“संजय गांधी निराधार योजना” लाभार्थ्यांना मिळणार एकूण तीन महिन्याचे एकत्रित पैसे

गरीब गरजू महिला पुरुषांसाठी एक मदतीचा हात म्हणून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा महत्वाकांक्षी योजनांकडे पहिल्या जाते. वृद्धांना, निराधार महिला पुरुषांना, विधवांना, अपंगांना त्यांचे भरणपोषण करण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्यावर खर्च करायला शासनाकडून मिळणारा हा निधी म्हणजे जणू त्यांच्यासाठी एक हक्काची साथ असते. अशा परिस्थितीत त्यांच्या रोजच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आवश्यक खर्चासाठी शासनाने या योजनांच्या माध्यमातून दिलेले हे पैसे प्रत्येक लाभार्थ्यासाठी जणू संजीवनीचे काम करतात.

संजय गांधी निराधार योजना पगार मिळणेबाबत नवीन शासन निर्णय

मागील 3 महिन्यापासून संजय “गांधी निराधार योजना” च्या लाभार्थी व्यक्तींना सदर मासिक सहाय्य प्रदान करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे या पैशांची सर्वच लाभार्थी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत होते. अशा सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. संजय गांधी निराधार योजना संबंधी ही बातमी ऐकून प्रत्येक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मितहास्य येणार आहे. बातमी आहे ती म्हणजे सदर योजनेचे गेल्या तीन महिन्यांपासूनचे रखडलेले हक्काचे पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने आज शासन निर्णय प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे.

एकूण इतका निधी योजनेअंतर्गत वितरीत करण्याचे निर्देश

सदर शासन निर्णयात म्हटले आहे की, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये ४१,८७,४८,७६०/- (रुपये एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लक्ष अठ्ठयेचाळीस हजार सातशे साठ फक्त) व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या
योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये १७,१७,२५,८४०/- (रुपये सतरा कोटी सतरा लक्ष
पंचवीस हजार आठशे चाळीस फक्त) इतकी अर्थसंकल्पिय तरतूद लेखानुदानाद्वारे (माहे
एप्रिल ते जुलै, २०२४ या कालावधवीसाठी) मंजूर करण्यात आली आहे.

दिनांक ०५ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयान्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये २७,२५,३४,४१०/- व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये १२,९६,५९,०४०/- इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरीत करण्यात आलेला आहे. आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये ८,९४,४८,९५०/- (रुपये आठ कोटी चौऱ्याण्णव लक्ष अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नास फक्त) व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये ४,३२,१९,६८०/- (रुपये चार कोटीबत्तीस लक्ष एकोणावीस हजार सहाशे ऐंशी फक्त) इतका निधी बिम्स प्रणालीवर वितरीत केला आहे.

👉 हे सुद्धा वाचा

वयोश्री योजनेतून वृद्धांना मिळणार 3 हजार रुपये, हे आहेत पात्रता निकष

मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना द्वारे मोफत तीर्थक्षेत्र यात्रा, या लोकांना मिळेल लाभ

कधी मिळणार तीन महिनंचे एकत्रीत पैसे?

सदरहू निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जून ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीकरीता या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे. सदर निधी हा सर्व आवश्यक प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर पंधरवड्यात आपल्या बँक खात्यात येणार असून यासंबंधी ०५ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या सदर शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच निगडित अधिकाऱ्यांना संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित असलेले जुन, जुलै, ऑगस्ट महिन्याचे अनुदान वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ लेकरे, अपंगत्व व्यक्ती प्रवर्गातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या दुर्दम्य व्याधींनी ग्रस्त असल्यामुळे स्वत:चा चरितार्थ चालविण्यास अपात्र ठरणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिला, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त अशा सर्व व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे हा महत्वाचा निकष आहे.

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

आवश्यक कागदपत्रे

1. विहीत नमुन्यातील अर्ज

2. वयाचा दाखला – शाळा सोडल्याचा किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील वयाचे प्रमाणपत्र

3. रहिवासी दाखला – तलाठी कडून दिलेले अधिवास प्रमाणपत्र

4. उत्पन्नाचे प्रमाणपत्र – तहसिलदार यांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला

5. अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त तृतीयपंथी यांचे बाबतीत जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र

6. विधवा – पतीच्या मृत्युचा दाखला – ग्रामसेवक/नगरपालिका.

7. घटस्फोटीत – कोर्टाचा आदेश/काझी यांनी तहसिलदार समोर घटस्फोटीत असले बाबत केलेले प्रतिज्ञपत्र

8. परित्यक्त्त्या, देवदासी – नगरपालिका कर निरीक्षक व तलाठी यांचे प्रमाणपत्र

9. स्वयं घोषणापत्र, शिधापत्रिका, मुलांसह फोटो.

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

सदर योजनेसाठी आपल्याला संबंधीत तहसील कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. त्यानंतर तुमचा अर्ज शासनाने निर्गमित केलेल्या तालुका स्तरावरील मंडळाकडे जाईल आणि त्यांच्या मासिक सभेत आपण अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या निकष वरून आपला अर्ज मंजूर किना नामंजूर करण्यात येईल.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment