शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) असे चेक करा

शेतकरी मित्रांनो सरकारने आता शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केले असून त्याशिवाय तुम्हाला पीएम किसान योजनेचा विसावा हफ्ता मिळणार नाही. तुम्ही जर शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज केला असेल तर शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) चेक करण्याची प्रक्रिया आजच्या या लेखातून देण्यात येत आहे.

शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक

शेतकरी मित्रांनो शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) चेक करण्याची प्रक्रिया जाणून घेण्याआधी या योजनेबद्दल थोडक्यात माहिती बघुया. सरकारी योजनांसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी ‘ॲग्रीस्टॅक’ पोर्टलच्या माध्यमातून तयार करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना त्यांची शेतजमीन आधारकार्डशी संलग्न करणे अनिवार्य केल्या गेले आहे. असे केले नाही तर शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, पीक विमा आणि इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही.

शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) असे चेक करा

यासाठी अर्ज कुठे करायचा?

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांची शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करून फार्मर आयडी बनवण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. राज्यातील एकूण एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांची यामध्ये नोंदणी होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या नावावर असलेले सर्व शेतजमीन आपल्या आधार कार्डशी संलग्न केल्यानंतर त्यांना एक विशिष्ट क्रमांक मिळणार आहे. या ओळखपत्र शिवाय तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. त्यासाठी अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर जवळच्या सेतू सुविधा केंद्रात किंवा तलाठीकडे जाऊन करून घ्या.

या शेतकरी ओळखपत्राची गरज काय?

शेतकरी बांधवांनो या विशिष्ट क्रमांकाचा उपयोग भविष्यात शासकीय योजना आणि इतर कृषी संबंधित कामांसाठी होणार आहे. त्यामुळे शेतकरी ओळखपत्र काढण्याच्या कामात कुचराई करू नका. अर्ज करण्यासाठी तलाठी कार्यालय गाठा. किंवा जवळच्या सी एस सी केंद्रावर जा. यासंदर्भात प्रत्येक तहसील कार्यालयात तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांची बैठक घेऊन त्यांना शेतकरी ओळखपत्र बनवण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) असे चेक करा तसेच शेतकरी ओळखपत्र क्रमांकाचे फायदे जाणून घ्या

शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) कशी चेक करावी?

शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा शेतकरी ओळखपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला असेल तर त्या अर्जाची ऑनलाईन स्थिती कशी तपासायची याबदल माहिती जाणून घेऊयात. शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) कशी चेक करावी? याबाबत अधिक माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना नसते. तर काळजी करू नका आजच्या या लेखातून तुम्हाला शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) घरबसल्या चेक करता येणार आहे.

ऑनलाईन स्टेटस कसं चेक करता येते?

तुम्ही सुद्धा ॲग्रीस्टॅकच्या महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटवर तुमचे शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी अर्ज केला असेल, तर आता तुम्हाला ओळखपत्र नोंदणीची स्थिती अगदी सहजपणे घरबसल्या समजू शकेल. शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) जाणून घेण्यासाठी तुम्हाला ॲग्रीस्टॅक या पोर्टलवर जाऊन पोर्टलवरील ‘नोंदणी स्थिती तपासा’ या पर्यायावर क्लिक करून आणि आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. एवढे केले की आपली नोंदणी स्थिती सहजपणे तपासता येऊ शकते.

मात्र लक्षात घ्या शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) स्टेटस चेक करण्यासाठी आधार कार्ड किंवा नोंदणी क्रमांक लागणार आहे. अर्जाची स्थिती चेक करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचाअर्ज क्रमांक आधार कार्ड क्रमांक त्यावर टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाइल क्रमांकावर एक OTP प्राप्त होईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन पेज उघडेल आणि तुमच्या शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) तुम्हाला कळेल. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता. तसेच तलाठी कार्यालयात जाऊन त्यांना विचारपूस करून तुमच्या शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) अर्जाची स्थिती जाणून घेता येईल.

तारीख ठरली! पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता या दिवशी मिळणार

शेतकरी ओळखपत्राचे कोणकोणते फायदे आहेत?

शेतकरी बांधवांनो शेतकरी ओळखपत्र अर्जाची स्थिती (Farmer ID status) घरबसल्या कसे बघायचे याबद्दल आपण माहिती घेतली. आता या शेतकरी नोंदणीचे काय फायदे आहेत हे बघुया.

1) शेतकरी ओळखपत्रामुळे शेतकरी बांधवांना सरकारी योजनांचा थेट लाभ घेता येणार आहे.

2) शेतकऱ्यांसाठी नवनवीन कल्याणकारी योजना अंमलात आणून त्या प्रभावीपणे राबविणे सरकारसाठी सुलभ होणार आहे.

3) शेतकऱ्यांना पीक विम्याचे थेट फायदे पुरविणे या शेतकरी नोंदणीच्या माध्यमातून सरकारला सोईस्कर होणार आहे.

4) देशभरातील शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे याबाबत प्रत्येक शेतकऱ्याची वैयक्तिक अचूक माहिती सरकारकडे असणार आहे.

5) शेतकऱ्यांची इत्यंभूत माहिती सरकारला कळण्यास मदत होईल. तसेच अल्पभूधारक शेतकरी किती आहेत हे सरकार सहजपणे शोधू शकेल आणि त्यांना अनेक लाभदायक योजनांशी जोडू शकेल.

6) शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि सर्व डिजिटल शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!