हा प्रसिद्ध अभिनेता करतोय ॲक्टिंग सोडून शेती, शेतीतून होते बक्कळ कमाई

ॲक्टिंग सोडून शेती करणाऱ्या अभिनेत्याची यशोगाथा : आपण आपल्या या शेतीविषयक ब्लॉग मधून नेहमी च यशस्वी शेतकऱ्यांची यशोगाथा जाणून घेत असतो. शेती व्यवसायातून करोडपती झालेल्या अनेक लोकांची उदाहरणे तुम्ही या ब्लॉगच्या यशस्वी शेतकरी या मेनुमध्ये जाऊन वाचू शकता. शेतीत प्रचंड नफा होऊन अनेक शेतकऱ्यांनी आजपर्यंत लाखो करोडो रुपये कमावले आहेत. शेतीची पॉवर काय आहे हे दाखवून देणारी बातमी आपण एका प्रसिद्ध अभिनेत्याने निवडलेल्या शेती व्यवसायाची तसेच शेतीतून केलेल्या भरघोस कमाईची रोचक माहिती जाणून घेणार आहोत. हा अभिनेता ॲक्टिंग सोडून शेती करत आहे. आणि एवढच नाही तर शेती यशस्वी करून लाखो रुपये तर कमावत आहेच, याशिवाय एक आधुनिक शेतकरी म्हणून सुद्धा नावारूपाला आला आहे.

कोण आहे हा अभिनेता जो ॲक्टिंग सोडून शेती करतोय?

तुम्ही जर 90 च्या दशकात जन्म घेतला असेल तर त्यावेळी स्टार प्लस वाहिनीवर येणारी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या लोकप्रिय हास्य मालिकेस आवर्जून पाहिले असेल. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या या प्रसिद्ध अभिनेत्याचे नाव आहे राजेश कुमार. या मालिकेतील हास्य भूमिकेसाठी प्रसिद्ध झालेल्या राजेश कुमार यांनी त्यानंतर अनेक टीव्ही मालिकांत अनेक विस्मरणीय भूमिका केल्या आहेत. याशिवाय या अभिनेत्याने विविध चित्रपटांमध्ये देखील प्रभावी अभिनय केला आहे. मात्र आज हा अभिनेता शेती करून बक्कळ पैसा कमावत आहे. तुमच्या मनात प्रश्न आला असेल की या अभिनेत्याची शेती कुठे आहे आणि हा अभिनेता कशाची शेती करतो? तर या सर्व प्रश्नांची रोचक उत्तरे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला सुद्धा या अभिनेत्याचे कौतुक वाटेल.

 प्रसिद्ध अभिनेता राजेश कुमार करतोय ॲक्टिंग सोडून शेती, शेतीतून होते बक्कळ कमाई

प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांची शेतीविषयी आत्मीयता आणि प्रेम बघून वाटेल कौतुक

शेतीतील खडतर प्रवास आणि प्रारंभी प्रचंड नुकसान

प्रसिद्ध सिने आणि टीव्ही अभिनेता राजेश कुमार यांनी शेती करण्यासाठी शेती करण्यासाठी पालघरमध्ये 17 एकर शेतजमीन खरेदी केली. आणि शेतीच्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. मात्र हा प्रवास खूप खडतर होता. प्रारंभीच्या काळात शेती करताना त्याला अनेक अडचणींचा तसेच आव्हानांचा सामना करावा लागला. त्यावर्षी पालघरमध्ये प्रचंड पूर आला आणि या अभिनेत्याचे संपूर्ण पिक पुराच्या पाण्यात वाहून गेलं. या कारणास्तव शेती व्यवसायाच्या प्रारंभीच ॲक्टिंग सोडून शेती करणाऱ्या राजेश कुमारला प्रचंड नुकसान सहन करावं लागलं.

यामुळे त्याला ‘शेतकरी आत्महत्या का करतात?’ या प्रश्नांचा ज्वलंत अनुभव आला. तो आर्थिक दृष्ट्या अत्यंत डबघाईस आला. त्याला त्याची शेती विकावी लागली .मात्र तो निश्र्चयाचा तसेच जिद्दीचा पक्का होता. आर्थिक संकटांचा सामना करत त्याने कर्ज घेऊन पुन्हा शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि पालघर मध्येच 5 एकर शेती भाड्याने घेतली. आता मात्र त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळायला सुरुवात झाली. दोन ते तीन वर्षातच ॲक्टिंग सोडून शेती करणाऱ्या राजेश कुमार या टीव्ही अभिनेत्याने भरघोस उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली.

शेतीचे ज्ञान आत्मसात करून इतरांना मार्गदर्शन

ॲक्टिंग सोडून शेतीचा निर्णय यशस्वी करणाऱ्या राजेश कुमार या अभिनेत्याने त्याच्या अनुभवातून आणि कष्टातून ज्ञान प्राप्त केले. आणि शेतीत वेगवेगळे प्रयोग करत शेती व्यवसाय यशस्वी करून दाखवला. लॉकडाऊनच्या काळात ॲक्टिंग सोडून शेती करणाऱ्या राजेश कुमारने त्याची शेती पर्यटकांसाठी खुली केली. यामुळे त्याला अधिकाधिक फायदा होऊ लागला. त्याचे जीवन बदलून गेले.

ॲक्टिंग सोडून शेती करणारे टिव्ही अभिनेते राजेश कुमार पर्यटकांना सेंद्रिय शेती बद्दल मार्गदर्शन करताना

त्याने भाड्याने घेतलेल्या 5 एकर जमिनीत सेंदिय शेती करून सेंद्रिय भाजीपाला पिक घेण्यास सुरुवात केली. यासाठी त्याने आधी सेंद्रिय शेतीचा आणि मार्केटिंगचा अभ्यास केला. अन् पर्यटकांसाठी शेतीची पर्यटनाची संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. शेती करणाऱ्या या शेतकऱ्याची शेती पाहायला आता दूरदूरवरून पर्यटक राजेशच्या सेंद्रिय शेतीला भेट देऊ लागले. या पर्यटकांचे चिमुकले शेतीत रमायला लागली. राजेश कुमार पर्यटकांना सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन करू लागला. रोपे कशी लावायची, ती कशी वाढवायची आणि त्यांचे झाडांत रूपांतर कसे करायचे याचे प्रशिक्षण देऊ लागला.

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे एक शेतकरी म्हणून जीवन कसे आहे आणि त्यांचे शेती क्षेत्रातील योगदान जाणून घ्या

लहान मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण केली

आज शेती करणारे टीव्ही अभिनेता राजेश कुमार यांनी पर्यटकांना सेंद्रिय शेती बद्दल अनमोल ज्ञान तर दिलेच शिवाय त्यांच्या मुलांना मोबाईल पासून दूर राहायला सुद्धा शिकवले. शिवाय त्यांच्यात शेतीची आवड निर्माण केली. जे त्यांच्या आईवडिलांना जमलं नाही हे राजेश कुमारने करून दाखवलं. राजेश कुमारला विश्वास आहे की, आजची मुलं शालेय शिक्षणापेक्षा अधिक ‘ऑफलाइन’ अनुभव घेत असताना चांगला प्रगतीचा मार्ग शोधू शकतात. ॲक्टिंग सोडून शेती करणाऱ्या राजेश कुमार यांचे ठाम मत आहे की, मुलांची शेतीत आवड निर्माण झाल्याने त्यांचा मानसिक विकास होऊन ते अधिक कार्यक्षम आणि जिज्ञासू होतात.

ॲक्टिंग सोडून शेती करणारे अभिनेते राजेश कुमार यांच्या शेतात एक चिमुकला शेतीबद्दल माहिती घेताना

आजही करतो पार्ट टाइम ॲक्टिग

शेतकरी मित्रांनो ॲक्टिंग सोडून शेती करणाऱ्या राजेश कुमार या अभिनेत्याने राजेशने अभिनय क्षेत्र पूर्णपणे सोडलेले नाही. आजही तो पार्ट टाईम ॲक्टिंग म्हणून अनेक मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारत असतो. प्रेक्षकांच्या भेटीला येणे सुरूच ठेवले आहे. मात्र आता त्याने पूर्णवेळ व्यवसाय म्हणून शेतीचा स्वीकार केला आहे. आज ॲक्टिंग सोडून शेती करणारा हा जिद्दी अभिनेता एक यशस्वी शेतकरी म्हणून पालघरमध्ये प्रसिद्ध आहे ॲक्टिंग सोडून शेती करणारे राजेश कुमार यांच्या अनुभवावरून शेतीची पॉवर काय आहे याची प्रचिती मिळते. कुठ्ल्याही क्षेत्रात अपयश आल्यास हार न मानता पुन्हा पुन्हा जिद्दीने आणि सातत्याने मेहनत करून प्रयत्न सुरूच ठेवले तर यश हा
हमखास मिळतेच.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!