शेतकऱ्यांना उत्पादन घरात येईपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लिंक हाता तोंडाशी येऊन सुद्धा कधी कधी निसर्गाच्या प्रकोपामुळे तसेच पिकांवर पडणाऱ्या विविध रोगांमुळे बळीराजाचे शेतीतील उत्पादन कमी होते. कधी कधी तर तर संपूर्ण पिक नष्ट होऊन त्यांच्या निराशेने वाढ होते. आज आपण कपाशीच्या पिकावर पडणाऱ्या गुलाबी बोंडअळी बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. शेतकऱ्यांनी वेळीच योग्य व्यवस्थापन करून बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करणे गरजेचे असते. चला तर बघुया गुलाबी बोंडअळी विषयी संपूर्ण माहिती.
गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मुळे होणारे नुकसान
- गुलाबी बोंडअळी अंड्यातून निघुन ताबडतोब कळ्या, फुले व बोंडाना छोटे छिद्र करून त्यात घुसते. प्रारंभीच्या काळात अळ्या पाते, कळ्या, फुलांवर वास्तव्य करतात.
- प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमलेलल्या कळीसारखी दिसायला लागतात, अशा कळ्यांना डोमकळया म्हणतात.
- बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त पराटीची पाने तसेच बोंडे गळून पडायला सुरुवात होते किंवा ते परिपक्व न होता फुटतात व गळून गेलेली बोंडे सडून जाण्याचा धोका असतो.
- अंड्यातून निघालेली अळी बोंडात गेल्यानंतर तिच्या विष्ठेने व बोंडाच्या बारीक कणाच्या सहाय्याने छिद्र बुजुन टाकते. ज्यामुळे बोंडाचे वरुन निरीक्षण केल्यानंतर अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही. या अळीचा प्रादुर्भाव बोंडामध्ये मुबलक प्रमाणात सापडतो.
5.शेंदरी (गुलाबी) बोंडअळी सरकीसाठी नुकसाकारक ठरते. बोंडाची वाढ खुंटते, बोंडे पूर्णपणे फुटायला प्रतिबंध निर्माण होतो. सरकी किडलेली असल्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती क्षीण होऊन धाग्याची लांबी, मजबूती आणि गुणवत्ता अत्यल्प होते.
बोंडअळीचे लक्षणे कसे ओळखाल?
गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कळ्या उमलत नाहीत, बोंड गळती सुरू होते, कापुस गुणवत्ता खालवते आणि बियाणे सुद्धा पोखरल्या जाते. उन्हाळ्याच्या सुरवातीला अळ्यांची पहिली पिढी पात्यांमध्ये उपद्रव करत वाढते आणि फुलते. प्रदुर्भाव झालेल्या फुलांच्या पाकळ्या अळ्यांच्या रेशमी धाग्यांनी एकत्र बांधलेल्या असतात. दुसरी पिढी बोंड आणि कापसाच्या आपर्यंत शिरून बीपर्यंत पोहचते अन् त्यांना खाते. परिणामी कापुस तुटतो आणि डागाळतो, ज्यामुळे कापसाची प्रत निकृष्ट होते. बोंडावरही खराबी दिसुन येते जसे कि बोंडाच्या आतल्या भिंतीला चामखीळ दिसून येतात. शिवाय बोंडअळी प्रमाणे ही अळी बोंडाला पोकळ करत नाहीत व विष्ठा सुद्धा बाहेर सोडत नाहीत. त्यामुळे बोंडकुज बुरशी सारखे इतर कीटकांना, अळ्यांनी तयार केलेल्या आत आणि बाहेर जाण्याच्या मार्गांचा उपयोग करुन संक्रमण करण्याचा धोका असतो.
गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन कसे करावे ?
- पतंगांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकरी दोन पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप ल्युर सक्रिय घटक असणारे कामगंध सापळे लावावेत. आर्थिक नुकसान पातळी (सलग तीन रात्री ८ पतंग/सापळा/रात्र) ओलांडल्यास शिफारशीत कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी.
- कपाशीच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान दहा पक्षीथांबे उभे करावेत. म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळया टिपून खातील.
- कापूस पीक पात्या लागण्याच्या अवस्थेत असताना शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा नीम तेल ५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात. १०% डोमकळ्या ही आर्थिक नुकसान पातळी समजून फवारणीचे उपाय करावेत.
- हिरवी बोंडे लागल्यानंतर अनिश्चित स्वरूपात एकरी २० बोंडांचे (१ बोंड/झाड) निरीक्षण करणे अनिवार्य आहे.
- बोंडअळ्यांची अंडी किंवा प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या पिकावर दिसून येताच ट्रायकोग्रामा बॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोणीस या परोपजीवी किटकाची १ ते १.५ लाख अंडी प्रति हेक्टर (३ ट्रायकोकार्ड प्रती एकर) या प्रमाणे हफ्त्याचे अंतर राखून तीन वेळा कपाशी शेतात सोडावीत.
- जैविक घटकांचा कीड नियंत्रणासाठी वापर करण्याच्या कमीत कमी सात दिवस आधी आणि सात दिवसानंतर रासायनिक कीटकनाशकांचा उपयोग करण्यात येऊ नये.
- किडीची आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर पराटीच्या वाढी अनुसार गुलाबी बोंडअळीच्या प्रभावी निर्मूलन साठी शिफारस केलेली कीटकनाशके (फवारणी प्रति एकर) क्विनॉलफॉस (२५ एएफ) ४०० मि.लि, थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) ४०० ग्रॅम , क्लोरपायरीफॉस (५० ईसी) ४०० मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ६०० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल ९.३० अधिक लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६० हे किडकनाशक १०० मिली प्रति एकर फवारणी करणे आवश्यक असते.
बोंडअळी प्रतिबंधक उपाययोजना काय आहेत?
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पिकाच्या शेवटच्या काळात होत असतो त्यामुळे लवकर परिपक्व होणाऱ्या वाणांची काळजीपूर्वक निवड करावी.
अळीच्या उपद्रवाच्या लक्षणांसाठी नियमितपणे शेताचे निरीक्षण करणे आवश्यक असते.
कामगंध सापळे इत्यादींचा उपयोग करून किड्यांच्या संख्येचा अंदाज घ्यावा.
किड्यांची संख्या कमी करण्यासाठी हिवाळा आणि वसंत ऋतुतील सिंचन योग्य रीतीने द्यावे उदाहरणार्थ शेतात पूर्ण पाणी भरावे.
कीटनाशकांचा उपयोग सावधपणाने केल्याने ह्यांचे नैसर्गिक भक्षक प्रभावित होत नाहीत आणि किड्यांची प्रतिकारशक्तीही वाढत नाही.
किड्यांची संख्या बळकट होण्याआधीच पिकाची काढणी करावी.
काढणीनंतर ताबडतोब झाडांचे अवशेष नष्ट करावे.
उन्हाळ्यात जमिन पडित ठेवावी.
कापूस लागवडीपासून शेत किमान ७ महिने मुक्त ठेवले पाहिजे. आणि त्यावेळी (उदा.बारीक धान्ये किंवा अल्फाअल्फा) पीक फेरपालट करणे फायद्याचे ठरते.
तणनाशकाचा योग्य वापर केल्यास होणारे नुकसान टळते, जाणुन घ्या योग्य मार्गदर्शन