अभिनेते नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान : तब्बल 55 कोटीपेक्षा जास्त संपत्ती असणारा आणि स्वतःच्या दमदार अभिनयाने हिंदी आणि मराठी चित्रपटांना न्याय मिळवून देणारा एक जिवंत कलावंत श्री. नाना पाटेकर. देशातील शेतकऱ्यांच्या व्यथा पाहून त्यांच्यासारखे जीवन जगून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जीवनाचा उत्तरार्ध अर्पण करण्यास सज्ज झालेला माणसातील एक देवच जणू. नाना पाटेकर आज सर्व झगमगाट बाजूला सारून शेती करून त्यांचे जीवन समाधानाने व्यतीत करत आहेत ही गोष्ट त्यांच्याईतक्या यशस्वी झालेल्या बऱ्याच कमी जणांना जमते.
नाना यांना शेतीची प्रचंड अवड आहे. पण याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे नाना पाटेकर यांना असलेली शेतकऱ्यांच्या आजच्या बिकट परिस्थितीची जाणीव अन् त्यांच्या कल्याणासाठी नांनांच्या मनात असलेली तळमळ. आजच्या या लेखातून आपण नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान आणि शेतीबद्दल त्यांची भूमिका आणि विचार याबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न अन् केली आर्थिक मदत
नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान काय आहे याची तुम्हाला त्यांच्या साध्या राहणीमाणाकडे पाहून कल्पना नक्कीच आली असेल. मागील काही वर्षांपासून स्वतःच्या गावात एक शेतकरी म्हणून स्वतः शेती करणारे नाना पाटेकर यांनी त्यांच्या जीवनात वेळोवेळी शेतकऱ्यांची वेगवेगळ्या प्रकारे मदत केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ते राजकीय लोकांना खडसाविण्यास सुद्धा कधी मागे हटले नाही. त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊन नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान त्यावेळी जगाला दिसले होते. त्यावेळी नाना पाटेकर शेतकऱ्यांचा पाठीशी उभे राहीले होते. एवढेच नाही तर नानांनी शेतकऱ्यांसोबत घडत असलेल्या काही चुकीच्या घडत असलेल्या गोष्टींवर निर्भिडपणे भाष्य केले होते.
शेतात एक छोटा खड्डा खोदून सरकारकडून मिळवा 4800 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात
त्यावेळी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी आपली कठोर भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी म्हटले होते की आधी 80 ते 90 टक्के शेतकरी होते. मात्र आता 50 टक्के शेतकरी आहेत. त्यामुळे सरकारकडे काही न मागता कोणते सरकार निवडायचे याचा गांभीर्याने विचार करून शेतकरी हिताचा निर्णय घेणारे सरकारच निवडून आणा. अशाप्रकारचा सल्ला त्यांनी राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना त्यावेळी दिला होता. आजही नाना गरजूंना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. म्हणुनच असे म्हणता येईल की नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान अतुल्य आहे.
नाना पाटेकर यांनी वेळोवेळी उठवला शेतकऱ्यांच्या हितार्थ आवाज
नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारच्या पदरी परखडपणे मांडताना ते कधीच मागे हटले नाही. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी या मातीशी नाळ जोडलेल्या परखड व्यक्तिमत्त्वाने एक संघटना स्थापन केली होती. आर्थिक दुर्बलतेमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या 180 विधवा पत्नींना प्रत्येकी 15 हजार रुपयांची मदत नाना पाटेकर यांनी केली होती.
नाना पाटेकर यांचे शेतीविषयक ज्वलंत विचार
नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान किती आहे याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचे शेती आणि शेतकरी यांच्याबद्दलच्या विचारांना जाणून घेणे महत्वाचे आहे. नानांच्या मते पूर्वीच्या काळी स्वस्त असलेली प्रत्येक गोष्ट हजारोंच्या पटींनी महाग झाली. मात्र प्रत्येकवेळी शेतकऱ्यांच्याच धान्याची अन् मालाची किंमत कशी वाढत नाही याचे नवल वाटते आणि मनातून जीव सुध्दा जळतो. जो शेतकरी संपुर्ण जगाचा पोशिंदा आहे त्यालाच आज आत्महत्या करण्याची वेळ येत आहे, तरीही शेतकऱ्यांच्या सरकारकडून मागील नाही दशकांत काहीच ठोस पाऊले उचलली गेली नाहीत.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि त्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे. नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान हे खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगे आहे कारण त्यांच्याईतकी तळमळ शेतकऱ्यांबद्दल इतर कुण्याच अभिनेत्याला दिसून येत नाही. नानांचे शेती विषयक योगदान या कारणांमुळे महत्वाचे ठरते ते म्हणजे हा माणूस फक्त भाषण देण्यापुरता मर्यादित नाही. तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नानांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत मिळून शेतीला समृद्धीकडे नेण्याचे ठरवले आहे. आज त्यासाठी त्यांनी पाणी फाउंडेशन या संस्थेची स्थापना 8 वर्ष आधीच केली आहे. अन् शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारच्या भरवशावर न राहता शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आलेले आहेत.
नाना पाटेकर यांनी सुरू केले नाम फाउंडेशन
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि त्यांनी दयनीय अवस्था पाहून नाना यांना खूप वाईट वाटायचे. सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या हितार्थ पाहिजे तशी ठोस पाऊले सरकारकडून उचलल्या जात नाही याची नानांना खंत वाटायची. आपण सुद्धा या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काहीतरी केले पाहिजे असा विचार करुन नाना पाटेकर यांनी मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून नाम या फाउंडेशन ची स्थापना सप्टेंबर 2015 साली झाली. या शेतकरी हिताच्या संस्थेची कार्यप्रणाली जाणून घेतली की नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान आपल्याला कळेल.
नाम फाउंडेशनचे कार्य काय आहे?
नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान हे आपल्याला नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दिसून येते. नाम फाउंडेशन महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे काम करते.
नाम फाउंडेशन बद्दल थोडक्यात माहिती
नाम फाउंडेशन ची स्थापना होण्याअगोदर ऑगस्ट ते सप्टेंबर 2015 या कालावधीत महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत केली. सुरुवातीला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील 2015 या वर्षी आत्महत्या केलेल्या 230 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा बँकचेक, ब्लॅंकेट, साडी-चोळी, वर्षभराचे मेडिकल किट अशाप्रकारची भरघोस मदत देण्यात आली.
मात्र ही मदत मर्यादित स्वरूपाची आहे अस नाना आणि मकरंद यांच्या लक्षात आलं. फक्त काही निवडक कुटुंबीयांना मदत करण्यापेक्षा या मदतीची व्याप्ती वाढवण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना करण्याचे ठरवले. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न राहता, शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे याकडे पण लक्ष देता यावे या उदात्त हेतूने या एका सामाजिक संस्थेची कल्पना पुढे आली.
या कल्पनेचे रूपांतर नाम फाउंडेशन या संस्थेमध्ये झाले. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर 2015 साली पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात नाम फाऊंडेशन संस्थेची नोंदणी करून घेतली. यावरून नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान किती भरीव आहे याची जाणीव झाल्यावाचून राहत नाही.
या संस्थेला मिळणारे आर्थिक स्त्रोत
नाम फाउंडेशन या संस्थेची स्थापना झाल्यानंतर अल्पावधीतच हा शेतकऱ्यांच्या हितार्थ अशा संस्थेमध्ये मदतीचा ओघ सुरू झाला. नाम फाउंडेशनच्या स्थापनेपासून दोनच आठवड्यांच्या आत तब्बल साडेसहा कोटी रुपये जमा झाले. नाम फाउंडेशन या संस्थेला वैयक्तिक देणगीदारांबरोबरच विविध गणेश मंडळे, संस्था, संघटना इत्यादी प्रकारची मदत मिळते. देशातूनच नव्हे तर अमेरिकेसह इतर देशांमधून सुद्धा आर्थिक सहाय्य प्राप्त होते.
नाम फाउंडेशन या संस्थेचा उद्देश आणि नियोजित कार्य
नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान किती महत्वपूर्ण आहे याची कल्पना तुम्हाला त्यांच्या या भरीव कार्यातून कळलेच असेल. नाना आणि मकरंद यांनी सुरू केलेल्या नाम फाउंडेशन संस्थेची स्थापना झाल्यानंतर निश्चितच या संस्थेची व्याप्ती वाढली. अन् परिणामी नाना आणि मकरंद यांच्यावरील जबाबदारी वाढली. मात्र निष्ठेने काम करणे सुरू ठेवून दोघांनीही अनेक लोक संस्थेला जोडले.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबरोबरच झाडे लावणे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, कृषी केंद्रे उभारणे, रोजगार केंद्रे स्थापन करणे असे विविध उपक्रम ही संस्था राबवणार आहे. नाम फाउंडेशन या संस्थेने धोंदलगाव तालूका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर आणि आमला गाव जिल्हा वर्धा ही दोन गावे दत्तक घेतली आहेत. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यातील 500 तरुणांना आणि 30 महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर, नागपूर येथे संस्थेची कार्यालये स्थापन होण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे.
आनंद शिंदे आणि कुटूंब आजही करते गावात शेती, आजही शेतीशी नाळ कायम
उतारवयात स्वाभिमानाने शेतकरी म्हणून साधं जीवन जगणारा नानांसारखा अभिनेता विरळच
नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान आणि परखड भूमिका आपण जाणून घेतली. मात्र वैयक्तिक आयुष्यात सुद्धा शेतकरी म्हणून स्वतः शेती करून साधे जीवन जगणारा हा दिलखुलास अभिनेता मनाच्या कप्प्यात घर करून जातो. नानांनी आजवर केलेली करोडो रुपयांची कमाई एकीकडे आणि नानांना असलेली मातीची ओढ आणि शेतीची आवड एकीकडे. नाना पाटेकर यांचे 25 एकर शेतीत पसरलेले एक टुमदार फार्महाऊस महाराष्ट्रातील खडकवासला येथे असून या फार्महाऊवर राहून ते स्वतःच शेती करतात. नानांचे हे फार्महाऊस दगडांनी बनवलेले असून दिसायला अतिशय सुंदर तसेच रम्य आहे. नाना पाटेकर फार्महाऊसमध्ये राहून सामान्य शेतकऱ्याप्रमाणे एकदम साधे आयुष्य जगतात.
नानांचे शेतकरी म्हणून जीवन कसे आहे?
नाना पाटेकर यांनी मराठीसह हिंदी सृष्टीत स्वतःची वेगळी अन् प्रभावी ओळख तर निर्माण केलीच, शिवाय सामजिक क्षेत्रात सुद्धा एक आदरणीय नाव म्हणुन ओळख निर्माण केली. ती आपलयाला नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान पाहून कळलीच असेल. या खुल्या दिलाच्या माणसाची मुंबईची गर्दी आणि उंच उंच इमारती पाहून घुसमट व्हायची. त्यामुळे मागील 15 वर्षांपासून ते पुण्यातील नाना पाटेकर कुटुंबासह शेतातील घरात राहत आहेत. *नानाची वाडी’ या नावाने प्रसिद्ध असलेलं हे शेतीत असलेलं घर तपुण्यातील खडकवासला येथील डोणजे या गावात आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या 8 ते 10 एकर क्षेत्रावर त्यांनी ही शेती केली आहे. नाना स्वतः या शेतात राबून तांदूळ, हळद इत्यादी पिकं घेतात. या शेतात भव्य अशी विहीर असून घराच्या परिसरात असलेले सिमेंटचे रस्ते, दगडी बांधकाम असलेलं भव्य टुमदार फार्महाऊस आहे.
नानांच्या या शेतातील घराभोवती फळा फुलांची मोठमोठी झाडं आहेत. म्हणूनच जनावरांसाठी गोठा सुद्धा आहे. नानांच्या फार्महाऊसची अनेक सेलिब्रिटींना भुरळ पडते. अनेक राजकीय नेत्यांनीही सुद्धा नानांच्या फार्महाऊस वर हजेरी लावलेली दिसून येते. नानांनी विशेषता म्हणजे इथे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला, मित्राला जेवू घातल्याशिवाय नाना त्यांना जाऊ देत नाहीत. काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या ‘गिरीजा’ गाईला वासरु झालं तिचं नाव त्यांनी ‘जनी’ ठेवलं. नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.