अधिक उत्पादन मिळवून देणारे सुर्यफुलाचे सुधारित वाण

सुर्यफुलाचे सुधारित वाण 2024 : सूर्यफूल हे प्रमुख तेलवर्गीय पिकांपैकी एक महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच भागांतील शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणावर सूर्यफुल शेतीकडे वळू लागले आहेत. खाद्यतेलाची पूर्तता व्हावी यासाठी सूर्यफूल खूप महत्वाचे आहे. सूर्यफूल तेलाला देशात आणि परदेशात प्रचंड मागणी असल्यामुळे सूर्यफूल शेती एक फायद्याचा सौदा ठरून शेतकऱ्यांच्या आर्थिक पातळीत नक्कीच सुधार होईल यात शंका नाही. सूर्यफूल लागवड करण्यासाठी अतिशय कमी खर्च लागतो आणि भरघोस उत्पादन मिळते.

पारंपरिक बियाणे वापरणे सोडून सुर्यफुलाचे सुधारित किंवा संकरित वाणाची लागवडीसाठी निवड केल्यास मिळणारे उत्पन्न कित्येक पटीने वाढते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळाली तर शेतकरी राजा आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण या लेखातून सुर्यफुलाच्या सुधारित आणि संकरित जातींची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्याशिवाय सुर्यफुलाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स सुद्धा या माहितीपर लेखातून आपल्याला मिळणार आहेत.

1) फुले भास्कर

हे सुर्यफुलाचे सुधारित वाण पीक कालावधीच्या बाबतीत कमी दिवसांत म्हणजेच 80 ते 84 दिवसांत तयार होत असून या वाणांचे दाणे चमकदार आणि काळेभोर असतात. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते तसेच अवर्षणप्रवण भागात हे वाण लागवड करण्याची शिफारस केली जाते. हे सुर्यफुलाचे सुधारित वाण 15 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते.

2) भानू

हे सुर्यफुलाचे सुधारित वाण पीक कालावधीच्या बाबतीत कमी दिवसांत म्हणजेच 85 ते 90 दिवसांत तयार होत असून या वाणांचे दाणे मध्यम आकाराचे आणि काळेभोर असतात. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण मध्यम असते तसेच तिन्ही हंगामासाठी आणि अवर्षणप्रवण भागासाठी हे वाण लागवड केल्यास फायदेशीर ठरते. हे सुर्यफुलाचे सुधारित वाण 12 ते 13 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते.

3) मॉर्डन

हे सुर्यफुलाचे सुधारित वाण 85 ते 90 दिवसांत तयार होत असून या जातीची रोपे बुटकी असतात. हे सुर्यफुलाचे सुधारित वाण उशिरा पेरणीसाठी सुद्धा उपयुक्त असते. तसेच दुबार आंतरपिके घेण्यास अनुकूल असते. या वाणाचे दाणे चमकदार आणि काळेभोर असतात. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते. हे सुर्यफुलाचे सुधारित वाण 12 ते 13 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते.

4) एस. एस. 56

हे सुर्यफुलाचे सुधारित वाण पीक कालावधीच्या बाबतीत कमी दिवसांत म्हणजेच 80 ते 85 दिवसांत तयार होत असून या वाणांचे दाणे चमकदार आणि काळेभोर असतात. हे सुर्यफुलाचे सुधारित वाण 10 ते 11 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते.

5) ई. सी. 68414

हे सुर्यफुलाचे सुधारित वाण पीक कालावधीच्या बाबतीत थोडे अधिक दिवस घेते.100 ते 110 दिवसांत तयार होत असून या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण मध्यम असते तसेच अवर्षणप्रवण भागात हे वाण लागवड करण्याची शिफारस केली जाते. हे सुर्यफुलाचे सुधारित वाण 15 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते.

गव्हाच्या या सुधारित जाती देतील एकरी 40 क्विंटल पर्यंत उत्पादन, अशी करा लागवड

6) एल. एफ.एस. 8

हे सुर्यफुलाचे सुधारित वाण पीक 85 ते 90 दिवसांत तयार होत असून या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण 37 टक्के असते तसेच अवर्षणप्रवण भागात हे वाण लागवड करण्याची शिफारस केली जाते. हे सुर्यफुलाचे सुधारित वाण 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते.

7) फुले रविराज (आर. एस. एस. व्ही. 437)

हे सुर्यफुलाचे सुधारित वाण पीक 85 ते 90 दिवसांत तयार होत असून या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण 34. 5 टक्के इतके असते तसेच मध्यम ते भारी शेतजमिनीत खरिफ हंगामासाठी हे वाण लागवड करण्याची शिफारस केली जाते. हे सुर्यफुलाचे सुधारित वाण 17 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळवून देण्यास सक्षम ठरते. उशिरा पेरणीसाठी सुद्धा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहे.

8) डी. आर. एस. एफ. 113

या सुधारित वाणाच्या पिकाचा कालावधी 90 ते 95 दिवसांचा असतो. या वाणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वच क्षेत्रात या वाणाची लागवड केल्या जाऊ शकते. या वाणाच्या बियांचे दाणे काळेभोर आणि चकचकीत असतात. तसेच या बियांमध्ये तेलाचे प्रमाण 37 टक्के असते.

9) टी. ए. एस. 82

हे सुर्यफुलाचे सुधारित वाण 90 ते 95 दिवसांत काढणीस तयार होते. या वाणापासून हेक्टरी सरासरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन मिळते. महाराष्ट्रात लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असे हे सुधारित वाण असून या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते.

10) डी. आर. एस. एफ. 108

90 ते 92 दिवसांत या जातीचे लोक काढणीयोग्य होते. या जातीच्या बियाण्यांपासून प्रती हेक्टर 14 ते 16 क्विंटल धान्य उत्पादित होते. या जातीच्या बियांत तेलाचे प्रमाण 36 टक्के असते. विशेष बाब म्हणजे संपूर्ण भारतभर सर्वच क्षेत्रात हे सुर्यफुलाचे सुधारित वाण लागवडीयोग्य असून भरघोस उत्पादन देण्यास सक्षम ठरते.

सुर्यफुलाच्या संकरित वाणांची माहिती

1) के. बी. एस. एच. 44

हे सुर्यफुलाचे सुधारित वाण नसून संकरित वाण आहे. या वाणाचे पीक 90 ते 95 दिवसांत तयार होत असून या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते तसेच अधिक उत्पादन क्षमता असलेले हे वाण लागवड करण्याची शिफारस केली जाते. हे सुर्यफुलाचे सुधारित वाण 14 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.

2) एल. एस. एफ. एच. 171

हे सुद्धा सुर्यफुलाचे सुधारित वाण नसून संकरित वाण आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात तसेच महाराष्ट्र या राज्यांसाठी कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी हे वाण उत्तम असून या वाणाचे पीक 90 दिवसांत तयार होत असून या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण मध्यम असते तसेच अधिक उत्पादन क्षमता असलेले हे वाण लागवड करण्याची शिफारस केली जाते. हे सुर्यफुलाचे संकरित वाण 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते. हे संकरित वाण केवडा रोगास प्रतिकारक असते.

3) के. बी. एस. एच. 1

केवडा रोगास प्रतिकारक्षम असलेले हे सुर्यफुलाचे सुधारित वाण नसून संकरित वाण आहे. या वाणाचे पीक 90 ते 95 दिवसांत काढणी योग्य होते. तसेच अधिक उत्पादन क्षमता असलेले हे वाण लागवड करण्याची खरिफ आणि रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी लागवड करण्याची शिफारस केली जाते. कोरडवाहू आणि बागायती दोन्ही प्रकारच्या शेतजमिनीत या वाणाची लागवड करून भरघोस उत्पादन घेता येऊ शकते. हे सुर्यफुलाचे संकरित वाण 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते.

4) एम. एस. एफ. 17

हे सुर्यफुलाचे सुधारित वाण नसून संकरित वाण आहे. या वाणाचे पीक 90 ते 95 दिवसांत तयार होत असून या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण मध्यम असते तसेच अधिक उत्पादन क्षमता असलेले हे वाण पश्चिम महाराष्ट्रात लागवड करण्याची शिफारस केली जाते. उशिरा पेरणीसाठी हे वाण जास्त उत्पादन मिळवून देणारे आहे. हे सुर्यफुलाचे संकरित वाण 18 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन आरामात मिळवून देण्यास सक्षम असते.

अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या हरभऱ्याच्या सुधारीत जाती कोरडवाहू शेतीत करतील कमाल

5) एल. एस. एफ. एच. 17

हे सुर्यफुलाचे सुधारित वाण नसून संकरित वाण आहे. या वाणाचे पीक 90 ते 95 दिवसांत तयार होत असून या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण मध्यम असते तसेच अधिक उत्पादन क्षमता असलेले हे वाण लागवड करण्याची शिफारस केली जाते. हे सुर्यफुलाचे सुधारित वाण 14 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.

6) डी. आर. एस. एफ. 113

या सुधारित वाणाच्या पिकाचा कालावधी 90 ते 95 दिवसांचा असतो. या वाणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वच क्षेत्रात या वाणाची लागवड केल्या जाऊ शकते. या वाणाच्या बियांचे दाणे काळेभोर आणि चकचकीत असतात. तसेच या बियांमध्ये तेलाचे प्रमाण 37 टक्के असते.

7) मारुती (एल. एस. एफ. एच. 35)

हे सुर्यफुलाचे एक संकरित वाण असून या जातीच्या पिकाचा कालावधी 90 ते 95 दिवसांचा असतो. बागायती क्षेत्रात लागवड करण्यास हे वाण उत्तम असून प्रती हेक्टर सुमारे 26 ते 19 क्विंटल उत्पादन मिळवून देते. हे संकरीत वाण केवडा रोगास प्रतिकारक्षम असून महाराष्ट्रात लागवड करण्याची शिफारस केली जाते. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते.

8) एस. सी. एच. 35

प्रति हेक्टर 15 ते 16 क्विंटल उत्पादन देणारे हे संकरित वाण आपल्या राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार लागवडीस अत्यंत फायदेशीर आहे. या संकरीत जातीच्या बियाण्यांत तेलाचे प्रमाण अधिक असून हे संकरीत वाण केवडा रोगास प्रतिकारक असते.

9) पी. डी. के. व्ही. एस. एच.

हे एक संकरीत वाण असून या वाणाची उत्पादन क्षमता 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर असते. या संकरीत वाणाचे पीक 90 ते 95 दिवसांत तयार होते. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देण्यास हे वाण अतिशय उपयुक्त आणि भरघोस उत्पादन मिळवून देवरे ठरते यात शंका नाही.

सुर्यफुलाचे सुधारित वाण, सुर्यफुलाची शेती

सूर्यफुलाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी करावयाच्या काही महत्वाच्या बाबी

1) तुम्हाला जर तुमच्या शेतात सुर्यफुलाचे सुधारित वाण पेरून भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर सूर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडा. आम्लयुक्त
पाणथळ जमिन या पिकासाठी योग्य नाही.

2) सूर्यफूल लागवडीसाठी पूर्वमशागत करताना जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्या. तसेच शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी 10 ते 12 टन प्रति हेक्टर चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्या.

3) ज्या शेतकऱ्यांना खरीप लागवड करायची असते त्यांनी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी करा. तसेच रब्बी लागवड करण्यासाठी पेरणीची योग्य वेळ ऑक्टोबर महिन्याचा पहिला आणि दुसरा आठवडा हा असतो. याशिवाय उन्हाळी सूर्यफूल लागवडीसाठी पेरणीची योग्य वेळ फेब्रुवारी महिन्याचा पहिला पंधरवडा प्रचंड उत्पादन मिळवून देण्यास अतिशय पोषक असतो.

4) तुम्ही पेरणी करणार तर त्यासाठी मध्यम ते खोल जमिनीत व सुधारीत वाणांसाठी 45 सें. मी. X 30 सें. मी. अंतरावर वर दिलेले सुर्यफुलाचे सुधारित वाण किंवा संकरित वाणाची पेरणी करा. तसेच भारी जमिनीत, संकरित बियाणे आणि जास्त कालावधीच्या वाणांसाठी 60 सें.मी. x 30 सें. मी अंतरावर पेरणी करा.

5) तुम्हाला जर तुमच्या कोरडवाहू शेतात सुर्यफुलाचे सुधारित वाण पेरून जास्तीत जास्त नफा कमवायचा असेल तर पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करा. यामुळे बी आणि खत एकाच वेळी पेरता येइल. मात्र सुर्यफुलाचे सुधारित वाण शेतात पेरताना बियाणे ५ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नका.

6) एक महत्वाची बाब म्हणजे बागायती सुर्यफूलाची लागवड सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने करा.

7) सुर्यफूलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे 8 ते 10 किलो प्रति हेक्टर बियाणे आणि संकरित वाणाचे प्रत्येक हेक्टरी साठी 5 ते 6 किलो बियाणे वापरा.

8) शेतकरी बांधवांनी सुर्यफुलाचे सुधारित वाण पेरण्याआधी बीजप्रक्रिया करणे आवश्यक असते. केवडा रोगाला प्रतिबंध करण्यासाठी 6 ग्रॅम मेटॅलॅक्झिल 35 डब्ल्यू. एस. प्रति किलो बियाण्यास चोळा. विषाणूजन्य (नॅकॉसिस) रोगाच्या प्रतिबंधासाठी थायामिथोक्झाम ३०% एफ.एस. १० मिली प्रति किलो बियाण्यास लावा. त्यानंतर अँझोटोबॅक्टर हे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावा.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment