महिलांना मिळत आहे मोफत शिलाई मशीन, असा करा अर्ज

देशातील असंख्य महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव विश्वकर्मा शिलाई मशीन योजना असून ज्या महिलांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारायची आहे, त्यांच्यासाठी ही घरून काम करण्यासाठी तसेच गरजू महिलांना या योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. मशीन खरेदी करण्यासाठी पैसे शासनाकडुन देण्यात येणार आहेत.. अशा प्रकारे एक रुपयाही खर्च न करता अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी चालून आली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


केंद्र सरकारच्या गरजू महिलांसाठी असलेल्या या अत्यंत महत्वाच्या योजनेचे निकष काय आहेत, योजनेसाठी पात्र कोणत्या महिला असणार, योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात विश्वकर्मा शिलाई मशिन योजना बद्दल संपूर्ण माहिती.

काय आहे विश्वकर्मा शिलाई मशिन योजना चे उद्दिष्ट

केंद्र शासनाकडून पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ही योजना पीएम विश्वकर्मा योजनेचाच एक भाग आहे. या योजनेत लाभार्थ्यांना मोफत शिलाई मशीन वितरीत करण्यात येते. शिवणकामाची कला जाणणाऱ्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

या योजनेतून शिलाई मशिन विकत घेण्यासाठी महिलांना एकूण किती रक्कम मिळेल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आधी या योजनेचा अर्ज करावा लागणार आहे. जेव्हा अर्ज केलेल्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन अशा महिलांची निवड केली जाईल, त्यावेळी त्यांना मशीन चालवण्याचे विशेष प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. पात्र महिलांनी महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून एकूण 15,000 रुपये दिले जातील. शासनाकडून शिलाई मशीन घेऊन या महिलांना रोजगार प्राप्त होऊन त्यांचे आर्थिक पाठबळ भक्कम होण्यास मदत होईल.

पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेचे फायदे काय आहेत?

देशातील गरजू गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे.
या योजनेंतर्गत महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी रोजगार प्राप्त करून देण्याच्या माध्यमातून शिलाई मशीन वितरीत केल्या जाईल त्यामुळे अशा असंख्य महिलांना त्यांचा आर्थिक विकास साधता येणार आहे.
पात्र महिलांना शिलाई मशीन टेलरिंग प्रशिक्षणही पुरविण्यात येणार आहे.
ज्या महिलेकडे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नाहीत अशा महिलांना सरकार 10 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यास तत्पर आहे.
टेलरिंग प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना शासनाकडून शिलाई मशिन योजना अंतर्गत नवीन शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15000 रुपयांची रक्कमही दिली जाणार आहे.

विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला सरकारने ठरवून दिलेल्या खालील सर्व पात्रता निकषांची पूर्तता करावी लागणार आहे.

हे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.

१) अर्जदार हा देशाचा मूळ रहिवासी असला पाहिजे.

२) शिलाई मशीन योजना अंतर्गत लाभ महिला आणि पुरुष दोघांनाही देण्यात येतो. त्यामुळे देशातील गरजू महिला तसेच पुरुष या योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन मिळविण्यासाठी अर्ज सादर करू शकतात.

३) अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला हवा.

४) अर्जदाराच्या घरातील कोणताही सदस्य आयकर भरत नसावा.

५) अर्ज करणारी व्यक्ती किंवा महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असणे अनिवार्य आहे.

👉 हे सुध्दा वाचा

नविन योजना आली, या महिलांना मिळणार पिंक ई रिक्षा योजनेचा लाभ

पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

ज्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज नोंदणीच्या वेळी खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.

१) आधार कार्ड

२)बँक खाते प्रमाणपत्र (पासबुक)
प्रमाणपत्र

३) पॅन कार्ड

४) जातीचे प्रमाणपत्र

५) सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र

६) राशन कार्ड

७) सध्या सक्रिय असलेला मोबाईल नंबर

८) पत्त्याचा पुरावा

९) पासपोर्ट आकाराचा फोटो

या व्यतिरिक्त ऐनवेळी तुमच्याकडून इतर कोणतेही आवश्यक कागदपत्र मागितले गेले तर तुम्हाला ते संबंधीत अधिकाऱ्यांसमोर सादर करावे लागेल.

पंतप्रधान विश्वकर्मा शिलाई मशीन योजना अंतर्गत शिलाई मशीन मिळण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लोकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर संबंधीत शासकीय अधिकारी आपल्या अर्जाची पडताळणी करून सर्व निकष गृहीत धरून आपला अर्ज मंजूर/नामंजूर करण्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी करेल.

मोफत शिलाई मशीन योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे अधिकृत संकेतस्थळ

प्रधानमंत्री विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना 2024 या योजनेचा अर्ज करायची अधिकृत वेबसाईट https://services.india.gov.in/ ही असून आपल्याला सर्वप्रथम या वेबसाईट वर रजिस्टर करून नंतर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर सर्च बॉक्स मध्ये Sewing Machine Scheme असं लिहावं लागेल अन् सर्च करावं लागेल. नंतर एक नवीन पेज उघडुन त्यात तुम्हाला अर्ज सादर करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर खाली दिल्याप्रमाणे अर्ज व्यवस्थीत अन् अचूकपणे भरावा लागेल. अर्ज कसा करावा याची माहिती खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नागरिकांना राज्य राज्यसरकारचे अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन अर्ज सादर करता येईल. या अधिकृत वेबसाईट ची लिंक खालीलप्रमाणे आहे.https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Login सदर अधीकृत संकेतस्थळावर जाऊन खाली मार्गदर्शन केले आहे त्याप्रमाणे अर्ज भरा.

अशाप्रकारे करा मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत लाभासाठी ऑनलाईन अर्ज

सर्वात आधी आपल्याला शिलाई मशीन योजना साठी असलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.

सदर वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला पीएम विश्वकर्मा शिलाई मशीनच्या योजनेचे होम पेज मिळेल.

या पेजवर तुम्हाला लॉगिन करण्याचा पर्याय दिसेल, तुम्हाला अर्जदार/लाभार्थी लॉगिनच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्या समोर आणखी एक नवीन पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला Apply Online असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्यासमोर पीएम विश्वकर्मा योजनेचा ऑनलाइन नोंदणी अर्ज येईल, तो अर्ज तुम्हाला अचूकरित्या आणि काळजीपूर्वक भरायचा आहे.

अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मागितलेली सर्व कागदपत्रे एक एक करून अपलोड करावी लागणार आहेत.
कागदपत्रे अपलोड करावी लागतील म्हणून तुम्ही आधीच तुमच्या मोबाइल मध्ये वर दिलेल्या सर्व कागदपत्रांचे फोटो काढून ठेवा. किंवा सदर कागदपत्रांची pdf स्वरूपात मांडणी करून ठेवा. अशीच कागदपत्रे मोबाइल मध्ये उपलब्ध असल्यास अर्ज करताना अडचणी येणार नाहीत. फोटो काढून ठेवणे हा pdf पेक्षा सोप्पा उपाय आहे.

सर्व अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर तसेच सर्व कागदपत्रे व्यवस्थितपणे अपलोड करून झाल्यावर तो पुन्हा एकदा तपासून पहा. चुकून एखादी चूक झाली असेल तर ती दुरुस्त करता येईल.
वरील सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर शेवटच काम म्हणजे तुमचा अर्ज सबमिट करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करायचे आहे तसेच आपल्या ऑनलाईन अर्जाची पावती सुरक्षितपणे जतन करून ठेवायची आहे.

या कारणांमुळे तुमचा अर्ज होऊ शकतो नामंजूर

अर्जात चुकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाईल. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी नसल्यास अर्ज नाकारला जाईल. अर्जात अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल. सदर महिला अर्जदाराने जर केंद्र किंवा राज्य सरकार द्वारे देण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेंतर्गत शिलाई मशीनचा लाभ घेतला असेल तर या अर्ज रद्द केला जाईल. महिला अर्जदार गरीब कुटुंबातील नसल्यास आणि कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्यास अर्ज रद्द होईल. महिला अर्जदाराकडे शिलाई मशीन चालविण्याचे प्रमाणपत्र नसल्यास अर्ज रद्द केला जातो.

मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत अटी आणि शर्ती

सदर मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच दिला जाणार आहे. महाराष्ट्र इतर राज्यांतील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला लाभार्थी महिला 20 ते 40 वर्षे वयोगटातील असणे अनिवार्य आहे. 40 वर्ष पूर्ण केलेल्या महिला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार नाहीत. 1 लाख 20 हजार रुपयांपेक्षा अधिकचे वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना सुद्धा मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभार्थी होता येणार नाही.

सदर महिला अर्जदारांकडे शिलाई मशीन शिकल्याचे प्रमाणपत्र सुद्धा अनिवार्य असेल. तुम्हाला शिलाई मशीन साठी 15 हजार रुपये अनुदान प्राप्त करायचे असेल तर आवश्यक ती कागदपत्रे तुमच्याकडे असणे सुद्धा गरजेचे आहे. केवळ आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिला सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत
विधवा तसेच दिव्यांग स्त्रियांना सदर योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. महिला अर्जदार विधवा असेल तर अशा महिलांनी अर्जासोबत त्यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडायचे आहे. अर्जदार दिव्यांग महिला असल्यास अर्जासोबत दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्यास लाभ मिळण्याची शक्यता वाढेल.

या योजनेचा प्रारंभ कधी झाला?

केंद्र सरकारच्या वतीने महिलांसाठी विविध महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असतात. त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे मोफत मशीन योजना. ही योजना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून दुर्बल घटकातील महिलांचे जीवन सुकर करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. देशातील व महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी महिला मोफत शिलाई मशिन योजना अंतर्गत लाभासाठी पात्र ठरतात.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!