देशातील शेतकऱ्यांसाठी राज्य आणि केंद्र शासन नेहमीच अनेक महत्वाकांक्षी योजना राबवत असते. शेतकऱ्यांना आर्थिक, तांत्रिक दृष्टीने मदत होऊन त्यांचे उत्पादन वाढावे यासाठी सरकार नेहमीच कटिबद्ध असते. आता देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सगळ्या शेतकऱ्यांना आता शेतकरी ओळखपत्र (Farmer Id Card) मिळणार असून या कार्डचे अनेक लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
आगामी काळात केंद्र सरकार शेतकऱ्यांना आधार कार्ड सारखे युनिक ओळखपत्र वाटप करणार आहे. कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी नुकतीच ही माहिती दिली. ते म्हणाले की, कृषी क्षेत्राचे तांत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने हा मोलाचा दगड ठरणार आहे. म्हणून सरकार लवकरच देशभरातील शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करणार आहे जेणेकरून त्यांना आधार प्रमाणेच एक युनिक शेतकरी ओळखपत्र (Farmer ID Card) देण्यात येणार आहे.
पाच कोटी शेतकऱ्यांना मार्च पर्यंत मिळणार शेतकरी ओळखपत्र ( Farmers Id Card)
याविषयी अधिक माहिती देताना कृषी सचिव देवेश चतुर्वेदी म्हणाले की, मार्च 2025 पर्यंत पाच कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे सरकारचे लक्ष आहे. हा करून त्यांना शेतकरी ओळखपत्र (Farmers Id Card) देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम म्हणजे सरकारच्या 2,817 कोटी रुपयांच्या डिजिटल कृषी मिशनचाच एक भाग असून, केंद्रीय मंत्रिमंडळाने याला नुकतीच मान्यता दिली आहे. ॲग्री-टेक समिट निमित्ताने बोलताना कृषी सचिव पुढे म्हणाले की, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार असून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यावर काम सुरू होईल.
कोणत्या राज्यांतील शेतकऱ्यांना मिळणार आधी शेतकरी ओळखपत्र
सरकारच्या वतीने जारी करण्यात येणारे शेतकरी ओळखपत्र (Farmer Id Card) सुरुवातीला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांत प्रायोजिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. नंतर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र वितरीत करण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीस्कर होणार असून सरकारतर्फे देण्यात येणारे शेतीविषयक कर्ज तसेच विविध योजनांचा मिळण्याच्या प्रक्रियेत सुलभता येणार आहे.
आधार कार्ड प्रमाणे असेल शेतकरी ओळखपत्र (Farmer Id Card)
या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी झाल्यानंतर प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्याला शेतकरी ओळखपत्र (Farmer Id Card) मिळणार असून यामध्ये आधार सारखा युनिक आयडी दिला जाणार आहे. जो विविध प्रकारच्या लाभासाठी महत्वाचा ठरणार असून यामुळे शेतकऱ्यांची ओळख पटणे तसेच विविध तांत्रिक फसवणुकीच्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
शेतकरी ओळखपत्राचे होणारे फायदे
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या युनिक आयडीमुळे विविध कृषी योजनांमध्ये किमान आधारभूत किंमत (MSP) आणि किसान क्रेडिट कार्ड सारख्या योजन शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याही अडचणीशिवाय पोहोचण्यास मदत होणार आहे.
शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.
शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणारे विविध प्रकारचे कर्ज वितरीत करण्याच्या कामी हे ओळखपत्र मोलाचे ठरणार आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीविषयक माहितीचे संकलन केल्या जाणार असल्यामुळे प्रत्येक योजनेसाठी होणारी पडताळणी करण्याची गरज असणार नाही. या शेतकरी ओळखपत्र (Farmer Id Card) वितरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट लाभ देणे सोप्पे होणार आहे.
शेतकरी ओळखपत्र अंतर्गत शेतकऱ्यांची वैयक्तिक शेतकरी-निहाय माहिती यात घेण्यात येणार असल्यामुळे एका क्लिकवर शेतकऱ्यांची शेत मालकी अन् इतर महत्वाची माहिती मिळणे शक्य होणार आहे.
2027 पर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना मिळणार शेतकरी ओळखपत्र
हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यामागे केंद्र सरकारचा महत्वाचा उद्देश म्हणजे देशातील शेती व्यवसायाचा अधिकाधिक विकास व्हावा. त्या दृष्टीकोनातून सरकारने डिजिटल कृषी उपक्रम सुरू केला आहे. आधी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करून नंतर 2026-27 पर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र (Kisan Id Card) देण्याचा उपक्रम उपक्रम राबविण्याची आखणी सरकारकडून केल्या जाणार आहे. देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना हे शेतकरी ओळखपत्र वितरीत होणार असल्याची खात्रीलायक बातमी आहे.
चालू वर्षात सुमारे 7 कोटी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र देण्याचे शासनाचे उद्दिष्ट
प्रगत तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात प्रत्येक शेतकऱ्याकडे शेतकरी ओळखपत्र (Farmer Id Card) असलेच पाहिजे या मताचे सरकार आहे. सदर शेतकरी ओळखपत्र हे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामार्फत बनवले जाणार असून देशातील शेतकऱ्यांची मॉनिटरिंग करण्याच्या महत्वाच्या कामी येणार आहे.
शेतकरी ओळखपत्र (Farmer Id Card) मध्ये कोणती माहिती समाविष्ट असणार?
1) सदर शेतकऱ्याकडे किती शेती आहे हे या ओळखपत्राद्वारे कळणार आहे.
2) शेतकऱ्याने त्याच्या शेतात कोणते पीक पेरले आहे याची विस्तृत माहिती या शेतकरी ओळखपत्र (Farmer Id Card) मुळे सरकारला प्राप्त होणार आहे.
3) शेतकऱ्याकडे पशुधन किती आहे याची सुद्धा माहिती शेतकरी ओळखपत्रात असणार आहे.
4) शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर किती कर्ज आहे याची सविस्तर माहिती शेतकरी ओळखपत्र ( Farmer Id Card) मधून मिळणे शक्य होणार आहे.
5) या शेतकरी ओळखपत्र व्दारे शेतकऱ्यांना पीक पाहणी सादर करण्यास मदत होणार आहे.
6) पीक विमा तसेच इतर योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळण्यास या शेतकरी ओळखपत्र (Kisan Id Card) चा वापर होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने घेतलेले 7 कल्याणकारी निर्णय
१) डिजिटल कृषी मिशन साठी एकूण 2,817 कोटी रुपये
२) पीक विज्ञान साठी एकूण 3,979 कोटी रुपये निधीला मंजूरी
३) कृषी शिक्षण आणि व्यवस्थापनाच्या सक्षमीकरण साठी एकूण 2,291 कोटी रुपये
४) शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादनासाठी 1,702 कोटी रुपये
फलोत्पादनाचा शाश्वत विकास करण्यासाठी 860 कोटी रुपये
६) कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरणासाठी 1,202 कोटी रुपयांची तरतुद
७) नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन करण्यासाठी एकूण 1,115 कोटी रुपये मंजूर
वर नमूद केलेल्या 7 महत्वाच्या कल्याणकारी निर्णयांवर सरकार 13,966 कोटी रुपये खर्च करण्याच्या तयारीत आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचावे या व्यापक उद्देशाने केंद्र सरकारने 2817 कोटी रूपयांची तरतूद सुद्धा केली आहे.
काय आहे डिजिटल कृषी मिशन?
डिजिटल कृषी मिशन ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी एक दूरगामी कल्याणकारी योजना असून या योजनेच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञान वापरून बळीराजाचे दरडोई उत्पन्न वाढून त्यांच्या शेतात भरघोस उत्पादन वाढीसाठी या मिशनचा उपयोग होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना बियाण्याची क्वालिटी, हवामानाचा अधिक अचूक अंदाज अन् माहिती, कीटकनाशकांचा योग्य वापर अन् त्यांच्या पिकाच्या विक्रीसाठी योग्य बाजारपेठा यांची माहिती मिळणे या डिजिटल कृषी मिशनच्या माध्यमातून साकार होणार आहे.
शेतकरी ओळखपत्र मिळण्यासाठी असणारी पात्रता
1) सदर शेतकरी हा भारताचा नागरिक असावा.
2) सदर शेतकऱ्याकडे शेतजमीन असून शेतीच्या सात बारा उताऱ्यावर त्या शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक आहे.
3) अर्जदार शेतकऱ्याची पीएम किसान योजना अंतर्गत लाभार्थी असावा.
4) शेतकऱ्याकडे आठ अ नमुना असणे आवश्यक आहे.
5) शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाखाच्या आत असावे.
6) सदर शेतजमिनीत शेतकऱ्याने स्वतः पीक घेतलेले असणे आवश्यक आहे.
शेतकरी ओळखपत्र लाभासाठी आवश्यक कागदपत्रे
1) सदर शेतकऱ्याचा रहिवासी दाखला
2) शेतकऱ्याकडे असलेला शेतीचा सात बारा उतारा
3) शेतकऱ्याचे आधार कार्ड
4) शेतकऱ्याचा मोबाइल क्रमांक
5) शेतजमिनीचा आठ अ नमुना
6) असल्यास किसान क्रेडिट कार्ड
7) शेतकऱ्याचे बँक पासबुक
8) शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
9) शेतकऱ्याचे प्रतिज्ञापत्र
10) नोंदणी करतेवेळी मागितलेली इतर कागदपत्रे
शेतकरी ओळखपत्र लाभासाठी नोंदणी अर्ज करण्याची प्रक्रिया
ज्या इच्छुक शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र (Farmer Id Card) अंतर्गत नोंदणी करावयाची आहे अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नोंदणीसाठी सादर अर्ज करता येणार आहे. शासनाकडून अद्यापपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट जाहीर करण्यात आली नसून केंद्र तसेच राज्य सरकारकडून लवकरच याविषयी माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे. अधिकृत संकेतस्थळ निर्माण झाले की तुम्हाला त्या संकेतस्थळावर अर्ज सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया सदर पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात येईल. जर या शेतकरी ओळखपत्र (Farmer Id Card) ची नोंदणी प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असेल तर तुम्हाला तलाठी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करता येऊ शकेल. मात्र अद्यापपर्यंत सरकारकडून याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.