वयोश्री योजना 2024 : वयाची पन्नाशी पार केली की मानवी जीवनाचा दुसरा टप्पा सुरू होऊन वार्धक्याकडे वाटचालीस प्रारंभ होतो. माणूस या वयात शारीरिक दृष्टया कमजोर होऊन विवीध व्याधींनी पिळल्या जातो. अशा या वयाच्या अत्यंत नाजूक उंबरठ्यावर बऱ्याच वृध्द नागरिकांना मदतीच्या हाताची गरज असते. परंतु आजकाल बऱ्याच वयोवृध्द लोकांची लेकरे परिस्थिती अभावी त्यांची काळजी घेण्यास अपात्र असतात. किंवा इतर कारणांमुळे सुद्धा वृद्ध मातापित्यांची काळजी घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. जे लोक साधन संपत्ती ने परिपूर्ण असतात त्यांचे आई वडील देखील अनाथाश्रमात पाहायला मिळतात.
अशा परिस्थितीत वृद्धांना त्यांच्या दैनंदिन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मदतीच्या एखाद्या हाताची तीव्र गरज असते. सर्व बाबी लक्षात घेऊन सरकारने ज्येष्ठ नागरिक व्यक्तींना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या गरजेची उपकरणे विकत घेता यावीत यासाठी नवीन योजना सुरू केली आहे. राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास मा. मंत्रिमडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात आली आहे.
वयोश्री योजनेची पार्श्वभूमी
सन २०११ च्या जनगणानेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे. त्यापैकी सद्यस्थितीत ६५ वर्षे व त्यावरील अंदाजे एकूण १०-१२ टक्के ज्येष्ठ नागरिक (१.२५- १.५० कोटी) आहेत. त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकाांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो. सदर बाब विचारात घेवून केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित ज्येष्ठ दिव्यांग, दुर्बलताग्रस्त, शारररीक अक्षमतेनुसार सहाय्य साधने/उपकरणे पुरविण्याची वयोश्री योजना सुरु केली आहे. त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि गतीशीलता, संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे, यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्याांचे मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
वयोश्री योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदीन जीवनात सामान्यपणे स्वाभिमानाने जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व , अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षण साठी एकवेळ एकरकमी रु. ३०००/- पात्र लाभार्थ्यांच्या बँके च्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणालीद्वारे लाभ प्रदान केला जातो.
नेमका लाभ किती मिळणार?
वयोश्री योजना अंतर्गत पात्र लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारच्या वतीने एकरकमी 3 हजार रुपये त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येतात.
👉 हे सुद्धा वाचा
सरकार वृद्धांसाठी करत आहे मोफत तीर्थ दर्शनाचा खर्च, सोबत घेऊन जाता येईल एक व्यक्ती
वयोश्री योजना अंतर्गत लाभासाठी पात्रता काय आहे?
लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असणे गरजेचे आहे.
लाभार्थी व्यक्तीचे ३१ मार्च २०२४ रोजी वयाचे ६५ वर्ष पूर्ण केलेले असावे.
लाभार्थी व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
लाभार्थी व्यक्तीने मागील 3 वर्षात कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत मोफत उपकरण घेतलेले नसावे.
या योजनेसाठी लाभार्थी म्हणून निवड झालेल्या व्यक्तींना त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर लाभ मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या अवधी मध्ये उपकरण खरेदी केलेले बिल संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील निवड यादीमध्ये कमीत कमी 30 टक्के आरक्षण महिलांना देण्यात आले आहे.
वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड.
राष्ट्रीयकृत बँक खात्याची पासबूक प्रत
पासपोर्ट साइज फोटो
स्वयंघोषणापत्र.
ओळख पटवण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही एखादे कागदपत्र आवश्यक ( उदा. रहिवाशी दाखला, राशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, चालक परवाना इत्यादी.)
मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत खालील साहित्य खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य मिळू शकेल.
डोळ्यांचा चष्मा
कमी ऐकू येत असल्यास श्रवण यंत्र
स्टिक व्हील चेअर
फोल्डिंग वॉकर
कमोड खुर्ची
नि( गुडघा दुखीसाठी) ब्रेस
लंबर बेल्ट
सारवाइकल कॉलर
ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया
राज्य सरकारने महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्याकडे वयो श्री योजनेसाठी अर्ज करता यावेत या उद्देशाने एक नवीन संकेतस्थळ तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. हे संकेतस्थळ तयार झाल्यानंतर संकेतस्थळावर नवीन अर्ज करता येणे शक्य आहे. पण सध्या तरी प्रत्येक जिल्ह्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे असे सांगण्यात आले आहे.(संकेतस्थळ निर्मिती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आमच्या वेबसाईट वर लेख टाकून कळविण्यात येईल). अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची समिति मार्फत छाननी होईल. छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल.
वयोश्री योजना संबंधी जागरूकता निर्माण करण्यात सरकारला यश आले असून या योजनेसाठी लाखो अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी सप्टेंबर २०२४ पर्यंत राज्यात एकूण ६ लाख २५ हजार १३९ अर्ज पात्र झाले आहेत.
राज्यात मुंबई विभागात ६३ हजार ९०, नाशिक विभागात १ लाख १२ हजार ७६१, पुणे विभागात ९१ हजार ६२५, अमरावती विभागात १ लाख ३२ हजार ७५८, नागपूर विभागात १ लाख १० हजार ४५५, छत्रपती संभाजीनगर विभागात ४२ हजार ९७६ लातूर विभागात ७१ हजार ४७४ अर्ज सदर योजने अंतर्गत पात्र ठरले आहेत.
खेड तालुक्यात वयोश्री योजना लाभासाठी सादर 10088 अर्ज सादर
भोर तालुक्यातून 20 सप्टेंबर 2024 पर्यंत एकूण 10088 अर्ज भोरच्या आरोग्य विभागाकडून जिल्हास्तरावर पाठविण्यात आले असल्याची माहिती भोरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदिपकुमार कापसिकर यांनी दिली आहे. भोरच्या आरोग्य विभागातंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत उपकेंद्रांमध्ये कार्यरत आशा सेविकांमार्फत वयोश्री योजनेचे ऑफलाईन अर्ज गटप्रवर्तक यांचेकडे सादर करण्यात आले.
गटप्रवर्तक कडून वैद्यकीय अधिकारी व तेथून तालुका वैद्यकीय अधिकारी अशाप्रकारे हे अर्ज जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर सर्व अर्ज जिल्हास्तरावर पाठविण्यात आले आहेत. वयोश्री योजना लाभासाठी भरलेल्या अर्जांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
आंबवडे – 1681, हिर्डोशी- 820, भोंगवली- 1091, जोगवडी-918, भुतोंडे- 293, नसरापूर- 2976, नेरे- 2254. भोर शहर- 55, एकूण अशाप्रकारे एकूण 10088 अर्ज सादर करण्यात आले आहेत.
जुन्नर तालुक्यात वयोश्री योजना अंतर्गत लाभासाठी 22 सप्टेंबर 2024 पर्यंत एकूण 7381 प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय दाखल झालेले अर्ज झालेले आहेत.
या अर्जांची गावनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
आळे….791
आपटाळे….267
बेल्हे…..1374
इंगळूण…..376
मढ…..758
वारूळवाडी…..350
निमगावसावा…..573
ओतूर…..160
पिंपळवंडी….595
राजूरी….529
सावरगाव…..461
शिरोली बुद्रूक…..823
येणेरे…..324
एकूण…7381
जळगाव जिल्ह्यात 761 वृद्ध व्यक्तींची लॉटरी पद्धतीने निवड
वयोश्री योजना संदर्भात जळगाव जिल्ह्यातील आकडेवारी हाती आली आहे. मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन यात्रेसाठी जळगाव जिल्ह्यातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केले होते. सादर केलेल्या अर्जांची छाननी करून एकूण 1 हजार 177 अर्ज पात्र ठरविण्यात आले होते. त्यातून लॉटरी सोडतीतून 761 जणांची अंतिम निवड करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी दिली.
तीर्थक्षेत्र दर्शना योजना लाभासाठी मोठया प्रमाणात अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे प्राप्त झाल्याने अंतिम लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी 22 सप्टेंबर रोजी लॉटरी पद्धतीने ड्रॉ काढण्यात आला. यावेळी लॉटरीसाठी जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना समन्वय सनियंत्रण समिती जळगाव यांच्यामार्फत जळगाव तहसिलदार शितल राजपूत व सामाजिक कार्यकर्ता प्रमोद बऱ्हाटे यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
जळगाव जिल्हयातून एकुण 1 हजार 177 अर्ज पात्र ठरले असल्यामुळे या पात्र अर्जामधून लॉटरी सोडतीव्दारे निरीक्षकांच्या उपस्थित कॅमेऱ्याच्या दृष्टिक्षेपात 761 लाभार्थ्याची निवड करण्यात आली. या निवड झालेल्या लाभार्थ्याचे जोडीदार (पती / पत्नी) असे 35 लाभार्थी व 12 सहायक असे एकुण 808 लाभार्थ्याची श्रीराम मंदिर, अयोध्या येथे जाण्यासाठी निवड करण्यात आली आहे. एकूण पात्र लाभार्थ्यांची निवड आणि प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय जळगाव, येथे प्रसिध्द करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 40220 लाभार्थ्यांना वयोश्री योजना अंतर्गत लाभ
मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना एक वेळ एक रकमी 3000 रुपयांच्या मर्यादित अनुदान देय आहे. राज्यात आतापर्यंत अखेर 17 लाख 23 हजार 30 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र 40 हजार 220 लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे प्रत्येकी 3 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. या योजनेचा गारगोटी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभारंभ केला.