जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश आपला शेजारी भूतान देश हा नैसर्गिक दृष्ट्या अतिशय अनुकूल देश असून या देशात सर्व कृत्रिम खते आणि कीटकनाशकांवर सरकारने बंदी घातल्याने भूतान शेती आणि कृषी पद्धतींच्या बाबतीत जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश बनला आहे. सरकारचेच आदेश असल्यामुळे रासायनिक खते न वापरता शेतकऱ्यांना सर्व-नैसर्गिक खतांवर अवलंबून राहावे लागते यात प्रामुख्याने जनावरांचा कचरा आणि इतर शेतातील टाकाऊ उप-उत्पादनांचा खते म्हणून वापर केला जातो. ज्यामुळे सेंद्रिय शेती करण्याकडे शेतकरी वर्गाला वळावे लागले आहे.
का घेतला संपूर्ण देशात सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय?
भूतान हा एक छोटा देश असून येथील सरकारला आशा आहे की देशातील शेती मर्यादित करण्याऐवजी कीटकनाशकांवर जर बंदी घालण्यात आली तर शेतीची उत्पादकता वाढेल. आणि भरघोस उत्पादन घेता येईल. चीन आणि भारत या शेजारील देशांकडून मागणी असलेल्या विशेष खाद्यपदार्थांसह अधिक अन्न उत्पादन करणे शक्य होईल. जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश म्हणून भूतान नावारूपाला आला आहे.
कीटकनाशक आणि रासायनिक खते हानिकारक
भूतानचे कृषी आणि वने मंत्री पेमा ग्यामत्शो यांनी एका मुलाखतीत असे मत जाहीर केले की, जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश व्हावे या निर्णयात देशाच्या सरकारसह शेतकऱ्यांची मोठी भूमिका असणार आहे. हा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे कृत्रिम कीटकनाशकांचा वापर करताना जमिनीचा कस कमी होऊन शेतजमिनीचे नुकसान होते ज्यात अनियंत्रित रनऑफचा समावेश आहे ज्यामुळे परिसरातील वनस्पती आणि प्राण्यांवर नकारात्मक आणि हानिकारक परिणाम दिसून येतो. सेंद्रीय शेती करून सकस अन्नधान्य उत्पादित करता येऊन त्यामुळे देशातील शेतजमीन सुद्धा चांगल्या दर्जाची राहण्यास मदत होईल.जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश होणे यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा चांगला बाजारभाव मिळेल.
सेंद्रीय पद्धतीने शेती करण्याचे अनुकूल परिमाण
जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश असलेल्या भूतानमध्ये अलीकडेच विकास आणि सध्याचे तंत्रज्ञान सामान्य माणूस तसेच शेतकऱ्यापर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. भूतान सरकारला खात्री आहे की सेंद्रिय पद्धतीमुळे भविष्यातील हवामान बदलाच्या परिणामांपासून देशाचे संरक्षण होऊन त्याचबरोबर आर्थिक दृष्टिकोनातूनही त्यांना फायदा होऊन शेतकऱ्यांची भरभराट होईल. जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश असलेल्या भूतान देशातील लोकांना सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या ताज्या अन्नधान्य आणि फळभाज्या पालेभाज्या खायला मिळतील.
जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात जाणून घ्या
शेतकऱ्यांच्या मनात सेंद्रिय शेती बद्दल संभ्रम
भूतान देशामधील काही शेतकऱ्यांनी जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश व्हावे म्हणून भूतान सरकारने घेतलेला या निर्णयाबद्दल आणि योजनेबद्दल स्थानिक शेतकरी वर्गाच्या मनात अनेक शंका असल्याचे चित्र आहे. मागील काही काळापासून उच्च तापमानामुळे आणि आक्रमक कीटकांच्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमाल उत्पादनात घसरण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परिणामी शेतीत अधिक कृत्रिम खतांची गरज निर्माण झाली आहे असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
भूतान हे नैसर्गिकदृष्टया अतिशय संपन्न राष्ट्र
भूतान हा एक विकसनशील देश असला तरीही एक नैसर्गिक संपत्ती संपन्न देश आहे. मागील काही दशकांत कीटकनाशके आणि कृत्रिम खतांचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर होत असला तरी भूतान हे नैसर्गिक दृष्ट्या एक अत्यंत टिकाऊ राष्ट्र आहे. याचे कारण म्हणजे भूतान देशाच्या 95% पेक्षा जास्त भागात “स्वच्छ पाणी आणि वीज आहे, देशाचे 80% भाग जंगलांनी व्यापलेला आहे नैसर्गिक संपन्नता पाहून याचा अनेक देशांना हेवा वाटेल अनेकांना हेवा वाटेल अशी परिस्थीती आहे.भूतान हा जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश कार्बन न्यूट्रल आणि अन्न सुरक्षित आहे.
सेंद्रीय शेती करण्याचे कोणते संभाव्य फायदे भूतान देशाला अपेक्षित आहेत?
सेंद्रिय मालासाठी असणारी मोठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ भूतानी शेतीमालाची मागणी वाढणार आहे. देशातील शेतकरी वर्ग आणि रसायनांचा वापर न करणाऱ्या निरोगी जीवनशैलीचा पुरस्कार करायची संधी आहे. निसर्गाशी जवळीक असणाऱ्या जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश भूतान या देशात नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग अजून जास्त प्रभावीपणे केल्या जाऊ शकतो. अन्नधान्याच्या आणि शेती निविष्ठांच्या परदेशी पुरवठ्यावरील भर कमी होऊन त्यासाठी आत्मनिर्भर होण्याची संधी मिळणार आहे. सेंद्रिय खताचे स्थानिक पुरवठादार तयार करणे सुद्धा या निर्णयामुळे शक्य होणार आहे.
पाकिस्तानी शेती बद्दल तुम्हाला माहित नसलेली ही अचंभित करणारी माहिती
परदेशी बियाणं आयात करून आपल्या मातीत रुजवण्यापेक्षा, स्वदेशी बियाण्यांचे सार्वभौमत्व तयार करणं हे भूतान देशाचे उद्दिष्ट आहे. जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश असल्यानं स्थानिक पिकांना प्रोत्साहन मिळणार आहे. सेंद्रीय पद्धतीने शेती केल्यामुळे देशातल्या मातीची सुपीकता वाढवता येणार आहे. इतर पारंपरिक पिकांपेक्षा येथील सेंद्रिय मालाला अधिकचा बाजारभाव मिळणार आहे. स्थानिक लोकांना रोजगाराच्या नवीन संधी तयार होऊन बेरोजगारीची समस्या कमी होणार आहे. जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश भूतान या देशाच्या सरकारने वर दिलेला आशावाद मनाशी बाळगून जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश होण्याच स्वप्न पूर्ण करण्याची कालमर्यादा 2020 पर्यंतच होती. मात्र या अवधीत ती पूर्ण होऊ न शकल्याने भूतान देशाच्या सरकारने हे उद्दिष्ट 2035 पर्यंत पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला आहे.