योजनादूत (Yojna Doot) online apply प्रक्रिया, 2 ऑक्टोबर शेवटची तारीख

योजनादूत (Yojna Doot) online apply भरती प्रक्रिया 2024 लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करणारे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आता योजनादूत नोकरीच्या स्वरूपात लाडक्या भावांसाठी सुद्धा एक रोजगार विषयक बातमी देऊन एक अनमोल गिफ्ट दिले आहे. तब्बल 50 हजार बेरोजगार युवकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी शासनाकडून 300 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या जॉब चे नाव योजनादूत (Yojna Doot) असे आहे. चला तर जाणून घेऊयात या भरतीची संपूर्ण प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती.

योजनादूत (Yojna Doot) online apply

योजनेचे स्वरूप काय आहे?

राज्यात एकूण 50 हजार योजना दूत नियुक्त होणार असून त्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार असून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी या योजनादूत (Yojna Doot) नोकरीतून मिळणारा पगार नक्कीच त्यांच्या कामात येणार आहे.

दारोदारी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी या योजना दूत पदांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून 300 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, या नियुक्त्या सहा महिन्यांसाठी करण्यात येणार आहे. प्रत्येकाला 10 हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे.

योजनादूत (Yojna Doot) Online apply भरती योजनेचे उद्दिष्ट

महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार, प्रसार करणे तसेच त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता या दृष्टिकोनातून योजनांविषयी इत्यंभूत ज्ञान प्राप्त होण्यासाठी योजनदुतांची नेमणूक करण्यात येणार असून या महत्वाकांक्षी योजनेद्वारे राज्यातील 50 हजार शिक्षित तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे ध्येय आहे.

योजनादूत (Yojna Doot) online apply नोकरीच्या अंमलबजवणीबाबत शासन निर्णय

९ जुलै, २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ६ नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहचविण्यासाठी ५०,००० योजनादूत नेमण्यात येणार आहेत.

योजनादुत नोकरीत काय काम करावे लागेल?

राज्य सरकार राबवित असलेल्या अनेक कल्याणकारी योजनांचा जनमानसात प्रचार आणि प्रसार होऊन जास्तीत जास्त लोकांना शासकीय योजनांचे लाभ मिळावा यासाठी सर्वसामान्य लोकांत या योजनांची माहिती पोहचविण्याचे काम करावे या योजनादूत ((Yojna Doot) online apply नोकरीत करावे लागणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

किती असेल योजना दुत नोकरीचा पगार?

राज्य शासनाच्या महत्वाच्या निर्णयानुसार योजनादूत (Yojna Doot) online apply पदांची संपूर्ण महाराष्ट्रभर भरती प्रकिया सुरू करण्यात येणार असून नोकरी प्राप्त करणाऱ्या तरुणांना 10 हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे. आणि या योजनादूत असलेल्या तरुणांना फक्त शासनाच्या विविध योजनांविषयी जनजागृती करण्याचे काम असणार आहे.

किती असणार या योजनेचा कालावधी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती सरकार मतदारांना खुश करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दिसत आहे. पिंक ई रिक्षा, स्वाधार, मोलकरीण, बळीराजा मोफत वीज, वयोश्री, तीर्थ दर्शन योजना अशा शेकडो कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला कळावी यासाठी योजना दुत कामाला येणार आहेत. परंतु योजनादूत (Yojna Doot) online apply पदाचा कालावधी मात्र दीर्घ असणार नाही. फक्त 6 महिन्यांसाठी ही नोकरी मिळणार आहे.

काय आहे योजनादूत (Yojna Doot) online apply पदासाठी पात्रता?


१) या योजनादूत (Yojna Doot) नोकरीसाठी online apply करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी नागरिक असणे आवश्यक आहे.

२) अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावे.
३) सदर अर्जदाराने शासनाच्या इतर विभागात अशी सरकारी नोकरी केलेली नसावी.
४) अर्जदाराला शासनाच्या विवध योजनांची इत्यंभूत माहिती असावी.
४) अर्जदार घरोघरी फिरून योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यास तत्पर असावा.
५) अर्जदाराने कुठ्ल्याही शाखेमधून पदवी प्राप्त केलेली असावी.

महत्वाची टिप: योजनादूत (Yojna Doot) online apply अंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःची दुचाकी आणि अद्ययावत स्मार्टफोन असणे अनिवार्य आहे.

या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

योजना दूत (Yojna Doot) नोकरीसाठी आपल्याला online apply करायचा असेल तर खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे .

१) आधार कार्ड
२) तहसीलदारांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र
३)जन्माचा दाखला
४) शाळा सोडल्याचा दाखला
५) पदवीधर गुणपत्रिका
६) शपथपत्र ७)MSCIT किंवा CCC प्रमाणपत्र

योजनादूत online apply करण्यासाठी अधिकृत वेबसाईट

योजनादूत ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सरकारद्वारे मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या महत्वाकांक्षी उपक्रमात सहभागी होऊन नोकरी प्राप्त करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

योजनादूत (Yojna Doot) नोकरीसाठी अर्ज इच्छुक तरुण तरुणी आता ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात. त्यासाठी तुम्हाला
https://mahayojanadoot.org
या महाराष्ट्र शासनाकडुन उघडण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे असून त्यात आपली संपूर्ण माहिती तसेच आवश्यक कागदपत्र अपलोड करून अर्ज यशस्वीरीत्या सादर करायचा आहे.

योजनादूत (Yojna Doot) online apply करण्याची प्रक्रिया

online apply करण्यासाठी सदर वेबसाईट वर गेल्यानंतर तिथे तुम्हाला होम पेजवर registration पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमची माहिती टाकून नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण करायची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी म्हणजेच तुम्ही नोंदणी करतेवेळी दिलेला ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल. त्यानंतर सर्वात आधी Application PROCESS वर क्लिक करून तुम्ही योजनेबद्दल संपूर्ण माहिती असलेली फाईल pdf स्वरूपात download करून घ्या. आणि व्यवस्थित वाचून घ्या.

त्यानंतर candidate registration पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल. त्यावर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून तुमच्या मोबाइल क्रमांकावर आलेला OTP verify करावा लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर ऑनलाईन अर्ज उघडेल. त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक रित्या भरून घ्या. तसेच मागितलेली सर्व कागदपत्रे सुद्धा JPEG किंवा pdf स्वरूपात व्यवस्थित अपलोड करून घ्या. अर्ज पूर्ण भरून झाल्यावर तुमच्या नोंदणी करतेवेळी दिलेल्या मोबाइल क्रमांकावर एक OTP येईल तो OTP टाका. नंतर तुमचा योजनादूत (Yojna Doot) online apply यशस्वीरीत्या सबमिट झाल्याचा मेसेज तुम्हाला वेबसाईटवर एक पॉप अप द्वारे येईल. तसेच तुमच्या मोबाइल नंबर वर आणि दिलेल्या ईमेल आयडी वर सुद्धा हा संदेश प्राप्त होईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची हवे तेव्हा ऑनलाईन स्थिती सदर वेबसाईटवर जाऊन तपासू शकता.

योजनादूत (Yojna Doot) online apply last date करण्याची शेवटची तारीख

योजनादूत (Yojna Doot) online apply नोकरीसाठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकतात. मात्र या योजनेची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली असून इच्छुक तरुण तरुणी आधी 30 सप्टेंबर 2024 पर्यंतच दिलेल्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करू शकत होत्या. मात्र आता या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन – कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत (Yojna Doot) कार्यक्रम अंमलात आणल्या जाणार आहे. राज्यात कार्यरत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता योजनादूत यांची नेमणूक करण्यात येणार आहे.ग्रामीण भागात प्रत्येकी ग्रामपंचायती साठी 1 व शहरी भागात 5000 हजार लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात 49 हजार योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे.

योजनादूत (Yojna Doot) व्यक्तीचे कार्य तसेच कर्तव्य काय असेल?

प्रशिक्षित योजनादूत (Yojna Doot) त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी स्वतः जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे अनिवार्य असेल.योजनादुतांना प्रत्येक दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा आढावा नमुना अहवाल तयार करून ऑनलाईन अपलोड करावा लागेल.योजनादूत त्यांना सोपवलेल्या कामाचा स्वतःच्या आर्थिक लाभासाठी वापर करणार नाहीत तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे अनुचित वर्तन करणारे नसायला हवेत. कोणताही योजनादूत तसे वर्तन करत असल्याचे आढळल्यास त्याच्यासोबत केलेला करार संपुष्टात येईल तसेच त्याला पदावरून काढून टाकण्यात येईल.योजनादूत (Yojna Doot) विनाकारण हजर राहिला नाही किंवा त्याने त्याची जबाबदारी योग्यरित्या पार पडली नाही तर असा योजनादुत मानधन साठी अपात्र असेल.

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 865 अर्ज सादर

योजनादूत (Yojna Doot) online apply करण्याचे आवाहन विविध जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत असून सोलापूर जिल्ह्यात 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 865 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकूण १५७३ योजनदूत नेमले पदांची नेमणूक करण्यात येणार आहे. विविध जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपआपल्या क्षेत्रात सदर योजनेचे काम करण्यासाठी वर नमूद केलेल्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा.

चंद्रपूर जिल्ह्यात 1800 योजनादूत पदांची झाली अंतिम निवड

महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री योजनादूत’ या स्तुत्य उपक्रमासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून सुमारे 1800 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली असून निवड झालेल्या पात्र उमेदवारांना सरकारकडून मासिक १० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. अधिकाधिक पदवीधर असलेल्या इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करावी, योजनादूत (Yojna Doot) online apply ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

योजनादूत पदाची कार्यपद्धती

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्षमार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कार्यरत प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीसाठी योजनादूत यांची नेमणूक केली जाईल. ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत (Yojna Doot) या प्रमाणात राज्यात एकूण ५० हजार योजनादूत निवडल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री योजनादुत पदावर कार्यरत कर्मचाऱ्यास दर महिन्याला प्रत्येकी १० हजार रुपये एवढे मानधन देण्यात येणार आहे. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूत कर्मचाऱ्यांशी सहा महिन्यांचा लिखित करार केला जाणार आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment