अधिक उत्पादन देणारे मक्याचे सुधारित वाण, संकरित तसेच संमिश्र बियाणे

मक्याचे सुधारित वाण 2024 : शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या शेतात मका लागवड करायचे ठरवले असेल तर तुमच्या ज्ञानात भर घालणारा हा लेख आहे. आपल्या भागातील भौगोलिक परिस्थिती आणि शेतजमिनीची गुणवत्ता तसेच हंगामानुसार योग्य बियाण्याची पेरणी करणे हे भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी खूप महत्वाचे असते. चला तर जाणून घेऊया विविधतेने संपन्न मक्याचे सुधारित वाण, संकरित आणि संमिश्र वाण कोणते आहेत याची सविस्तर माहिती. सर्वप्रथम आपण उशिराने काढणीस येणाऱ्या मक्याचे सुधारीत वाण याबद्दल माहिती घेऊयात.

1) गंगा 11

हे एक उशिरा पक्व होणारे मक्याचे सुधारित वाण आहे. या सुधारित वाणाच्या पिकाचा कालावधी 100 ते 110 दिवसांचा असतो. या वाणाची लागवड केल्यास हेक्टरी 50 ते 60 क्विंटल धान्याचे उत्पादन होते.
या सुधारित वाणाचा दाणा नारंगी
पिवळा असून केवडा रोगास प्रतिकारक असे हे मक्याचे सुधारित वाण आहे.

2) डेक्कन 105

रब्बी हंगामासाठी लागवड करण्यास उपयुक्त असे हे उत्तम मक्याचे सुधारित वाण असून या सुधारित वाणाच्या पिकाचा कालावधी 100 ते 110 दिवसांचा असतो. या वाणाची लागवड केल्यास हेक्टरी 50 ते 60 क्विंटल धान्याचे उत्पादन होते. हे मक्याचे सुधारित वाण लागवड केल्यास भरघोस उत्पादन मिळू शकते. या मक्याच्या दाण्यांचा रंग पिवळा असून या रब्बी हंगामासाठी हे वाण फायदेशीर ठरू शकते.

3) त्रिशुलता

या सुधारित वाणाच्या पिकाचा कालावधी सुद्धा 100 ते 110 दिवसांचा असतो. या वाणाची लागवड केल्यास हेक्टरी 50 ते 60 क्विंटल धान्याचे उत्पादन आरामात घेता येऊ शकते. भरघोस उत्पादन देणारी ही मक्याचे सुधारित जाती आहे. या मक्याच्या दाण्यांचा रंग पिवळा असून या रब्बी हंगामासाठी हे वाण लाभदायक ठरते.

मका लागवड, मक्याची शेती, मक्याचे सुधारित वाण तसेच मक्याच्या संकरित आणि संमिश्र जाती

4) प्रो 311

हे मक्याचे सुधारित वाण 100 ते 120 दिवसांत काढणी योग्य होते.
प्रति हेक्टर 50 ते 60 क्विंटल उत्पादन देणाऱ्या या वाणाचे दाणे पिवळे असतात.

एकरी 40 क्विंटल पर्यंत भरघोस उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या या जाती जाणून घ्या

5) बायो- 9689

सुमारे 100 ते 110 दिवसांत तयार होणारे हे मक्याचे सुधारित वाण सुद्धा 50 ते 60 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळवून देऊ शकते. पिवळा दाणा असलेले हे मक्याचे सुधारित वाण लागवडीस अत्यंत फायदेशीर ठरते.

6) महाराजा

हे मक्याचे सुधारित वाण 115 ते 120 दिवसांत काढणी योग्य होते.
प्रति हेक्टर 55 ते 60 क्विंटल उत्पादन देणाऱ्या या वाणाचे दाणे पिवळे किंवा नारंगी रंगाचे असतात.

7) युवराज

हे मक्याचे सुधारित वाण 95 ते 115 दिवसांत काढणीस तयार होते. प्रति हेक्टर 55 ते 60 क्विंटल उत्पादन देणाऱ्या या वाणाचे दाणे नारंगी किंवा पिवळे असतात.

