ई श्रम कार्ड (e shram card) नोंदणी आणि केवायसी अशी करा

E shram card balance check 2024 : केंद्र सरकारने असंगाठीत तसेच घरेलु कामगार यांच्यासाठी ई श्रम कार्ड ( e shram card योजना सुरू केली आहे. ई श्रम कार्ड धारकांना भरण पोषण योजना अंतर्गत प्रती महिन्याला सरकारकडून पाचशे ते एक हजार रुपये महिना भत्ता म्हणून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. पण बऱ्याच ई श्रम कार्ड अंतर्गत नोंदणी केलेल्या असंगठीत तसेच घरेलु कामगार व्यक्तींना त्यांचे पैसे बँकेत जमा झाले की नाही हे कळत नाही. अशाच ई श्रम कार्ड (e shram card) धारकांना त्यांचे ई श्रम कार्ड अंतर्गत येणारे पैसे म्हणजेच ई श्रम कार्ड (e shram card balance check) 2024 मध्ये घरबसल्या तपासता येणार आहे. या प्रक्रियेची संपूर्ण माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत.

ई श्रम कार्ड (e shram card) balance check करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम केंद्र सरकारच्या खालील अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. सदर वेबसाईट उघडल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर तुमच्यापुढे तीन पर्याय येतील. त्या तीनपैकी पहिल्याच क्रमांकावर know your payments अस ऑप्शन दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव आणि अकाउंट नंबर टाकावा लागेल. अकाउंट नंबर एकूण 2 वेळा टाकावा लागेल. तसेच तिथे खाली दिलेला captcha अचूक रित्या भरून send OTP on registered Mobile या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्या खात्यात ई श्रम कार्ड (e shram card) अंतर्गत आतापर्यंत कित्ती रक्कम जमा झाली याचा संपूर्ण तपशील तुम्हाला दिसेल. तुम्हाला जर तुमचा तपशील दिसला नाही याचे 2 अर्थ होतात. पहिलं म्हणजे आता पर्यंत भरण पोषण योजना अंतर्गत तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले नाहीत. आणि दुसरे म्हणजे तुम्ही दिलेला बँक तपशील हा तुमच्या आधार सोबत सीडेड केलेला नाही.

त्यासाठी उपाय म्हणजे https://uidai.in या आधार कार्ड च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तिथे चेक बँक सीडींग या पर्यायावर क्लिक करून तिथे OTP टाकून तुम्हाला तुमचे कोणते बँक खाते आधार सोबत सीडेड आहे याची माहिती मिळेल. तुमचे जे खाते आधार सोबत सीडेड असेल त्याची माहिती घेऊन त्या बँक खात्याची माहिती ई श्रम कार्ड (e shram card) च्या वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन update my information वर क्लिक करून व्यवस्थित भरायची आहे. एवढं केलं की तुम्ही पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल.

नवीन ई श्रम कार्ड (e shram card) नोंदणी करणे, ई केवायसी (ekyc) करणे किंवा अपडेट करणे यासाठी अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे.

https://pfms.nic.in/Home.aspx

e shram card balance check process 2024

काय आहे ई श्रम कार्ड (e shram card) योजना?

असंगठीत कामगार म्हणजेच रोजंदारी करून स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी मजुरी करणारे सर्व श्रमिक तसेच घरेलु कामगारांना विवीध प्रकारचे लाभ देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ई श्रम कार्ड (e shram card) योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ही योजना घरेलु कामगार तसेच असंगठीत कामगारांसाठी एक कल्याणकारी योजना असून या योजने द्वारे लाभार्थी असंगठीत घरेलु कामगार व्यक्तींसाठी आधार कार्ड प्रमाणेच unique Id असलेले एक कार्ड देण्यात येते. या ई श्रम कार्ड (e shram card) च्या माध्यमातून भरण पोषण योजना भत्ता आणि इतर विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. ई श्रम कार्ड (e shram card) हे असंगठीत घरेलु कामगार व्यक्तींसाठी एक अत्यंत महत्वाच्या डॉक्युमेंट पैकी एक आहे.

ई श्रम कार्ड (e shram card चे उद्दिष्ट

आपल्या देशात अनेक असंगठीत तसेच घरेलु कामगार आहेत ज्यांना प्रत्येक दिवशी काम मिळेलच असं नाही. मिळेल ते काम करून आपला चरितार्थ भागविणाऱ्या या बांधवांचे जीवन कठीण असते. त्यांना त्यांच्या या कधी कधी उपलब्ध होणाऱ्या या मजुरी शिवाय उत्पन्नाचा इतर कुठलाही सोर्स नसतो. अशा सर्व असंगठीत तसेच घरेलु कामगारांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने ई श्रम विभागाची निर्मिती केली. देशातील सर्व असंगठीत तसेच घरेलु कामगार लोकांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आर्थिक मदत देणे तसेच भरण पोषण योजना द्वारे दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करून त्यांची आहारविषयक गरज भागविणे, तसेच अशा सर्व कामगारांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना शासनाच्या इतर योजनांद्वारे विविध लाभ देणे हे ई श्रम कार्ड (e shram card) योजना सुरू करण्यामागे सरकारचे उद्दिष्ट आहे.

असंगठीत कामगार बद्दलची व्याख्या

खालीलपैकी कोणत्याही वर्गातील कामगार असल्यास अशा सर्व कामगारांना असंगठीत कामगार या श्रेणीत मान्यता मिळते.

बांधकाम क्षेत्रातील कामगार
रस्त्यावरील किरकोळ विक्रेते.
घरगुती काम करणारे घरेलु कामगार
रिक्षा चालक
शेतीत राबणारे मजूर
ऊसतोड कामगार
इतर कामगार (उदा., ओला/उबर या वाहनांना भाडे तत्वावर किंवा चालविणारे वाहन चालक

जे कामगार औपचारिक करारानुसार( Contract Base Worker) काम करत नसतील तसेच पेन्शन निधी किंवा आरोग्य विमा यांसारखे फायदे ज्या कामगारांना मिळत नसतील असे सर्व कांगा असंगठीत कामगार आहे श्रेणीत येतात.

ई श्रम कार्ड (e shram card)नोंदणी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

१) आधार कार्ड

२) रहिवासी दाखला

३) बँकेचा तपशील, बँक खाते क्रमांक आणि इतर माहिती

४) असंगठीत कामगार असल्याचा पुरावा म्हणून ग्रामसेवकांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र

५) पासपोर्ट आकाराचा फोटो

६) उत्पन्नाचे प्रमाणपत्र

ई श्रम कार्ड (e shram card) चे फायदे

ई श्रम कार्डच्या माध्यमातून असंगठीत घरेलु कामगार व्यक्तींना वयाच्या साठ वर्षापर्यंत योजनेअंतर्गत विविध प्रकारचे लाभ देण्यात येतात. ई श्रम कार्ड (e shram card) चे लाभार्थी असलेल्या असंगठीत तसेच घरेलु कामगार व्यक्तींना या योजनेद्वारे 1 लाख रुपयांपर्यंत अपघात विमा कवरेज प्राप्त करून देण्यात येते. तसेच 2 लाख रुपयांपर्यंत विमा उतरविला जातो. असंगठीत तसेच घरेलु कामगार व्यक्तींच्या पाल्यांना या योजनेद्वारे विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती सुद्धा मिळतात.

प्रत्येक असंगठीत तसेच घरेलु कामगार म्हणून नोंदणी केलेला कामगार वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3000 रुपये मासिक पेन्शनचा हक्कदार ठरतो. अशा कामगारांना सायकल खरेदीसाठी सरकार वित्त पुरवठा करते. दर महिन्याला भरण पोषण योजना अंतर्गत अशा असंगठीत तसेच घरेलु कामगारांना 500 ते 1000 रू. DBT प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. अशा कामगाराच्या कुटुंबातील गर्भवती स्त्रियांना त्यांची देखभाल अन् भरण पोषण करण्यासाठी पैशांच्या स्वरूपात मदत देण्यात येते. मासिक राशन धान्य व्यतिरिक्त शिल्लक धान्य मिळण्यास असे श्रमिक पात्र ठरतात.

ई श्रम कार्ड (e shram card) लाभासाठी पात्रता निकष

१) अर्जदार हा असंगठित कामगार असला पाहिजे.

२) ई-श्रम कार्ड मिळवण्यासाठी अर्जदार 16 ते 59 या वयोगटातील असणे आवश्यक आहे.

३) जे लोक आयकर भरतात किंवा EPFO (Employee provident fund organisation), ESIC (Employees state insurance corporation) चा सदस्य आहेत अशा व्यक्ती मात्र ई श्रम कार्ड लाभासाठी नोंदणी करण्यास पात्र नाहीत.

४) अर्जदार हा भारताचा रहिवासी असला पाहिजे.

५) तुम्ही या पोर्टलवर यशस्वीरीत्या नोंदणी केली, की कामगारांना 12 अंकी युनिक कोड असलेलं ई-श्रम कार्ड दिलं जाईल. ज्याला यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर असं म्हटलं गेलं आहे.

नविन online ई श्रम कार्ड (e shram card) बनविण्याची प्रक्रिया

ज्या असंगठीत तसेच घरेलु कामगार व्यक्तींकडे ई श्रम कार्ड ( e shram card) नाहीत अशा श्रमिकांना ऑनलाईन पद्धतीने अगदी सहजरीत्या ई श्रम कार्ड बनवता येते. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे. आपण नवीन ई श्रम कार्ड कसे बनवता येते त्याबद्दल अधिक माहिती पाहूया.

e shram card new registration online apply

सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाइल मध्ये खालील अधिकृत वेबसाईट उघडावी लागेल. https://eshram.gov.in/ ही अधीकृत वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला register on eshram असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करुन self registration पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यात त्यात तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. तसेच तुमच्या आधार सोबत संलग्न मोबाइल वर आलेला OTP टाकावा लागेल. नंतर तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल. यात तुमचं नाव, पत्ता, मोबाइल नंबर, कामगाराचा प्रकार, बँक अकाऊंट नंबर, इत्यादी माहिती अचूक रित्या भरावी लागेल.

त्यानंतर तुमचा अर्ज पूर्ण भरून झाल्यावर तुमच्या आधारसोबत लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर एक OTP प्राप्त होईल. तो OTP सदर से अधिकृत संकेतस्थळावर टाकल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल. एकदा तुमची नोंदणी पूर्ण झाली की तुमचे आधार सारखेच असलेले ई श्रम कार्ड (e shram card) सदर वेबसाईट वरून डाउनलोड करू शकाल. या ई श्रम कार्ड (e shram card) मध्ये तुम्हाला 12 अंकी आयडी असल्याचं दिसेल. या ई श्रम कार्डच्या साहाय्याने अनेक शासकीय योजनांचा लाभ तुम्हाला घेता येईल.

घरेलू कामगारांना मिळतो एकूण 14 योजनांचा थेट लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती

ई श्रम कार्ड (e shram card) केवायसी कशी करावी?

ई श्रम कार्ड (e shram card) अंतर्गत मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे ई श्रम कार्ड ची ई केवायसी (ekyc) करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला ई श्रम कार्डच्या दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. तिथे तुम्हाला already registered असा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. सदर पेज उघडल्यानंतर तुम्हाला तुमचा ई श्रम कार्डचा 12 अंकी आयडी त्यात टाकायचा आहे. एकदा तुम्ही तुमचा ई श्रम कार्ड (e shram card) क्रमांक टाकला ती त्यांनतर तुम्हाला सेंड OTP पर्यायावर क्लिक करून तुमच्या मोबाइल नंबर वर आलेला OTP त्यात भरायचा आहे. म्हणजे तुमच्यापुढे नवीन पेज उघडेल. त्यावर तुम्हाला update your information असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुमच्या समोर तुम्ही नवीन ई श्रम कार्ड (e shram card) काढण्याच्या वेळी भरलेली सर्व माहिती दिसेल. त्यानंतर एडिट पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या माहितीत बदल करू शकता. तुमचे बँक अकाउंट सुद्धा बदलू शकता. त्यानंतर तुमच्या समोर e shram card ekyc हा पर्याय येईल. त्यात तुम्हाला OTP हा पर्याय निवडायचा आहे. ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या मोबाईल वर एक OTP येईल. हा OTP तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर पाठविला जाईल त्यामुळे तुमच्या आधार कार्डसोबत मोबाइल नंबर जोडलेला असणे अनिवार्य आहे. तुमच्या आधार सोबत संलग्न मोबाइल वर आलेला हा OTP तुम्ही अचुकपणे टाकला की तुमच्या ई श्रम कार्ड ( e shram card) ची ekyc पूर्ण होईल

बांधकाम कामगारांना मिळत आहे घरगुती भांडी संच आणि सुरक्षा पेटी, तसेच इतर विवीध योजनांचा लाभ, असा करा ऑनलाईन अर्ज

ई श्रम कार्ड (e shram card) ची ताकत वाढणार, मिळणार 10पट अधिक सुविधा

केंद्र सरकारकडून आता ई श्रम कार्ड (e shram card) पोर्टलला अधिक शक्तिशाली बनविण्यात येणार असून आता 10 समाजकल्याण योजना ई-श्रम पोर्टलशी संलग्न करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आता अनेक कल्याणकारी योजना ई-श्रम पोर्टलशी जोडल्या जात असून त्यामध्ये रेशन कार्ड आणि पीएम स्ट्रीट व्हेंडर सेल्फ-रिलेंट फंड यांसारख्या योजना समाविष्ट आहेत.परिणामी असंघटित क्षेत्रातील कामगारांना आपोआपच या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे सोईस्कर होईल.

या योजना होणार ई श्रम पोर्टलशी संलग्न

केंद्र सरकारच्या वतीने ई-श्रम पोर्टलशी जोडल्या जाणाऱ्या विविध महत्वाकांक्षी योजनांमध्ये रेशन कार्ड, पीएम स्ट्रीट व्हेंडर सेल्फ-रिलेंट फंड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण आणि शहरी), राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टल, पीएम श्रम योगी इत्यादी योजनांचा समावेश आहे.याशिवाय मानधन, राष्ट्रीय अपंगत्व निवृत्ती वेतन, राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, पीएम मत्स्य पालन संपदा या योजना सुद्धा सदर पोर्टल सोबत अंतर्भूत करण्यात येणार आहेत.

काय होणार ई श्रम कार्ड (e shram card) संलग्नीकरणचा फायदा

केंद्र सरकारच्या वतीने ई-श्रम पोर्टलसोबत या योजना एकत्रित केल्याचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ज्या कामगारांनी ई-श्रम कार्ड अंतर्गत नोंदणी केलेली आहे त्यांना कोणत्याही अतिरिक्त अर्ज प्रक्रियेशिवाय या योजनांचा लाभ आपोआप मिळणे सोप्पे होणार आहे. सध्या असंघटित क्षेत्रातील अंदाजे 30 कोटी कामगार ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत आहेत, ज्यामध्ये दुकानातील परिचर, वाहन चालक, दुग्ध कामगार, पेपर फेरीवाले आणि विविध वितरण सेवांमध्ये गुंतलेले लोक यासारख्या विविध स्तरावरील कामगारांचा समावेश आहे. तरी जास्तीत जास्त असंगठीत कामगारांनी ई श्रम कार्ड नोंदणी करून सदर विविध योजनांचा लाभ घ्यावा असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

असंगठीत कामगारांच्या वेतनात केंद्र सरकारकडून घसघशीत वाढ

देशातील असंख्य असंगठीत कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या वतीने कामगारांच्या किमान वेतन दरांमध्ये सरकारनं वाढ करण्यात आली आहे. विशेषत: असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अन् आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने परिवर्तनीय महागाई भत्ता (VDA) मध्ये सुधारणा करून किमान वेतन दरांमध्ये घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या कामगारांचे वाढले वेतन?

इमारत बांधकाम कामगार, हमाल, चौकीदार किंवा पहारेकरी, केर काढणे, साफसफाई, घरकाम, खाणकाम आणि शेतमजूर तसेच अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या असंगठीत कामगारांना सुधारित वेतन दरांचा लाभ देण्यात येणार आहे. हे नवीन वेतन दर 1 ऑक्टोबर 2024 पासून संपूर्ण देशात लागू होणार आहेत. वेतनदरांमध्ये शेवटची सुधारणा एप्रिल 2024 मध्ये करण्यात आली होती. किमान वेतन दरांचे कौशल्य स्तरांच्या आधारे वर्गीकरण केले जाते. यामध्ये अकुशल, अर्ध-कुशल, कुशल आणि सर्वाधिक कुशल-तसेच भौगोलिक क्षेत्रानुसार-ए, बी आणि सी असे वर्गीकरण करण्यात येतं.

कामगार श्रेणी नुसार झालेली सुधारित वेतन वाढ

शासन निर्णयाप्रमाणे अकुशल कामासाठी उदा. बांधकाम, झाडूकाम, साफसफाई, हमाली या क्षेत्रातील कामगारांसाठी अ श्रेणीत किमान वेतन दर 783 रुपये प्रतिदिन (मासिक वेतन 20358 रुपये) अर्ध-कुशल कामगारांना प्रत्येक दिवशी 868 रुपये (महिन्याला 22568 रुपये) इतकं असेल.

कुशल आणि अर्ध कुशल कामगारांना नवीन निर्णयानुसार मिळणारे किमान वेतन याप्रमाणे

या निर्णयानुसार कुशल, कारकुनी आणि विना शस्त्र चौकीदार किंवा पहारेकरीसाठी दिवसाला 954 रुपये (महिन्याला 24804 रुपये) तसेच कुशल आणि शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या चौकीदार किंवा पहारेकऱ्यासाठी 1035 रुपये प्रतिदिन (26910 रुपये) इतका पगार मिळणार आहे. याशिवाय औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकातील सहा महिन्यांच्या सरासरी वाढीच्या आधारे केंद्र सरकार वर्षातून दोनदा 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरपासून प्रभावीपणे परिवर्तनीय महागाई भत्ता वाढीत सुधारणा करते. केंद्र सरकारच्या मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) यांच्या संकेतस्थळावर (https://clc.gov.in) कार्य , श्रेणी आणि क्षेत्रानुसार किमान वेतन दरांबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.

असंगठीत कामगारांना आता मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुटी

रोजंदारीवर काम करून आपले पोट भरणाऱ्या असंघटीत कामगारांना आता मतदानाच्या दिवाशी भरपगारी सुटी मिळणार आहे. अशा कामगारांना कामावरून सुटी घेऊन मतदानाला जाणे अवघड होते. कारण रोज मोलमजुरी केली तरच बऱ्याच असंगठीत कामगारांच्या घरातील चूल पेटते. परिणामी एक दिवसाची सुटी घेणे सुद्धा त्यांना शक्य होत नाही. परिणामी मतदानाची टक्केवारी कमी होते. या सर्व बाबींचा विचार करून असंगठीत कामगारांना आता मतदानाच्या दिवशी भरपगारी रजा मिळावी, यासाठी निवडणूक आयोग विशेष लक्ष पुरवत आहे.

या मुद्द्यावर तोगडा काढण्यासाठी निवडणूक मुख्य आयुक्त यांनी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत असंघटीत कामगारांना भरपगारी रजा औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना मिळाल्यास ते मतदानाकडे वळू शकतील असा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे असंघटीत कामगारांना भरपगारी रजा देण्यात येणार आहे. यासंदर्भातील अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment