेशने कॉर्पोरेट जीवनाला रामराम ठोकला. त्यांच्या आजोबांनी शेतीतून सुरू केलेला वारसा बरेच दिवस स्थगित असल्याचे पाहून त्यांनी तो पुन्हा सुरू करण्याच ठरवलं. शेती करण्यामागे त्यांचा मूळ हेतू हा नैसर्गिक सानिध्य आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांचा गावातील स्थानिक ग्रामस्थांना रोजगार देऊन ग्रामीण जीवनाच्या विकासात खारीचा वाटा उचलण्याचा त्यांचा हेतू होता.
शेतीतील या अडथळ्यांवर केली यशस्वी मात
आज जरी आपण शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये अशा मथळ्याची ही यशोगाथा वाचत आहात तरी योगेश यांना प्रारंभीच्या काळात शेती करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. 2017 मध्ये शेतीची सुरुवात करताना योगेशने टोमॅटो या एकाच पिकाची लागवड केली. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक शेतीविषयक आव्हानांना तोंड द्यावे लागले. यात प्रामुख्याने नैसर्गिक चढउतार आणि चंचल हवामानामुळे पिकांचे नुकसान आणि बाजारातील चढउतार यामुळे त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण झाले. मात्र हार मानतील ते योगेशभाऊ कसले? तर या तरुणाने जिकरीने यातून मार्ग काढला. केलेल्या चुकांमधून धडा घेतला आणि शेतीत नवनवीन प्रयोग सुरू ठेवले.
अबब! 8 फूट खोल पाण्यात ज्वारीची शेती, मशागत खर्च शून्य, मिळते इतके उत्पन्न
जिद्द ठेवून कार्य पार पाडणाऱ्या लोकांना यश मिळतेच. मग योगेशरावांनी शिमला मिरची, मिरची यांसारख्या बागायती पिकांची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवायला सुरुवात केली. त्यांनी आंतरपीक पद्धतींचा वापर करून त्यांच्या पिकांमध्ये विविधता स्थापन केली. बाजारातील भावाचा अभ्यास करून त्यानुसार पिके घेतल्याने बाजारभावाची अनिश्चितता कमी होऊन त्यांच्या शेतमालास मागणी वाढली. आणि प्रत्येक वर्षी त्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि पद्धतींचा वापर करून लाखो रुपयांचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये” इतकेच नाही तर गावातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. आज ते त्यांच्या शेती व्यवसायात प्रचंड उत्पन्न मिळवत आहेत.
शेती व्यवसायाकडे वेगळ्या नजरेतून पाहण्याची गरज
योगेश भाऊंच्या “शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये” या यशोगाथे मधून आपल्याला शेतीचे महत्व नक्कीच उमजते. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यापेक्षा जास्त पैसा कमावणारा हा तरुण आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी जर योग्य ज्ञान प्राप्त करून धाडस करून आपण नावीन्यपूर्ण शेती करण्यासाठी आपण धाजवलो, तर शेतीत सोन पिकविल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे. आशा आहे तुम्हाला आजची “शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये” ही यशकथा आवडली असेल आणि यातून आपण नक्कीच प्रेरणा घ्याल.