ओवा सुधारित जाती पेरणीसाठी वापरून लागवड केल्यास फायदेशीर ठरतात आणि प्रचंड उत्पादन मिळवून देण्यास सक्षम असतात. ओवा पिकाचा खर्च त्यामानाने अत्यल्प असल्यामुळे आणि कोरडवाहू शेतीत सुद्धा हे पीक चांगल्या प्रमाणात येत असल्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील ओवा सुधारित जाती वापरून केलेल्या लसूण शेतीसाठी अत्यंत उपयुक्त लागवड ठरणार आहे. कारण यावर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे जमिनीत मस्तपैकी ओलावा टिकून राहणार असून कोरडवाहू ओवा लागवडीसाठी अत्यंत पोषक असे वातावरण यावर्षी आहे.
ओवा हे एक घरोघरी वापरल्या जाणारे मसाला पीक आहे. औषधी गुणधर्म असलेल्या या पिकास प्रचंड मागणी असते. परिणामी ओवा सुधारित जाती पेरून लसूण शेती केल्यास राज्यातील शेतकरी बांधवांना चांगले उत्पादन मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते. चला तर जाणून घेऊयात प्रचंड उत्पादन मिळवून देणाऱ्या कोणत्या आहेत या ओवा सुधारित जाती याची सविस्तर माहिती. याशिवाय आपण ओवा लागवडीसाठी पूर्वमशागत, पेरणी, खत आणि पाणी व्यवस्थापन, काढणी याबद्दल सुद्धा माहिती घेऊया.
1) लाम सिलेक्शन
ही ओवा सुधारित जाती निवड पद्धतीने आंध्र प्रदेश राज्यातून प्रसारित करण्यात आली असून या जातीच्या झाडाची सरासरी उंची 60 से.मी. एवढी असते. या जातीच्या पिकाचा कालावधी 135 ते 145 दिवसांचा असतो.
उत्पादनाचा विचार केला तर प्रती हेक्टरी 8 ते 9 क्विंटल एवढे उत्पादन या ओवा सुधारित जाती पासून मिळते.
2) आर.ए. 1-80
ही सुधारित जाती बिहार राज्यातून विकसित केल्या गेली असून या जातीच्या बियांचा आकार अतिशय लहान असतो. मात्र त्यांचा स्वाद अतिशय मधुर आहे. या जातीचे पीक 170 ते 180 दिवसात काढणीस तयार होत असून यापासून प्रती हेक्टर 10 ते 11 क्विंटल उत्पादन मिळू शकते. ही ओवा सुधारित जाती लागवडीस योग्य असून राज्यातील शेतकरी या जातीची लागवड करून भरघोस उत्पादन मिळवू शकतात.
3) ए. ए. 01-19
ही ओवा सुधारित जाती गुजरात राज्यातील जुनागड कृषी विद्यापीठ, यांच्याद्वारे विकसित करण्यात आली असून या जातीच्या पिकाचा कालावधी 150 दिवसांचा असतो . लवकर तयार होणारी जात ही ओवा सुधारित जाती आहे. या जातीच्या पिकापासून 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. याशिवाय विदर्भातील हवामानात भुरी रोगाच्या प्रादुर्भावापासून कमीत कमी नुकसान करणारी ही ओवा सुधारित जाती आहे. या जातीच्या बियाण्यामध्ये तेलाचे प्रमाण 3 ते 4 टक्के असते.
हवामान आणि जमीन
ओवा पिकाला थंड हवामान पोषक ठरते. शाखीय वाढ होण्यासाठी तापमान 15 ते 20 अंश सेल्सिअस एवढे असायला पाहिजे. तसेच आद्रता 60 ते 65 टक्के इतकी असली तर वाढ उत्तम प्रकारे होते. पिकाची कायिक वाढ होण्यासाठी 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान पोषक असते. ओवा लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू मिश्रित शेतजमीन उत्तम असते. खूप भारी किंवा खूपच हलक्या दर्जाच्या जमिनीत ओवा पिकाचे जास्त उत्पादन मिळत नाही ही बाब शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी.
पुर्व मशागत अशी करा
ही ओवा सुधारित जाती शेतात पेरण्या अगोदर शेतीची मशागत करणे गरजेचे असते. पूर्वमशागत करताना शेत उभे आडवे नांगरूण घ्या. यानंतर कुळवाने मातीची ढेकळे फोडून घ्या. कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन माती भुसभूशीत करून घ्या. याशिवाय शेतीतील सर्व तण, काडीकचरा व धसकटे वेचून घ्या. ज्या शेतकरी बांधवांना कोरडवाहू पध्दतीने पेरणी करायची आहे त्यांनी जुलै, ऑगस्ट पर्यंत शेतास जांभूळवाही करून ओलावा टिकून राहील याची काळजी घ्या किंवा आधी मुग पिकासारखे एखादे पीक घेवून नंतर जमीन तयार करा आणि रब्बी हंगामात ओवा पीक घेणारे शेतकरी बांधवांनी जमीन भुसभूशीत करून घ्या. नंतर वापसा परिस्थितीत अथवा कोरड्यात पेरणी उरकून घ्या.

ओवा सुधारित जाती पेरणीची योग्य वेळ
शेतकरी बांधवांनो आपल्या विदर्भातील हवामानात ओवा हे पीक ओलिताची व्यवस्था असणारे शेतकरी ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्याचे पहिल्या आठवड्यात पेरणी करतात. बियाण्याच्या मात्रेचा विचार केला तर एक हेक्टर शेतजमिनीसाठी सुमारे 4 ते 5 किलो बियाणे लागते. तुम्हाला जर कोरडवाहू पीक घ्यावयाचे असेल तर लागवडीची योग्य वेळ म्हणजेच जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवाडा या काळात लागवड करून घ्या. म्हणजे भरघोस उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने मोलाचे पाऊल उचलले असे म्हणता येईल.
मोहरीच्या या सुधारित जाती देतील प्रचंड उत्पादन, कोरडवाहू शेतीसाठी उत्तम
पेरणी कशी करावी, योग्य पद्धत
शेतकरी मित्रांनो पेरणी करताना दोन ओळीत 45 सें.मी. ते 60 सें.मी. अंतर ठेवणे आवश्यक असते.ओव्याचे बियाणे अडीच ते तीन सें.मी. पेक्षा जास्त खोलवर पडणार नाही याबाबत जागरूकता बाळगा. बागायती शेतीतील ओवा लागवडीसाठी सरी वरंबा पध्दतीचे (60 सें.मी. ते 75 सें.मी. अंतरावर) 3×2 मीटर लांब रूंदीचे वाफे तयार करा आणि त्यामध्ये 30 सें.मी. ते 40 सें.मी. अंतरावर वरंब्याच्या मधोमध टोकून पेरा. ओव्याचे बीयाणे आकाराने तसेच वजनाने हलके असते. त्यामुळे बियाण्याइतक्याच वजनाची बारीक रेती मिसळून बियाणे पेरा/टोका. बियाणे जमिनीपासून दोन ते साडेतीन सें.मी. खोलीवर पडेल याची खबरदारी घेणे सुद्धा आवश्यक आहे हे विसरू नका.
ओवा लागवड खत व्यवस्थापन
ओवा या पिक हे नैसर्गिकरीत्या पीक तणासारखे जमीनीतील पाणी, अन्नद्रव्ये व इतर बाबींकरीता स्पर्धा करून जीवनक्रम पूर्ण करते. त्यामुळे लागवड करताना 10 ते 15 टन कुजलेले सेंद्रिय खत प्रति हेक्टरी शेतीत मिसळा. यामुळे तुमचे पीक योग्यरीत्या वाढून उत्पादनात लक्षणीय वाढ होईल.
तण व्यवस्थापन असे करा
एकदा का तुमची ओवा पिकाची पेरणी करून झाली की पेरणीनंतर 3 दिवसांच्या आत पेंडामिथीलीन सव्वा किलो उपलब्ध घटक प्रति हेक्टरी फवारणी अवश्य करा. यामुळे पुढील 40 ते 50 दिवस होणारा तणांचा बंदोबस्त झालाच म्हणून समजा. या फवारणीमुळे तणाची वाढ कमी प्रमाणात होते. तसेच ओवा पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी दोन ते तीन निंदणी आणि एक डवरणी कराच. यामुळे उत्पादवाढीसाठी मोलाचा हातभार लागेल.
पेरणी करून एक महिना झाला की पहीली निंदणी खुरपणी करून घ्या. याशिवाय सपाट वाफ्यामध्ये एका ठिकाणी ओव्याची दोन किंवा तीनच झाडे ठेवून बाकीचे झाडांची विरळणी सुध्दा करायला विसरू नका. कारण विरळणी सुद्धा खूप महत्वाची आहे. साधारणपणे एक महिना अंतर ठेवून निंदणाच्या पाळ्या करत रहा. यामुळे तणांची स्पर्धा कमी होऊन तुम्हाला प्रचंड उत्पादन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
एकरी 6 लाख रुपयांपर्यंत भरघोस उत्पन्न देणाऱ्या या पिकाची लागवड अशी करा
ओवा पीक पाणी व्यवस्थापन
ओवा पिका काढणीस योग्य होईपर्यंत सामान्यतः 4 ते 5 पाण्याच्या पाळ्यांची आवश्यकता असते. मात्र तुम्ही जर कोरडवाहू शेतीत ओवा सुधारित जाती पेरून ओवा लागवड केली असेल तर जमीनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्याच्या संख्येत बदल करता येऊ शकत नाही ही बाब मान्य आहे. परंतु शक्य आल्यास पीक फुलोरा येण्याच्या अवस्थेत असताना म्हणजेच लागवड केल्यापासून
70 ते 85 दिवसापर्यंत एक पाण्याची किमान एक पाळी देणे शक्य असल्यास नक्कीच द्या. यामुळे उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल. पाण्याची व्यवस्था झाली तर सोन्याहून पिवळे असे झक्कास काम होईल.

ओवा पिकाची काढणी
वर दिलेल्या ओवा सुधारित जातीचे हे ओवा पीक सुमारे 160 ते 180 दिवसांत काढणीस पूर्णपणे तयार होते. झाडाच्या फुलांचा किंवा बोंड्यांचा रंग तपकिरी होण्यास सुरूवात होणे ही बिया तयार होण्याची महत्वाची खूण आहे.एकदा का बिया पक्व झाल्या की मग जमीनीपासून 15 ते 20 सें. मी. अंतर ठेवून झाडांची कापणी करा. आणि त्याच्या पेंढ्या बांधून घ्या. बिया पुर्णपणे सुकल्यानंतर लाकडी काठीने बदडून किंवा यंत्राने हे ओवा बियाणे वेगळे करून घ्या. आणि स्वच्छ करून पिशव्यांत भरून ठेवा.
ओवा लागवड प्रति हेक्टरी उत्पादन
शेतकरी मित्रांनो शास्त्रीय पध्दतीने ओव्याची शेतीकेल्यास बागायती शेतीतून हेक्टरी 10 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न मिळते. तसेच कोरडवाहू शेतीतून प्रती हेक्टरी 8 ते 10 क्विंटल उत्पन्न मिळू शकते.
कीड आणि रोग व्यवस्थापन
ओवा पिकावर मावा ही कीड ओव्याचे नाजुक व रसदार भाग उदा. पाने, फुले, कोवळी शेंडे यातील रस शोषून घेते. त्यामुळे ओवा झाडाची पाने पिवळी पडून वाळायला लागतात. तसेच बिया सुद्धा आकाराने लहान राहतात. मावा किडीचे नियंत्रण करण्यासाठी डायमेथोएट 30 इ.सी., 10 मि.ली., प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास मावा किडीला आळा घालता येऊ शकतो. याशिवाय ओवा झाडावर भुरी रोग रोग पडूनही नुकसानकारक ठरू शकते.
या भुरी रोगाचा पिकावर प्रादुर्भाव झाल्यास प्रारंभीच्या काळात पानाच्या वरच्या बाजूला पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ होण्यास सुरूवात होते. कालांतराने याचे रूपांतर पुर्ण झाड पांढरे होण्याच्या अवस्थेत होऊन झाडाची वाढ खुंटते आणि झाड पूर्णपणे वाळून जाते. या भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी गंधक पावडर 20 ते 25
किलो प्रति हेक्टरी धुरळून घ्या. किंवा औषध 0.05% तीव्रतेचे कॅरेथॉन फवारून घ्या.