8) एच. क्यू. पी. एम. 1

हे मक्याचे गुणात्मक संकरित वाण असून या वाणाचे दाणे पिवळे तसेच अर्ध खळीदार असतात. करपा रोग आणि खोडकिडीस हे वाण प्रतिकारक आहे. या वाणाच्या पिकाचा कालावधी 110 ते 120 दिवसांचा असून हेक्टरी 60 ते 65 क्विंटल उत्पादन या वाणापासून मिळते.

9) एच. क्यू. पी. एम. 4

हे मक्याचे गुणात्मक संकरित वाण असून या वाणाचे दाणे नारंगी तसेच अर्ध खळीदार असतात. करपा रोग आणि खोडकिडीस हे वाण प्रतिकारक आहे. या वाणाच्या पिकाचा कालावधी 110 ते 120 दिवसांचा असून हेक्टरी 50 ते 60 क्विंटल उत्पादन या वाणापासून मिळते.

10) संगम

हे मक्याचे गुणात्मक संकरित वाण असून या वाणाचे दाणे अर्ध पिवळे तसेच अर्ध खळीदार असतात. करपा रोग आणि खोडकिडीस हे वाण प्रतिकारक आहे. या वाणाच्या पिकाचा कालावधी 110 ते 120 दिवसांचा असून हेक्टरी 75 ते 80 क्विंटल उत्पादन या वाणापासून मिळण्यास हे वाण सक्षम आहे.

ज्वारीचे हे सुधारित वाण मिळवून देतील लाखो रुपयांचे भरघोस उत्पन्न

आता आपण काही मक्याचे संमिश्र वाणांची माहिती घेऊया.

11) धवल

हे मक्याचे संमिश्र वाण 100 ते 110 दिवसांत काढणी योग्य होते. प्रति हेक्टर 45 ते 50 क्विंटल उत्पादन देणाऱ्या या वाणाचे दाणे पांढरे असून टपोरे असतात.

12) आफ्रिकन टॉल

70 ते 80 दिवसाचा पिकाच्या काढणीचा अत्यंत कमी कालावधी घेणारे हे मक्याचे संमिश्र वाण प्रती हेक्टर 67 ते 70 टन चारा तसेच 45 ते 50 क्विंटल धान्याचे भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणापौकी एक महत्वाचे संमिश्र वाण आहे. सदर वाण हे हिरव्या चाऱ्यासाठी उत्तम असून 10 ते 12 फुट उंच लांब पाने असतात. तसेच करपा रोगास प्रतिकारक असे हे वाण आहे.

शेतकरी मित्रांनो आता आपण मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण कोणते आहेत याविषयी अधिक माहिती पाहूया. सर्वात आधी आपण अधिक उत्पादन देणारे मक्याचे संकरित वाण कोणते कोणते आहेत याचा तपशील जाणून घेऊया.

13) डी. एम. एच. 107

हे मक्याचे संकरित वाण 90 ते 100 दिवसांत काढणीस तयार होते. तसेच उत्पादन क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास 50 ते 55 क्विंटल उत्पादन हे वाण देऊ शकते.या वाणाच्या दाण्याचा रंग
नारंगी, पिवळा असतो.

14) एम. एम. एच. 69

हे मक्याचे संकरित वाण 90 ते 100 दिवसांत काढणी योग्य होते.
प्रति हेक्टर 50 ते 55 क्विंटल उत्पादन देणाऱ्या या वाणाचे दाणे नारंगी असून हे एक उच्च गुणवत्ता असलेले संकरित वाण आहे.

मध्यम कालावधीत उत्पादन देणारे संमिश्र वाण

15) मांजरी

हे मक्याचे संमिश्र वाण 90 ते 100 दिवसांत काढणीस तयार होते. तसेच उत्पादन क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास 40 ते 50 क्विंटल उत्पादन हे वाण देऊ शकते.या वाणाच्या दाण्याचा रंग
नारंगी, पिवळा असतो.

वाटाण्याच्या या सुधारित जातींची लागवड करून 2 महिन्यांत व्हा मालामाल

16) नवज्योत

नारंगी पिवळा खरिपासाठी योग्य असलेले हे मक्याचे संमिश्र बियाणे 900 ते 100 दिवसांत काढणीस तयार होते. प्रति हेक्टर 40 ते 50 क्विंटल धान्याचे उत्पादन हे वाण मिळवून देते.

17) प्रभात

हे मक्याचे संमिश्र वाण 90 ते 100 दिवसांत काढणीस तयार होते. तसेच उत्पादन क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास 40 ते 50 क्विंटल उत्पादन हे वाण देऊ शकते.या वाणाच्या दाण्याचा रंग
नारंगी, पिवळा असतो. हे संमिश्र बियाणे सुद्धा खरिप हंगामासाठी योग्य ठरते.

मका लागवड, मक्याची शेती, मक्याचे सुधारित वाण तसेच मक्याच्या संकरित आणि संमिश्र जाती

18) करवीर

रब्बी हंगामात लागवडीसाठी अत्यंत फायदेशीर असलेले हे मक्याचे संमिश्र बियाणे असून नारंगी/ पिवळ्या रंगाचे दाणे असतात. हे मक्याचे संमिश्र बियाणे 900 ते 100 दिवसांत काढणीस तयार होते. प्रति हेक्टर 52 ते 55 क्विंटल धान्याचे उत्पादन हे वाण आरामात देऊ शकते.

19) एम. पी. क्यू. – १३

खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी उपयुक्त असे हे मक्याचे संमिश्र वाण असून याचे दाणे नारंगी पिवळ्या रंगाचे असतात. या वाणाचे पीक सुद्धा 90 ते 100 दिवसांत तयार होते. तसेच 65 ते 68 क्विंटल पर्यंत भरघोस उत्पादन मिळवून देण्याची क्षमता या संमिश्र बियाण्यात आहे.

20) शक्ती

हे मक्याचे संमिश्र वाण 90 ते 100 दिवसांत काढणीस तयार होते. तसेच उत्पादन क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास 50 ते 60 क्विंटल उत्पादन हे वाण देऊ शकते.या वाणाच्या दाण्याचा रंग
नारंगी, पिवळा असतो. हे संमिश्र बियाणे सुद्धा खरिप हंगामासाठी योग्य ठरते. अधिक उत्पन्न देणारे हे मक्याचे वाण आहे.

कांद्याच्या सुधारित आणि संकरित जाती, ज्या आहेत प्रगतिशील शेतकऱ्याची ओळख

21) पि.के.व्ही.एम .शतक

खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी उपयुक्त असे हे मक्याचे संमिश्र वाण असून याचे दाणे पांढऱ्या रंगाचे असतात. या वाणाचे पीक सुद्धा 85 ते 95 दिवसांत तयार होते. तसेच 55 ते 60 क्विंटल पर्यंत भरघोस उत्पादन मिळवून देण्याची क्षमता या संमिश्र बियाण्यात आहे.

22) पुसा संकर मका 1

हे एक लवकर पक्व होणारे मक्याचे सुधारित वाण नसून एक संकरित वाण आहे. या संकरित वाणाच्या पिकाचा कालावधी 80 ते 85 दिवसांचा असतो. या वाणाची लागवड केल्यास हेक्टरी 45 ते 50 क्विंटल धान्याचे उत्पादन होते. या संकरित वाणाचा पिवळा असून हे एक एकरी संकरीत वाण आहे.

23) पुसा संकर मका 2

हे सुद्धा मक्याचे सुधारित वाण नसून लवकर पक्व होणारे एक संकरित वाण आहे. या संकरित वाणाच्या पिकाचा कालावधी 80 ते 85 दिवसांचा असतो. या वाणाची लागवड केल्यास हेक्टरी 45 ते 50 क्विंटल धान्याचे उत्पादन होते. या संकरित वाणाचा दाणा नारंगी पिवळा असून हे एक संकरीत वाण आहे.

24) एम. एम. एच. 1933

हे एक लवकर पक्व होणारे मक्याचे संकरित वाण आहे. या संकरित वाणाच्या पिकाचा कालावधी 80 ते 85 दिवसांचा असतो. या वाणाची लागवड केल्यास हेक्टरी 45 ते 50 क्विंटल धान्याचे उत्पादन होते. या संकरित वाणाचा पिवळा असून हे एक लागवड योग्य संकरीत वाण आहे.

25) एक्स. 1123 जी.

हे एक लवकर पक्व होणारे मक्याचे संकरित वाण आहे. या संकरित वाणाच्या पिकाचा कालावधी 80 ते 85 दिवसांचा असतो. या वाणाची लागवड केल्यास हेक्टरी 45 ते 50 क्विंटल धान्याचे उत्पादन होते. या संकरित वाणाचा नारंगी पिवळा असून हे एक उत्तम संकरीत वाण आहे.

26) किरण

हे मक्याचे सुधारित वाण एक लवकर पक्व होणारे मक्याचे संमिश्र वाण आहे. या संकरित वाणाच्या पिकाचा कालावधी 80 ते 85 दिवसांचा असतो. या वाणाची लागवड केल्यास हेक्टरी 45 ते 50 क्विंटल धान्याचे उत्पादन होते. या संकरित वाणाचा मका पिकाचा दाणा पिवळा असून हे संमिश्र वाण बऱ्याच भागात लागवडीस योग्य ठरते.

27) डी. 941

हे मक्याचे सुलित प्रकारचे वाण असून या जातीचे उत्पादन हरियाणा पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांत मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. प्रति हेक्टर सुमारे 40 ते 45 क्विंटल उत्पादन देणारे हे वाण आहे . या वाणाचा पिक तयार होण्याचा कालावधी फक्त 80-85 दिवसांचा असतो. या वाणाच्या मक्याचे दाणे पिवळ्या रंगाचे असतात.

28) प्रकाश – जे.एच. 3189

हे एक संकरित वाण असून लवकर पिकणाऱ्या जातींपैकी ही एक जात आहे. भारतभर या वाणाची लागवड केल्या जाऊ शकते.या जातीचे पीक 80-85 दिवसांत काढणीयोग्य होते. उत्पादनाचा विचार केला तर मक्याच्या या जातीपासून प्रति हेक्टर 40 ते 45 क्विंटल इतके उत्पादन आरामात मिळते.

29) फुले मधू

हे मक्याचे सुधारित वाण असून उशिराने पक्व होणारे वाण आहे. या जातीच्या पिकाचा कालावधी 125 ते 130 दिवसांचा असतो. यामध्ये साखरेचे प्रमाण 14.88%इतके असते. याचे हिरवे कणीस आवरण रहित असते. हे मक्याचे सुधारित वाण हेक्टरी 45 ते 50 क्विंटल उत्पादन देते.

30) पंचगंगा

हे मक्याचे संमिश्र वाण असून हेक्टरी 45 ते 50 क्विंटल उत्पादन देणाऱ्या वानापैकी एक वाण आहे. या वाणाच्या पिकाचा कालावधी फक्त 80 ते 85 दिवसांचा असतो. या संमिश्र वाणाच्या मक्याचे दाणे रंगाने नारंगी/पांढरे असतात. ही मक्याची जात लागवड केल्यास अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळवून देऊ शकते.

मक्याच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी हे करा

शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या शेतात मका लागवड करायचे ठरवले असेल आणि वर दिलेले मक्याचे सुधारित वाण वापरणार असाल तर पेरणी करण्यापूर्वी 2 ते 2.5 ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळा यामुळे करपा रोगाचे नियंत्रण करता येऊन उत्पन्नात वाढ होते. याशिवाय अझोटोबक्टर जीवाणू संवर्धन 25 ग्रॅम किंवा 100 मिली प्रति किलो बियाण्यास लावा आणि नंतरच पेरणी करा. यामुळे पिकाचे बऱ्यापैकी रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपयोग होतो. मका लागवडीची खत व्यवस्थापन, रोग नियंत्रण, आंतर मशागत, पूर्व मशागत, पेरणीची प्रक्रिया, आंतरपिके, काढणी, फवारणी याची संपुर्ण माहिती लवकरच एका नवीन लेखात देण्याचा आमचा प्रयत्न असेल.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment